' महागड्या ‘डेंटल ट्रिटमेंट’पेक्षा या घरगुती उपायांच्या मदतीने दातांना कीड लागू न देणं केव्हाही योग्यच! – InMarathi

महागड्या ‘डेंटल ट्रिटमेंट’पेक्षा या घरगुती उपायांच्या मदतीने दातांना कीड लागू न देणं केव्हाही योग्यच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मनुष्याला हास्य किंवा स्मित हास्य ही एक दैवी देणगी आहे. एखाद्या व्यक्तीचे स्मितहास्य ही त्या व्यक्तीची खासियत असते. अशा व्यक्तीकडे पाहून आपल्याला पण प्रसन्न वाटतं.

 

teeth care inmarathi
burienfamilydentalcare.com

 

इतर कोणत्याही प्राण्यामध्ये ही स्मित हास्याची खासियत नाही, त्यामुळे हे स्मित हास्य मानवाला मिळालेले जणू वरदानच आहे. पण, जर दात नीट नसतील, किडके असतील तर ते स्मित हास्य पाहून प्रसन्न वाटेल का?

आपले दात किडके असावेत असे कोणालाच वाटणार नाही.

दातांचे आरोग्य आणि स्मितहास्य ह्यांचा परस्पर संबंध आहे, तसेच आपले दात निरोगी असतील, तर आपण आपला आहारही व्यवस्थित घेऊ शकू.

जर दात किडके असतील तरआपण आपला आहारही व्यवस्थित घेऊ शकणार नाही, कारण अन्न चावताना वेदना होणार आणि म्हणून आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वादही आपल्याला घेता येणार नाही.

मग आपले दात नीट, निरोगी करण्यासाठी आपल्याला डेंटिस्टकडे धाव घ्यावी लागते आणि डेंटिस्टची ट्रीटमेंट घ्यायची म्हणजे खूप वेळ खर्च करावा लागतो, शिवाय आपला खिसा देखील बराच हलका होतो कारण ह्या ट्रीटमेंटस् खूपच महाग असतात.

 

teeth care featured inmarathi
visualsstock.com

 

मग अशा वेळी आपल्या हातात एकच गोष्ट असते ते म्हणजे, आपले दात किडू न देणं! आपल्या दातांची काळजी आधीपासूनच आपण घ्यायची, ते म्हणतात ना prevention is better than cure!

मागाहून दातदुखी, महागड्या ट्रीटमेंटस्, वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा दातांची निगा आधीच राखायची जेणे करून ते किडणार नाहीत.

फ्लोराइड युक्त टूथपेस्टनी दात घासणे हा एक दात किडू न देण्याचा एक उपाय आहे, पण त्यापेक्षा घरगुती उपाय जास्त खात्रीशीर आणि फायदेशीर असतात.

घरगुती उपायांचा अपाय पण होत नाही. चला तर मग आज आपण ह्या लेखात हेच बघूया, की दातांची घरीच सहजपणे उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून कशी काळजी घ्यायची!

 

१. तेलाच्या गुळण्या करणे किंवा तेलाने चूळ भरणे

 

oil pulling inmarathi
albanyawakenings.com

 

जीवाणू, कीड आणि दातांसंबधित समस्या मूळापासून काढून टाकण्यासाठी तेलाने चूळ भरणे (ऑईल पुलिंग oil pulling) हा एक उत्तम उपाय आहे.

काही संशोधन असे सूचित करतात, की काही तेलांनी चूळ भरली तर, कीड लागण्याची शक्यता खूपच कमी होते शिवाय दात पांढरे होण्यास मदत होऊ शकते.

अमेरिकन डेंटल असोसिएशन (एडीए) तेलाने चूळ भरणे ही पारंपरिक दंतचिकित्सा मानते आणि असे सांगते की,

“तेलामुळे दातांची पोकळी कमी होते, दात पांढरे शुभ्र होतात किंवा तोंडाचे आरोग्य सुधारते.

कशी वापरावी ही पद्धत?

या पद्धतीचा वापर करण्यासाठी, ब्रश केल्यानंतर एक मिनिट तेलाने स्वच्छ चूळ भरा. नंतर ते थुंकून टाका.

ह्यासाठी उपयुक्त तेलांमध्ये ह्या तेलांचा समावेश होतो:

खोबरेल तेल
सूर्यफूल तेल
तीळाचे तेल

 

२. अन्नातील साखरेचे प्रमाण कमी करणे

 

sugar inmarathi
theconversation.com

 

अन्नात साखरेचे प्रमाण जास्त असल्यास ते आपल्या शरीरासाठी तर हानीकारक असतेच, शिवाय आपल्या दातांनाही ते हानी पोहोचवते.

