' कोरोनाबद्दल मराठी कलाकार डॉ. विलास उजवणे यांचा धक्कादायक गौप्यस्फोट… – InMarathi

कोरोनाबद्दल मराठी कलाकार डॉ. विलास उजवणे यांचा धक्कादायक गौप्यस्फोट…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गेले अनेक दिवस भारतासह संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा कहर माजला आहे. जिकडे तिकडे फक्त कोरोनाच्याच बातम्या, कोरोनाच्याच गप्पा. रोजचे वाढते आकडे बघून लोकांच्या मनात जी भीती बसली आहे, ती काही लवलर जाईल असं काही वाटत नाही.

अशातच एखाद्या “बड्या असामी”ला या विषाणूची लागण झाली की त्याची “ब्रेकिंग न्यूज” होते. त्यांचे बंगले कसे निर्जंतुक करण्यात आले आहेत इथपासून ते अगदी कोरोनानंतर त्यांची वैयक्तिक दिनचर्या कशी आहे इथपर्यंत सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात.

 

amitabh bachchan InMarathi

 

या सगळ्यात सामान्य माणसाचं काय? त्यांच्या घरात कोणी एक पेशंट सापडला तर खरंच निर्जंतुकीकरण केलं जातं का? याविषयीच्या वास्तवावर प्रकाश टाकणारी एक पोस्ट मराठी अभिनेते डॉ.विलास उजवणे यांच्या फेसबुक वॉलवरुन….

 

vilas ujavane inmarathi
cinestaan.com

 

===

मित्रांनो, आज वाईट वाटतंय म्हणून ही पोस्ट टाकतोय कृपया सगळ्यांनी वेळात वेळ काढून ही वाचावीच आणि तुमच्या ओळखीत कोणी असतील अथवा मोठ्या अधिकारी, राजकारण्यांपर्यंत ही बातमी वजा तक्रार पोहचवण्याची व्यवस्था होईल तर खूप बरे होईल आणि मानवजातीवर खूप उपकार होतील….

तर ..असे आहे, की घरात एखादा कोविड (कोरोना),रुग्ण असला की की त्याचं पूर्ण घर, मजला विषाणू मुक्त, जीवाणू मुक्त करतात….

असे करत नाही असे अनेक लोक म्हणत होते पण माझा विश्वास नव्हता… पण आता अशा २ केसेस घडल्या आहेत माझ्या समोर (प्रत्यक्ष उदाहरण).

माझी बिल्डिंग २७ गणेश कृपा. राजे शिवाजी कॉम्प्लेक्स. एकता नगर(म्हाडा) येथे मी ६व्या माळ्यावर राहतो,त्याच बिल्डिंग मध्ये १ ल्या माळ्यावर फ्लॅट क्र.१०४ मध्ये.श्री. कुरील (महानगर टेलिफोन सेवानिवृत्त) राहतात.

त्याच्या सौ. ना बरे नसल्याने त्या औषधोपचारासाठी दवाखान्यात गेल्यात आणि किविड पोझिटीव्ह निघाल्या… त्यांना आयसोलेट केलंय त्यांच्या श्रींना त्याच्याबरोबर राहू दिले नाही हे अगदी योग्य…

पण घरी त्यांचे यजमान, मुलगी, नातू सगळे असताना आणि माळ्यावर इतर लोक ही राहत असताना तसेच लिफ्ट असताना बाकी लोकांच्या जीविताला धोका होऊ नये म्हणून त्यांचे घर आणि फ्लोर बी एम सी. आर साऊथ वॉर्ड ने निर्जंतुक करू नये का? म्हणजे बाकी सगळे आपल्या मौतीने मरा असे सांगण्यासारखे आहे असे मला वाटते…

महानायक अमिताभ बच्चन साहेबांचे ४ बंगले निर्जंतुक होतात. थोर? नायिका रेखा जीं, हे दोघे आणि इतरही पब्लिक फिगर आमच्या देशाचे गौरवस्थान आहेत… (त्याची सेवा करण्यास आमची ना नाही..आम्हीही करू… जर आम्हाला संधी दिली तर)

 

amitabh bachchan inmarathi 1
onmanorama.com

 

त्यांच्या बंगल्याबाहेर कितीतरी दिवस आमचे कर्मचारी बंगला उघडण्याची वाट बघतात (कुणाच्या आदेशाने माहित नाही) आणि या सामान्य माणसांचे साधे छोटेसे घर आणि मजला निर्जंतुक करू नये….या गोष्टीचा निषेध…!!

मोठ्यांचा जीव – जीव… सामान्य माणसाचा जीव…. पावसाळी गवत!… कधीही उपटा, कुठेही, कसेही फेका… असो त्यांच्याच मतांनी राजकारणी निवडून येतात.. याची संबंधित अधिकाऱ्यांनी दाखल घ्यावी आणि लवकरात लवकर संपूर्ण एरिया निर्जंतुक करावा ही विनंती…!!

डॉ.विलास उजवणे ( मराठी अभिनेता)

===

या आणि अशा बऱ्याच पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातून महानगरपालिकेकडून सामान्य माणसाला मिळणारी वागणूक आणि एका प्रथितयश व्यक्तीला मिळणारी वागणूक यातील भेद समोर येत आहे. हे आणि असे कित्येक प्रश्न आज जनसामान्यांसमोर उभे ठाकले आहेत.

तासाभरात प्रतिष्ठित लोकांना मिळणारी “ट्रीटमेंट” आणि सामान्य व्यक्तीला मिळणारी ट्रीटमेंट बघता आरोग्य विभागाला सामान्यांचे काही वावडे आहे का? असाच प्रश्न पडतो.

=== 

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?