' दाढी वाढवण्यासाठी ‘बिअर्ड ऑइल’ वापरत असाल, तर दोन मिनिटं वेळ काढून हे वाचाच – InMarathi

दाढी वाढवण्यासाठी ‘बिअर्ड ऑइल’ वापरत असाल, तर दोन मिनिटं वेळ काढून हे वाचाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मानवी जीवन म्हणजे बदल आलाच. राहणीमान, खानपान आणि इतर बऱ्याच गोष्टी. राहणीमानामध्ये तर मग सतत बदलत राहणारी गोष्ट म्हणजे कपडे.

आधी बेलबॉटम पॅन्ट प्रसिद्ध होती. कालांतराने नेरो बॉटम आणि मध्येच तरुणाईला भुरळ पडलेली पेन्सिल बॉटम स्टाईल.

अशीच काहीशी मग दाढी-केस ठेवण्यात पण ट्रेंड येऊ लागले. आधी चकाचक असणाऱ्या चेहऱ्यावर मग भरगच्च मिशी येऊ लागली. कालांतराने अमिताभ स्टाईल फ्रेंचकट दाढी, आणि हळूहळू आता भरलेली दाढी.

उदाहरण घ्यायचं मग भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहलीचं घ्या.

 

virat kohli inmarathi

 

सुरवातीला क्लीन शेव ठेवणारा कोहली मग हनुवटीवर दाढी ठेवायला लागला आणि कालांतराने आता पूर्ण दाढी. त्याला पाहून बहुतेक भारतीय संघातला प्रत्येक खेळाडू दाढी ठेवायला लागला.

साहजिकच कोहलीला फॉलो करणारा त्याचा फॅन बेस पण त्याची प्रत्येक स्टाईल फॉलो करायचा प्रयत्न करणारच.

चित्रपटांमध्ये तर सर्रास आता अभिनेते वाढीव दाढी ठेवून काम करायला लागले आहेत. केजीएफ मध्ये यशने ठेवलेल्या दाढीने तर वेगळाच पायदंडा घातलेला दिसतो.

अन दाढी ठेवण्याचे प्रमाण वाढलेले आज आपल्याला दिसत आहे. आता दाढी ठेवायची म्हणजे त्याची डोक्यावरच्या केसांसारखी निगा आणि काळजी घ्यावी लागणार.

अशातच मग दाढीसाठी लागणारे तेल ‘बिअर्ड ऑइल’ बाजारात आले आणि नेहमी प्रमाणे लोकांनी त्याला भरपूर प्रतिसाद दिला. तर आज बघूया हे बिअर्ड ऑइल नेमकं आहे काय? त्याचे फायदे, तोटे याबद्दल डिटेल मध्ये.

मुळात बिअर्ड ऑइल हे कॉस्मेटिक मटेरियल आहे. दाढी भरगच्च वाढावी म्हणून दाढीच्या केसांच्या मुळांना पोषण मिळावं हे या तेलाचं मुख्य काम आहे.

यासाठी अनेक तेलांचे मिश्रण वापरले जाते. काही वेळेस कृत्रिमरित्या केसांची वाढ व्हावी म्हणून केमिकल्सचा वापर होतो.

टी ट्री ऑइल,निलगिरी,बदाम यासारख्या बऱ्याच तेलाचा वापर यात केला जातो.

बिअर्ड ऑइलचे फायदे :

•दाढीच्या वाढीला मदत करते.

•दाढी चमकदार होते.

•दाढी मजबूत आणि भरगच्च होण्यास मदत होते.

•दाढीचे केस स्वस्थ आणि सिल्की-मुलायम होतात.

 

yash beard inmarathi

•दाढीच्या खालील त्वचा जर मृत झाली असेल तर नवीन त्वचा निर्माण करण्यास मदत करतात.

•दाढी सुगंधित करण्यास सहाय्यभूत.

बदाम, निलगिरी, टी ट्री सारख्यांचा तेलाचा आपल्या त्वचेला सुद्धा खूप फायदा आहे. त्वचा टवटवीत राहण्यास खूप मदत होते. आता फायदे आहेत म्हटल्यावर तोटे नसणार अशातला भाग तर नसणार.

बिअर्ड ऑइल चे घातक असे साईड इफेक्ट नाहीत. पण साईड इफेक्ट हे आहेत.

