' “दिल बेचारा” बघून आम्हाला जाणवलं सुशांत, आमची लायकी नाहीये तुझ्यासारखा नट बघण्याची… – InMarathi

“दिल बेचारा” बघून आम्हाला जाणवलं सुशांत, आमची लायकी नाहीये तुझ्यासारखा नट बघण्याची…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश नेरलेकर

===

सुशांत आम्हा प्रेक्षकांची लायकी नाही रे तुझ्यासारखा नट बघायची..खरंच बरं झालं तू गेलास, त्यामुळे लोकांना किंमत तरी कळतीये तुझी.

तरी काही बुद्धिजीवी समीक्षक तुझ्या ह्या शेवटच्या सिनेमाला सेलिब्रेट करायचं सोडून क्रीटीसाईज करतायत, दुर्दैव आम्हा प्रेक्षकांचं अजून काय!

तू गेल्यावर लोकंअसे पेटून उठले की बास आता पुन्हा असा आणखीन कुणी सुशांत त्याचं आयुष्य संपावणार नाही पण ते सगळं बेगडी होत रे, सोशल मिडियासाठी होतं रे फक्त!

तुझा शेवटचा सिनेमा जसा रिलीज झाला तसं काही लोकांनी त्याची चिरफाड करायला सुरवात केली, बरं झालं यारा तू नाहीयेस इथे..

आज जर तू असतास आणि थेटर्स चालू असते तर ४ दिवसात सिनेमा मल्टिप्लेक्स वरून उतरला असता, मग कोणत्यातरी ओटीटी प्लॅटफॉर्म वर लोकांची खोटी वाहवाह मिळवून पडून राहिला असता छिछोरे एखाद्या डिजिटल प्लॅटफॉर्म वर.

लोकं छिछोरे बघताना रडले होते राव, पण इथं साध्या अवॉर्ड फंक्शन मध्ये त्याला नॉमिनेशन सुद्धा नव्हतं, बरं झालं सुशांत तू गेलास, खरंच आमची लायकी नाही तुझ्यासारखा नट आणि तुझा अभिनय पचवायची!

 

chicchore inmarathi
republicworld.com

 

माफ करा खरंतर ह्या सिनेमाविषयी मी काहीच बोलणार नव्हतो, पण काही खूप क्विक आणि हार्श प्रतिक्रियांमुळे ह्यावर रिऍक्ट होण्याचं ठरवलं. दिल बेचारा हा सिनेमा खरंच रिव्ह्यूज च्या पलीकडचा आहे.

म्हणजे केवळ सुशांत आहे म्हणून नाही, तर सध्याची परिस्थिती आणि सुशांत च्या केस ची चाललेली चौकशी, बॉलिवूड आणि लोकांमध्ये वाढलेला तणाव पाहता मोठमोठ्या क्रिटिक्स नी सुद्धा दिल बेचारा चा रिव्ह्यू करायचा नाही असं ठरवलं.

कारण एकच, ही फिल्म फक्त सुशांतची आहे ती सेलिब्रेट करायची असंच ठरवलं गेलं, तरी सोशल मीडियावर कालपासून बरेच उलट सुलट रिव्ह्यू वाचतोय म्हणून व्यक्त व्हायचं ठरवलं!

मान्य आहे हा शो बिझनेस आहे पण त्याहिआधी आपण एक माणूस आहोत आणि आपल्यात सुद्धा सेनसिटीव्हिटी आहे त्यामुळे दिल बेचारा ह्या सिनेमाचा चांगला किंवा वाईट कोणताच रिव्ह्यू देणं मला तरी योग्य वाटत नाही, आणि मला ते शक्य सुद्धा नाही!

सिनेमा एका इंग्लिश सिनेमाचा रिमेक आहे. पण तो इंग्लिश सिनेमा सुद्धा एक नॉव्हेल वर आधारित आहे हे फार कमी लोकांना ठाऊक असेल.

हा काय त्या फिल्मचा दोष नव्हे मी तर म्हणेन चांगल्या गोष्टींची कॉपी करायला सुद्धा अक्कल आणि टॅलेंट लागतं.

दिल बेचारा हा कथा – पटकथा लेव्हल वर कदाचित कमी पडला असेल पण लोकांच्या हृदयाला स्पर्श करण्यात हा चित्रपट कुठेही कमी पडलेला नाही, हो पण हे त्यांनाच समजेल जे सिनेमा फील करतात!

 

dil bechara inmarathi
deccanherald.com

 

फक्त सिनेमा बघून काहीतरी खरडायचं अशा लोकांना हा सिनेमा अपूर्णच वाटणार…खरंतर ह्या कथानकावर हिंदीत बरेच सिनेमे झाले आहेत. तरी एक सिनेमा आपल्याला कायम आठवतो तो म्हणजे “आनंद”!

तसाच काहीसा अनुभव देणारा हा दिल बेचारा आहे मी इथे ह्याचं कथानक वगैरे काही सांगत बसणार नाही, कारण १ तास ४० मिनिटांचा सिनेमात काय एक्स्प्लेन करणार, हा सिनेमा तुम्ही अनुभवाच!

