' विपरीत परिस्थितीत सकारात्मक मनःस्थिती ठेवण्यासाठी हा फॉर्म्युला वापरा! यशाची १००% खात्री! – InMarathi

विपरीत परिस्थितीत सकारात्मक मनःस्थिती ठेवण्यासाठी हा फॉर्म्युला वापरा! यशाची १००% खात्री!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक रहावं हे आपण भारतीयांना कायमचं शिकवण्यात येतं. भारतात जितक्या प्रखरतेने ऋतू बदल होत असतात ते बदल जगातील फार कमी देशांमध्ये बघायला मिळतात. एकीकडे दुष्काळी भाग असतो तर त्याच वेळी दुसऱ्या भागात पुर आलेला असतो.

एक वर्ग हा कायम जगण्यासाठी संघर्ष करत असतो तर दुसरा वर्ग हा टॅक्स कसा वाचवता येईल याचे मार्ग शोधत असतो. आजूबाजूची ही परिस्थितीच आपल्याला ‘अंदर से स्ट्रॉंग’ बनवत असते आणि कोणत्याही परिस्थतीला सामोरं जाण्याची शक्ती देत असते.

पुस्तकात वाचतांना हे खूप छान वाटतं, की ‘आयुष्य जर का सरळ असेल तर किती बोरिंग असेल’. पण, जेव्हा अशी कठीण परिस्थिती समोर येऊन ठेपते तेव्हा जनजीवन कधी पूर्ववत होईल याची वाट सुद्धा आपणच बघत असतो.

एकदा तो ढळला की, काही लोक आत्महत्या सारखा पर्याय निवडताना आपण सध्या जवळपास रोज ऐकत आणि वाचत आहोत. काय करावं? ‘फोकस’ ढळू न देण्यासाठी :

 

१. थोडा वेळ घ्या :

 

take your time inmarathi

 

तुमच्या मनातील प्रश्नांना थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा. काही लोक उलट करतात. ते त्यांच्या समस्या सोडवण्याच्या मागेच लागतात. पण, जेव्हा अपेक्षित उत्तर मिळत नाहीये तेव्हा थोडा ब्रेक घ्या.

तुमच्या प्रश्नांना थोडं दूर जाऊन बघा. ते तुम्हाला छोटे वाटतील. प्रश्न सोडवण्यासाठी विविध पर्याय तुमच्या लक्षात येतील. जसं म्हणतात की, ‘Dont magnify your problems’ किंवा ‘Dont let any problem look bigger than you.’

हे नेहमी लक्षात ठेवलं तर फार कमी प्रश्न तुमच्या मनाचा ताबा घेतील.

 

२. ध्येय निश्चित करा :

 

set goals inmarathi

 

प्रत्येक वेळी प्लॅन A वर्क होईलच असं नाहीये. तो नाही चालला तर प्लॅन B कडे जाण्यात काहीच गैर नाहीये. प्लॅन A चं ओझं डोक्यावर ठेवून काहीच न करण्यापेक्षा निदान प्लॅन B वर तरी काम करावं.

कारण, कृती केल्यानेच गोष्टी साध्य होतात. नुसत्या विचारांनी काहीच घडत नाही. आपली जडणघडण ही बऱ्याच वेळेस केवळ एव्हरेज जगण्यासाठी केलेली असते.

ते barriers आपणच तोडले पाहिजेत आणि स्वतःसाठी नवीन स्टॅंडर्ड सेट केले पाहिजेत. ते करण्यासाठी मनासारख्या गोष्टी न घडणे हा एक संकेत समजावा आणि आपल्या ध्येयात किंवा ध्येयप्राप्तीच्या मार्गात काही बदल करावे लागतील का ते बघावं.

प्रवाहा सोबत पोहोणं हे तर कधीही सोपं असतं. कधी प्रवाहाविरुद्ध पोहून सुद्धा स्वतःला टेस्ट करावं.

 

३. सेकंड ओपिनियन :

 

second opinion inmarathi

 

एखादा आजार बरा होत नसेल तर ज्याप्रमाणे आपण सेकंड ओपिनियन घेतो. तसंच, तुमच्या असयुष्यात काही लोकांना मार्गदर्शकाचं स्थान नक्की द्या. ही माणसं तुमच्या प्रश्नाकडे तटस्थपणे बघून तुम्हाला योग्य पर्याय निवडायला मदत करु शकतात.

