' आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा निर्णय विचारपूर्वक घ्या – अन्यथा…!!! – InMarathi

आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा निर्णय विचारपूर्वक घ्या – अन्यथा…!!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“लग्नाच्या जोड्या या स्वर्गात बनतात” हे वाक्य आपण बऱ्याच वेळेस ऐकलं आहे.

९० च्या दशकात तर या आशयाचं एक सुंदर गाणं सुद्धा खूप गाजलं होतं. गाण्याचे बोल होते, “जैसे दिल है धडकन है, एक दुजे के वास्ते…” हे गाणं बघताना आपला लग्न संस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदीच रोमँटिक होतो.

त्या काळात तसं घडत होतं असं सुद्धा म्हणता येईल. तोपर्यंत लोक फक्त मनाने विचार करत होते असंही आपण म्हणू शकतो.

 

ek duje ke waste inmarathi
amayaar.com

 

काही वर्षांनी त्याच बॉलीवूड ने आपल्याला ‘साथीया’ सारखा सुद्धा सिनेमा सुद्धा दाखवला ज्यामध्ये आपण बघितलं की, घरातून पळून जाऊन लग्न करणारे हिरो आणि हिरोईन लग्नानंतर मात्र एकमेकांपासून विभक्त होण्यापर्यंत विचार करतात.

हे असं का होतं? प्रमुख कारण म्हणजे दोघं एकमेकांसाठी पूरक नसणे. प्रत्येक बनलेली जोडी ही एकमेकांसाठी अनुरूप असतेच असं नाही. म्हणून तर, मागच्या दहा वर्षात ‘ब्रेकअप’ हा शब्द आपल्या सर्वांना अगदीच परिचयाचा झाला आहे.

आता तर त्याची सुद्धा पार्टी होते. “सैय्याजी से आज मैने ब्रेकअप कर लिया…” या शब्दांचं गाणं तयार होतं हे आजच्या समाजाचं प्रतिबिंब आहे.

काही सोप्या गोष्टी जर का लक्षात ठेवल्या तर हा प्रवास अगदी सुखकर होऊ शकतो. गरज आहे ती तुमच्या पार्टनर ला निवडताना काही गोष्टींची काळजी घेणे.

खालील ७ गोष्टी जाणून मग निर्णय घेतला तर निर्णयाचा परत विचार करावा लागणार नाही!

 

१. व्यसनाधीनता :

 

shahrukh in devdas inmarathi
indiatvnews.com

 

लग्न झालेल्या किंवा होणाऱ्या व्यक्तींपैकी कोणी एक जरी कोणत्याही व्यसनाच्या आधीन असेल तर ते नातं टिकवणं अवघड असतं. व्यसनाधीन मनुष्य हा नेहमी स्वतःच्या आयुष्याचं आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्याचं नेहमी नुकसानच करत असतो.

व्यसन म्हणजे नेहमीच दारू, सिगरेट वगैरे नसतं. व्यसन म्हणजे शॉपिंग, क्रिकेट किंवा तत्सम गोष्टींचा अतिरेक करणं हे सुद्धा असतं. व्यसन शोधायचं कसं? 

तुमच्या झालेल्या किंवा होणाऱ्या पार्टनर च्या बोलण्यातून कोणत्या गोष्टीचा वारंवार उल्लेख होतो याकडे लक्ष द्या. कोणती वस्तू आजूबाजूला असल्याने त्याला / तिला आनंद होतो आणि नसल्याने दुःख होतं हे लक्षात घ्या.

काही व्यक्ती त्यांचं व्यसन मान्य सुद्धा करत नाहीत. पण, जशी ती वस्तू (उदाहरणार्थ : सिगरेट) त्यांना मिळत नाही ते आगंतुक होतात. ती वस्तू मिळालीच नाही तर त्यांची जी वागणूक असते ती एकदा बघा.