स्लाइस ऑफ लाईफ म्हणतात ना पण एक वेगळ्याच प्रकारचा सिनेमा म्हणता येईल. ज्याला प्रत्येकाने अनुभवायलाच हवं! आयुष्य म्हणजे काय आणि त्याच्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून बघायला हवं इतका साधा सरळ वन लायनर मेसेज देणारा नितांत सुंदर सिनेमा आहे.

कथा पटकथा आणि खासकरुन म्युझिक ह्यामध्ये कमी पडलं आहे ती कथा आणखीन रंगवण्यात, पण जर बाजूला काढलेलं डोकं जागेवर बसवलं आणि थोडा मनाने तो सिनेमा फील केला तरी तो तुमच्या मनाला हात घालतोच!

त्यामुळे कुणी काही म्हणो सिनेमा म्हणजे ज्यांचं पॅशन आहे त्यांनी हा सिनेमा अनुभवाच!

रेहमान साहेबांचं संगीत खूप तोकडं पडलं आहे ह्यातल्या सीन्सला न्याय देण्यात.अरिजित आणि साशा च्या आवाजताल खुलके जिने का हे गाणंच मला खूप आवडलं! म्हणजे इतर चालींपेक्षा ह्यात रहमान ने जीव ओतून काम केलं आहे ते ऐकताना जाणवतं.

 

a r rehman inmarathi
republicworld.com

 

शिवाय सिनेमाभर ज्या अपूर्ण गाण्याला पूर्ण करायचा प्रयत्न केला आहे ते गाणं सुद्धा खुप छान जमलं आहे, सामान्य माणूस यमक कसा जुळवेल अगदी तसाच विचार करून ते गाणं लिहिलं आहे आणि छान जुळून आलंय!

बाकी रेहमान जादू ह्यात इतकी नाही…शशांक खैतान ने पटकथेत मार खाल्ला आहे पण ऍक्टर्समुळे स्क्रिप्ट तरुन गेली आहे!

मुकेश छाब्रा हे नाव कास्टिंग डायरेक्टर म्हणून किती मोठं आहे हे मी सांगायची गरज नाही, त्याचा हा पहिला दिग्दर्शनाचा प्रयत्न खूप सुंदर आणि वाखाण्याजोगाच आहे.

ह्यामध्ये सुद्धा मुकेश छाब्रा च्या कास्टिंग स्किलचं दर्शन घडतं, स्वस्तिका मुखर्जी पासून जेपी ही भूमिका करणारा साहिल वैद पर्यंत सगळ्या कलाकारांचं काम सुंदर झालं आहे!

कहानी मधला बॉब बिस्वास साकारणाऱ्या सास्वता चॅटर्जी ह्यात किझी बासुचे वडील म्हणून अगदी परफेक्ट जमून आलेत. सैफ अली खानचा रोल फक्त २ मिनिटांचा आहे, काही लोकं म्हणतात त्याचा रोल आणखीन वाढवायला हवा होता!

पण मला अस वाटलं की तो २ मिनिटांचा सिन संपूर्ण सिनेमाचा अँगल च बदलून टाकतो, त्यातला सैफ चा परफॉर्मन्स डायलॉग, आग लगा दिया बॉस…धाडकन फेयरी टेल मधून रिएलिटी मध्ये आणतो तो सिन तुम्हाला!

संजना संघी हिने सुद्धा खुप सुंदर काम केलंय, आणखीन स्वतःला ती एक्सप्लोर करू शकते, तिच्या चेहऱ्यातला इनोसन्स, गोडवा हा वेगळाच आहे!

 

saif ali khan inmarathi
pinkvilla.com

 

आणि सुशांत बद्दल काय लिहायचं शेवटचा जेपी चा डायलॉग आहे ज्यात तो मॅनी बद्दल म्हणजे सुशांतच्या पात्राच्या फ्युनरल च्या वेळच्या भाषणाची रिहर्सल करत असतो, त्या सिन ला अक्षरशः बांध फुटला!

तो म्हणतो “अच्छा हो गया मेरी आँखें चली गयी, क्योंकि हमें वो दुनिया ही नहीं देखनी जिसमे मॅनी नहीं है!” शपथ अजूनही तो सिन आणि सुशांतचा तो चेहरा डोळ्यासमोरून जात नाहीये.

अगदी तशीच भावना आमच्या मनात आली, सुशांत शिवाय ही इंडस्ट्रीच सुनी पडली आहे!

पण बरं झालं सुशांत आधीच तू डिप्रेशनमध्ये होतास आणि जर तू असतास तर छिछोरे सारखा ह्या सिनेमाला मिळालेला रिस्पॉन्स बघून आणखीनच खचला असतास!

खरंच सुशांत आमची लायकी नाही तुझा अभिनय बघायची, We dont deserve a super talented actor and intelligent person like you!

 

sushant inmarathi
republicworld.com

 

आता तू जिथे कुठे असशील आनंदी असशील मुळात ह्या डबल स्टॅंडर्ड दुनियेपासून खूप लांब असशील…तिथंही असाच दिलखुलास हसत रहा…लोकांना आनंद देत रहा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?