कोणतीही आयडिया चांगली असणं महत्वाची असते. ती आयडिया किंवा ते लॉजिक कोणाचं आहे हे महत्वाचं नसतं. ‘Right Logic should Win.’ हे कायम लक्षात ठेवावं.

‘माझाच मार्ग योग्य’ म्हणून स्वतःच्या अहंकाराला कुरवाळत बसू नका.

 

४. चांगल्या गोष्टींची आठवण करा :

 

happy memories inmarathi

 

एखाद्या व्यक्ती सोबत सगळं वाईटच घडतं असं कधीच होत नाही. आपल्या सोबत घडलेल्या चांगल्या गोष्टींची कठीण काळात आठवण काढा. सध्या तर तुम्ही निरोगी आहात ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे.

आपलं कुटुंब असेल किंवा मित्र असतील ते आपल्याला कठीण समयात सुद्धा साथ द्यायला तयार आहेत यासाठी त्यांचे निदान मनातल्या मनात आभार माना. चांगल्या गोष्टी आपोआप तुमच्यापर्यंत पोहोचतील.

 

५. फेज :

 

life phase inmarathi

 

कोणतीच परिस्थिती ही कायम सारखी नसते हे स्वतःला सांगा. मग, ती वाईट असो किंवा चांगली. प्रत्येक परिस्थतीकडे एक फेज म्हणून बघायला शिका. त्रास कमी होईल.

सध्या कठीण परिस्थिती म्हणजे तुम्ही हसू शकत नाही असं अजिबात नाहीये. जसं प्रत्येक रात्री नंतर उजेड हा होणारच आहे तसंच, तुमच्या प्रश्नांवर उत्तर हे तुम्हाला मिळणारच आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवा.

 

६. पेशन्स :

 

patience inmarathi

 

आजपर्यंत पेशन्स म्हणजे ‘वाट बघणे’ हाच अर्थ आपल्याला माहीत आहे. पेशन्स म्हणजे तुमच्या ध्येयप्राप्तीच्या मार्गावर तुमचा attitude चांगला ठेवणे. “मी जे करतोय ते योग्यच आहे” हे स्वतःला सांगत राहणे आणि धोपट मार्ग न सोडणे.

पेशन्स म्हणजे तुमच्या कम्फर्ट झोन च्या बाहेर पडून गोष्टी साध्य करणे. या मार्गावर तुम्ही एकटेच असणार आहात हे सतत स्वतःला सांगत राहणे. एकांतात सुद्धा खूप शक्ती असते हे मान्य करणे.

कोणतीही गोष्ट पाहिजे म्हणजे त्यासाठी किती त्याग करण्याची तुमची तयारी आहे हे चेक करणे म्हणजे तुमच्यात पेशन्स असणे. यशाच्या मार्गावर संघर्ष मिळतो हे आपल्याला माहीत आहे.

पण, संघर्ष हाच एक राजमार्ग आहे हे आपण मान्य करायला काही वेळेस कचरतो. ते मान्य करा आणि कार्य करत रहा. 

 

७. नकारात्मकता :

 

negativity inmarathi

 

काही वेळेस आपण इतरांच्या नकारात्मकतेला खूप महत्व देतो आणि त्यांना एखादा पर्याय सांगण्या ऐवजी आपणच त्यांच्यासारखे विचार करायला लागतो. ते करणं प्रकर्षाने टाळा. त्यासाठी कायम हसतमुख रहा.

प्रत्येक गोष्ट ही मनाला लावून घेण्यासाठी नसते. इतरांना तुमच्यातील कोणती गोष्ट आवडत नसेल तर त्यासाठी लगेच स्वतःला बदलू नका. कोणाला इम्प्रेस करण्यासाठी प्रयत्न करू नका.

तुम्हाला चांगलं व्हायचं आहे म्हणून स्वतःमध्ये बदल करा. इतरांना जे अशक्य वाटतं ते साध्य करण्यात जे समाधान आहे ते इतर कोणत्याही गोष्टीत नाहीये. अशक्य गोष्ट सध्या करण्यासाठी कायम प्रयत्नशील रहा.

हे सगळं ज्ञान आपण लक्षात ठेवलं तर आजूबाजूची परिस्थती सुखकर वाटेल आणि मिळालेलं आयुष्य चांगल्या पद्धतीने कसं जगूयात असे विचार मनात येतील.

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हे स्वतःला कायम सांगत रहा आणि प्रत्येक क्षणाकडे एक संधी म्हणून बघा आणि त्याचं सोनं करा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?