अपयशातून यशाचा प्रवास सुरु करा, अंगिकारा “या १०” सवयी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपला दृष्टीकोन हा आपली उंची निश्चित करतो. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर ते अशीच ऊंची गाठत नाहीत. तिथे पोहचण्यासाठी अनेक गोष्टी घडवून आणायला लागतात जस केंद्रित कृती, वैयक्तिक शिस्त आणि दररोज बरीच उर्जा आवश्यक असते.

आणि मग त्या व्यक्तिची झालेली प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. जर तुम्हाला उत्तमप्रकारे सिद्ध करायच असेल तर स्वत:ला सर्वोत्कृष्ट बनवा. ज्यामुळे तुम्ही अधिक सुखी व्हाल आणि तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण व्हायला मदत होईल.

 

success-inmarathi

 

पण अनेकदा असं होतं की मेहनत करून सुद्धा तुम्हाला यश नाही मिळत.

याकरिता तुम्हाला योग्य शिक्षण आणि मेहनत घेण गरजेचं आहे. त्याचबरोबर निरोगी राहणं, स्वतःशी दयाळूपणे वागण आणि अनेक महत्वाच्या सवयी आहेत ज्या तुम्ही स्वत:ला लावून घेतल्यात तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल.

 

१. तुमच्या स्वप्नांनाप्रमाणे टु डू लिस्ट करा :

 

to do list inmarathi
greatist.com

 

जीवनाच्या उद्दीष्टांवर आधारित कार्य करण्याची लिस्ट तयार करा. तुमची स्वप्न काय आहेत त्याचा विचार करा. तुम्ही पुढच्या ५ ते १० वर्षात स्वतःला किती यशस्वी झालेलं बघताय हे विचारा.

उदाहरणार्थ, तुम्हाला तुमचा व्यवसाय स्थिर स्थावर करायचाय तर उत्तमप्रकारे प्लॅन तयार करा. त्या विषयाशी संबंधित ऑनलाइन लेक्चरर्स अटेंड करा.

साध्या शब्दांत सांगायचं तर अगदी सोप्या कामांच्या याद्यांमध्ये दीर्घकालीन दृष्टीकोन असणे आवश्यक आहे. कार्यसूची तयार केल्याने आपण कुठे वेळ घालवत नाहीयेना याचा अंदाज तुम्हाला येईल.

 

२. अधिक हिरव्या भाज्या खा :

 

vegetables inmarathi
zeenews.india.com

 

निरोगी आयुष्य जगणं हे सुद्धा यशस्वी होण्याच एक महत्वाचं कारण आहे. तुमचं आहार जितका उताम आणि आरोग्यदायी असेल तितके तुम्ही ताजेतवाने राहता.

आणि यावर हिरव्या भाज्या खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. भाज्या खाल्याने तुम्हाला फायबर मिळतं. शरीराला पोषक घटक मिळतात.

त्यामुळे डॉक्टर सुद्धा कायम तुमच्या जेवणात पालेभाज्या वगैरेच प्रमाण वाढवा हे वारंवार सांगतात. या भाज्या तुम्ही पराठे, पास्ता अगदी वेगावगेळे पदार्थ बनवून त्यात घालून खाऊ शकता.

 

३. स्वत: ला मुदत द्या :

 

ultimatum inmarathi
fun107.com

 

स्वतःला मुदत द्या. मला इतक्या कालावधीत हे काम पूर्ण करायचचं आहे. याने तुम्ही त्या प्रकारची पाऊल उचलता. गोष्ट मिळवायची एखादी अंतिम मुदत असेल तर आपल्याला ती पूर्ण करण्याचा मार्ग सापडतो.

जेव्हा तुम्हाला एखाद काम संपवायचयं त्या तारखेसह आपल्या साइड प्रोजेक्टची किंवा व्यवसायाची घोषणा करा.

एखाद्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला आपली अंतिम मुदत सांगून ठेवा, जेणेकरून ते तुम्हाला काम झालं का अस विचारून तुमच्यावर प्रेशर टाकून ते करून घेतील.

 

४. कृतज्ञता बाळगा :

 

sorry inmarathi
theswaddle.com

 

मला कायम समोरच्याला सॉरी म्हणण्याची एक वाईट सवय आहे. जेव्हा एखाद्याला आपण पुन्हा एखादी गोष्ट सांगा अस म्हणतो किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीला धक्का देतो, तेव्हा आपण “सॉरी” म्हणतो.

“सॉरी” हा फक्त एक शब्द आहे, पण तरीसुद्धा भाषा तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवर परिणाम करू शकते.

त्याऐवजी “माफ करा” अस म्हणा किंवा “धीर धरल्याबद्दल धन्यवाद!”, “उशीर झाल्याबद्दल क्षमस्व!” असं म्हणा हे सगळे कृतज्ञता पाळण्याचे मार्ग आहेत.

