' मुलाच्या दुष्कृत्यामुळे जॅकी चॅनने स्वतःची संपत्ती दान करायचं ठरवलं आहे!

मुलाच्या दुष्कृत्यामुळे जॅकी चॅनने स्वतःची संपत्ती दान करायचं ठरवलं आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण बघतोच, की बहुतांश पालक आपले कर्तव्य समजून, जीवनावश्यक सुख सोयी पुरवण्या व्यतिरिक्त मुलांना आयुष्य भर पुरेल इतकी धन, संपत्ती कमावून ठेवतात.

भारतात हे हमखास बघायला मिळतेच, कारण हे फार पूर्वीपासून आपल्याकडे चालत आलेले आहे. राजे आपल्या मोठ्या मुलाला युवराज घोषित करून पुढे त्याला राज्य सुपूर्त करीत अशा कथा आहेत. हेच आपण आजही अनुभवतो.

हल्ली उद्योगपती, सिने कलाकार, राजकारणकर्ते, चार्टर्ड अकाऊंटंट, वकील, डॉक्टर जवळ पास सगळेच आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, आपल्या व्यवसाया मार्फत जमेल ती तजवीज करून ठेवतात. आणि त्यात गैर काहीच नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्या मुलांच्या सुखाची, भविष्याची काळजी आपणच करणे अगदी रास्त आहे. पण हे करताना “कोण्या दुसऱ्या व्यक्तीच्या प्रगतीत आपण अडथळा बनतो आहोत का” हा विचार बघायला मिळत नाही.

काही महिन्यांपुर्वी नेपोटिझमला वाचा फोडणारे मोठे प्रकरण आपल्याकडे घडले आहे. त्यात एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, आपल्या मुलासाठी असलेली काळजी दुर्भाग्याने आपल्या धृतराष्ट्र बनवू लागली आहे.

 

nepotism

 

जिथे तिथे आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून, आपल्या अक्षम मुलांना संधी देण्यात येत आहे.

“योग्य व सक्षम व्यक्तीलाच संधी मिळायला हवी, यश, संपत्ती, सन्मान प्रत्येकाने आपल्या मेहनतीने कमवावे, कारण आयते मिळाले की त्याची किंमत माणसाला रहात नाही.” या विचारांच्या व्यक्तींच्या यादीतील एक नाव म्हणजे जॅकी चॅन.

आपण सगळेच जॅकी चॅनला ओळखतो, अगदी तळा गाळातून त्याने आपल्या अथक परिश्रमाने आपले करियर घडवले. जॅकी ची मेहनत इतकी कठोर की त्यांचे सगळे स्टंट सुद्धा ते स्वतः करत.

“माझ्या शरीराचे एकही हाड असे उरले नाही जे फ्रॅक्चर झाले नाही” हे त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी म्हंटले होते.

हॉलिवूडचा इतका प्रसिद्ध अभिनेता, यशाची नव नवीन शिखरे गाठणारे हे नाव, आपल्या एकुलत्या एक मुलाला म्हणजेच जेसी चॅनला आपलीच संपत्ती देऊ पाहत नाही हे आश्चर्याचे आहे, नाही का?

पण या मागचे कारणही तसेच आहे. जॅकी नी एकदा आपली अर्धी संपत्ती आपण सामाजिक कार्यासाठी दान करणार असल्याचे सांगितले होते, पण त्यांनी यात बदल करून आता संपूर्ण संपत्तीचे सुमारे $३५० मिलियन चे दान करण्याचे ठरविले आहे.

 

jackie chan inmarathi

 

कारण, आपला मुलगा इतका सक्षम आहे की त्याने मनावर घेतले तर तो एक दिवस स्वतःचे यशस्वी करिअर घडवेल असा त्यांना विश्वास आहे व त्यांची ईच्छा सुद्धा.

फक्त जॅकी चॅन चा मुलगा म्हणून त्याला वेगळी वागणूक मिळावी, त्याला संघर्ष न करता घर बसल्या काम मिळावे हे जॅकीला अमान्य आहे.

त्याला पैशाची किंमत असावी, परिश्रमाने कमावलेला सन्मान अनुभवायला मिळायला हवा म्हणून जॅकी ने त्याला संपत्तीतून बरखास्त केले आहे.

असे पाऊल उचलण्याची वेळ जॅकी वर का आली असावी चला ते बघुया.

आधी इतर जबाबदार पालकांसारखेच जॅकी ने देखील जेसी ला हव्या असलेल्या सगळ्या किंबहुना आवश्यकते प्रमाणेच काही अधिक अशा सुविधा पुरवल्या. लहानपणा पासून जेसी एक अत्यंत सुखद जीवन जगत आलाय.

