'"आरोग्य सेतू अॅपचा उपयोग काय?!" हा थक्क करणारा अनुभव आवर्जून वाचा!

“आरोग्य सेतू अॅपचा उपयोग काय?!” हा थक्क करणारा अनुभव आवर्जून वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मार्च महिन्यापासून कोरोनाने जो धुमाकूळ साऱ्या जगात घालायला सुरू केला तो अजूनही कमी झालेला नाही. भारतात ३ महिन्यांच्या कडक लॉकडाऊन नंतर हळूहळू मिशन “बिगिन अगेन” सुरू झाले.

भारतात आणि खासकरून महाराष्ट्र, मुंबईत कोरोनाचा कहर चालूच आहे. दर दिवशी बऱ्याच रुग्णांची नोंद होत आहे. काही लाख लोकांनी त्यांचे प्राण गमावले तर कित्येक लोकं बरी होऊन त्यांच्या त्यांच्या घरी परतली सुद्धा!

ह्या अशा भीषण परिस्थितीत आपल्या भारत सरकारने एक ऍप्लिकेशन चालू केलं आणि प्रत्येक भारतीयाला हे अॅप त्यांच्या स्मार्टफोन मध्ये इन्स्टॉल करण्यास बंधनकारक केलं ते म्हणजे आरोग्य सेतू अॅप!

 

aarogya setu app inmarathi3
ndtvgadgets.com

 

सुरुवातीला बऱ्याच लोकांनी हे अॅप डाउनलोड केलं आणि कित्येकांनी तर ते अजिबात उपयोगाचं नाही हे सांगून ते मोबाइल मधून डिलिट सुद्धा केलं.

काही लोकांनी तर ह्यावरून राजनैतिक टीका सुद्धा केली, आणि कशाप्रकारे हे अॅप म्हणजे एक स्कॅम आहे हे सुद्धा सिद्ध करायचा प्रयत्न केला पण हाती काहीच लागलं नाही!

आज तर तुम्ही देशात किंवा परदेशी विमानाने प्रवास करताना किंवा आपत्कालीन परिस्थितीत रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना हे अॅप त्यांच्या मोबाइल मध्ये असणे अनिवार्य आहे!

ह्या ऍपची खासियत म्हणजे हे अॅप चालू असताना तुम्ही एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह माणसाच्या संपर्कात आलात तर ते अॅप आपोआप तुम्हाला त्याचे संकेत देते, ज्यामुळे तुम्ही सावध होता!

याशिवाय गर्दीच्या ठिकाणी जाणे तुम्ही टाळले पाहिजे याबद्दल सुद्धा हे अॅप तुम्हाला बजावत असते. तसेच तुमच्या हेल्थ चेक अप साठी सुद्धा हे अॅप उपयुक्त आहे. शिवाय तुमच्या आसपासच्या परिसरात किती रुग्ण आहेत हे सुद्धा त्यावरून समजते! 

 

aarogya setu inmarathi
thewire.in

 

ह्या सगळ्यावरून बऱ्याच लोकांनी ह्या अॅप ची प्रचंड खिल्ली उडवली आणि हे ऍप नसेल तरी काही होत नाही असं देखील आपण कोणाकडून तरी ऐकलं असेलच!

पण आज आम्ही तुम्हाला एक वेगळाच अनुभव सांगणार आहोत. फेसबुकवरचे सदस्य अमित उदगीरकर ह्यांनी त्यांचा ह्या अॅप बद्दलचा एक अनुभव शेयर केला आहे. तो अनुभवच आम्ही इथे आपल्यासमोर मांडत आहोत!

त्यांनी सुद्धा ह्या अॅप कडे सुरुवातीला दुर्लक्ष केले, पण त्यांच्या अनुभवामुळे त्यांना ह्या अॅप ला सॅल्युट का करावासा वाटला ते आपण जाणून घेऊया त्यांच्याच शब्दातून!

===

आरोग्य सेतू अॅप इन्स्टॉल करून ठेवलं आणि कधी कधी फावल्या वेळातली उत्सुकता म्हणून डोकावलं, फार हसलो होतो या अॅप वर. काय तर म्हणे इतके लोकं तुमच्या सर्कल मध्ये आहेत, इतके इतके आजारी आहेत, इतके infected आहेत.