ते व्यसन तुम्हाला चालणार आहे का? याचं उत्तर स्वतःला द्या आणि मगच पुढे जा.

 

२. नकारात्मकता :

 

negative guy inmarathi
willingness.com.mt

 

तुमच्या होणाऱ्या पार्टनर ला त्याच्या आधीच्या नात्यांबद्दल विचारा. जर का तो एकही चांगली गोष्ट बोलत नसेल तर लक्षात घ्या की त्याचा स्वभाव हा नकारात्मक आहे. पुढे जाऊन तो तुमच्यातल्या सुद्धा नकारात्मक गोष्टीच फक्त शोधेल.

अश्या लोकांचा एक प्रॉब्लेम असतो तो म्हणजे, ते कधीच स्वतःचं काय चुकलं ? हे सांगत नाहीत.

“मी फार छान आहे” असं फक्त म्हणत ते प्रत्येकाच्या चुका सांगत असतात आणि नकळत त्या व्यक्तीवर एका प्रकारे ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात.

असे लोक दिसायला सिनेमातील व्हिलन सारखे असतील असं अजिबात नाहीये. पण, त्यांच्या कृती या व्हिलन सारख्या असू शकतात. सारासार विचार करून मगच तुमचा निर्णय घ्या.

३. तक्रार करण्याचा स्वभाव :

 

complaining people inmarathi
pharmeasy.in

 

काही व्यक्तींमध्ये कायम तक्रार करण्याचा स्वभाव असतो. आजूबाजूला सर्व काही मनासारखं घडूनही ते तक्रार करण्यासाठी गोष्ट शोधत असतात आणि त्या गोष्टीवर तोंडसुख घेत असतात.

या करणासाठी त्यांना त्यांचा बॉस किंवा राजकारण असे विषय कायम उपलब्ध असतात. एखाद्या गोष्टींबद्दलचं त्यांचं अपयश लपवण्यासाठी ते कायम तक्रार करण्यासारख्या गोष्टी शोधत असतात.

आपल्या पैकी प्रत्येकाला आपलं म्हणणं ऐकून घेणारी एक व्यक्ती लागत असते.

पण, असं गरजेचं नाहीये की तुम्ही रोज त्या व्यक्तीसाठी तक्रार करण्याच्या गोष्टींची यादी मनात तयार करावी आणि तो पाढा वाचून दाखवावा. त्यांची ही सवय सोडवा अन्यथा, तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखेच होऊ शकता.

तुमच्या पार्टनर ला प्रेमाने विनंती करा की, ही सवय चांगली नाहीये. आनंदी विषय काढून त्यावर त्याला किंवा तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करा.

 

४. ‘चाईल्डिश प्रौढ’ लोक :

 

childish girl inmarathi
mansworldindia.com

 

आपल्या मनात आपलं बालपण जपून ठेवणं हे ठीक आहे. पण, काही व्यक्ती अश्या असतात ज्यांनी त्या मनातल्या “लहान लेकराला” खूप जास्त महत्व दिलेलं असतं. ते लहान लेकरू त्यांच्यातल्या प्रौढ व्यक्तीची पर्सनॅलिटी तयारच होऊ देत नसतं.

तुमच्या विचारातील मॅच्युरिटी आणि या व्यक्तीची मॅच्युरिटी यात जर का जमीन आस्मान चा फरक असेल तर नात्याच्या भविष्याचं तुम्ही निदान करूच शकता. हे लोक कसे ओळखावे ?

चाईल्डिश लोकांना नेहमीच ‘जवाबदारी’, ‘काम’, ‘नाते’ या गोष्टींचा तिटकारा असतो. या लोकांना फॅशन ची सुद्धा आवड नसते. त्यांच्या मनोबुद्धिप्रमाणेच ते सुद्धा चाईल्डिश राहत असतात.