आलिशान बंगल्यात राहण्या पासून, वर्ल्ड क्लास टूर्स, वर्ल्ड क्लास शिक्षण, सामान्यांना मिळणार नाहीत असे अनेक अनुभव जे फक्त जॅकीच्या प्रतिष्टे मुळे, आर्थिक परस्थितीमुळे त्याला अनुभवता आले.

आयुष्य सुखकर बनवण्याच्या नादात, जॅकी योग्य ते धडे जेसी ला देऊ शकले नाही की जेसी नेहमी “आपण जेसी चॅन आहोत, आपण व आपले भविष्य दोन्ही सुरक्षित आहेत” या भावनेत वाढला हे विचार करायला लावणारे आहे.

जॅकी ने जेसी चे हॉलिवुड चे करियर घडवण्याचा खूप प्रयत्न केला. २००२ पासून जेसी चित्रपटांत काम करू लागला. त्याने आपल्या सिने-कारकिर्दीत एकूण २० सिनेमे केले आहेत.

 

jaycee chan inmarathi

 

त्यापैकी एकही सिनेमा आपली जादू दर्शकांवर चालवू शकला नाही.

शिवाय, जेसी सोबत केलेला “डबल ट्रबल” हा एक सिनेमा हॉलिवूडच्या इतिहासातील सगळ्यात तोट्यात असलेला व खुद्द जॅकीच्या आयुष्यातला सगळ्यात अयशस्वी सिनेमा ठरला.

या सिनेमाचे प्रदर्शन इतके वाईट ठरले, की त्याची कमाई फक्त ९००० डॉलर इतकीच झाली. अभिनयाव्यतिरिक्त गायन, वादन या क्षेत्रात देखील जेसी ने आपले भाग्य आजमावाण्याचे प्रयत्न केले, पण तो पूर्ण पणे अयशस्वी ठरला.

ह्यात भर म्हणजे २०१४ ला जेसी चॅन बीजिंग येथे काही अमली पदार्थांचा वापर करताना पकडला गेला. प्रकरण इतके चिघळले, की जॅकी चॅनला याची दखल घेऊन समस्त चाहत्यांची माफी मागावी लागली.

जेसी च्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या असलेल्या वागण्याने जॅकी हे पाऊल उचलण्यास प्रवृत्त झाला असावा. जेसी मध्ये योग्यता असेल तर तो आपला मार्ग स्वतः शोधेल व आपले उदरनिर्वाहाचे साधन स्वतः शोधेल.

 

jaycee chan 2 inmarathi

 

कारण जर तो अयोग्य असेल तर माझी संपत्ती उधळून टाकेल असे जॅकी ने एका अवॉर्ड समारंभात म्हंटले.

आपली एवढी संपत्ती दान करणाऱ्या नावाजलेल्या व्यक्तींमध्ये जगातील सगळ्यात मोठे गुंतवणूकदार वॉरन बफे, मायक्रोसॉफ्ट चे संस्थापक बिल गेट्स, e bay चे संस्थापक Pierre Omidyar ही नावे देखील सामील आहेत.

यांच्या कडूनच प्रेरणा घेऊन जॅकी चॅनने हा निर्णय घेतल्याचे देखील त्यांनी सांगितले.

जॅकी चॅन सद्ध्या UNICEF goodwill ambassador आहेत ज्या मार्फत ते animal abuse विरोधात व प्राणी संरक्षणाची कामे करतात.

शिवाय १९८८ मध्ये त्यांनी “Jackie Chhan Charitable Foundation” ची स्थापना केली आहे ज्या अंतर्गत ते नैसर्गिक आपत्तीत ग्रासित व दुखावलेल्या माणसांची मदत करतात.

आपल्या मृत्यू नंतर आपली संपूर्ण संपत्ती सत्कारणी लागावी यासाठी हा कठोर निर्णय घेतलाय.

 

jackie chan son inmarathi

 

मुलांना सुख-सोयी पुरविताना कष्ट करून पैसा मिळवणे सोपे नसते.

त्यामुळे पैश्यांचे नियोजन करणे, मुलांना हातचे राखून खर्च करण्याच्या ह्या सवयी लावण्याचे व लख लखते नशीब कसे मिळाले ह्याची जाणीव करून देण्याचे काम पालकांचे असते.

चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेली बाळं जबाबदारीने वागतील हे पाहणे पालकांचे कर्तव्य असते व तसे आपण वागायला हवे हे सांगण्यासाठी जॅकी चॅन सारखी माणसं आपल्या पुढे श्रेष्ठ उदाहरण आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?