' घरी बादलीत बनवले अस्सल मोती! या माणसाचा लाखभर रुपये मिळवून देणारा व्यवसाय!

घरी बादलीत बनवले अस्सल मोती! या माणसाचा लाखभर रुपये मिळवून देणारा व्यवसाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मोती हे केवळ खोल समुद्रात, शिंपल्यात तयार होतात हा तुमचा आजवरचा समज या बातमीमुळे मोडून पडेल. हा शेतकरी आपल्या शेतात, अगदी आपल्या अंगणात मोती तयार करण्यात यशस्वी झालेला आहे.

केरळच्या एका शेतकऱ्याने आपल्या घराच्या अंगणात कुंड्यामधून उगवलेत मोती. सध्या तो या मोत्यांवर लाखो रुपये कमवतोय.

ते म्हणतात, “केवळ एका वर्षात मी जवळपास ५० कुंड्यांमध्ये साडेचार लाख रुपये किंमतीचे मोती निर्माण केलेत. यात मला तीन लाखाचा निव्वळ नफा झालाय.”

हा शेतकरी आहे केरळ येथील कासारगोड जिल्ह्यातला.

या शेतकऱ्याचे नाव आहे केजे मथाचन आणि त्यांचे वय आज आहे ६५. यांनी नदीच्या पाण्यातल्या ताज्या शिंपल्यांचा वापर करून त्यात गेली दोन दशके प्रयत्न करून मोती उगवण्यात यशस्वी झाले आहेत.

नदीतल्या गोड्या पाण्यातील शिंपल्यांवर विशिष्ट प्रक्रिया करून त्यांनी हा प्रयोग केला आहे. हे मोती त्यांनी ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, कुवैत आणि स्वित्झर्लंड येथे निर्यात केले आहेत.

पाहू या त्यांनी हे कसे काय केले?

 

kj mathachan inmarathi

 

मथाचन हे याआधी सौदी अरेबियातील किंग फहाद पेट्रोलियम व खनिज विद्यापिठात दूरसंचार विभागात प्राध्यापक म्हणून काम करीत होते. तेव्हा त्यांना अरमको ऑईल कंपनीत अरबीतून इंग्रजीत अनुवादक म्हणून चीनला जाण्याची संधी मिळाली.

त्यादरम्यान त्यांनी चीनमधील वुक्शी येथील डॅनशुई फिशरीज रिसर्च सेन्टरला भेट दिली होती. मथाचन यांना पहिल्यापासून फिशरीज विषयात रस होता. त्यांनी त्या सेन्टरमधील वेगवेगळे कोर्सेस केले.

तिथेच त्यांनी मोत्याच्या लागवडीचा डिप्लोमा केला. हा एक वेगळाच प्रयोग होता. भारतात आजपर्यंत फार कमी लोकांनी असा प्रयोग केला असेल.

हा कोर्स करण्यासाठी मथाचन यांनी आपला जॉब सोडला आणि ते चीनला जाऊन राहिले. सहा महिन्यांचा कोर्स करून ते परत भारतात केरळ येथे आले. ते वर्ष होते १९९९चे. त्यांनी इथे येऊन आपल्या घराच्या परसदारी मोती उगवण्याचा प्रयोग सुरू केला.

हा त्यांनी घेतलेला अनपेक्षित निर्णय होता. त्यांच्या घरातल्या आणि परिचीत लोकांनी त्यावर बरीच टिकाही केली. परंतु मथाचन यांना आपण शिकलेल्या कोर्सवर आणि या प्रयोगावर पूर्ण विश्वास होता.

हा एक अपवादात्मक बिझनेस असून तो एक दिवस नक्की यशस्वी होईल याची त्यांना खात्री होती.

या प्रयोगासाठी त्यांनी नदीतले शिंपले गोळा करण्यास सुरूवात केली. काही शिंपले महाराष्ट्राच्या नदीतून तर काही प. घाटातील विविध नद्यांमधून आणले गेले. त्या शिंपल्यांवर त्यांनी आपल्या घराच्या परसदारी बादल्यांमधून प्रक्रिया सुरू केली.

 

kj mathachan inmarathi3

 

पहिल्या दीड वर्षांतच त्यांनी जवळपास पन्नास बादल्यांमधून मोती तयार केले. या मोत्यांची किंमत होती साडे चार लाख! आणि त्यासाठी त्यांना खर्च आला होता दीड लाख. म्हणजेच त्यांनी या प्रयोगावर तीन लाखाचा निव्वळ नफा कमवला होता. तोही दीड वर्षात.

यानंतर मथाचन यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांचा हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला आणि त्यांचा उद्योग बहरला. त्यांनी सरकारी लायसन्स काढून हा प्रयोग इतरांना शिकवण्यासाठी त्याचे क्लासेसही सुरू केले.