१. त्वचेवर अँलर्जीक रिऍक्शन :

बिअर्ड ऑइल मध्ये मल्टिपल ऑइल इंटेग्रेड असल्यामुळे त्वचेवर ऍलर्जी व्हायची शक्यता कमी नाही. अनेक डॉक्टरांनी याबद्दल उघडपण भाष्य सुद्धा केलेले आहे.

या बिअर्ड ऑइलचा वापर करण्याआधी त्याचा आपल्या त्वचेवर काही परिणाम होतोय का पाहण्यासाठी आधी त्वचेवर कमी प्रमाणात ऑइल लावून बघा. सकारात्मक रिझल्ट असेल तर मग त्याचा सलग वापर करण्यास हरकत नाही.

 

२. दाढीच्या वाढीवर दुष्परिणाम :

 

beard hair fall inmarathi

बिअर्ड ऑइल हे चेहऱ्याच्या आतील हार्मोन्स आणि डीएचटी यावर थेट परिणाम करतात. हे हार्मोन्स चेहऱ्यावरील रंग, दाढीची वाढ यासाठी कारणीभूत असतात.

अचानक झालेल्या बदलामुळे दाढीचे केस एक तर भरपूर वाढू शकतात किंवा दाढीची वाढ खुंटू शकते.

३. शुष्क त्वचा आणि डँड्रफ :

दुनिया भरचे तेल,शॅम्पू,कंडिशनर वापरून सुद्धा डोक्यात डँड्रफ होतातचं. एक चांगले बिअर्ड ऑइल दाढी मॉइश्चराईझ करण्यास मदत करते.

पण जर तेच चुकीचं बिअर्ड ऑइल दाढीच्या संपर्कात आले तर दाढी खालची त्वचा ड्राय होण्याची शक्यता भरपूर असते. दाढी मॉइश्चराईझ करण्याऐवजी दाढी मध्ये डँड्रफ निर्माण होण्यास कारणीभूत होऊ शकते.

४. सूर्यप्रकाशाची संवेदनशीलता वाढू शकते :

जस आपणास माहीत आहे की डार्क रंग सूर्यप्रकाश खेचून घेण्यासाठी समर्थ असतात. बिअर्ड ऑइलमुळे आपली दाढी दाट झाल्यामुळे सूर्यप्रकाश आकर्षून घेण्यात ते अजून सक्षम होतात.

यामुळे युवी रेजचा थेट संबंध दाढीशी आणि इनडायरेक्टली त्वचेशी येतो. त्यामुळे विविध त्वचेचे आजार, ऍलर्जी सारख्या समस्या उदभवू शकतात.

जर तुमचे काम सततचे उन्हामध्ये असेल तर मोस्टली फोटोसेन्सिटायझिंग इलेमेंट नसलेले बिअर्ड ऑइल वापरावे.

 

beard oil apply inmarathi

५. लहान मुलांवर परिणाम :

बिअर्ड ऑइलचे फक्त दोन-तीन थेंब हे आपण आपल्या दाढीवर अप्लाय करतो. पूर्ण तयार झालेल्या आपल्या त्वचेवर त्याचा एवढा परिणाम होत असेल तर पूर्ण तयार न झालेल्या लहान मुलांच्या त्वचेवर किती होईल याचा विचार करा.

नकळत खेळता खेळता आपल्या चेहऱ्याचा आणि लहान मुलांचा संबंध हा येतोच.त्यामुळे त्यांच्या त्वचेवर याचा वाईट दुष्परिणाम होण्याचे सुद्धा दाट चान्सेस आहेत.

हेच पाळीव प्राण्यांच्या बद्दल सुद्धा लागू होते. घरात कुत्रा अथवा मांजर हल्ली सर्रास पाळल्या जातात. आपली आणि प्राण्यांची त्वचा ही वेगळी असते.त्यामुळे त्यांच्या वर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो.

तर, प्रत्येकाची त्वचा ही समान नसते. “अ” व्यक्ती च्या त्वचेला जर एखादी गोष्ट सूट करत असेल तर “ब” व्यक्तीला ती करेलच असे नाही.

बिअर्ड ऑइलचा अतिरेक सुद्धा या गोष्टी प्रत्यक्षात आणू शकतात. तर फायदे आणि तोटे दोन्ही लक्षात घेऊन स्वतःला योग्य अशा बिअर्ड ऑइलची निवड करा आणि योग्य प्रकारे त्याचा वापर करा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?