' पावसाळ्यात आजही पाळल्या जाणाऱ्या ११ हास्यास्पद अंधश्रद्धा! – InMarathi

पावसाळ्यात आजही पाळल्या जाणाऱ्या ११ हास्यास्पद अंधश्रद्धा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पावसाळा सुरू झाला की काय काय होतं? उन्हानं तापलेल्या धरतीवर पाऊस बरसला की मृद्गंध पसरतो. सर्वात सुंदर सुगंध..जो आजवर कुणीही तयार करु शकलेलं नाही.

मग कविता करणारे लोक उत्साहानं कविता करु लगतात. शेतकरी पेरणीच्या मागं लागतात, मुलांच्या शाळा सुरू होतात, पुस्तकांसोबतच नवे रेनकोट, छत्र्या यांची खरेदी होते.

गृहीणींना गरमागरम चहा आणि भजीची फर्माईश केली जाते. कविमनाची माणसं पावसाची गाणी लावून पाऊस एंजाॅय करतात. फारच हौशी लोक वर्षाविहाराला जातात. पावसात भिजतात.

 

rain mumbai 1 inmarathi

हे ही वाचा – समाजात वर्षानुवर्षे पाळल्या जाणाऱ्या ९ अंधश्रद्धामागील अजब कहाण्या!

एकंदरीत पावसानं धरतीला जसा हिरवा ऋतू व्यापून टाकतो. तशीच मनंही हिरवीगार करायचं सामर्थ्य पावसाळ्यात आहे.

 

सासुरवाशीण मुलींना श्रावणात येणारे सणवार हे माहेरी जायचं निमित्त देतात. झाडाला बांधलेले झोके, मेहंदी, मंगळागौर, शिवामूठ, अशा उत्साहानं पावसाळा भरलेला असतो.

पाऊस पण नेमका आॅफीसला जायच्या वेळी आणि आॅफीस सुटायच्या वेळीच चालू होतो. आॅफीसला जायला उशीर..घरी परतायला उशीर.

शाळकरी मुलांचे तर वेगळेच दुःख.. रात्रभर पडत असलेला पाऊस सकाळी सकाळी थांबतो. आणि शाळेला जावं लागतं. पाऊस न आवडणारे लोक पण आहेतच.

 

rainy season inmarathi

 

चिखलाची किचकिच..कपडे न वाळणं..नदीला पूर येणं ही कितीतरी कारणं त्यांच्याकडं असतात. थोडक्यात सांगायचं तर पाऊस कधी आवडता तर कधी नावडता.. कुणाचा प्रिय सखा तर कुणाचा अप्रिय.

पण आजही एकविसावं शतक ओलांडून पुढे चाललो, तरी पावसाशी संबंधित कितीतरी विचित्र गोष्टी आपल्या समाजात मानल्या जातात. अगदी सुशिक्षित लोकही यात मागे नाहीत. त्या ऐकून हसावं की रडावं समजत नाही.

यातील काही मान्यता खरोखर खऱ्या आहेत आणि कांही फक्त अंधश्रद्धा.

 

rain inmarathi

 

वास्तविक भारतीय समाज हा अत्यंत धार्मिक दृष्टीकोनातून विचार करणारा आहे. त्यावर आधारित असलेल्या कितीतरी गोष्टी लोकांनी आंधळेपणाने स्वीकारल्याही आहेत. त्यासाठी एका बेंचची गोष्ट सांगितली जाते..

एकदा एका अधिकाऱ्याने एका हाताखाली काम करणाऱ्या माणसाला एका बेंचवर बसायला सांगितले. त्याने काही न विचारता ते काम स्वीकारले.

रोज न चुकता तो तिथं बसून रहायचा. पुढं त्या अधिकाऱ्याची बदली झाली. त्या बेंचवर बसणाऱ्या माणसाचीही बदली झाली. त्याच्या जागी दुसरा माणूस आला. तोही तिथं बसून राहू लागला. का?

याचं कारण त्यालाही माहीत नव्हतं. अशी बरीच वर्षे गेली. त्या ड्यूटीवर असलेला प्रत्येक जण तिथं बसून रहायचा. एका अधिकाऱ्याने त्या जागेवर आलेल्या शिपायाला विचारलं, इथं का बसतोस? त्याला माहित नव्हतं.

