' ह्या एका माणसाच्या धाडसी निर्णयामुळे जगावर आलेलं तिसऱ्या महायुद्धाचं सावट दूर झालं! – InMarathi

ह्या एका माणसाच्या धाडसी निर्णयामुळे जगावर आलेलं तिसऱ्या महायुद्धाचं सावट दूर झालं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

युद्धामुळे प्रश्न हे कधीच सुटत नाहीत, उलट ते आणखीन चिघळतात आणि त्यात होरपळला जातो तो सामान्य माणूस. जगात झालेली २ विश्वयुद्ध आणि  त्याच्या कटू आठवणी आजही कित्येक लोकांच्या मनात खोलवर रुजलेल्या आहेत!

खासकरून दुसरं महायुद्ध आणि त्याच्या शेवटाला अणुबॉम्ब मुळे उध्वस्त झालेली हिरोशिमा नगासाकी ही २ शहरं आणि ती वाताहात, ती घटना आजही आठवली तरी कित्येकांच्या काळजाचा थरकाप उडतो!

६ ऑगस्ट ह्या दिवशी अमेरिकेने जपानवर दोन अणूबॉम्ब टाकून दुसऱ्या महायुद्धाची सांगता केली. मित्र पक्षाचा विजय नक्की झाला. पण जपानचं कधीच भरून न निघणारे नुकसान झाले.

लाखो लोकं मारली गेली. एक पिढी विविध आजार घेऊन जन्माला आली.आर्थिक घडी कोलमडून पडली.

 

japan nuclear attack inmarathi
en.wikipedia.org

 

अणुबॉम्बचा हा झालेला दूरगामी परिणाम पाहता ६ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक अण्वस्त्र जागृती दिवस’ म्हणून जगभर पाळला जातो. तर, जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी वर झालेला हा अणुहल्ला जगाने पहिल्यांदाच पाहिलं होता.

आणि असंच आण्विक युध्द पुन्हा दिसेल असं शीतयुद्ध काळात वातावरण तयार झालेलं.

आपल्या वर्चस्वाच्या लढाईत अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत रशिया हे अनिर्बंध वागत होते. व्यापार, संरक्षण, डिप्लोमॅट सगळ्या स्तरावर एकमेकांना धोबीपछाड देण्याच्या मागे हे लागले होते.

एक चुकीचा निर्णय आणि युद्धाला तोंड फुटेल एवढे या दोन देशांमधील संबंध ताणले गेले होते. शिवाय दोनही देश हे अण्वस्त्रसज्ज. युद्धाला तोंड चुकून फुटलं तर जगाचा विनाश नक्की होता.

अमेरिका आणि सोव्हिएत रशिया हे एवढे प्रगत देश होते की अंतराळात त्यांनी असे उपग्रह सोडले होते की आपल्यावर होणाऱ्या हल्ल्याची जाणीव त्यांना बराच वेळ आधी मिळत असे.

 

us and russia inmarathi
bbc.co.uk

 

आणि सोव्हिएत रशियाच्या याच उपग्रहाच्या चुकीच्या संदेशवहनामुळे पुन्हा एकदा जग अणूयुद्धाच्या दारावर येऊन पोहोचला होता.

तर, दिनांक २६ सप्टेंबर १९८३. सोव्हिएत रशियाच्या आण्विक हल्ल्याची पूर्व सूचना देणाऱ्या यंत्रणेने अमेरिकेच्या बेस वरून पाच आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईल लॉन्च झाल्याचे कळवले.

त्यावेळेस वायुसेनेत अधिकारी असलेले स्टॅनिस्लाव्ह पेट्रोव्ह ड्युटी वर होते. पेट्रोव्ह मॉस्कोच्या ज्या ऑफिस मध्ये कार्यरत होते तिथे या हल्ल्याची पहिली माहिती मिळाली.

पेट्रोव्ह ऑन ड्युटी होते आणि त्यांच्या ऑफिस मधले कम्प्युटर धडदड संदेश देऊ लागले. रशियाने अंतराळात सोडलेल्या ओको ५ या लष्करी टेहळणीसाठी सोडलेल्या उपग्रहाची ही माहिती होती.

