' या ९ अगदी स्वाभाविक सवयी तुमच्या मेंदूची प्रचंड प्रमाणात हानी करत आहेत! वाचा

या ९ अगदी स्वाभाविक सवयी तुमच्या मेंदूची प्रचंड प्रमाणात हानी करत आहेत! वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“Boost is the secret of my energy” हे वाक्य आपण लहानपणापासून त्यांच्या जाहिरातीत ऐकत आहोत. बऱ्याच सेलेब्रिटी लोकांना, खेळाडूंना हा प्रश्न वारंवार विचारला जातो की, “इतकी एनर्जी तुम्ही आणतात कुठून?”

याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमिताभ बच्चन सर. नुकतीच त्यांनी कोरोना वर सुद्धा मात केली आणि आपल्या घरी सुखरूप परतले.

वयाची पंचाहत्तरी उलटून गेली असली तरी हा मनुष्य तरुणांना लाजवेल इतक्या उत्साहाने नवीन कामासाठी सदैव तयार असतो.

 

amitabh inmarathi

 

काम कोणतंही असू द्या – सिनेमा, छोटा रोल, जाहिरात, सरकारी निवेदन. सगळीकडे सारखीच ऊर्जा. खरंच कोणती गोष्ट त्यांना ही ऊर्जा देते?

काम करण्यामागे प्रत्येकाचा उद्देश हा वेगवेगळा असू शकतो. पण, ते करत असताना तुमची एनर्जी कशी टिकवावी हे शिकणं सध्या फार गरजेचं झालं आहे.

कोणत्या गोष्टी करण्यापेक्षा कोणत्या गोष्टी करू नयेत हे जाणून घेतल्या तरी आपण या ‘अदृश्य’ स्पर्धेत स्वतःला शेवटपर्यंत फिट ठेवू शकतो.

या गोष्टी केल्या नाहीत, तर तुम्हीही तुमची ऊर्जा कायम टिकवून ठेवी शकता. यासाठी काही सवयी मोडणं गरजेचं आहे.

 

१. कमी झोप :

 

less sleep inmarathi

 

जेव्हा तुम्ही शांत झोप घेत नाही, तेव्हा तुम्हाला अशक्त वाटणं हे साहजिकच आहे. कमी झोप झालेली असली, की त्या दिवशी तुम्ही अर्धवट एनर्जीने काम करत असता.

तुमच्या कडून जितकी productivity अपेक्षित आहे, तितकी तुम्ही देऊच शकत नाही.

नुसतं कामावर हजर राहण्याचे दिवस आता राहिले नाहीयेत.  तुम्ही कामाच्या ठिकाणी पूर्ण एनर्जी आणि मनाने सुद्धा हजर आहात हे तुमच्या बॉसला तुमच्या कडून अपेक्षित असतं.

तुम्ही जास्त वेळ काम करून फायदा नाहीये. तुम्ही दिलेल्या वेळातच तुमचं काम संपवायला शिकणं हे गरजेचं आहे. नाही तर, तुम्हाला आवश्यक तेवढी झोप मिळणार नाही.

 

२. भूतकाळात/ भविष्यातील स्वप्नांत रमणे :

 

daydream inmarathi

 

प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो. एक गोष्ट असते. तुम्ही त्यातच घुटमळत राहिलात तर पुढे कसे जाणार?

ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या विसरून जाणे आणि नवीन क्षणाचं स्वागत करणे इतकंच आपल्या हातात असतं. तसं न केल्याने त्रास हा तुम्हालाच होणार असतो.

या गोष्टी प्रकर्षाने टाळाव्यात आणि वर्तमानात जगावं म्हणजेच – Be Present wherever you are.

भविष्यातील स्वप्ने साकार करण्यासाठी त्यामध्ये रममाण न होता त्यासाठी प्रयत्न करा.

 

३. कमी पाणी पिणे :

 

drinking water girl inmarathi

 

शरीरात पाणी कमी असल्याने तुमच्या उत्साहात खूप फरक पडतो. तुमचा मेंदू सुद्धा लवकर थकत असतो. पेट्रोल नसलेली गाडी कशी चालणार? तसंच आपल्या शरीराचं सुद्धा आहे.

Dehydration झालं, की तुम्ही अजिबात मन एकाग्र करू शकत नाही आणि तुमच्यातली ऊर्जा ही मोबाईलच्या बॅटरी सारखी झपझप कमी होत असते.

म्हणून, जास्त पाणी प्या आणि उत्साही रहा.

 

४. सकस आहार न घेणे :

 

junk food eating inmarathi

 

रोज बाहेरचं खाणं हे जर का तुमचं रुटीन असेल तर तुम्ही जंक फूड खाणं हे अगदीच क्रमप्राप्त आहे.

