'इथे चहा प्यायल्यावर बिस्किट म्हणून तुम्ही चक्क कप खाऊ शकता; वाचा काय आहे हा प्रयोग!!

इथे चहा प्यायल्यावर बिस्किट म्हणून तुम्ही चक्क कप खाऊ शकता; वाचा काय आहे हा प्रयोग!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

असं म्हणतात की, चहाला वेळ नसते, पण वेळेला चहाच हवा. चहा हा आपल्याकडे ब्रिटिशांनी जरी लोकप्रिय केला असला तरी आज जवळ जवळ प्रत्येक भारतीय हा चहा पितोच.

चहा हे भरतीयांचं आवडतं पेय आहे आणि चहा म्हटलं की सोबत बिस्किट हवंच.

 

red label inmarathi1
pieceofcakeproductions.in

 

पण चहाचा कपच जर बिस्किट म्हणून खाता आला तर? ही कल्पना नसून खरंच असे कप आहेत. 

कधी मदुराईला गेलात, तर आर.एस. पाथी यांचा निलगिरी चहा जरूर प्या. हा चहा खाद्य बिस्किटच्या बनवलेल्या कपात मिळेल.

पर्यावरणाशी सुसंगत असे बिस्किटापासून बनवलेले चहाचे कप –

पर्यावरणाची काळजी घेणं ही सध्या काळाची गरज आहे. सध्या प्लास्टिकचा वापर ही पर्यावरणाला हानीकारक अशी सर्वात मोठी डोकेदुखी, सर्वात मोठी समस्या आहे. या प्लास्टिकची विल्हेवाट लावणं हे मोठं समस्येचं काम आहे.

 

Plastic-Pollution 1 InMarathi

 

प्लास्टिकचा वापर हळूहळू कमी होऊन तो पूर्ण बंद व्हावा ही काळाजी गरज आहे. आपण प्लास्टिक पिशव्या बंद करून कापडी पिशव्यांचा प्रचार आणि प्रसार होताना पाहतोय.

मात्र प्लास्टिकचा वापर फक्त पिशव्यांपुरताच मर्यादित नाही. तर त्याचा पसारा खूप वाढलेला आहे. त्या त्या सर्व ठिकाणी प्लास्टिकला पर्याय शोधणं हे गरजेचं होऊन बसलेलं आहे.

असाच एक उपाय शोधला आहे, तामिळनाडू मधील मदुराई येथील आरएस सबपाथी या कंपनीने.

प्लास्टिकचा वापर कमी व्हावा या उद्देशाने या चहावाल्याने आपला चहा बिस्किटापासून बनवलेल्या कपात द्यायाला सुरूवात केलीय. म्हणजे एकाच वेळी चहा आणि बिस्कीट दोन्ही खाता येतात.

विशेषतः प्लास्टिक किंवा पेपर कपचा वापर करावा लागत नाही. त्यामुळे पर्यावरण राखण्यासही मदत होते.

हे बिस्किट कप चॉकलेट फ्लेवरचे असतात. त्यातील चहा पिऊन झाल्यावर तो कप बिस्कीटाप्रमाणे चावून खाता येतो.

 

edible chai cup inmarathi1
whatshot.com

 

या चहावाल्याचे नाव आहे विवेक सबपाथी. तो आरएस पाथी अँड कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. या कंपनीने हे असे चहाचे खाता येण्याजोगे कप बनवून घेतले आहेत.

ग्राहकाला हा कप वीस रुपयाला पडतो. या कपात ६० मिली. गरम चहा राहतो. आणि हा कप जवळपास दहा मिनिटे टिकून राहतो. नंतर तो नरम पडू लागतो. तोपर्यंत चहा पिऊन तो कप खाऊन टाकायचा असतो.

दोन ते तीन बिस्किटं खाण्याच्या प्रमाणातला हा कप असतो. त्यामुळे चहाबरोबर तुमचं खाणंही होतं. वेगळी बिस्कीटं मागवावी लागत नाहीत. पोटंही भरतं.

प्लास्टिकला पर्याय म्हणून हा एक चांगला उपाय आहे. मदुराईच्या वेस्ट मासी स्ट्रिटवरचे सगळे चहावाले हेच कप वापरतात.

आर एस सबपाथी अँड कंपनी ही कंपनी १९०९ पासून स्थापित आहे. आज त्याचा मॅनेजिंग डायरेक्टर असलेल्या विवेक सबपाथीच्या आजोबांनी ती सुरू केली होती.

ही कंपनी बाम आणि वेगवेगळ्या प्रकारची तेले तयार करते. त्याचसोबत चहाची कंपनी म्हणूनही ही कंपनी ओळखली जाते.

