' रंजकतेमध्ये गुरफटून टाकणाऱ्या, इतिहास जिवंत ठेवणाऱ्या जगातील ५ प्रसिद्ध शहरांच्या कथा

रंजकतेमध्ये गुरफटून टाकणाऱ्या, इतिहास जिवंत ठेवणाऱ्या जगातील ५ प्रसिद्ध शहरांच्या कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्राचीन इतिहास म्हणजे रंजक गोष्टींचा खजिना जणू! जगभरातील प्राचीन इतिहास अभ्यासताना आपल्याला काही ऐतिहासिक शहरांची ओळख होते.

या शहरांच्या कथा आपल्याला त्यांच्या रंजकतेमध्ये अगदी गुरफटून टाकतात आणि आपला प्रवास सुरु होतो या शहरांच्या अस्तित्वाच्या शोधात, त्यांच्याबद्दल जमेल ती माहिती मिळवण्यात.

आज आम्ही तुम्हाला जगाच्या इतिहासातील अश्याच काही काही प्राचीन आणि ऐतिहासिक शहरांची माहिती देणार आहोत, ज्यांनी इतिहासाला एक जिवंतपणा प्रदान केला.

 

ट्रॉय …

 

troy-marathipizza

स्रोत

महाकवी होमर यांनी इ.स. पूर्व ८०० मध्ये लिहिलेल्या महाकाव्यात ट्रॉयचा उल्लेख आहे. या काल्पनिक कथांमध्ये ट्रोजन वॉरचे वर्णन करण्यात आले आहे.

ट्रॉय शहर सध्याच्या तुर्कीजवळ आशिया व युरोप खंडादरम्यान वसलेले होते. चांगली पोहोच असल्याने ट्रॉय संस्कृतीचे मोठे केंद्र व व्यापारासाठी आदर्श केंद्र होते.

स्पार्टाचा राजा मेनेलाउसची तेजस्वी पत्नी हेलन ट्रोजनच्या राजकुमारासोबत कशी पळून गेली, याचे वर्णन होमर यांच्या पौराणिक कथांमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळेच प्रसिद्ध “ट्रोजन वॉर” झाले.

त्यात मेनेलाउसने ट्रॉयवर हल्ला केला. या युद्धात एका लाकडी घोड्याचा वापर करण्यात आला होता. तथापि, ट्रॉय खरोखरच अस्तित्वात होते की नाही, याबाबत इतिहासकारांना पूर्णपणे खात्री नाही.

मात्र, ट्रोजन युद्धानंतर ट्रॉयला इ. स. पूर्व ११०० ते ७०० दरम्यान सोडण्यात आले होते, याचे पुरावे उपलब्ध आहेत.

रोमन लोकांनी हे शहर इ. स. पूर्व ८५ मध्ये पुन्हा वसवले. त्यानंतर रोमन संस्कृती नष्ट झाली आणि या शहराचाही अंत झाला. १८२२ मध्ये पुरातत्त्व शास्त्रज्ञांना या शहराचे अनेक अवशेष सापडले.

उत्खननात दगडांच्या भिंती आणि किल्ल्यासारखी संरचना सापडल्याने होमरच्या महाकाव्यात वर्णिलेले ट्रॉय शहर खरोखरच अस्तित्वात होते आणि ट्रोजन वॉर खरोखरच घडले होते, यावर लोकांचा विश्वास बसला.

 

एल-डराडो…

 

el-dorado-marathipizza

स्रोत

सोने व धनाच्या मोहामुळे अनेक इतिहास संशोधकांना नव्या शहरांचा शोध घेण्यास उद्युक्त केले आहे. असेच सोने व धन या गोष्टींनी संपन्न शहर म्हणून एल-डराडो ओळखले जायचे.

दक्षिण अमेरिकेत राहणाऱ्या युरोपीय संशोधकांना सोन्याने समृद्ध असलेल्या या शहराच्या अनेक कथा माहीत झाल्या. हे शहर दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील भागात वसलेले असावे.