आपण तिथे कोणत्या प्रकारचं तेल वापरत आहेत किंवा किती स्वच्छ वातावरण आहे हे बघू शकत नाही. परिणाम असा होतो की, भरपूर खाऊनही अवस्थ वाटत असतं आणि ठराविक काळानंतर तुमची एनर्जी लेव्हल ही सातत्याने कमी होते.

दिवसभर energetic राहण्यासाठी ‘सकस आहारा’ ची गरज ओळखून त्याला प्रथम प्राधान्य देणं हे खूप आवश्यक आहे.

 

५. सतत बैठे काम :

 

work from home inmarathi 1

 

एक काळ होता जेव्हा प्रत्येक कामासाठी आपल्याला बाहेर जावं लागायचं. दिवसेंदिवस ती गरज अगदीच कमी होत आहे. सगळं काही ऑनलाईन ऑर्डर करता येत असल्याने आपण अगदी आवश्यक कामासाठीच बाहेर पडतो.

आपल्या शरीराची रचना ही फिरण्यासाठी पूरक आहे. फिरणे ही गरज आहे. ते होत नसेल, तर एका ठराविक काळाने याचा वाईट परिणाम तुम्हाला जाणवेल.

 

६. व्यायाम न करणे आणि थकवा :

 

tiredness inmarathi

 

तुम्हाला थकवा वाटत असेल आणि त्यासाठी जर का तुम्ही व्यायाम सोडत असाल, तर त्या गोष्टीचा शरीरावर नकारात्मक परिणाम होताना तुम्हाला जाणवेल.

एका अभ्यासानुसार, तुम्ही निदान आठवड्यातून तीन दिवस जरी सातत्याने कमीत कमी २० मिनिट व्यायाम केला, तरी तुम्हाला उत्साहपूर्ण वाटेल.

नियमित केलेला व्यायाम हा हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या कामाला मदत करणारा असतो. व्यायामाने तुमच्या शरीराला सतत ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि तुम्हाला दिवसभर उत्साही वाटतं.

 

७. प्रत्येक गोष्ट मनाला लावणे :

 

social media inmarathi

 

आपण सगळेजण सोशल animal आहोत. सध्या जरा जास्तच आहोत. काहींना तुमच्या सगळ्या गोष्टी पटतील तर काहींना निवडक. तेव्हा प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेण्याची गरज नाहीये.

तुम्ही जर का संवेदनशील मनाचे असाल तर, काही वेळेस, एखादया व्यक्तीची एक ओळ सुद्धा तुमच्या दिवसभराची ऊर्जा ओढून घेऊ शकते.

गोष्टी लक्षात ठेवण्यासोबतच त्या विसरणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे.

 

८. अशक्य तणाव :

 

stress inmarathi 1

 

तुमच्या शरीरासारखीच मेंदूची सुद्धा एक क्षमता असते. त्याला किती ताण द्यावा हे लक्षात येणं अत्यंत आवश्यक आहे. उद्याचं टेन्शन, कर्जाचं टेन्शन, नोकरी असे किती तरी विषय तुमचा ताण वाढवणारे आहेत.

यातून थोडा ब्रेक घेत जा आणि तुम्हाला आवडणारी गोष्ट, छंद यांना सुद्धा वेळ द्या. तुम्हाला उत्साही वाटेल.

खूप ताण येत असेल, तर काही वेळ दीर्घ श्वास घ्या आणि मग तुमच्या मनातील विचारांमध्ये कसा फरक पडतो ते बघा.

 

९. इम्प्रेस करायचा प्रयत्न करणे :

 

rocket singh saleman of the year office discussion gossip inmarathi

 

दोन गोष्टी आपण नियमितपणे करत असतो. एक म्हणजे, समोरच्याला नावं ठेवणे आणि मी कसा चांगला आहे हे सतत सांगत राहणे.

आपल्या कौतुकाची अपेक्षा करणे आणि ते नाही झालं की नाराज होणे यासाररखी कमकुवत करणारी दुसरी गोष्ट नाहीये. ते करणं नेहमीच टाळा.

स्वतःसाठी जगा. अपेक्षांचं फार ओझं तुम्ही घेऊ नका आणि दुसऱ्याकडून ठेवू नका. तुम्ही सतत आनंदी रहाल आणि कोणत्याही नवीन कामासाठी कायम तयार असाल.

‘हर पल यहा जी भर जीयो, जो है समा… कल हो न हो’ या ओळीप्रमाणे जगायचा प्रयत्न करा आणि तुमच्या उत्साहाने समोरच्या व्यक्तीला सुद्धा सुंदर आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?