मोत्यांचा हा बिझनेस, इच्छुक असलेल्या सगळ्या लोकांनी शिकावा असे त्यांना वाटते.

पण ऑयस्टर, समुद्री शिंपले नसताना हे कसं शक्य झालं?

 

kj mathachan inmarathi1

 

ते म्हणतात, की मोत्यांच्या तीन मुलभूत जाती असतात. कृत्रिम, नैसर्गिक आणि कल्चर्ड मोती. मथाचन गेली वीस वर्षे जे मोती तयार करत आहेत ते आहेत कल्चर्ड मोती.

भारतातील नद्यांमधून भरपूर शिंपले मिळत असल्याने त्या शिंपल्यांच्या सहाय्याने कल्चर्ड मोती तयार करणे सहज शक्य आहे.

हे शिंपले अलगदपणे थोडे उघडून त्यात विशिष्ट पदार्थ सोडला जातो. त्यानंतर हे शिंपले पाण्यात एका जाळीदार पात्रात बुडवून ठेवले जातात. तेव्हा त्या पाण्याचे तापमान १५-२५ डीग्री राखले जाते.

त्यात त्यांना खाण्यासाठी बॅक्टेरिया सोडले जातात. जवळपास अठरा महिन्यांनंतर त्या शिंपल्यांमध्ये सोडलेले द्रव्य शिंपल्यातील कॅल्शिअम कार्बोनेटचा वापर करून मोत्याचा आकार घेऊ लागते.

या द्रव्यावर जवळपास ५४० थरांचे आवरण तयार होऊन ते मोत्यासारखे तयार होते.

मथाचन यांच्या शेतात तयार झालेले हे कल्चर्ड मोती अत्यंत मौल्यवान असून ते निर्यातीच्या दर्जाचे असतात. त्यांची विक्री सौदी, कुवैत, ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंड येथे होते. या देशांतून या मोत्यांना खूप मागणी आहे.

 

भारतातील बाजारातले मोती-

 

pearl inarathi

 

भारतातील बाजारात जे मोती आणि त्यांचे दागिने मिळतात, ते प्रामुख्याने कृत्रिम मोती असतात. मात्र ते खरे मोती वाटतात, कारण त्यांच्यावर सिंथेटिक चमकदार आवरण तयार केलेले असते.

अर्थातच असे मोती फार स्वस्त असतात. खरा एका मोती हा जवळपास एका कॅरेटला ३६० रुपये आणि एका ग्रामला १८०० रुपये इतका महाग असतो.

मथाचन यांनी आपल्या घरामागे एक कृत्रिम तलावच या कामासाठी तयार केला आहे. हा तलाव ३० मिटर लांब आणि १५ मिटर रुंदीचा आहे. तसेच ६ मिटर खोल आहे. हा एक वेगळा व्यवसाय आहे.

अर्थात यासाठी मथाचन यांनी योग्य प्रशिक्षण घेऊन त्यासंबंधी ज्ञान मिळवले. आपल्या चांगल्या नोकरीचा त्याग केला, धोका पत्करला, लोकांची टिका सहन केली आणि नंतर अत्यंत मेहनत घेऊन त्यांनी हा व्यवसाय आकाराला आणला.

त्यासाठी त्यांचे कौतुकच आहे. याशिवाय त्यांनी आपल्या घरामागे मोठ्या प्रमाणावर नारळाची झाडे, आंब्याची झाडे आणि व्हॅनिलाची झाडे लावली आहेत. त्यांचेही उत्पन्न येते.

२०१८ साली त्यांना मोठा अटॅक आला होता. तरीही त्यांनी लोकल शेतकऱ्यांच्या मदतीने आपला हा व्यवसाय चालूच ठेवला.

सोबतच या व्यवसायासाठी लागणारे प्रशिक्षणही इतरांसाठी आणि विशेषतः तरूण शेतकऱ्यांसाठी चालू ठेवले.

 

kj mathachan inmarathi2

 

मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात त्यांचा हा व्यवसाय थोडा मंदावला होता. मात्र, त्यांनी या व्यवसायाचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आणि लोकांचे लक्ष आपल्या या अनोख्या व्यवसायाकडे खेचून घेतले आहे.

केरळमधील अनेक युनिव्हर्सिटीतून विद्यार्थी त्यांचा हा प्रोजेक्ट पाहायला येतात. अनेक लोकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय सुरू करत आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “घरी बादलीत बनवले अस्सल मोती! या माणसाचा लाखभर रुपये मिळवून देणारा व्यवसाय!

  • August 5, 2020 at 5:09 pm
    Permalink

    very nice plz send me ur sell number sir

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?