साथीच्या रोगांमध्ये डॉक्टरांना १००% निरोगी ठेवणारा जबरदस्त आरोग्यपूर्ण आहार जाणून घ्या…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
डॉक्टर्स नेहमी काय खातात? ते स्वतःला निरोगी आणि फिट कसे ठेवतात? ते तळलेले पदार्थ, मिठाया वगैरे खातात का? लोकांना डॉक्टरांचे अनुभव जाणून घ्यायचे असतात.
विज्ञान काय सांगतं ते बाजूला ठेवा. स्वतः डॉक्टर्स हेल्थ डाएट फॉलो करत असतात का? करत असले तर कितपत करतात? काय खातात? हे जाणून घेण्यात लोकांना रस असतो.
त्यातही सध्या कोरोनाच्या साथीच्या काळात डॉक्टर्स लोक स्वतः कोणता आहार घेतात हे लोकांना जाणून घ्यावेसे वाटते.
त्यासाठी अनेक डॉक्टरांना प्रश्न विचारले गेले. देशातल्या मोठमोठ्या डॉक्टरांना त्यांचे अनुभव विचारले गेले. आणि त्यांनी जी उत्तरे दिली त्यातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला.
खालील पदार्थ आपल्या आहारात असतील तर त्यांचा शरीराला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.
अंडी –

प्रोटीन सोर्स म्हणून अंडी खात असल्याचे काही डॉक्टर्स सांगतात. यातले काही डॉक्टर्स हे शाकाहारी आहेत. ते इतर मांसाहार करत नाहीत. मात्र अंडी खातात.
मासे –
मासे तुम्हाला हेल्दी ओमेगा-३ फॅटी ऍसिड पुरवतात. त्यामुळे तुमचा मेंदू कार्यक्षम राहतो.
सफरचंद –

भुकेला एखादं सफरचंद खाणं डॉक्टर पसंत करतात. बाहेर जातानाही एखादं सफरचंद बॅगेत सहज ठेवून देता येतं. आणि प्रवासात भूक लागली की खाता येतं.
इतर फळं –

यात रास्बेरी, स्ट्रॉबेरी, ब्ल्यूबेरी इत्यादी बेरी जातीतील फळं, अॅव्हाकेडो ही भरपूर जीवनसत्त्वे देणारी फळं आहेत.
पालक –

पालकात व्हिटॅमिन ए भरपूर असतं. आणि कॅलरीज कमी असतात. त्यामुळे ते तुमच्या केसांना आणि त्वचेला चांगले असते.
प्रोटीन बेस पदार्थांसोबत पालक खाल्लं तर ते अधिक फायदेशीर ठरतं.
मशरूम्स –

मशरुम्समध्ये व्हिटॅमिन बी असतं. व्हिटॅमिन बी हे रक्तातील रेड ब्लड सेल्स (RBC)ची निर्मिती वाढवतं.
कांदा –

कांदा हा चवीसाठी खाल्ला जात असला, तरी त्यात व्हिटॅमिन सी बऱ्यापैकी असतं. हे व्हिटॅमिन सी शरीरातील फ्रि रॅडीकल्स कमी करून तुम्हाला त्वचेच्या कॅन्सरपासून वाचवतं.
ब्रोकोली –
ब्रोकोली ही आवश्यक न्युट्रीएन्ट्स शरीराला देणारी एक हिरवी भाजी आहे. तिचा आहारात समावेश जरूर करा.
फ्लॉवर –
फ्लॉवरमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे ते पचनाला मदत करते. म्हणून आहारात फ्लॉवरचा वापर जरूर करा.
बदाम –

दोन जेवणाच्या मध्ये भूक लागली असेल, तर थोडे बदाम खाल्ल्याने तुम्हाला पौष्टीक स्नॅक खाल्ल्याचे फायदे मिळतात. भारतीय आहारात तर बदामाचे महत्त्व आयुर्वेदानेही सांगितले आहे.
रात्री पाण्यात भिजवून सकाळी सोलून चार बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते असेही म्हटले जाते. शिवाय तो पौष्टिक सुकामेवा आहे.
ग्रील्ड चिकन सॅलड –