तंदुर चहा –

तामिळनाडू सरकारने युज अँड थ्रोवाले प्लास्टिक, आणि पेपर कपवर बंदी आणलेली आहे. त्यावर विवेकने पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला. आणि या कपची कल्पना त्यांच्या डोक्यात आली.

 

edible chai cup inmarathi
curlytales.com

 

विवेक हा आजच्या पिढीतला तरूण, धडाडीचा उद्योजक आहे.

सुरूवातीला त्याने उत्तर भारतात ज्याप्रमाणे मातीच्या भांड्यात चहा दिला जातो, त्याप्रमाणे तिथल्या स्थानिक कुंभारांकडून तसे कप बनवून त्यात चहा सर्व करायला सुरूवात केली. ह्या चहाची जाहिरात करताना ती ‘तंदूर चहा’ अशी केली गेली.

आईस्क्रीमच्या कोन्सवरून कल्पना –

परंतु यापेक्षाही काहीतरी चांगला आणि आधुनिक पर्याय यावर शोधायला पाहिजे असे त्याला वाटले. त्याच्या डोक्यात त्याविषयाचे चक्र चालूच होते.

तेव्हा त्याच्या लक्षात आले, की आईस्क्रीम आणि तत्सम अनेक पदार्थ असे वॅफल बिस्कीटच्या कपात दिले जातात.

आईस्क्रीम सोबतच ते कपही खाऊन टाकता येतात. तर याच धर्तीवर चहासाठी देखील बिस्किटाच्या स्वरुपातील कप बनवता येऊ शकतात.

त्याने आईस्क्रिमसाठी असे वॅफल कोन बनवणाऱ्या कंपनीशी संधान साधले आणि त्यांच्याकडून सुरूवातीला असे चहासाठी बिस्कीट कप बनवून घेतले. ते कप काम करू लागले. लोकांना आवडू लागले.

 

edible chai cup inmarathi2
thelogicalindian.com

 

त्यात चहा व्यवस्थित रित्या पिता येतो आणि ते बिस्कीटही चॉकलेट चवीचे असल्याने लोकांना रुचकर लागते. हे सगळे लक्षात आल्यावर, त्यांचा अनुभव घेतल्यावर त्याने अजून काही कपांची ऑर्डर दिली.

गेल्या वर्षभरापासून जगभर प्लास्टिकच्या विरोधात चळवळ उभी राहिलेली आहे. प्लास्टिकऐवजी बायोडिग्रेडेबल मटेरिअलचा वापर करून आवश्यक वस्तू तयार करण्यावर भर दिला जातोय.

तरी देखील वेस्ट प्लास्टिक आणि इतर वस्तुंची विल्हेवाट लावणं ही जगभर मोठी समस्या होऊन बसलेली आहे.  त्याचाच एक भाग म्हणून असे पर्याय शोधणे ही काळाची गरज होऊन बसलेली आहे.

एडीबल स्ट्रॉ –

 

edible straw inmarathi2
springwise.com

 

इटलीतील रेस्टोरंट्सनी एडीबल म्हणजे वापरून झाल्यावर खाऊन टाकता येतील असे स्ट्रॉ तयार केले आहेत. ते पास्ता स्ट्रॉ म्हणून ओळखले जातात.

या पास्ता स्ट्रॉचे उत्पादन घेणारी कंपनी स्ट्रुडल्स नावाने ओळखली जातेय. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा एडीबल स्ट्रॉ तासभर टिकू शकतो. मात्र ते बेचव असतात.

असे असले, आणि लोकांनी ते न खाता फेकून दिले तरी ते ओल्या कचऱ्याबरोबर डिकम्पोस्टेबल असल्याने प्लास्टिक स्ट्रॉसारखे ते पर्यावरणाला हानीकारक ठरत नाहीत.

भारतात हेच स्ट्रॉ जाड पेपरापासून बनवले जातात. केएफसी आणि पिज्झा हट वाले सध्या असे स्ट्रॉ वापरताना दिसतात. तो देखील प्लास्टिकला बरा पर्याय आहे. मात्र एडीबल स्ट्रॉ हा अधिक चांगला पर्याय आहे.

स्ट्रॉला अजून एक पर्याय म्हणजे प्लास्टिक ऐवजी धातूची नळी देखील वापरू शकतो. ती आपली आपण आपल्यासोबत कॅरी करू शकतो.

बंगलोरमधील एक कॅफे आपल्या दुकानात लोकांना ज्यूस आणि फळांचे रस हे फळांच्याच कवचात सर्व करतात. जेणे करून प्लास्टिक किंवा इतर कप्सचा वापर टळतो.

थोडक्यात प्रत्येकाने या प्लास्टिक वापरावर आपल्या परीने काहीतरी पर्याय शोधण्याची गरज तीव्र झालेली आहे. आणि असे अभिनव प्रयोग आपल्याला त्यासाठी चालना देतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?