' ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी भारतीय रेल्वेचं कल्पक पाऊल!! सामान्य माणसाला मिळणारेत जबरदस्त फायदे! – InMarathi

‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी भारतीय रेल्वेचं कल्पक पाऊल!! सामान्य माणसाला मिळणारेत जबरदस्त फायदे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

क्रेडिट कार्ड म्हटलं की काय आठवतं? आगाऊ मिळालेली रक्कम. हवी तशी वापरा आणि ठराविक तारखेच्या आधी पैसे परत करा.

आता तर ऑनलाइन शॉपिंगला क्रेडिट कार्ड वर मिळालेल्या “नो कॉस्ट ईएमआय”मुळे व्याजाचं टेन्शन पण निघून गेलं.

सुलभ हफ्ते भरायच्या पॅटर्नमुळे क्रेडिट कार्ड पद्धत ही बऱ्यापैकी लोकांच्या पसंतीला उतरली.

तर, अशीच क्रेडिट कार्ड सिस्टीम रेल्वेने सुद्धा काढली आहे. ही क्रेडिट कार्ड सुविधा सध्या एक्सप्रेस रेल्वे साठीच आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी नुकतंच व्हर्च्युअली या कार्डचं लॉन्च केलं.

 

piyush goyal inmarathi
financialexpress.com

 

 

आयआरसीटीसी-एसबीआय रूपे कार्ड (IRCTC-SBI RuPay Card) असं हे कार्ड देशातली सगळ्यात मोठी बँक “स्टेट बँके”शी संबंधित कार्ड असणार आहे.

या कार्ड बद्दल अधिक माहिती देताना पियुष गोयल म्हणाले,

हे कार्ड भरपूर अशा सुविधांनी परिपूर्ण आहे. ए .सी, ए.सी १, ए.सी २, ए.सी ३ आणि सीसी क्लासचे प्रवासी रेल्वे तिकीट बुक केल्यावर १०% व्हॅल्यू बॅक रिवॉर्ड पॉईंट्सच्या स्वरूपात मिळतील. यामध्ये एका पॉईंटची व्हॅल्यू ही एक रुपायाएवढी असेल.

आणि या रिवॉर्ड पॉईंटचा वापर आपण आयआरसीटीसी द्वारे प्रवासी तिकीट बुक करताना वापरू शकतो.

सतत रेल्वे प्रवास करणाऱ्यांना या कार्डचा भरपूर फायदा होणार आहे.

या नव्या रेल्वे क्रेडीट कार्डबद्दल अधिक जाणून घेऊया..

 

railway credit card inmarathi
fresherslive.com

 

जसं की, क्रेडिट कार्डच्या वापरासाठी सुरवातीला एक वार्षिक रक्कम भरावी लागते. तर या कार्डसाठी सुद्धा तशी ठराविक रक्कम प्रवेश फी म्हणून आहे.

पण, जर तुम्ही ३१ मार्च २०२१ पर्यंत या कार्ड साठी अर्ज केला,  तर कोणत्याही प्रकारचे शुल्क तुम्हाला द्यावं लागणार नाही.

कार्ड तुमच्या नावावर सुरू झाल्यावर तुम्हाला ३५० रिवॉर्ड पॉईंट सुरवातीलाचं मिळतील. नवे ग्राहक म्हणून कार्ड सुरू केल्याचे एक्टिव्हेशन पॉईंट.

आयआरसिटीसीच्या वेबसाईट वरून तिकीट बुक करताना या कार्डचा वापर केल्यावर १% फी माफ होईल.

तसेच, या कार्डद्वारे पेट्रोल किंवा डिझेल भरलंत तर १% फ्युएल सरचार्ज माफ होईल.

 

petrol pump inmarathi
sirfnews.com

 

बँकेने ठरवलेल्या इ-कॉमर्स वेबसाईट वर या कार्डद्वारे खरेदी केल्यावर आपल्याला निश्चित सवलत मिळणार आहे.

मेडलाईफ वरून औषधे मागवल्यावर २०% सूट तर फिटरनिटी वर २५% सूट या कार्डच्या मार्गे आपण मिळवू शकतो.

हंगामा म्युझिकचं एक रुपयात सबस्क्रिप्शन सुद्धा या कार्डच्या वापराने मिळू शकणार आहे.

या कार्डचा उपयोग कॉन्टॅक्टलेस ट्रांजेक्शन साठी सुद्धा केला जाऊ शकतो.

नियर फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) टेक्नॉलॉजीचा वापर केला असल्यामुळे केवळ एका टॅपने सुरक्षित व्यवहार आपण करू शकतो.

सुविधाजनक आणि सुरक्षित व्यवहारांसाठी हे उपयोगी ठरू शकते.

भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार या क्रेडिट कार्ड बद्दल सांगतात,

“भारतीय रेल्वेचा वापर हा प्रवासासाठी सर्वाधिक केला जातो. रेल्वेचे ग्राहक सर्वाधिक आहेत. त्यामुळे अशा ग्राहकांच्या सोयीसाठी ही कार्ड सेवा उपयुक्त ठरणार आहे.

ग्राहकांच्या या कार्डबद्दल अनेक अपेक्षा असल्याचे दिसून येते. एसबीआयचे हे क्रेडिट कार्ड प्रवाशांच्या विश्वासात खरे उतरेल अशी अपेक्षा आहे.”

भारत सरकारने व्हिसा, मास्टरकार्ड या कार्ड सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांच्या स्पर्धेत आपली रूपे (RuPay) ही कार्ड सर्व्हिस उतरवली आहे.

 

railway credit card inmarathi1

 

रूपे चा अवलंब आज जवळपास सगळ्याच राष्ट्रीयकृत बँक करत आहेत.

रेल्वेचे एकूण ग्राहक बघता या नवीन आयआरसीटीसी कार्डच्या मार्गे रूपेचे ग्राहक वाढण्याची संभावना जास्त आहे. एकूणच ‘आत्मनिर्भर’ होण्याकडे एक एक पाऊल सरकार उचलत असल्याचे इथे दिसून येते.

आयआरसीटीसीचे एकूण पाच करोड पेक्षा जास्त ग्राहक आहेत.आणि त्यांच्या मार्गे रेल्वेच्या या वेबसाईट वर दिवसाला १० लाखापेक्षा जास्त किमतीचे व्यवहार होतात.

या व्यवहारात इतर बँकांचे कार्ड वापरले जातात.

हे लक्षात ठेवून रेल्वेने स्वतःचे हे कार्ड सुरू केले आहे. ज्या मुळे रेल्वेच्या ग्राहकांना या कार्डचा तिकीट बुकिंग व्यतिरिक्त इतर प्लॅटफॉर्म वर सुद्धा फायदा घेता येईल.

या वर्षाच्या डिसेंबर पर्यंत रेल्वेने हे कार्ड तीन करोड ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस ठेवला आहे.

तर, सतत आपल्या ग्राहकांसाठी नावीन्य आणणाऱ्या रेल्वेच्या या नव्या उपक्रमाबद्दल बरीच उत्सुकता आहे. एकूणच हा कार्डचा उपक्रम भविष्यात किती यशस्वी ठरतो हे पाहणे योग्य ठरेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?