म्हणजेच मिठाई, चॉकोलेटस्, जास्त गोड पेये इत्यादी खाल्ल्याने किंवा प्यायल्याने दात किडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे अशा अती गोड पदार्थांचे सेवन टाळावे.

ज्या पदार्थांमधे साखरेचे प्रमाण जास्त असते त्या पदार्थांचे सेवन शक्यतो टाळावे किंवा त्यांच्या सेवनाचे प्रमाण कमी करावे. खाल्यानंतर लगेचच चूळ भरावी.

 

३. लवंग किंवा लवंग तेल

 

clove oil inmarathi
wikihow.com

 

दातांच्या आरोग्यासाठी लवंग हा अत्यंत उपयुक्त पदार्थ आहे आणि जो आपल्या सगळ्यांच्याच घरात अत्यंत सहजतेने उपलब्ध असतो. ही लवंग जर रोज खाल्ली किंवा चघळली तर दातांच्या किडण्याची समस्या अजिबात उद्भवणार नाही.

लवंगाचे तेल देखील वापरणे अतिशय फायदेशीर असते. हे तेल एका स्वच्छ कापसाच्या बोळ्यावर घ्यावे आणि तो बोळा दाताखाली धरावा.

जर दातदुखीची अगदी सुरुवात असेल (किडण्याची अगदी पहिली पायरी) तर कापसाच्या बोळ्यावर लवंग तेल घालून तो बोळा दातांखाली धरावा.

ह्या उपायाचा दातांना खूपच फायदा होतो. घरच्या घरी केलेला हा उपाय खूपच गुणकारी आहे आणि ह्याचे काही side effects देखील होत नाहीत.

 

३. कोरफड जेल

 

aloe vera jel inmarathi
shoestringsustainability.wordpress.com

 

कोरफड जेल हे वाचून थोडे आश्चर्य वाटले ना! पण तुम्हाला माहितेय का कोरफड जेल (घरात कोरफडीचे रोप असेल तर उत्तमच नाही तर Aloe vera tooth gel मिळते त्याचा वापर करावा) हे दातांच्या सर्व समस्यांना दूर करते.

हे खरंच दातांच्या सर्व समस्यांवर एक गुणकारी औषध आहे. जर पोटात गेले तरी त्याने काहीच हानी होत नाही.

त्यामुळे निर्धोकपणे, कोणतीही शंका न बाळगता दातांना हे कोरफड जेल लावू आपण शकतो .

 

४. व्हॅनिला इसेंस

 

vannila extract inmarathi.jpg1
foodsguy.com

 

व्हॅनिला इसेंस मधे दातांच्या समस्यांना दूर करणारे घटक असतात, त्यामुळे ऐकायला जरी विचित्र वाटलं तरी आपल्या दातांच्या आरोग्यासाठी ते खूपच फायदेशीर असते.

ज्याप्रमाणे आपण लवंग तेल एका कापसाच्या बोळ्यावर घेऊन तो आपण दाताखाली धरतो त्याचप्रमाणे थोडेसे व्हॅनिला इसेंस कापसाच्या बोळ्यावर घ्यायचे आणि तो बोळा दातांखाली धरावा.

त्यामुळे दात किडणे, दातदुखी अशा दातांच्या समस्यांपासून मुक्ती मिळते.

 

५. व्हिटॅमिन डी

 

vitamin d inmarathi 2
bbc.com

 

२०१३ मधल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे, की व्हिटॅमिन डी हे दातांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. व्हिटॅमिन डी मध्ये असणाऱ्या खनिजांच्या कारणामुळे दातांच्या समस्या उद्भवण्याची शक्यता खूपच असते.

दातांचे किडणे, दातदुखी तर उद्भवत नाहीच, शिवाय व्हिटॅमिन डी मुळे हिरड्या देखील मजबूत होतात.

व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ :

 

milk featured inmarathi
nbcnews.com

दूध
अंडे
मशरूम
सोया
मासे
संत्रे (संत्र्याचा रस असेल तर जास्त फायदेशीर असते)
चीज
दही
ओटस्
मोड आलेली कडधान्ये

मग काय मंडळी! आपल्या दातांचे आरोग्य नीट रहावे म्हणून हे उपाय घरच्या घरी करून दात किडण्यापासून वाचवणार ना?

ज्या उपायांमुळे आपला किंमती वेळ आणि पैसा देखील वाचेल आणि किडल्यानंतर, महागड्या ट्रीटमेंटस् घेण्यापेक्षा दात किडू नयेत ह्यासाठीचे हे घरगुती उपाय नक्कीच सर्वच दृष्टीने फायदेशीर आहेत.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?