' भारतमातेच्या या दहा वीरपुत्रांनी गाजवलेला पराक्रम ऐकून तुम्हीसुद्धा द्याल कडक सॅल्यूट! – InMarathi

भारतमातेच्या या दहा वीरपुत्रांनी गाजवलेला पराक्रम ऐकून तुम्हीसुद्धा द्याल कडक सॅल्यूट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपला देश हा नेहमीच आपल्या सैनिकांचा ऋणी राहिला आहे. देशावर जेव्हा जेव्हा युद्धाचं संकट आलं तेव्हा तेव्हा सीमेवरील सैनिकांमुळे आपण निर्धास्त राहिलो.

त्यातील अनेकांनी देशासाठी, देशातील जनतेच्या संरक्षणासाठी आपले प्राण गमावले. लोक या शहिदांचा सदैव आदर करतात.

आज आपल्या या लेखात अशाच दहा सैनिकांचा परिचय करून घायचा आहे. त्यांचे धाडस, त्यांचे शौर्य आणि त्यांचे बलिदान यांना आम्ही सॅल्यूट करतो.

त्यांच्यामुळेच देशभक्ती काय असते ते आपल्याला शिकायला मिळतं.

१. कॅप्टन अनुज नय्यर –

 

anuj nayyar inmarathi
thebetterindia.com

 

कारगिल युद्धाच्या वेळी १७ जाट रेजिमेंटचा हा सर्वात लहान वयाचा सैनिक होता.  पाकिस्तानच्या घुसखोरीला उत्तर देण्यासाठी जीवाची शर्थ केली. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी हार मानली नाही.

हे करत असताना त्याच्या अंगावर स्फोटकं सुद्धा पडली होती. अशा सैनिकांमुळेच आपण कारगिल युद्ध जिंकलो आणि पाकिस्तानला धडा शिकवला.

२. लेफ्टनंट अरूण खेतरपाल –

 

arun khetarpal
thebetterindia.com

हे ही वाचा –  सैन्यातील सर्व जवानांचे केस बारीक असण्यामागची कारणं, सैन्याच्या कार्यपद्धतीची झलक दाखवतात!

लेफ्टनंट अरूण खेतरपाल यांचा त्याग आणि शौर्य अफाट आहे. १९७१ च्या युद्धात त्यांच्या शौर्याचा महत्त्वाचा वाटा होता.

त्यांची युद्धातील रणगाड्यांची रणनीती आणि नेतृत्व कौशल्य यामुळेच शत्रूला आपल्या देशात प्रवेश मिळू शकला नाही. लेफ्टनंट अरुण खेतरपाल शहीद झाले तेव्हा त्यांचे वय अवघे २१ होते.

३. लेफ्टनंट अरविंद सिंग –

 

lt. arvind singh inmarathi
facebook.com

 

भारतीय मरीन स्पेशल फोर्स ऑफिसर, लेफ्टनंट अरविंद सिंग यांना ‘इंडियन पीस कीपिंग फोर्स’चा एक भाग म्हणून श्रीलंकेत तैनात केले होते. त्यांनी आपल्या टिमला माईन्सच्या क्षेत्रातून सुखरूप बाहेर काढले.

आपल्या सैन्याला सुरक्षित बाहेर पडता यावे म्हणून, ते पुढे सरसावले. शत्रू हल्ला करत असताना, प्रतिहल्ला करून त्यांनी इतर सैनिकांचे प्राण वाचवले.  या हल्ल्यात अरविंद सिंग मात्र शहीद झाले.

 

४. लेफ्टनंट कर्नल धानसिंग थापा –

 

dhan singh thapa inmarathi
jauhindindian.army

‘हे ही वाचा – भुज’चा हल्ला: भारताच्या स्वाभिमानासाठी लढलेला ‘मराठमोळा जवान’ आहे तरी कोण?

१९६२च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी लेफ्टनंट कर्नल धनसिंग थापा हे शत्रूसैन्याला रोखण्यासाठी लडाख येथील सीमेवर तळ ठोकून होते. त्यांनी शत्रूसैन्याला तिथेच रोखून धरले आणि आपला गड राखला.

 

५. रायफलमॅन जसवंतसिंग रावत –

 

jaswant singh rawat inmarathi
ukacademe.com

 

१९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी रायफलमन जसवंतसिंग रावत यांना माघार घेण्यास सांगितले होते. असे असतानाही ते शत्रूसैन्यासमोर उभे ठाकले. त्यांनी केवळ दोन आदिवासी मुलींच्या सोबतीने शत्रूचा सामना केला.

सेला आणि नुरा अशी त्या मुलींची नावं होती. त्यांनी अशी रणनीती आखली की समोरील चीनी सैन्याला वाटले की जसवंतसिंगाच्या मागे मोठी बटालियन उभी आहे.

शत्रूसैन्याला चकवणारी त्यांची ही रणनीती आजही वाखाणली जाते. प्रत्यक्षात ते लढले ती केवळ वन मॅन आर्मी होती.

६. ब्रिगेडीयर कुलदिप सिंग चांदपुरी –

 

kuldeep singh chandpuri inmarathi
english.hindikhabar.com

 

१९७१ च्या भारत-पाक युद्धात ब्रिगेडीयर चंदपुरीनी पंजाब रेजिमेंटच्या तुकडीचे नेतृत्व केले आणि ते विजयी ठरले. त्यांनी जे अतुलनीय धैर्य दाखवले त्याच घटनेवर बॉर्डर सिनेमा आधारलेला होता.