आजवरचं रेकॉर्ड पाहता त्या अधिकाऱ्यापर्यंत चौकशीचा धागा पोहोचला. तो अधिकारी आता निवृत्त झाला होता. कोणतेही कारण नसताना प्रत्येक जण आंधळेपणाने सूचना पळत होता.

परंपरा अशा असतात. या पावसाबाबतही अशाच काही मजेदार गोष्टी लोक मानतात. त्याचा आगापीछा…आडबुड काही माहिती नाही. पण हे समज गैरसमज असे आहेत-

१. पावसाळ्यात जन्मलेली मुलं अतिशय बडबडी असतात-

खरं वाटतं हे? शक्य आहे का हे? पण हा अंधविश्वास आहे.

२. कढईत खाणं खाल्लं, तर खाणाऱ्याच्या लग्नात पाऊस पडतो-

 

rain InMarathi

 

असं होतं? उन्हाळ्यात, हिवाळ्यात लग्न केलं तर पाऊस पडतो का? हे फक्त यासाठी की कढई मध्ये जेवणं कसं वाटतं बघा बरं.. चांगलं वाटतच नाही. असं काही सांगितलं की अडेलतट्टू माणसं ऐकतात.

३. ऊन पाऊस एकाच वेळी येणं म्हणजे माकड माकडीणीचं लग्न

ही अजून एक अंधश्रद्धा.

४. बेडकांचं लग्न लावलं, की पाऊस पडतो-

 

rain superstitions inmarathi

हे ही वाचा – नव्या वर्षाच्या सुरुवातीला ‘व्हायरल’ होणाऱ्या या आहेत जगभरातील १७ अंधश्रद्धा!

खूपदा पावसाने ओढ दिली की खेडोपाडी आजही बेडकांचं लग्न लावून देतात. त्यामुळं पाऊस पडतो असा सार्वत्रिक समज आहे.

५. अंगणात तवा ठेवला की पाऊस थांबतो-

मग महापूर आला असता का सांगा बरं!! पाऊस आला … हवा तेवढा वेळ पडला की अंगणात तवा पालथा घातला की पाऊस थांबलाच. मग ओला दुष्काळ..अनावृष्टी ही संकटं आली असती का??

६. गाढवावर बेडूक उधळले की पाऊस येतो-

पावसाने ओढ दिली की हा पण एक उपाय. गाढवावर बेडूक उधळायचे. आता याचा एकमेकांशी काय संबंध? पण हे करतात लोक.

७. ऊन पाऊस एकाच वेळी आले, तर कोल्हा कोल्हीचं लग्न लागलं-

 

DTh Dish in Rain inmarathi

 

खूपदा श्रावणात हा ऊन पाऊस आणि इंद्रधनूचा खेळ चालतो. पण त्याचा कोल्ह्याच्या लग्नाशी काय संबंध?

८. एका ठिकाणी खूप साप दिसले तर पाऊस नक्की येतो-

 

snake-island Feature Inmarathi

 

ही गोष्ट फार दुर्मिळ. एका वेळी अनेक साप एकत्र दिसणं. कारण एखादा एखादा साप आपण बघतो. पण अनेक साप एकत्र असले तर भरपूर पाऊस पडतो असं महणतात.

९. स्त्रियांनी नग्न होऊन शेतातील नांगर चालवला तर पाऊस पडतो-

आवर्षणात जर पाऊस पडावा असं वाटत असेल, तर हा अघोरी आणि निर्लज्ज उपाय. कोण होईल का करायला तयार??पण हा विचित्र उपाय सांगितला जातो.

१०. रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांवर शेणकाला फेकला तर पाऊस पडतो-

अनावृष्टीचं संकट आलं तर हा उपाय करुन बघा.

पावसाचं तर माहीत नाही, पण रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांवर जर शेण आणि पाणी मिसळून फेकलं तर ते लोक आपल्यावर रागाचा आणि शिव्या गाळ्यांचा पाऊस नक्की पाडतील.

११. पावसात मामा भाचा सोबत उभे राहिले तर वीज पडते-

हा एक समज. याला काय आधार आहे माहीत नाही पण असं म्हणतात.

थोडक्यात सांगायचं तर असे काही विचित्र समज, विचित्र उपाय पावसासाठी सांगितले आहेत. यावर हसावं की रडावं समजत नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?