जेव्हा आपण चुकता किंवा दुसर्‍या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जातात तेव्हा नाते संबंधात दिलगीरीपूर्वक व्यक्त होण महत्वाच आहे, पण त्याहूनही अधिक कृतज्ञता दर्शवण महत्वाच आहे.

 

५. नाही म्हणायला शिका :

 

say no inmarathi
xaviroca.com

 

आपल्याला कितीतरी वेळा गोष्टी जमणार नसतात तरी पण आपण त्याला नाही असं उत्तर देत नाही. स्वत: ला इतरांसाठी कायम available आहोत हे दखावतो.

पण कधीतरी अस होऊ शकत की आपल्याला खूप आहे आपण एखाद्या मित्रांच्या पार्टीला किंवा गेट टू गेदरला नाही जाऊ शकत तर काही हरकत नाही.

तिथे तुम्हाला fomo होण्यापेक्षा नाही म्हणायला शिका. कारण तुमचं काम हे त्या काळात जास्त महत्वाच आहे. आणि परत स्वतःसाठी वेळ देऊ शकता.

 

६. आपल्याला कशामुळे आनंद मिळतो त्यावर पैसे खर्च करा :

 

invest you inmarathi
smarthomechoice.ca

 

पैसा म्हणजे आपल्या जीवनाची ऊर्जा शक्ती आहे. तुम्हाला मोठ झाल्यावर पैसा हा वाचवायलाच लागतो. जेव्हा आपण मित्रांबरोबर कुठे फिरायला जातो तेव्हा अनेकदा उगाच जास्त खर्च करतो.

त्या वेळेस आपल्याला ती मजा वाटते पण नंतर विचार केला तर काळात हा क्षणिक आनंद आहे. ज्याचा मला स्वत:ला फार फायदा होणार नाहीये.

त्यामुळे स्वतःमध्ये गुंतवणूक करा, जिम लावा, फायद्याचे ऑनलाइन कोर्स करा, सेविंग अकाऊंट उघडा. आपण जितके पैसे वाचवू तितक चांगल आहे.

 

७.अधिक झोप घ्या :

 

sleeping girl inmarathi
depositphotos.com

 

जरी आपल्याला अधिक झोप येणे अशक्य वाटत असल तरी ही सवय तुम्हाला लागणं गरजेचं आहे. झोपेचा दिनक्रम तयार करा, रोज किमान आठ तास झोपल्याने तुम्ही दुसर्‍या दिवशी ताजेतवाने असता.

तुमचा मूड दिवसभर चांगला असतो. यावर योग्य पर्याय म्हणजे झोपायच्या आधी फोन बाजूला ठेवा, स्नूझ बटण दाबण थांबवा.

 

८. वाचन करा :

 

reading inmarathi
shutterstock.com

 

जर तुम्हाला एखाद्या विषयात अभ्यास करून पुढे जायच असेल तर वाचनाची सवय लावा. जेवढ तुम्हाला करता येईल तेवढं वाचन करा. त्यातही निवडक पुस्तक वाचा.

पण याने काय होईल तुमचं एखाद्या गोष्टी बद्दलच ज्ञान वाढेल आणि तुम्ही त्यात उत्तम फराके पुढे जाऊ शकाल. तुमची मत मांडू शकाल. आणि शेवटी तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही कायम त्या विषयाबद्दल उपडेटेड रहा.

 

९. व्यायामासाठी वेळ काढा :

 

home exercise inmarathi

 

आपले शारीरिक आरोग्य सुधारण्याने तुमची सर्जनशीलता वाढते. तुमच्यात सहनशक्ती निर्माण करण्याचा आणि तुमही उत्साही राहण्याचा हा देखील एक प्रभावी मार्ग आहे.

व्यायामामुळे एंडॉरफिन हार्मोन्स तयार होतात जे शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवतात. त्यामुळे व्यायाम करण कधीही चांगलं आहे.

 

१०. ऐकण्याची कला पार पाडणे :

 

listner inmarathi
goodchoicesgoodlife.org

 

जर तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध टिकवून ठेवायचे असतील तर प्रभावी संवाद आवश्यक आहे. आणि समोरच्याच ऐकण हा त्याचा मुख्य भाग आहे. यामुळे तुम्हाला नवीन दृष्टीकोन मिळण्यास मदत होईल.

त्याचप्रमाणे समोरच्या माणसाला काय म्हणायच आहे आणि त्याचा अर्थ काय आहे हे नीट जाणून घ्या. आपण जितक अधिक ऐकतो तितक आपण शिकतो.

त्यामुळे तुम्ही उत्तम श्रोता होण आवश्यक आहे. तर अशाप्रकारे जर तुम्हाला आयुष्यात यशप्राप्ती करायची आहे तर वरील दहा गोष्टी लक्षात ठेवा.

ज्याने तुमची आर्थिक, बौद्धिक आणि मानसिक वाढ नक्की होईल. आणि तुम्ही या जगात स्वत:ला सिद्ध करू शकता.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?