सिनेमात चंदपूरी यांची भुमिका सनी देवलने साकारली होती. ती भूमिका देखील ब्रिगे. चंदपुरींप्रमाणेच अजरामर झालेली आहे. त्या भूमिकेतूनच ब्रिगेडीयर चंदपुरी यांचा लढाऊ बाण्याची कल्पना येईल.

 

७. फ्लाईंग ऑफिसर निर्मल जित सिंग सेखन –

 

nimal jeet singh inmarathi
thebetterindia.com

 

फ्लाईंग ऑफिसर निर्मल जीतसिंग शेखोन, परमवीर चक्र जिंकणारे हवाई दलाचे एकमेव अधिकारी म्हणून ओळखले जातात. यांनी श्रीनगर हवाई तळाचे रक्षण करण्यासाठी बरेच धैर्य दाखवले होते.

शत्रूच्या सहा विमानांना त्यांनी एकट्यांनी लढा देऊन परतवले होते.

 

८. कॅप्टन विक्रम बत्रा –

 

vikram batra inmarathi
thebetterindia.com

 

यांचा जन्म हिमाचल प्रदेश येथील पालमपुरचा आहे. ते १३ जम्मु कश्मीर रायफल फलटणीचे कॅप्टन होते. १९९९च्या कारगिल युद्धाचा नायक कॅप्टन विक्रम बात्रा याने कारगिलचे शिखर शत्रू सैन्याच्या हातून वाचवण्यात मोलाची कामगिरी बजावली होती.

आपले १६००० फूट उंचावरील शिखर ५१४० वाचवण्यासाठीच्या मिशनवर असताना, जखमी झालेल्या आपल्या एका अधिकाऱ्याला सोडवण्यासाठी त्यांनी जीवाची बाजी लावली.

हे शिखर ७ जुलै १९९९ला पुन्हा ताब्यात घेतले, तेव्हा त्यांचे शेवटचे शब्द होते, ‘जय माता दी.’ या मोहिमेवर जाताना त्यांचे शब्द होते, ‘एकतर मी तिथे तिरंगा लावून परत येईन, किंवा तिरंग्यात लपेटून परत येईन.’

२००३ साली या कारगिलच्या घटनेवर एलओसी कारगिल नावाचा सिनेमा आला होता. त्यात बात्रांची भुमिका अभिषेक बच्चन याने केली होती.

 

९. सुभेदार योगेंद्र सिंग यादव –

 

subedar yogendra singh inmarathi
youtube.com

हे ही वाचा – भारताचे नागरिक “नसलेले” – पण आपल्या सीमेचं रक्षण करणारे “खास” जवान…!

कारगिल युद्धात १६००० फूट उंचीवरच्या बर्फाच्छादित टायगर हिल भारतीय सैन्याने पुन्हा ताब्यात घेतली.  आपले सैन्य सक्षम ठरले त्याचे मुख्य कारण सुभेदार योगेंद्रसिंग यादव होते.

परमवीर चक्र मिळवणारा हा केवळ १९ वर्षांचा सर्वात तरुण सैनिक. त्यांचा जन्म १९८० साली यूपीतील औरंगाबादजवळील अहिर या छोट्याशा गावात झाला होता.

टायगर हिलवरून शत्रू सैन्य रॉकेटफायर करत असताना हा निधड्या छातीचा जवान दोराच्या सहाय्याने ते शिखर चढून वर चालला होता. शरीराला तीन ठिकाणी गोळ्या लागूनही ते वरती चढतच राहिले.

वर गेल्यावर तशाही अवस्थेत त्यांनी शत्रूसैन्याचा पहिला बंकर फोडला. चार पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले. त्यांच्या या पराक्रमामुळे मागून येणारे भारतीय सैन्य सुरक्षितपणे शिखर चढून येऊ शकले.

पण यादव तिथेच थांबले नव्हते. त्यांनी आपल्या दोन साथीदारांसह पुढे जाऊन शत्रूच्या दुसऱ्या बंकरवर देखील हल्ला चढवला होता. मागील सैन्य येईपर्यंत यादव यांनी निम्मे शत्रूसैनिक गारद केले होते.

कुणी म्हणतात यादवला १६ गोळ्या लागल्या होत्या. परंतु ते तरीही लढत राहिले होते. त्यांची भुमिका लक्ष्य सिनेमात ऋतिक रोशन याने केली होती.

 

१०. लान्स नायक अल्बर्ट एक्का –

 

lance naik inmarathi
republicworld.com

हे ही वाचा – देशाच्या रक्षणधगधगणाऱ्या काश्मीर मध्ये दक्ष असलेल्या जवानांच्या टोपीची ही खास बाब वाचून थक्क व्हाल!

१९७१च्या युद्धात लान्स नाईक एक्का यांनी शत्रू सैन्यावर जोरदार हल्ला करून शत्रूचे बंकर आणि सैनिकांचा खातमा केला. त्यावेळी ते स्वतः खूप जखमी झाले आणि अखेर कोसळले.

परंतु आपले ध्येय गाठल्यावरच त्यांनी प्राण सोडला. त्यांच्या अतुलनीय शौर्याच्या आठवणीत आजही वीरनायकांची वीरज्योत जळते आहे.

असे हे भारताचे वीर बहादूर जवान. चला या पंधरा ऑगस्टला त्यांच्या आठवणीत स्वतःला गौरवशाली, भाग्यशाली समजू या. आणि त्यांना एक कडक सॅल्यूट देऊ या.

देशाच्या सीमेवर हे असे सैनिक तैनात असल्यामुळेच आपण आपल्या घरी सुखाने आपले जीवन कंठू शकतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?