' वडील कंपनीचे सर्वेसर्वा, मुलीने मात्र आपल्या हिंमतीवर कंपनीचे अध्यक्षपद कमावले!!

वडील कंपनीचे सर्वेसर्वा, मुलीने मात्र आपल्या हिंमतीवर कंपनीचे अध्यक्षपद कमावले!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

मुलगी म्हणजे ‘मर्यादित काम करणारी व्यक्ती’ असं भारतीय समाजात मानलं जात असे. मागच्या काही वर्षात ही ओळख बदलताना दिसत आहे.

प्रामुख्याने IT सेक्टरची भारतात जेव्हापासून भरभराट झाली तेव्हापासून, मुलींसाठी नोकरीमध्ये समान संधी उपलब्ध झाल्या आहेत हे मान्य करावंच लागेल. मॅनेजमेंट जॉब्समध्ये सुद्धा मुलींना प्रथम प्राधान्य दिलं जात आहे.

याचं कारण म्हणजे त्यांच्यात असलेला समजूतदारपणा!

स्त्रियांकडे असणारी एका जॉबमध्ये टिकून राहण्याची वृत्ती आणि कोणत्याही गोष्टीचं लवकर आकलन करण्याचा स्वभाव ही या बदलाची प्रमुख कारणं आहेत. हे कोणी नाकारू शकत नाही.

काही उदाहरणं द्यायची झाली तर, जगद्विख्यात पेप्सी कंपनीच्या सी.इ.ओ इंद्रा नूयी ज्यांनी पूर्ण जगात भारताचा ठसा उमटवला होता. सुधा मूर्ती ज्या ‘इन्फोसिस’ या IT कंपनीच्या चेअर पर्सन आहेत.

 

indra nooyi inmarathi
successstory.com

मुलांना शिकवण्यासाठी, दररोज नदी पार करणाऱ्या कष्टाळू शिक्षिकेचा खडतर प्रवास

त्या स्वतः कॉम्प्युटर इंजिनिअर आहेत. या श्रेणीतील अजून एक नाव म्हणजे आपल्या औरंगाबादची मयुरी कांगो. कला क्षेत्रातील करिअर नंतर ती कुठे गेली ? हे बऱ्याच जणांना माहीत नसेल.

ती सध्या Google India Industry Head – Agency Business म्हणून कार्यरत आहे.

आता या यादीमध्ये एक नवीन नाव समाविष्ट झालं आहे ते म्हणजे रोशनी नाडर – मल्होत्रा. वय फक्त ३८ वर्ष१ इतक्या कमी वयात त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल.

२०१९ च्या Forbes च्या जगातील ‘मोस्ट पॉवरफुल वूमन’ या १०० महिलांच्या यादीत त्या ५४ व्या स्थानावर होत्या. HCL कंपनीच्या फाऊंडर शिव नाडर यांची ही एकुलती एक कन्या आहे.

रोशनी या शिव नाडर चॅरिटेबल फाउंडेशनच्याट्रस्टी आहेत. जुलै २०२०मध्ये शिव नाडर यांनी HCL ची सर्व सूत्रं रोशनी नाडर – मल्होत्रा यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांनी सुद्धा उत्तम काम करून वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला आहे.

 

roshni nadar inmarathi
indiatvnews.com

आर्किटेक्ट होण्याचं तंत्रशुद्ध शिक्षण नव्हतं; तरीही या महिलेने भारतात ‘स्वर्ग’ साकारला!

ही नवी जबाबदारी स्वीकारण्याआधी, रोशनी नाडर – मल्होत्रा केवळ नाडर फाउंडेशनच्या ट्रस्टी होत्या. चेन्नई मधील श्री शिवसुब्रमण्यम नाडर कॉलेज ऑफ इंजिनीरिंग या चॅरिटेबल कॉलेजचं व्यवस्थापन त्या बघत होत्या.

त्यासोबतच, रोशनी या शिव नाडर विद्यापीठाची जबाबदारी सांभाळत होत्या. त्यांच्या अधिपत्याखाली VidyaGyan या नावाने उत्तर प्रदेशातील बुलंद शहर इथे त्यांनी गरीब मुलांसाठी त्यांनी मोफत शाळा सुरू केल्या आहेत.

यासोबतच, HCL हा ब्रँड भारतात प्रसिद्ध होण्यासाठी रोशनी यांनी विविध उपक्रम राबवले आणि आपली योग्यता सिद्ध केली.

त्यांच्या परोपकारी वृत्तीसाठी सुद्धा तितक्याच आत्मीयतेने त्यांना नावाजलं जातं.

त्यांच्या या वृत्तीची दखल घेऊन त्यांना २०१४ मध्ये NDTV ने ‘Young Philanthropist of the Year’ या अवॉर्ड ने सन्मानित केलं होतं.

तर, २०१५ मध्ये WSIE (World Summit on Innovation & Entrepreneurship) ने रोशनी यांना ‘World’s most innovative people award ‘ ने सन्मानित केलं होतं. त्याच बरोबर, २०१७ मध्ये त्यांना ‘Vogue India Philanthropist of the Year’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

 

roshni nadar inmarathi 2
entrepreneurship.babson.edu

एक सामान्य मुलगी ते भारताची पहिली महिला फोटोजर्नलिस्ट – प्रवास जाणून घ्या!

हे सर्व सांगण्याचं कारण असं की, त्यांना HCL कंपनीची चेअरपर्सनचं पद केवळ वडील कंपनीचे सर्वेसर्वा होते म्हणून मिळालेले नाही.

