' जगातल्या या अद्भुत रेल्वेतून प्रवास केलात, तर वा-याच्या वेगात पोहोचाल

जगातल्या या अद्भुत रेल्वेतून प्रवास केलात, तर वा-याच्या वेगात पोहोचाल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

=== 

भारतात बुलेट ट्रेन येतेय! कधी येतेय माहित नाही, पण लवकरच येईल अशी आशा ठेवायला हरकत नाही. असो, ही बुलेट ट्रेन म्हणजे अतिशय वेगवान अशी तिची ख्याती! याच बुलेट ट्रेनच्या धर्तीवर आज आपण वाऱ्याशी स्पर्धा करणाऱ्या जगातील काही वेगवान रेल्वे गाड्यांबद्दल जाणून घेऊया!

ई५ सीर‍िज शिन्कानसेन हायाबूसा

e5-series-shinkansen-marathipizza

स्रोत

हायाबूसा जपानमध्‍ये २०११ मध्‍ये धावली. त‍िची गती ३०० किलोमीटर प्रति तास इतकी आहे. जास्तीत-जास्त ४०० किलोमीटर प्रति तास इतकी गती आहे. हासाबूसाचे संचालन हेवी इं‍डस्ट्री आणि हिताचेच्या वतीने करण्‍यात येते.

 

अल्सटम युरोड्यूपिलेक्स

alstom-euroduplex-marathipizza

स्रोत

या डबलडेकर रेल्वेची सेवा डिसेंबर २०११ मध्‍ये सुरू झाली. ३२० किलोमीटर प्रति तास इतक्या गतीने ३२० किलोमीटर प्रत‍ि तासांनी युरोपियन नेटवर्कवरून धावते. युरोड्यूपिलेक्स रेल्वेची फ्रेंच, जर्मनी, स्वीस आणि लॅक्झेंबर्ग रेल्वे नेटवर्कवर धावण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे.

 

ईटीआर ५०० फ्रेसिआरोस्सा ट्रेन

etr-500-frecciarossa-marathipizza

स्रोत

ईटीआर रेल्वे सेवा २००८ मध्‍ये सुरू झाली. रेल्वेची गती ३०० किलोमीटर प्रति तास इतकी आहे. ती रोम आणि मिलान दरम्यान धावते. या रेल्वेची निर्मिती ट्रेनो व्हेलोस इटालियामो या कंपनीने केली आहे.

 

ए‍जीव्ही इटालो

AGV-Italo-marathipizza

स्रोत

एजीव्ही इटालो एजीव्ही सीर‍ीजमधील पहिलीच रेल्वे आहे. एप्रिल २०१२ मध्‍ये ती सुरू झाली. इटालोची गती ३६० किलोमीटर प्रति तास इतकी आहे. ही युरोपमधील सर्वा‍त आधुनिक रेल्वे आहे. ही रेल्वे नेपोली, रोम, फ‍िरेन्डे, बोल्गना आणि मिलानों कॉरिडोर दरम्यान धावत नाही.

 

टाल्गो ३५० (टी ३५०)

talgo-350-marathipizza

स्रोत

टाल्गो स्पेनमध्‍ये २००५ मध्‍ये सुरू झाली. तिची गती ३५० किलोमीटर प्रति तास इतकी आहे. टी ३५० ची निर्मिती पेटेंटीज टाल्गोने बॉम्बार्डियर ट्रान्सपोर्टेशनने एकत्ररित्या केली आहे.

 

टीजीव्ही ड्यूपिलेक्स

tgv-duplex-marathipizza

स्रोत

टीजीव्ही ड्यूपिलेक्सची निर्मिती १९९६ पासून 2004 दरम्यान झाली होती. ही रेल्वे ३०० ते ३२० किलोमीटर प्रति तास गतीने धावणार आहे. वजन कमी असावे यासाठी अल्युमिनिअमने तिची निर्मिती करण्‍यात आली आहे.

 

हार्मनी सीआरएच ३८० ए

CRH380A-marathipizza

स्रोत

हार्मनी सीआरएच ३८० ए ही रेल्वे जगातील दुस-या क्रमांकाची सर्वाधिक वेगवान रेल्वे आहे. ती ३८० किलोमीटर प्रत‍ि तास या गतीने धावते. हार्मनी चीनमधील वुहान ते गुआंझुओ यामार्गावर धावते. सीएसआर जिंगदाओ सिफांग लोकोमोटिव्ह आणि रोलिंग स्टॉकमार्फत तिचे संचालन केले जाते. हार्मनी सेवेची सुरूवात ऑक्टोबर २०१० मध्‍ये सुरू झाली.

 

सिमेन्स वेलारो ई/ एव्हीएस १०३

siemens-Velaro-E-AVS-103-marathipizza

स्रोत

सीमेन्स ही स्पेनमध्‍ये धावते. तिची गती ३५० किलोमीटर प्रति तास इतकी आहे. बार्सिलोना-माद्रिद दरम्यान ही रेल्वे धावते. जुलै २००५ मध्‍ये सिमेन्स तयार झाली आणि २००७ मध्‍ये ती धावली

 

टीएचएसआर ७०० टी

thsr-700t-marathipiza

स्रोत

टीएचएसआर ७०० टी रेल्वेची सेवा जानेवारी २००७ मध्‍ये सुरू झाली. तिची गती ३०० किलोमीटर प्रति तास इतकी आहे. रेल्वेची निर्मिती कावासाकी, हिताची , निप्पॉनने केली आहे.

 

शांघाई मागलेव

shanghai maglev-marathipizza

स्रोत

जगातील सर्वाधिक वेगवान धावणारी पहिली ट्रेन आहे शांघाई मागलेव. या ट्रेनची जास्तीत-जास्त ४३० किलोमीटर प्रति तास आणि कमीत कमी २५१ प्रति तास गती आहे. मागलेव रेल्वे एप्रिल २०१४ मध्‍ये सुरू झाली. शांघाई मागलेव ट्रान्सपोर्ट डेव्हलपमेंट को-ऑपरेशन ( एसएमटीडीसी) या संस्‍थेच्यावतीने शांघाई मागलेव रेल्वेचे संचालन करते.

काय म्हणता? एक तरी राईड झालीच पाहिजे की नाही यातून?!!

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “जगातल्या या अद्भुत रेल्वेतून प्रवास केलात, तर वा-याच्या वेगात पोहोचाल

  • March 5, 2017 at 3:59 pm
    Permalink

    Very informative and entertaining.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?