एल-डराडोचे मूळ १६ वे-१७ वे शतक असावे. स्पॅनिश भाषेत एल-डराडो म्हणजे सोन्याच्या पाण्याचा मुलामा दिलेले अर्थात प्रत्येक गोष्ट सोन्याची असलेले शहर.

हे शहर शोधण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक निघाले. त्यापैकी अनेकांना भूक, तहान आणि आजारपणामुळे आपले प्राण गमवावे लागले. मात्र, या शहराचा पत्ता लागला नाही.

त्यात पर्सी हॅरिसन या ब्रिटिश शोधकर्त्याचाही समावेश होता. त्याने १९२५ मध्ये एल-डराडोचा शोध घेण्याच्या प्रवासास सुरुवात केली. त्याने त्यास ‘सिटी ऑफ झेड’ असे नाव दिले.

हॅरिसन व त्याच गट अ‍ॅमेझॉनच्या जंगलात शिरण्यापूर्वी अखेरचा दिसला होता. त्यानंतर आजपर्यंत त्यांच्याबाबत काही कळू शकलेले नाही. अनेक शोधकर्त्यांनी हॅरिसनच्या गटाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते रिकाम्या हाताने परतले.

 

अटलांटिस…

 

atlantis-marathipizza

स्रोत

ग्रीक विचारवंत प्लूटो यांच्या मते, अटलांटिस धन व संस्कृतीबाबत अतिशय संपन्न, वास्तूबाबत अतिशय प्रगत ठिकाण होते.

तथापि, अटलांटिसबाबत प्लूटो यांनी दिलेली ही माहिती अनेकांना काल्पनिक वाटते, तर काही इतिहासकारांच्या मते, हे शहर खरच अस्तित्वात होते.

प्लूटोंच्या मते, जेव्हा या शहराबाबत त्यांनी पहिल्यांदा लिहिले, त्याच्या ९ हजार वर्षांपूर्वीच हे शहर गायब झाले होते. हे शहर नाविक शक्तीने संपन्न होते.

या शहराने पश्चिम युरोप आणि आफ्रिकेतील अनेक भागांवर विजय मिळवला होता. मात्र, दुर्दैवाने अथेन्सवर हल्ला करण्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर एके दिवशी अटलांटिस शहर महासागरात बुडाले.

मात्र काही विद्वानांच्या मते, अनुवाद करताना चूक झाली असावी. ९०० वर्षांपूर्वी शहर नष्ट झाले, हे विधान अधिक सुसंगत आहे.

काही पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मते, अटलांटिस शहर ग्रीस बेटांवर वसलेले होते. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर निघालेल्या लाव्हा रसाखाली हे शहर दफन झाले.

तर काही लोकांच्या मते, हे शहर कॅरेबियन, आयर्लंड, दक्षिण अमेरिका वा अंटार्क्टिकाजवळ कुठेतरी पाण्यात बुडाले असावे.

अटलांटिस प्रत्यक्षात होते की नाही, हा विचार इतका मंत्रमुग्ध करतो की, अनेक पुस्तके, चित्रपट, माहितीपटांमध्ये या शहराचा महिमा वर्णन करण्यात आला आहे आणि ते गायब झाल्याचे रहस्य शोधण्याची मागणी करण्यात आली आहे.

फेब्रुवारी २००९ मध्ये एका एअरोनॉटिकल इंजिनिअरने गूगलच्या ओशियन टूलच्या मदतीने अटलांटिसचा शोध लावल्याचा दावा केला होता. हे टूल उपयोगकर्त्यास सागरी भूखंडांची हजारो छायाचित्रे घेण्यास मदत करते.

 

पॉम्पी…

 

pompeii-marathipizza

स्रोत

इटलीचे पॉम्पी शहर खरे तर क्षणार्धात राखेच्या भग्नावशेषात बदलले होते. इ.स. ७९ मधील एक दिवस पॉम्पीवासीयांसाठी एखाद्या सामान्य दिवसासारखाच होता.