करिअर सुरू केल्यानंतर त्यांनी केलेल्या विविध व्यवसायिक आणि सामाजिक सकारत्मक कार्याचं हे फलित आहे असं म्हणता येईल.

HCL कंपनीची सुरुवात १९७६ मध्ये शिव नाडर यांनी दिल्ली मधील बरासती या ठिकाणापासून केली होती. सुरुवातीला HCL ही एक कॉम्प्युटर हार्डवेअर सप्लायर म्हणून काम बघत होती.

तिथून सुरू झालेला प्रवास हा आज ४६ देशातील त्यांच्या शाखा आणि त्यात कार्यरत असलेले १,५०,००० कर्मचारी इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. कॉप्युटर तयार करणारी भारतातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून HCLने नाव मिळवलं आहे.

माहिती आणि तंत्रज्ञानात त्यांनी केलेल्या प्रगतीचा अभ्यास जगभरातील कंपन्या सध्या करत आहेत. त्यांचा सध्याचा ग्लोबल टर्नओवर हा $९.९ बिलियन इतका आहे.

बिजनेस साठी हे दिवस येणं इतकं सोपं नसतं तसंच HCL साठी सुद्धा ते सोपं नव्हतं. रोशनी नाडर यांनी काम सुरु केलं तेव्हा त्या आज आहेत तितक्या ध्येयवादी नव्हत्या.

 

roshni nadar 3 inmarathi
businesstoday.in

 

त्यांचं मन कायम समोजोपयोगी कामांमध्येच रमायचं. म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रात योगदान देण्याचं ठरवलं होतं. त्यांचा हेतू पैसे कमावणं हा कधीच नव्हता.

बिजनेस टुडे ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी वापरलेलं एक वाक्य खूप गाजलं होतं, “Money-making and Education do not go together”.

२०१३ मध्ये HCL Technologiesच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये रुजू झाल्यानंतर रोशनी यांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीत बदल केला. अनेक वर्षं HCL ही लोकांना फक्त IT कंपनी म्हणून माहीत होती.

२०१४ पासून कंपनीने हेल्थकेअर सेक्टरमध्ये सुद्धा काम करणं सुरू केलं. HCL Corp या कंपनीचा टर्नओव्हर वाढत चालला होता. गरज होती तो अतिरिक्त पैसा इतर सेक्टरमध्ये गुंतवण्याची.

ही गरज रोशनी यांनी ओळखली. परदेशात Kellogg School of Management मधून MBA केलेल्या रोशनी यांना भारतातील कामाची पद्धत बोर्डरूमचे नियम या गोष्टी पटत नव्हत्या.

मात्र त्यांनी आधी स्वतःचं ट्रेनिंग पूर्ण केलं.

एका मुलाखतीत रोशनी नाडर यांनी सांगितलं होतं की, “तुम्हाला जर बिजनेसमध्ये यश मिळवायचं असेल तर, त्यासाठी तुम्ही आधी स्वतःला तितकं कार्यक्षम बनवणं खूप गरजेचं आहे.”

 

hcl founders inmarathi
flickr.com

आईच्या वेदना पाहून त्याने जे केलं त्यासाठी जगभरातील महिला त्याचे आभार मानतील

रोशनी नाडर – मल्होत्रा यांना फक्त बिजनेसची आवड आहे, असं नाही. त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण हे अमेरिकेतील Northwestern युनिव्हर्सिटी मधून रेडिओ, टेलिव्हिजन आणि फिल्म्स मध्ये झालं होतं.

त्यांनी शास्त्रीय नृत्य सुद्धा शिकलं आहे. Kelogg School of Management मधून MBA पूर्ण केल्यानंतर त्यांनी UK च्या Sky News आणि CNN America मध्ये News Producer म्हणून काम सुद्धा केलं होतं.

त्या अनुभवानंतर २००९ मध्ये त्यांनी HCL Corp जॉईन केली. एका वर्षात त्या CEO झाल्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी त्यांनी हे यश मिळवलं.

त्यांनी सुरु केलेल्या शाळेविषयी बोलताना, त्या एकदा म्हणाल्या होत्या;

“आपल्या शाळेचं नाव होण्यासाठी कमीत कमी ३० वर्षांच्या प्लॅनसाठी तयार असावं लागेल. कारण, आपण मुलांना फक्त शिक्षण देत नाही आहोत. आपण भविष्यातले लिडर्स तयार करत आहोत.”

असे विचार असल्यानेच रोशनी या भारतीय IT इंडस्ट्रीमधील A listed कंपनीला लीड करणाऱ्या पहिल्या महिला होऊ शकल्या. शिव नाडर हे Chief Strategy Officer म्हणून HCL ग्रुपचा भाग आहेत.

रोशनी नाडर HCL Healthcare चे Vice चेअरमन शिखर मल्होत्रा यांच्या पत्नी आहेत. त्यांना अरमान आणि जहान ही दोन मुलं आहेत.

 

richest women inmarathi
trendingews.news

नवऱ्याने टाकलं, पदरी दोन मुलं, वाचा, ‘सफाई कामगार कशी बनली कलेक्टर’!

रोशनी नाडर – मल्होत्रा यांचे विचार आणि करिअरचा प्रवास, मॅनेजमेंट स्किल्स या सध्याच्या आणि येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच आदर्शवादी आहेत.

HCL या भारतीय ग्रुपच्या उत्तरोत्तर भरभराटीसाठी आमच्या टीम कडून शुभेच्छा… 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?