'५० पैसे ते २ लाख : पतीच्या अत्याचारांना झुगारून, शून्यातून विश्व उभारणाऱ्या स्वावलंबी महिलेची कहाणी

५० पैसे ते २ लाख : पतीच्या अत्याचारांना झुगारून, शून्यातून विश्व उभारणाऱ्या स्वावलंबी महिलेची कहाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एके काळी दिवसाला फक्त पन्नास पैसे कमवणाऱ्या एका स्त्रीची ही यशस्वी कहाणी …!! तिचं नाव पॅट्रिशिया नारायण.

 

patricia narayan inmarathi2
ourownstartup.com

 

पॅट्रीशियाचा जीवनप्रवास –

पॅट्रिशिया थॉमस हिचं लग्न नारायण या व्यक्तीशी झालं तेव्हा ती जेमतेम १७ वर्षांची होती. शिवाय तिने हे आंतरधर्मीय लग्न केल्याने तिच्या माहेरच्यांनाही ते पसंत नव्हतं, म्हणून त्यांनीही तिच्याशी संबंध तोडले होते.

ज्या व्यक्तीसाठी ती माहेरच्यांना आणि आपल्या मुलांना सोडून, सगळ्यांचा विरोध पत्करून आली होती, तो नारायण देखील नंतर दारूचा व्यसनी निघाला आणि तिला दारिद्र्याचा सामना करावा लागला.

घरात खाणारी तोंडं चार आणि पैसा तर अजिबात नाही अशी तिची अवस्था झाली होती. हे लग्न करून तिने फार मोठी चूक केली होती. त्यातच तिला दोन मुलंही झाली. एक मुलगा आणि एक मुलगी.

पण ती धडाडीची होती. परिस्थितीला शरण जाऊन हार मानणारी नव्हती.

काहीतरी करायला हवं हे तिने ठरवलं. आणि काहीतरी करण्याशिवाय तिच्यापुढे दुसरा पर्यायही नव्हता. आपल्या दोन मुलांसाठी तरी तिला जगावं लागणार होतं आणि त्यांना जगवावं लागणार होतं.

ती म्हणते, की ही चूक मी केली होती, तर मी कुणाला त्यासाठी दोषी का ठरवू? आणि कुणाच्या मदतीची अपेक्षाही का ठेवू?

पण तेव्हा ती फक्त १९ वर्षांची होती. प्रेग्नंट होती. तिला आयुष्याचा किंवा कामाचाही कोणताही अनुभव नव्हता. पूर्ण शिक्षणही झालेलं नव्हतं, त्यामुळे नोकरीही मिळू शकणार नव्हती.

म्हणून तिने आपल्याला जे येतंय त्याचाच उपयोग करून पैसे कमवण्याचा विचार केला, आणि ते म्हणजे कुकींग.

 

cooking inmarathi 1
darshanascookbook.com

 

सुरुवातीला तिने जॅम, लोणची इत्यादी करून विकली. ती चांगली विकली जात होती. परंतु तिच्याजवळ मोठ्या प्रमाणावर पदार्थ बनवून विकण्यासाठी लागणारी भांडी, व्यावसायिक स्वयंपाकघर नव्हतं.

तिच्या वडिलांच्या मित्रांनी तिला या कामी मदत केली आणि तिला छोटी सुरूवात करता आली. मरीना बीच जवळ तिने स्वतःची खाद्यपदार्थांची गाडी लावण्याचे ठरवले. पण त्यासाठी सरकारी परवानगी लागते हे तिला ठाऊक नव्हतं.

त्यासाठी ती आपल्या दीड वर्षाच्या बाळाला घेऊन पीडब्ल्यूडीच्या ऑफीसमध्ये गेली. मात्र तिच्याजवळ कोणतेही वशिल्याचे पत्र नसल्याने तिला मोठ्या साहेबांना भेटू दिले जात नव्हते.

ती रोजच येऊन त्या कार्यालयात बसू लागली. एक दिवस तरी मोठ्या साहेबांशी भेट होईल या अपेक्षेने.

एके दिवशी तिला मोठ्या साहेबांना भेटण्याची परवानगी मिळाली. मात्र त्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी देखील तिला परवानगी द्यायला जवळपास वर्ष घालवले.

यानंतर तिने मरीना बिचवर आपला खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरू केला. समोसे, कटलेट, फ्रेन्च फ्राईज असे विविध पदार्थ विकायचे ठरवले होते. पण पहिल्या दिवशी तिचा फक्त एक कप चहा विकला गेला. केवळ पन्नास पैशांना!

 

immunity tea inmarathi1

 

ती खूपच निराश होऊन घरी परतली. दुसऱ्या दिवशी पुन्हा बीचवर जाऊन तिथे व्यवसाय करण्याचा धीरच होत नव्हता तिला. त्यावेळी तिच्या आईने तिला धीर दिला. समजावले. आणि तिला व्यवसाय चालू ठेवण्यास बळ दिले.

ती पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीच्या ठिकाणी आली. आणि त्या दिवशी मात्र तिचा धंदा चांगला झाला. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

तिने मरीना बीचवर गाडी लावून तिथे स्नॅक्स, कॉफी, चहा, ज्यूसेस इत्यादी विकायला सुरूवात केली.