ग्रील्ड चिकन सॅलड हे तुमच्या शरीराला प्रोटीनचा पुरवठा करतात. त्याचवेळी कमी कॅलरीज देणारे हे पदार्थ आहेत. त्यात हिरव्या पालेभाज्यांचा वापर भरपूर असतो.
अंड्यातील पांढरा बलक –
अंड्यातील पांढरा बलक हा नाश्ता म्हणून तुम्ही खाऊ शकता.
मिश्रधान्यांची पोळी किंवा भाकरी –

एकच एक धान्यापासून बनवलेली पोळी किंवा भाकरी खाण्यापेक्षा ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ इत्यादी मिश्र धान्यांपासून बनवलेली भाकरी ही अधिक पोषक आहे.
मिश्र पिठांचं थालीपीठ –
वेगवेगळ्या डाळी, धान्य आणि कडधान्य भाजून त्यापासून केलेल्या पीठात वेगवेगळ्या भाज्या, कांदा इत्यादी घालून केलेली थालिपिठे हा अत्यंत पोषक आहार आहे.
गाजर –

गाजरात बीटाकॅरोटीन असतं जे व्हिटॅमिन ए साठी पोषक असतं. आणि पर्यायाने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. त्याचा डोळ्यांनाही फायदा होतो.
हळद –

जेवणात हळदीचा वापर गरजेचा आहे. रोजच्या जेवणातील हळद, ओल्या हळदीचे सॅलड, लोणचे तुमच्या त्वचेसाठी चांगले असते. ते त्वचेचा रंगही उजळते आणि शरीरातील विषाणू, जिवाणूंचा नाश करते.
अळशी –

अळशीत ओमेगा-३ फॅटी ऍसिड असतं, जे आपल्या हृदयासाठी चांगलं असतं. शिवाय त्यात ऍन्टी ऑक्सिडन्ट्स घटक असतात जे आपल्या शरीरातील कॅन्सरचा धोका कमी करते.
आंबा –

आंब्यात भरपूर फायबर असतं, पाणी असतं आणि व्हिटॅमिन सी असतं.
लेट्यूस, सॅलड, सेलेरीची पाने –

यांचे सॅलड बनवून खाल्लेले चांगले असते. यात व्हिटॅमिन सी आणि के असतं.
दही –

दह्यामुळे अन्नाचे चांगले पचन होते. दह्यात साखर, केळे, वेलची टाकून खाल्ल्यास ते अधिक चांगले असते. शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवते.
मध –

मधात नैसर्गिक साखर असते तसेच तांबे, लोह, मॅग्नेशिअम, मॅंगेनिज, फॉस्फरस, पोटेशिअम, सोडीयम आणि झिंक असते. या सर्वांचा उपयोग आपल्या एकूणच आरोग्यासाठी चांगला असतो.
त्याने रोगप्रतिकारकशक्तीही वाढते.
दालचिनी –

दालचिनीच्या वापराने शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते आणि डायबेटीसला नियंत्रणात राहतो. तसेच दालचिनी हृदयविकाराचे धोके टाळते.
ऑलिव्ह ऑईल –

ऑलिव्ह ऑईलमध्ये आरोग्याला उपकारक असे मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात.
द्राक्ष –

द्राक्षे, संत्री, बेरीज सारखी फळे सकाळच्या नाश्त्यात खाल्लेली चांगली असतात.
थोडक्यात, फायबरयुक्त, हिरव्या पालेभाज्या, प्रोटीनयुक्त, विविध फळं, दही-दूध-मध, अंडी-मासे, विविध कडधान्येयुक्त समतोल, चौरस आहार डॉक्टर्स स्वतःही सांगतात.
त्याचसोबत दिवसभरातून भरपूर पाणी हेही शरीराला तितकंच आवश्यक आहे.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.