' जाहिरातींमधल्या महागड्या वस्तूंपेक्षा या सवयी तुम्हाला सर्वार्थाने “चार्मिंग” बनवतील – InMarathi

जाहिरातींमधल्या महागड्या वस्तूंपेक्षा या सवयी तुम्हाला सर्वार्थाने “चार्मिंग” बनवतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या आजूबाजूला अनेक असे मित्र मैत्रिणी असतात, जे सगळ्यांनाच आवडतात. कितीही अवघड परिस्थिती आली, तरीही त्यांच्याकडे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग असतो.

कुठल्याच परिस्थितीत ही मंडळी हार मानत नाहीत. आपल्या आयुष्यातील निर्णय आपल्या पद्धतीने घेतात आणि त्यात यशस्वी होऊन दाखवतात.

अशीच काहीशी लक्षण असतात एका चार्मिंग व्यक्तिमत्त्वाची. आपल्यापैकी प्रत्येकालाच आपलंही व्यक्तिमत्त्व चार्मिंग हवं असं वाटत असतं. मग त्यासाठी इंटरनेट वरअनेक गोष्टींचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होते.

चार्मिंग व्यक्तिमत्त्व तयार करण्यासाठी जाहिराती बघून आपण आपलं असलेलं व्यक्तिमत्त्व देखील हरवून बसतो. यातून आपल्याला नैराश्य देखील येण्याची शक्यता असते.

त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व चांगल्या पद्धतीने खुलवण्यासाठी, आम्ही सांगत आहोत त्या ७ गोष्टींची काळजी घेतली, तर तुमचं व्यक्तिमत्त्व नक्कीच खुलून दिसेल. 

चला तर मग जाणून घेऊयात कुठल्या आहेत या सात गोष्टी…..

 

१. स्मितहास्य करायला शिका

 

teeth care inmarathi
burienfamilydentalcare.com

 

अनेक वेळा आपण एखाद्या गंभीर परिस्थितीत अडकलेले असतो. “अशाही परिस्थितीत आपण मार्ग काढू शकतो” हे आपल्या मनाला नेहमी सांगत रहा आणि एक पॉझिटिव्ह स्माईल तुमच्या चेहऱ्यावरती असू द्या.

तुमच्या आजूबाजूला कितीही बिकट परिस्थिती असली, तरीही स्माईल करणे हे त्याचं उत्तर आहे. तुमच्या याच पॉझिटिव्ह स्माईल मधून तुम्हाला मार्ग मिळत राहील.

सतत हसत खेळत असणारी आणि प्रसन्न व्यक्ति प्रत्येकालाच आपलीशी वाटते.

 

२. स्थितप्रज्ञ असणे

 

ratan tata inmarathi 6
livemint.com

 

आताच सांगितल्याप्रमाणे, आयुष्यात अनेक चांगले वाईट प्रसंग येत असतात. या सर्व प्रसंगाला आपण सारख्याच पद्धतीने सामोरं जाणं हेच चार्मिंग व्यक्तीचं महत्त्वाचं लक्षण असतं.

भरपूर यश मिळाल्यावर हुरळून जायचं नाही आणि पराभव झाल्यावर देखील हार मानायची नाही. 

त्यामुळे, जर तुम्हाला चार्मिंग व्यक्तिमत्त्व घडवायचं असेल, तर आयुष्यातील कुठल्याही प्रसंगात नेहमीच शांत आणि संयमी भूमिका घ्यायला हवी.

 

३. इतरांना आधार देणे

 

counselling inmarathi
addictioncenter.com

 

आपल्याशी लोकं कसे वागतात याहीपेक्षा आपण इतरांना किती आधार देतो ही बाब महत्त्वाची असते.

चार्मिंग व्यक्ती त्यांच्या वागण्या – बोलण्यातून इतर व्यक्तींना नेहमीच आधार देत असतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून इतरांना बरं वाटतं. हे इतरांना बरं वाटणं चार्मिंग व्यक्तिमत्त्वाचं महत्त्वाचं लक्षण आहे.

त्यामुळे येथून पुढे इतरांशी बोलताना त्यांना कशाप्रकारे मदत होईल याचा विचार करत जा.

 

४. आपले छंद जोपासा

 

mom daughter dance inmarathi
theaustinchronicle.com

 

आपले छंद जोपासल्यामुळे आपल्यातील आनंद आणि लहान मूल जिवंत राहतं. या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या केल्यामुळे तुम्हाला आनंद मिळू शकतो.

आपल्यामध्ये आणि चार्मिंग व्यक्तींमध्ये एवढाच फरक आहे, की परिस्थितीला दोष देत आपण आपले छंद जोपासत नाही आणि चार्मिंग व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत आपले छंद जोपासायचे सोडत नाहीत.

या छंदामधून त्यांना एक सकारात्मक ऊर्जा मिळत असते. त्यामुळे येथून पुढे आपल्याला आवडणारा एक तरी छंद जोपासा.

 

५. आपुलकीने वागणे

 

help inmarathi
guidepost.com

 

दैनंदिन आयुष्यात वावरत असताना आपण अनेक अडचणी आणि व्यथा घेऊन फिरत असतो, पण लक्षात ठेवा, अडचणी आणि व्यथा फक्त आपल्या आयुष्यातच नाही, तर इतरांच्या आयुष्यात देखील आहेत.

संधी मिळाल्यावर फक्त आपल्याच व्यथा मांडण्यापेक्षा कधीतरी समोरच्या व्यक्तीच्या व्यथा देखील ऐकून घ्या. कदाचित आपल्याही पेक्षा जास्त त्रास ती व्यक्ती सहन करत असेल.

इतर व्यक्तींमध्ये आणि त्यांच्या आनंदात- दु:खात सहभाग घ्या. यामुळे तुम्ही त्या व्यक्तीसाठी आपलेसे व्हाल.

 

६. आत्मविश्वासाने संवाद साधा

 

Job Interview inmarathi

 

मित्रांनो, लक्षात ठेवा संवाद फक्त शब्दांच्या माध्यमातूनच होत नसतो, तर तुमच्या इतर बॉडी लैंग्वेज मधून देखील तुम्ही समोरच्या व्यक्तीशी संवाद साधत असता. सर्वात जास्त संवाद हा डोळ्यांच्या माध्यमातून होतो.

आपला आत्मविश्वास दाखवण्यासाठी नेहमी संवाद साधताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये- आत्मविश्वासाने नजर देत त्यांच्याशी संवाद साधावा.

त्यामुळे त्या व्यक्तीवर आपली छाप पडते आणि आपल्या विचारांनी ती प्रेरित होऊ शकते.

 

७. खरं बोला

 

raju 3 idiots rastogi interview file closing inmarathi

 

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात, जे फक्त आपल्याला इम्प्रेस करण्यासाठी अनेक वेळा खोटं बोलतात, पण लोकप्रिय व्यक्ती कधीच इतरांशी संवाद साधताना खोटं बोलत नाहीत किंवा दुसऱ्यांना आनंदी करण्यासाठी खोट्या भावनांचा वापर करत नाहीत.

तुम्ही देखील आयुष्यात नेहमीच “सत्यपणा” जपला, तर लोकांना तुम्ही सहज आपलंसं करू शकता. 

खरं बोलताना समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल, अशा पद्धतीने ते बोललं जाऊ नये याची मात्र काळजी घ्या.

वाचकहो, खरा “चार्मिंग”पणा हा दिसण्यात नाही, तर स्वभावात असतो. तुमचं रूप कालांतराने बदलू शकतं, पण तुमचं वागणं कायम लोकांच्या स्मरणात असतं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?