ती म्हणते, की मरीना बीच हे माझ्यासाठी बिझनेस स्कूल होतं. कारण आपला बिझनेस कसा चालवायचा या विषयी सगळ्या गोष्टी तिला तिथे शिकायला मिळाल्या.

कुणी तिला शिक्षणाबद्दल विचारलं, तर ती सांगते की मी मरीना बीचवर एमबीए केलंय. धंद्यातली सारी गणितं मी तिथं शिकलेय.

 

marina-beach-inmarathi02
bbc.com

 

हे काम करण्यासाठी तेव्हा तिने दोन दिव्यांग माणसांची मदत घेतली होती. दरम्यान तिची मुलं मोठी होत गेली. तिला त्यांची मदत होऊ लागली.

नवरा नारायण मात्र दारूच्या पूर्ण आहारी गेला होता. तो कित्येक महीने घरातून गायब असे. आला तर तिला मारहाण करणे, तिच्याकडून पैसे हडप करणे, तिला सिगरेटचे चटके देणे असे अत्याचार तिच्यावर करत असे.

 

rape 3 inmarathi
Siasat.com

 

त्यानंतर लगेचच वर्षभरातच तिने चेन्नाईमधील ऑफीसेससाठी कॅन्टीन चालवायला सुरूवात केली. केटरींगचे कॉन्ट्रॅक्ट घेऊ लागली. बँका, सरकारी कार्यालये इथून तिला जेवणाच्या मोठ्या ऑर्डरी मिळू लागल्या.

अशीच तिला एक मोठी ऑर्डर मिळाली, ती म्हणजे नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ पोर्ट मॅनेजमेंटची. तिथे रोज २००० लोकांचं जेवण पोचवायचं होतं. आणि सन १९९८ सालात ती संगीता ग्रुप्सच्या नेल्सन मॅनकाम रोड रेस्टॉरंटची डायरेक्टर झाली.

दुर्दैवाची मालिका –

पण पॅट्रिशियाचं दुर्दैव अजून संपलेलं नव्हतं. २००२ मध्ये तिच्या नवऱ्याचं, नारायणचं निधन झालं, आणि काही दिवसांनी तिची मुलगी आणि जावई यांनी देखील एका अपघातात आपले प्राण गमावले.

लागोपाठच्या या घटनांनी पॅट्रिशिया मोडून पडल्यासारखी झाली होती. परंतु तिचा मूळ स्वभाव परिस्थितीला सामोरं जाण्याचा असल्याने ती पुन्हा उठून उभी राहिली आणि कामाला लागली.

त्यानंतर पॅट्रिशियाने आपल्या मुलाच्या मदतीने ‘संदिपा’ नावाचं रेस्टॉरन्ट उघडलं. संदिपा हे तिच्या अपघातात मरण पावलेल्या मुलीचं नाव होतं.

 

patricia narayan inmarathi1
wirally.com

 

तेव्हापासून तिने आपलं सगळं लक्ष या रेस्टॉरन्टकडे दिलं आणि या रेस्टॉरन्टच्या प्रगतीसाठी मेहनत केली. तिला हे रेस्टॉरन्ट लोकप्रिय आणि मोठे करायचे होते.

कारण तिने ते आपल्या दिवंगत मुलीच्या आठवणीत तिच्या नावाने सुरू केले होते. त्या रेस्टॉरंटमध्ये तिला आपली मुलगी दिसत होती. म्हणून ती आपल्या या व्यावसायिक अपत्यावर जीवापाड प्रेम करत होती.

चेन्नईच्या मरिना बीचवर हातगाडीवर चहा विकणाऱ्या पॅट्रिशियाची आज स्वतःच्या रेस्टॉरन्ट्सची चेन आहे.

 

patricia narayan inmarathi3
patrika.com

 

तिला आयुष्यात वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागला. परंतु तिने प्रत्येकवेळी अतुलनीय धैर्य दाखवत परिस्थितीवर मात केली. तिच्या या धीराचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

२०१० मध्ये तिच्या या संघर्षाची आणि व्यावसायिक दृष्टीची दखल घेतली गेली आणि तिला त्या वर्षीचा देशातील सर्व स्त्रियांना प्रेरणा देणारा फिक्कीचा वुमेन एन्टरप्रिनरचा पुरस्कार मिळाला.

तिने आपला व्यवसाय सुरू केला ते केवळ दोन लोकांच्या मदतीने. आता मात्र तिच्या रेस्टॉरन्टमध्ये २०० माणसं तिच्या हाताखाली काम करत आहेत.

 

patricia narayan inmarathi
thebetterindia.com

 

तिची दिनचर्या, आणि जीवनशैली देखील आता बदललेली आहे. पूर्वी ती सायकल रिक्षातून प्रवास करत होती, मग ऑटो रिक्शाने करू लागली आणि आता तिची स्वतःची कार आहे.

दिवसाला जेमतेम ५० पैसे कमवणारी पॅट्रिशिया आता दिवसाला २ लाख कमवते आहे. तिची ही कहाणी सगळ्यांना प्रेरणादायी आहे यात शंका नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?