' खगोलप्रेमींनो, कोणत्याही चष्म्याशिवाय सध्या आकाशात दिसतोय हा धूमकेतू!! ही संधी सोडू नका – InMarathi

खगोलप्रेमींनो, कोणत्याही चष्म्याशिवाय सध्या आकाशात दिसतोय हा धूमकेतू!! ही संधी सोडू नका

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या अंतराळात किती ग्रह आणि तारे आहेतआणि त्यांची सध्याची स्थिती काय आहे याबद्दल आपल्याला कायमच उत्सुकता असते. प्रत्येक वेळी होणारं चंद्र ग्रहण आणि सूर्य ग्रहण ही खगोल प्रेमींसाठी नेहमीच एक पर्वणी असते.

“पृथ्वी रोज स्वतः भोवती एक प्रदक्षिणा मारते” ही सुद्धा किती मोठी गोष्ट आहे याचा आपण दैनंदिन जीवनात विचार सुद्धा करत नाहीत.

इंग्रजी सिनेमा नियमित बघणारे लोक या विषयावर तयार होणाऱ्या सिनेमातून आपली जिज्ञासा पूर्ण करत असतील. हिंदी मध्ये सुद्धा ‘मंगल यान’, ‘कोई मिल गया’ वगैरे सिनेमा बघताना आपल्या या अद्भुत विश्वाची सफर करायला मिळते.

तुम्ही जर का खगोलप्रेमी असाल, तर तुम्हाला माहीतच असेल की, नासा ने दिलेल्या माहितीनुसार निओवाईज नावाचा एक धूमकेतू सध्या आकाशात दिसत आहे.

 

neowise comet inmarathi
mensxp.com

 

१४ जुलै ते ४ ऑगस्ट या काळात हा धूमकेतू आपल्याला दिसू शकणार आहे. हा धूमकेतू मागची ६८०० वर्ष सूर्याभोवती प्रदक्षिणा मारत होता.

तुम्हाला हा धूमकेतू बघण्याची संधी मिळाली तर नक्की बघा. कारण, यानंतर पुन्हा ही संधी हजारो वर्षांनंतर मिळणार आहे. तो बघण्यासाठी काय केलं पाहिजे याची थोडक्यात माहिती घेऊया.

धूमकेतू हे सूर्यमालेतील घटक असतात. हे घटक ठराविक अंतराने पृथ्वीवरील अवकाशात दिसत असतात. १९९७ साली हेल-बॉप हा धूमकेतू पृथ्वीवरून दिसला होता.

त्यानंतर, २००७ मध्ये मॅकनॉट ह्या धूमकेतूला खगोलप्रेमींनी बघितलं होतं. आता निओवाईज हा धूमकेतू आपल्याला दिसू शकणार आहे.

धूमकेतू हे आकाराने खूप लांब असतात. त्यामध्ये बर्फाचा समावेश असतो. त्यासोबत धूलिकण आणि वायू सुद्धा असतो.

 

neowise comet inmarathi1
firstpost.com

 

सूर्याला प्रदक्षिणा मारताना त्यांच्यातील बर्फ हा वितळत असतो. त्यामुळे धूलिकण हे उल्कावर्षाव करत असतात. हे सगळं आपल्या डोळ्यांनी बघता येणं हे एक पर्वणी असते.

निओवाईज या धूमकेतूची माहिती ओडीसाचे पथानी सामंता यांनी ANI या वृत्त संस्थेशी बोलताना दिली. पथानी सामंता हे ओडीसा येथील प्लॅनटोरियम चे उपसंचालक आहेत.

त्यांनी अशी माहिती दिली की,

“२७ मार्चला वायव्येकडच्या आकाशात नासाच्या दुर्बिणीला निओवाईज चा शोध लागला. प्रत्येक धूमकेतूला एक क्रमांक दिलेला असतो. निओवाईज ला C/2020 F3 हा क्रमांक देण्यात आला आहे.