सगळा घोळ, काहीही हँ श्री! च्यायला रोज वेगळे आकडे. आणि काय करायचं यावर तर assessment टेस्ट द्यायची.

त्यातले प्रश्न ही ७०% आपल्या कामाचे नाहीत. या सगळ्या कारणांमुळे मी हे अॅप जवळपास ३ महिने बरंच दुर्लक्षित केलं. पुण्यात असंही पेशंट वाढल्याने आमचं बाहेर निघणे बंद होतं.

एक दिवस, म्हणजे २४ जुलै ला, संध्याकाळी जे You are Safe status असायचं, ते बदलून You are at Moderate Risk हे आलं. उत्सुकतेने त्यावर क्लिक केल्यावर एक मोठा धक्का वाट बघत होता. त्याचा स्क्रीन शॉट इथे जोडला आहे.

 

aarogya setu 2 inmarathi

 

Came in contact of Infected Person on

18 July 20
20 : 13 – 4 min duration
Ambegaon Budruk, Pune, Pune MH

याचा अर्थ मी infected माणसाच्या १८ तारखेला संपर्कात आलो होतो म्हणजे ८ दिवसांपूर्वी. ज्या अॅप ला इतके दिवस हसत होतो, त्या अॅप ने मला हे दाखवलं. बाप रे!

थोडा वेळ कळलंच नाही काय करावं. मी बायकोला दाखवलं आणि आम्ही आठवू लागलो की ८ : १३ ला मी कुठे होतो. १ तासानंतर आम्हाला साक्षात्कार झाला की मी त्यावेळी आमच्याच बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या माझ्या मित्राला भेटलो होतो.

तेवढ्यात त्याच मित्राचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं की तो कोविड पॉझिटिव्ह आहे, रिपोर्ट त्याला त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी मिळालाय. सर्वात आधी काय केलं तर आरोग्य सेतू ला सॅल्युट केला राव.

आता मला मित्राच्या संपर्कात मध्ये येऊन १६ दिवस झालेत, आणि आज सकाळी मी त्याच्या touch मध्ये असल्याचा मेसेज दिसला नाही. आणि परत you are safe हा मेसेज परत झळकला.

हा माझा मित्र आणि त्याचे कुटुंब सर्वात जास्त काळजी घेणारे आहेत, तरी त्यांना कोरोना होऊ शकतो. मनात त्यानंतर हाच विचार घोळत होता की मी या एका माणसाच्या संपर्कामध्ये आलो होतो तर इतका फरक पडला.

समजा मी जर infected असलो असतो, तर मी ज्यांना या आठ दिवसात भेटलो, त्यांचं काय, या प्रश्नाचा मी फार विचार केला तेंव्हापासून.

इतकी संख्या का वाढतेय त्याचंही कारण त्यात समजलं. नजर हटी दुर्घटना घटी!

 

 

corona risk featured

 

Vaccine येईपर्यंत तर कोरोना बाबा काय जाणार नाहीत. त्यामुळे काळजी घ्या, टेन्शन नको!

दिवसातून दोन वेळेस वाफ घ्या, गरम पाणी पित रहा आणि हो, तूम्ही जर हे अॅप काढून टाकलं असेल किंवा त्याकडे पहात ही नसाल, तर एकच सल्ला एकदा..दिवसातून फक्त एकदा त्यावर स्वतःच स्टेटस पहात जा!

आणि सुरक्षित रहा…नाही, खरंतर सर्वांना सुरक्षित ठेवा!!

===

हा अनुभव वाचून आपलेही डोळे उघडले असतील, आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ह्या अॅपकडे दुर्लक्ष केलं असेल. पण कोरोना च्या संकटकाळात हे अॅप आपल्यासाठीच बनवले गेले असल्याने त्याकडे दुर्लक्ष न करता प्रत्येकाने ते वापरत राहिलं पाहिजे!

निदान स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी आणि आपल्या मित्रपरिवारासाठी आपण इतकं तर नक्कीच करू शकतो!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?