'विमानात love at first sight झालंय? मग तुमचं प्रेम ही वेबसाईट शोधून देईल!

विमानात love at first sight झालंय? मग तुमचं प्रेम ही वेबसाईट शोधून देईल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

नव्या वर्षात पिकनीकचे प्लॅन आखलेत ? मित्रांसोबतच्या या ट्रिप्सचं बुुकिंगही झालंय ? पण यंदाचा हा प्रवास तुमच्या प्रेमाची सुरुवात ठरु शकेलं असं तुम्हाला सांगितलं तर…

आपल्या आयुष्याचा जोडीदार आपल्याला नेमक्या कोणत्या वळणावर भेटेल हे सांगता येत नाही. तुमचा विमान प्रवास अशाच एखाद्या सुंदर नात्याची सुरुवात ठरणार असेल, तर मग हा लेख वाचाचंं.

प्रवासात पहिलीच भेट. नजरानजर झाली आणि ती व्यक्ती मनातही भरली. हा अनुभव तुमचच्यापैकी अनेकांना आला असेल, मात्र  त्या प्रिय व्यक्तीचे नाव, गाव, पत्ता काहीच माहिती नसल्याने अनेकांची प्रेमकथा सुरु होण्यापूर्वीच संपली असेल.

मात्र विमानात सुरु होणारी तुमची लव्ह स्टोरी यापुढेही सुरु रहावी यासाठी ही अनोखी वेबसाईट तुमच्या मदतीला धावून येईल.

प्रवासात भेटणा-या प्रिय व्यक्तीला शोधणं आता फारसं अवघड जाणार नाही. अर्थात ही सुविधा सध्या तरी विमान प्रवास करण-यांसाठीच उपलब्ध आहे.

 

we-met-on-plane-marathipizza00

स्रोत

ऑनलाईनच्या बाजारात कोणतीही गोष्ट विकली जाऊ शकते असं म्हणतात ते काही खोटं नाही.

त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही वेबसाईट.

एका ऑस्ट्रेलियन उद्योजकाने ही शक्कल लढविली आहे. त्याने ‘वुई मेट ऑन प्लेन.कॉम’-  wemetonaplane.com  नावाची वेबसाईट काढली असून प्रियजनांच्या शोधात असलेल्या लव्ह बर्डस्साठी ही उपयोगाची ठरणार आहे.

विमानात भेटलेल्या त्याचं किंवा तिचे नाव, गाव, पत्ता काहीही माहिती नसलं तरीही त्या आवडत्या व्यक्तीला शोधणं या वेबसाईटव्दारे शक्य होणार आहे.

आपला संपर्क जास्त असेल तर प्रियजनाची भेट होणे अधिक सोपं कारण सोशल नेटवर्कींगमध्ये ती व्यक्ती कुणाची तरी फ्रेंड असेल अथवा कनेक्ट असणारच.

त्यामुळे आपल्यासाठी अनोळखी असलेली ही व्यक्ती शोधणं या वेबसाईटव्दारे शक्य असल्याचे त्याचे निर्माते विल स्कली पॉवर सांगतात.

 

we-met-on-plane-marathipizza03

स्रोत

विल स्कली पॉवर हे ३६ वर्षांचे आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांना त्यांची जिवलग मैत्रिण विमान प्रवासातच भेटली होती. त्यावरूनच त्यांना ही कल्पना सुचली. गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात ते या प्रसंगावरून सिध्द होतं.

आपल्याला जो अनुभव आला, तो इतरांना का येऊ नये, या विचारातून ही वेबसाईट आकाराला आली.

सुरवातीला ही कल्पना हसण्यावारी नेण्यात आली, एका नजरेत आवडलेल्या व्यक्तीला शोधणं हे अनेकांसाठी चेष्टेचा विषय ठरला, मात्र कालांतराने प्रेमवीरांना त्याचं महत्व लक्षात आल

गुगल सर्च इंजिनवर दर महिन्याला मेट ऑन प्लेन सर्च करणारे सरासरी 4 हजार 400 लोक असतात. या आकडेवारीवरून हे सिद्ध होतं, की केवळ काही तासांचा प्रवास अनेकांसाठी जीवनभराचे प्रेम फुलविणारा ठरु शकतो.

 

या वेबसाईटचा वापर कसा कराल?

 

we-met-on-plane-marathipizza01

स्रोत

चलते चलते या फिल्ममध्ये हिरो शाहरुख खान आपल्या प्रेमिकेच्या शोधात वणवण करताना दिसतो, रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम करून गुमशुदा हे गाणं म्हणतो.

मात्र फिल्ममध्ये दाखविलेली ही कल्पना प्रत्यक्षात आणता येऊ शकत नाही. मात्र रस्त्यावर उतरून गाणं म्हणण्यापेक्षाही सोपा उपाय ही वेबसाईट घेऊन आली आहे.

अनोळखी प्रियेला शोधणार कसे असा प्रश्न पडला असेल तर हे करा.

वेबसाइटवर लॉग ऑन केल्यानंतर आपला फ्लाइट नंबर, वर्ष, महिना, तारीख, ठिकाण आदी माहिती फिड करायची. या विमानात असलेल्या इतर प्रवाशांनी त्यांचे काही अनुभव शेअर केले असतील तर लगेच ते तुमच्यासमोर डिस्प्ले होतील,

पण यातही तुमच्या त्या व्यक्तीचा शोध लागला नाही तर ? तर मग शेअर युवर स्टोरी वर क्लिक करून आपला किस्सा लिहायचा. कुठे भेटली किंवा भेटला. लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट कसे झाले वगैरे वगैरे.

 

we-met-on-plane-marathipizza02

स्रोत

वरकरणी वाचायला ही माहिती गमतीशीर वाटत असली, तरी या साईटच्या आधारे अनेकांना आपलं प्रेम सापडंल आहे, इतकंच नाही तर, याच प्रेमातून अनेकांनी आपली विवाहगाठ बांधली आहे.

आपल्या देशात लव्ह अट फर्स्ट साईट या संकल्पनेला फारसं महत्व दिलं जात नसलं, तरी त्याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही.

अनेकदा आपलं प्रेम आपल्यापासून हाकेच्या अंतरावर असतं, पण काखेत कळसा अन गावाला वळसा या म्हणीनुसार आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, आणि प्रेमाच्या शोधात भटकत राहतो. मात्र असं दुर्लक्ष करण्यापेक्षा आपल्या हातातं असलेल्या टेक्नॉलॉजीचा योग्य वापर केला, तर तुमचीही लव्ह स्टोरी यशस्वी होवु शकेल.

….

आपला हा किस्सा फेसबुक अथवा ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटद्वारे शेअर केला की हे पोर्टल तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीचा शोध घेण्यास मदत करेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “विमानात love at first sight झालंय? मग तुमचं प्रेम ही वेबसाईट शोधून देईल!

 • March 16, 2019 at 11:37 am
  Permalink

  बस मधे झाल असेल तर…?

  Reply
 • March 16, 2019 at 3:09 pm
  Permalink

  हि साईट म्हणजे एखाद्याच्या खाजगी जीवनावर घाला होईल. जर का एखाद्याला अशा प्रकारे संपर्क झालेला आवडले नाही तर हि साईट गाळात आणि प्रेमवीर पण गाळात. मग प्रेम बीम गेलं तेल लावत

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?