१४ जुलै पासून पुढील २० दिवस हा धूमकेतू सूर्यास्ता नंतर २० मिनिट दिसणार आहे. निओवाईजला पाहण्यासाठी कोणत्याही चष्म्याची वगैरे गरज नाहीये.”

 

neowise comet inmarathi2
india.com

 

निओवाईज बद्दल पूर्ण माहिती नासाच्या अधिकृत वेबसाईट वर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या धूमकेतूचं नाव निओवाईज कसं पडलं याचं सुद्धा कारण वेबसाईटवर देण्यात आलं आहे.

 हा धूमकेतू सूर्याजवळून जाताना नासाच्या ‘Near Earth Object Wild Field Infrared Survey Explorer’ नावाच्या स्पेस टेलिस्कोपने सर्वात पहिल्यांदा त्याची माहिती दिल्याने त्याच्या अद्याक्षराने NEOWISE हे नाव या धूमकेतू ला देण्यात आलं आहे.

नासाच्या अधिकृत माहितीत असं सांगण्यात आलं आहे की, “निओवाईज हा सध्या पृथ्वीपासून सर्वात कमी अंतर म्हणजे १० कोटी ३० लाख किलोमीटर अंतरावरून प्रवास करत आहे.

या धूमकेतूचा आकार पाच किलोमीटर लांब इतका आहे. त्याला दोन शेपट्या आहेत. त्या शेपट्यांचं अंतर काही लाख किलोमीटर इतकं आहे.

या धूमकेतूची निर्मिती सूर्यमालेच्या निर्मितीच्या वेळी झाली होती. निओवाईजच्या केंद्रस्थानी धूलिकण आणि बर्फ आहे.”

मुंबईच्या खगोल मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकात हा धुमकेतू संध्याकाळी सहा ते साडे नऊ या वेळात भारतातून बघता येईल. गरज आहे ती आकाश निरभ्र असण्याची. जितका उशीर होईल तितका तो अंधुक होत जाईल.

नासाने निओवाईज हा धूमकेतू बघण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत :

 

neowise comet inmarathi3
english.jagran.com

 

१. तुम्हाला शहरातील उजेडा पासून थोडं लांब जावं लागेल. अशा ठिकाणी तुमची इन्फ्रारेड दुर्बीण घेऊन बसा जिथून तुम्हाला वायव्येकडच्या क्षितिजा पर्यंत बघता येईल.

२. तुमच्या प्रदेशात सूर्यास्त कधी होतो याचा अभ्यास करून घ्या. सूर्यास्तानंतर तुम्हाला कमीत कमी ४५ मिनिटे निओवाईज दिसण्यासाठी वाट बघावी लागेल.

३. आकाशात चांदणं पडण्याच्या वेळी निओवाईज सुद्धा दिसेल. तो काही ताऱ्यांप्रमाणे प्रखर असेल.

 

neowise comet inmarathi4
news18.com

 

४. उघड्या डोळ्यांनी तुम्ही हा धूमकेतू बघू शकतात. पण, छोटा टेलिस्कोप किंवा दुर्बीण असल्यास तुम्हाला थोडा क्लिअर view बघायला मिळेल.

५. निओवाईज मधून प्रकाश परावर्तित होईल आणि आपल्याला दोन शेपट्या तयार होतात. एका शेपटी मध्ये वायू आणि धूलिकण असतील. दुसऱ्या शेपटी मध्ये ionized particles असतात.

निओवाईज मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. फोटो आणि दुर्बीण असल्यास वरील मुद्दे तुमच्या लक्षात येतील.

ही संधी आपल्यापैकी जितक्या लोकांना सांगता येईल त्यांना सांगा. धूमकेतू बघितल्यानंतर होणाऱ्या आनंदात सर्वांना सामील करून घ्या.

आता नाही जमलं तर ८००० वर्षांनीच दिसणार आहे. आपल्या पिढीने आजवर फक्त शाहरुखच्या सिनेमातच ‘टूटता तारा’ बघितला असेल. आता प्रत्यक्षात आलेली ही संधी वाया घालवू नका.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?