'गांधीजींबद्दल तुम्हाला माहित "नसलेल्या" काही महत्वाच्या गोष्टी

गांधीजींबद्दल तुम्हाला माहित “नसलेल्या” काही महत्वाच्या गोष्टी

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असलेले महात्मा गांधीजी आपण सर्व जाणतो.

२ ऑक्टोबर १८६९ रोजी जन्मलेल्या “मोहनदास करमचंद गांधी”जींची, वयाच्या ७९ व्या वर्षी – ३० जानेवारी १९४८ रोजी हत्या करण्यात आली.

भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला अहिंसेचं तत्वज्ञान आपल्या वागणुकीतून शिकवणाऱ्या ह्या राष्ट्रीय संताबद्दल अश्या काही महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या – ज्या तुम्हाला माहित नसतील.

 

१) इंग्रजांचे समर्थक ते विरोधक…!

गांधीजी १९१८ पर्यंत इंग्रज सरकारवर विश्वास बाळगून होते. इंग्रजांच्या त्यांचा न्याय प्रणालीवर विश्वास होता.

पण १९१९ च्या जालियानवाला बाग हत्याकांडानंतर गांधींचा इंग्रजांवरील विश्वास उडाला.

gandhi01

स्त्रोत

२) ५ वेळा Nobel नामांकनं !

गांधीजींना Nobel Peace Prize – जागतिक शांतता प्रस्थापित करण्याच्या कार्यासाठी देण्यात येणाऱ्या नोबेल परितोषिकासाठी एक-दोनदा नव्हे तर ५ वेळा नामांकन मिळालं होतं. परंतु गांधींच्या मृत्यूआधी त्यांना हे पारितोषिक देण्यात आलं नाही. Nobel पारितोषिक मृत्युपश्चात देण्यात येत नाही – त्यामुळे गांधीजींना Nobel कधीच देण्यात येणार नाही ह्याबद्दल खुद्द Nobel committee ने दिलगिरी व्यक्त केली आहे.

gandhi02

स्त्रोत

१९८९ मध्ये जेव्हा दलाई लामांना नोबेलचा शांतता पुरस्कार देण्यात आला तेव्हा “हे एक प्रकारे गांधीजींना अभिवादन आहे” असं कमिटीचे चेअरमन म्हणाले.

 

३) गांधीजींचा हिटलरशी पत्रव्यवहार

गांधीजींनी अनेकांशी पत्रव्यवहार केला होता. ज्यात Tolstoy, Einstein आणि Hitler सुद्धा होते.

एका पत्रात शांततेचा आग्रह धरताना गांधीजी हिटलरला म्हणतात की

तुमच्या शौर्याबद्दल किंवा देशभक्तीबद्दल आमच्या मनात शंका नाही. तुमच्या शत्रूंच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही राक्षस आहात असंही आम्हाला वाटत नाही.

पण —

तुमचं लिखाण, तुमचे मित्र आणि समर्थक ह्यांचा व्यवहार हे सर्व राक्षसीच वाटतं. विशेषतः माझ्यासारख्या विश्व-बंधुत्वाच्या समर्थकाला.

असंच हिटलरला लिहिलेलं आणखी एक पत्र :

Gandhi_to_Hitler02

स्त्रोत

Gandhi_to_Hitler

स्त्रोत

४) संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा — दोनदा !

गांधीजी त्यांच्या जीवनातील ४० वर्ष, दररोज साधारण १८ किलोमीटर चालालले. त्यांनी १९१३ ते १९३८ एवढ्या कालावधीत ७९००० किमी अंतर पायी कापलं.

हे अंतर पृथ्वीला २ दा प्रदक्षिणा मारल्याइतकं होईल.

gandhi03

स्त्रोत

५) TIME Person Of The Year – असणारे एकमेव भारतीय

 गांधीजी १९३० मध्ये प्रतिष्ठित TIME magazine च्या मुखपृष्ठावर TIME Person Of The Year म्हणून झळकले होते.

इतर कुठलाही भारतीय TIME Person Of The Year ह्या मानाने सन्मानित झाला नाहीये.

gandhi04

स्त्रोत

६) हत्येच्या एक दिवस आधी गांधीजी “कॉंग्रेस” बरखास्त करण्याबद्दल गांभीर्याने विचार करत होते.

 

gandhi05

स्त्रोत

७) Apple चा निर्माता असलेले Steve Jobs गांधीजींचे खूप मोठे जाहते होते.

गांधींची आठवण आणि त्यांना अभिवादन म्हणूनच ते गांधीजींसारखाच चष्मा वापरायचे.

gandhi06

स्त्रोत

९) M G Road

भारतात गांधीजींच्या नावाने छोटे-छोटे अगणित रस्ते आहेत. पण “महात्मा गांधी रोड” नावाने तब्बल ५३ मोठे रस्ते भारतात आणि ४८ परदेशांत आहेत.

gandhi07

स्त्रोत

गांधीजींनी सांगितलेल्या मानवता, अंत्योदय, शांतता – ह्या रस्त्यांवर आम्ही चालतोय की नाही माहित नाही. पण गांधीजींचं नाव आम्ही भरपूर रस्त्यांना दिलं आहे !

महात्मा गांधीजींना विनम्र अभिवादन !

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 186 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?