या लोकांचे त्यांच्या पालकांशी सुद्धा संबंध चांगले म्हणजे जसे असावेत तसे नसतात. ते एक तर कायम त्यांच्या पालकांसोबत रहाण्यासाठी हट्टी असतात किंवा त्यांच्याशी कायम वाद घालत असतात.

 

५. ‘भावनाशून्य’ लोक :

 

emotionless people inmarathi
bollyinside.com

 

काही लोक स्वतः भोवती एक कवच तयार करून घेतात आणि त्यांच्या मनातल्या खऱ्या भावना त्या कधीच कोणाला कळू देत नाहीत. आपल्या भावनांचं प्रदर्शन करणं हे त्यांना कमीपणाचं लक्षण वाटत असतं.

भावनाहीन असणं हा एक तर त्यांच्या स्वभावाचा भाग असतो किंवा त्यांचं प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यामुळे असं होत असतं. असं वागणं म्हणजे त्या व्यक्तीचं तुमच्यातील इंटरेस्ट नसल्याचं सुद्धा प्रतिक असतं.

भावनाशून्य लोकांचं त्यांच्या पार्टनर सोबतचे रिलेशन्स हे कायम ‘कॉम्प्लिकेटेड’ असतात. ते सुधरवण्यासाठी ते कोणते विशेष प्रयत्न सुद्धा करत नाहीत.

त्यांचं कुठेच मनाने नसणं हे त्यांच्या पार्टनर ला पटणं फार अवघड असतं. या लोकांकडून फोन, मेसेज ची वाट बघणं म्हणजे तासनतासाची बेफिकरी असते.

 

६. स्वतः भोवती फिरणारे :

 

selfish guy inmarathi
radiocity.in

 

या प्रकारचे लोक कायम ‘मी’, ‘माझं’ हेच शब्द नेहमी वापरत असतात. त्यांना जगात घडणाऱ्या इतर घडामोडींबद्दल काहीच घेणंदेणं नसतं.

स्वतःला मान देणं वेगळं आणि फक्त स्वतःभोवतीच विचारांनी फिरणं हे काही तुम्हाला चांगला पार्टनर बनवू शकत नाही.

अशी व्यक्ती जर का तुमचा पार्टनर म्हणून बनणार असेल तर तुम्ही कायम फक्त त्यांची ‘सावली’ बनू शकतात त्याच्यात सामावू शकत नाही. मान्य असेल तर पुढे जा.

 

७. परफेक्शनिस्ट :

 

perfectionist inmarathi
raywilliams.ca

 

काही लोक त्यांच्यातील परफेक्शनिस्ट ला कायम खूपच महत्व देत असतात. पण, आजूबाजूला सगळे जण काही परफेक्ट नसतात. गरज असते ती लोकांना accept करायला शिकण्याची.

या लोकांना एक सवय असते ती म्हणजे, “तुझ्यातली ही गोष्ट मला आवडते. पण….”, “हा टी शर्ट चांगला आहे. पण…” त्यांच्या मनातील हा ‘पण’ शेवटपर्यंत संपतच नाही.

अश्या व्यक्तींसोबत नातं तयार होणं म्हणजे एक तर स्वतःला सतत बदलायची तयारी असावी किंवा त्यांच्या काही कंमेंट्स ला दुर्लक्ष करण्याची सवय करून घ्यावी.

प्रेम, नातं, लग्न या सर्व सुंदर गोष्टी आहेत. फक्त आजूबाजूला सतत बदलणाऱ्या परिस्थिती मुळे आपले विचार हे व्यवहारिक जास्त होत आहेत आणि आपण या गोष्टीतील गोडवा शोधणं नकळत विसरत चाललो आहोत.

जाणीवपूर्वक हा बदल स्वतःमध्ये घडवूयात आणि योग्य निर्णय घेऊन सुंदर आयुष्य जगण्यासाठी प्रयत्नशील राहूयात. कारण, खऱ्या आयुष्यात ‘रिटेक’ नसतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?