आणि ही माहिती पेट्रोव्ह ज्या कम्प्युटर वर घेत होते त्याचं नाव होतं सर्पुकोव्ह १५.

क्षेपणास्त्राच्या इंजिन मधुन बाहेर पडणाऱ्या उष्णतेचे मोजमाप करून त्याची दिशा बेस स्टेशनला कळवणे अशी सिस्टीम ओको ५ या उपग्रहात होती.

आलेले संदेश पुन्हा पुन्हा पडताळून पाहणे हे ऑन ड्युटी अधिकाऱ्यांचे काम असते. पेट्रोव्ह यांनी सुद्धा मिळालेली माहिती खरी आहे का हे पाहण्यासाठी स्वतः संगणकाजवळ आले.

 

patrov inmarathi
vox.com

 

पण, ओको ५ ने ‘कन्फर्म’ म्हणून दिलेला मेसेज पाहून पेट्रोव्ह यांच्या पायाखालची जमीन सरकली. कमांडिंग ऑफिसर या नात्याने पेट्रोव्ह यांनी आपल्या सतसत विवेक बुद्धीचा वापर केला.

एक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागुण आण्विक युद्ध सुरू करेल एवढी अमेरिका मूर्ख नाही,असा विचार करून त्यांनी एक विचार पक्का केला.

आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊन मिळालेली माहिती चुकीची आहे हे स्पष्ट सांगून टाकले. वरिष्ठ स्वतः ते मिळालेले संदेश पाहण्यासाठी आले. संगणक पुन्हा पुन्हा हल्ल्याची सूचना देत होता.

पेट्रोव्ह आपल्या अंतर्मनाची हाक ऐकून वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.’हल्ल्याच्या सर्व सूचना चुकीच्या आहेत!’ पेट्रोव्ह म्हणतात,

‘अमेरिकेने केलेल्या कथित हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून सोव्हिएत ने सुद्धा क्षेपणास्त्र डागले असते तर जग अणूयुद्धच्या खोल दरीत फेकला असता.’

 

nuclear attack inmarathi
4synapses.com

 

बीबीसी ला दिलेल्या मुलाखती मध्ये पेट्रोव्ह सांगतात,

माझ्या समोर असलेली माहिती आहे तशी पाठवली असती तरी मला कोणी काही बोललं नसत. सर्वोच्च अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे काम होते. त्यावेळी मी जागेवरून हलू सुद्धा शकत नव्हतो. तापलेल्या तव्यावर बसलो आहे अशी माझी अवस्था झाली होती.

ट्रेनिंग दरम्यान शिकवण्यात आलेलं सगळं टेक्निकल ज्ञान बाजूला ठेवून पेट्रोव्ह यांनी थेट आपल्या सिनीयर्सना गाठले. आणि मिळालेली माहिती चुकीची आहे हे ठणकावून सांगितलं.

त्यांचा दावा जर चुकीचा निघाला असता तर पुढच्या पाच मिनिटात त्यांचं ऑफिस,पूर्ण मॉस्को शहर त्या हल्ल्यात बळी पडले असते.

‘साधारण २० मिनिटांनी माझ्या लक्षात आलं की काहीच घडलेलं नाही. उपग्रहानी दिलेली माहिती खरी असती तर आतापर्यंत सगळे नष्ट झाले असते. तसे काही झालेलं नव्हतं. आणि मी सुटकेचा निश्वास सोडला.’

पुढे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली. सोव्हिएतच्या उपग्रहानी ढगातून परावर्तित झालेल्या सुर्यकिरणांना क्षेपणास्त्र समजून संदेश पाठवल्याचे उघड झाले.

स्टॅनिस्लाव्ह पेट्रोव्ह यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे जग विनाशपासून लांब राहिलं.

 

patrov feaatured inmarathi
dailymail.co.uk

 

दरम्यान आज अनेक वर्षे ‘जगाला वाचवणारा माणूस’ म्हणून त्यांची लष्करी जगतात ओळख प्रसिद्ध झाली.

तर, अशाप्रकारे पेट्रोव्ह यांनी दाखवलेल्या आपल्या विवेक बुद्धीच्या प्रदर्शनाने तिसरं महायुद्ध आणि आण्विक हल्ल्यात जगाची होणारी हानी टाळली.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?