मात्र, अचानक विसुवियस ज्वालामुखीत स्फोट झाला आणि त्यातून निघालेला लाव्हारस पॉम्पी शहरावर बरसू लागला. अनेक शहरवासी यामुळे घाबरले आणि आपला जीव वाचवण्यासाठी ते शहर रिकामे करण्यात यशस्वी ठरले.

त्यानंतरही जवळपास २००० लोक या भयावह ज्वालामुखीच्या स्फोटानंतर पळू शकले नाहीत आणि राखेच्या ढिगाऱ्याखालीच ते दफन झाले.

१७४८ मध्ये पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी शोध लावला नसता, तर अनेक वर्षांपूर्वी राखेखाली दफन झालेल्या पॉम्पी शहराचा इतिहास आपल्याला समजलाच नसता.

या शहराचे उत्खनन सुरू केले तेव्हा पुरातत्त्व शास्त्रज्ञांना १५०० वर्षांपूर्वी मातीत गाडल्या गेलेल्या जुन्या इमारती, वस्तू आणि मृत लोकांचे हाडांचे सापळे मिळण्याची आशा कमीच होती.

मातीत गाडल्या गेलेल्या लोकांची व इमारतींची काय व्यवस्था कोण जाणे; पण त्यांचे अवशेष जवळपास पूर्णत: सुरक्षित होते. तेथील रहिवासी ज्या स्थितीत पळून जात होते, अगदी त्याच स्थितीत त्यांचे अवशेष सापडले.

 

कार्थेग…

 

cartheg-city-marathipizza

स्रोत

ट्रॉयप्रमाणेच कार्थेग शहरही मध्ययुगीन कालात सध्याच्या ट्यूनिशियाजवळ वसलेले होते. कार्थेगची स्थापना जवळपास ८०० ख्रिस्तपूर्व वर्षांपूर्वी उत्तर आफ्रिकेत ट्रेडिंग पोस्ट म्हणून झाली होती.

हे शहर मोक्याच्या ठिकाणावर असल्याने अतिशय संपन्न होते. मात्र, या संपन्नतेमुळे कार्थेगला १५० वर्षे युद्ध करावे लागले, विशेषत: रोमशी. त्यातच कार्थेग शहर नष्ट झाले. पहिले प्युनिक युद्ध इ.स. पूर्व २६०-२४१ दरम्यान झाले होते.

त्यात रोमच्या शक्तिशाली नौदलापुढे कार्थेगला हार मानावी लागली.

इ.स. पूर्व २१८-२०१ दरम्यान झालेल्या दुसऱ्या प्युनिक युद्धात कार्थेगने रोमसह स्पेनशीही अधिकारांसाठी युद्ध केले आणि दुसऱ्यांदा मोठा पराभव स्वीकारला.

या विनाशकी हानीनंतर कार्थेग इ.स. पूर्व १५१ पर्यंत अस्तित्वात होते. कार्थेगची संपन्नता पाहून रोमवासी बेचैन झाले होते. त्यानंतर त्यांनी शांतता करारातील अटींचा भंग केल्याच्या निमित्ताने कार्थेग शहरावर हल्ला केला.

अनेक वर्षे चाललेल्या या युद्धात कार्थेगचा सर्वनाश झाला आणि हजारो लोक मृत्युमुखी पडले. नंतर हे शहर पुन्हा वसले; पण पूर्वीसारखे त्याचे वैभव राहिले नाही. आज ते ट्यूनिशियातील उपनगर आहे.

अशी ही शहरे म्हणजे ऐतिहासिक इतिहासाची साक्षच आहेत जणू!!!

(हे देखील वाचा: पाण्याखाली असलेली जगातील ६ प्राचीन शहरे जी आजही रहस्यमयी इतिहासाची साक्ष देतात!)

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “रंजकतेमध्ये गुरफटून टाकणाऱ्या, इतिहास जिवंत ठेवणाऱ्या जगातील ५ प्रसिद्ध शहरांच्या कथा

  • March 18, 2017 at 10:21 am
    Permalink

    द्वारका, इंद्रप्रस्थ, लंका,

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?