' सावधान "तो" परत आलाय - पण मनोरंजनासाठी नव्हे तर आयुष्य उध्वस्त करण्यासाठी!

सावधान “तो” परत आलाय – पण मनोरंजनासाठी नव्हे तर आयुष्य उध्वस्त करण्यासाठी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

हॉलिवूड चित्रपट सृष्टी मधला प्रेक्षकांना सगळ्यात जास्त भावलेला व्हिलन म्हणजे बॅटमॅन डार्क नाईट मधला हेथ लेजरने रंगवलेला जोकर.

आजही जोकर हे सिनेविश्वातला सगळ्यात जास्त पसंत केलं जाणारं निगेटिव्ह पात्र आहे हे मात्र अगदी

बॅटमॅन पेक्षा त्याचीच क्रेझ सगळ्यात जास्त होती. त्यानंतर मात्र वॉर्नर ब्रदर्स च्याच जोकर ने २०१९ च्या मध्यापासून फिल्म जगतमध्ये हवा करायला सुरुवात केली. वॉकीन फिनिक्स ने रंगवलेला हा जोकर आधीच्याचं जोकरच्या तोडीचा होता.

 

joker inmarathi
hype.my

 

फिल्म जगतामध्ये हा जोकर सगळ्यांच लक्ष आपल्याकडे केंद्रित करत होताच तेच डिजिटल दुनियेत सुद्धा एक नवीन जोकर आला होता.

‘जोकर मालव्हेअर.’ २०१९ च्या सप्टेंबर मध्ये गुगलने आपल्या गुगल प्ले स्टोअर वरून तब्बल २४ ऍप्लिकेशन तत्काळ काढुन टाकण्याचे आदेश दिले होते. हे २४ अँप याच व्हायरसने इन्फेक्टेड झाले होते.

हा व्हायरस युजरच्या नकळत मोबाईल मधला डेटा ऍक्सेस घेत होता.आणि त्याचा वापर करून पेड सर्व्हिस सस्क्राईब करून डिजिटली पैसे चोरी करण्याचे कांड करत होता.

यावेळेस स्वतः गुगल बॅटमॅन बनून या जोकरच्या तावडीतून अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्सना वाचवण्यासाठी पूढे आलं. आणि ऍप काढून टाकायची तात्काळ कारवाई केली.

आता तुम्ही म्हणाल २०२० चा सप्टेंबर येऊ घातला मग २०१९ च्या सप्टेंबरची घटना का सांगत आहात.?

तर, भारतासाहित जगभरात या व्हायरसने पुन्हा डोकं वर काढायला सुरवात केली आहे.

 

joker malware inmarathi
tech.hindustantimes.com

 

बऱ्याच अँड्रॉइड युजर्सना एसएमएस थ्रू कसले तरी ओटीपी नंबर येऊ लागले आणि नको असलेल्या पेड सर्व्हिसला सस्क्राईब केल्याचे मेसेज-मेल येऊ लागले.

लॉट मध्ये आलेल्या रिपोर्ट केसेसमुळे गुगलने यामध्ये जातीने लक्ष घालावे लागले. आणि जोकर व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा दिसू लागला.

यावेळेस ११ ऍप्लिकेशन हे या जोकर व्हायरस ने अफेक्टेड झाल्याचे दिसून आले. आणि पुन्हा गुगल ते ऍप आपल्या प्ले स्टोअर वरून काढून टाकण्याची कारवाई केली.

जोकर व्हायरस नक्की आहे तरी काय?

हा व्हायरस/मालवेयर एक सॉफ्टवेअर आहे जो मोबाइल फोन किंवा इतर वायरलेस-सक्षम डिजिटल इक्विपमेंट मधील गोपनीय माहिती लीक करतो.

मालवेअर विविध प्रकारचे असतात. जोकर हा एक ‘ट्रोजन’ मालवेअर आहे जो एका स्पेसिफिक ऍप च्या माध्यमातून युजरच्या डिव्हाईस मध्ये कार्यरत होतो.

हा व्हायरस डिव्हाइसचे सिक्युरिटी ब्रेक करण्यास सक्षम आहे. त्याप्रमाणे डिव्हाईसची सिक्युरिटी ब्रेक करून डिव्हाइस निरुपयोगी किंवा निकामी करण्यास याचा वापर केला जाऊ शकतो.

पण सध्या हा व्हायरस माहिती चोरण्यासाठी वापरला जात असल्याचे दिसून येत आहे.

ऍप-इंस्टॉलेशनच्या रूपात कमांड-अँड-कंट्रोल (सी अँड सी) सर्व्हर वरून सुरक्षित कॉन्फिगरेशन डाउनलोड करून या व्हायरसला त्या पर्टीकुलर डिव्हाईस मध्ये एन्ट्री मिळते.

परमिशन अलॉ केल्यानंतर हा व्हायरस एक फॉलो अप कम्पोनंट स्वतःहुन इन्स्टॉल करतो जो जाहिरात वेबसाइटसह होस्टच्या कम्युनिकेशन थ्रू एसएमएस वरून आलेली इन्फॉर्मेशन चोरी करतो.

 

joker malware 3 inmarathi
asianetnews.com

 

हा जोकर मालवेयर डिव्हाईस युजरच्या परमिशन शिवाय एखाद्या पर्टीक्युलर प्रीमियम सर्व्हिसची सबस्क्रिप्शन घेऊन पैसे चोरी केल्याचे सुद्धा अनेक केसेस रजिस्टर झाल्याचे दिसून आले होते.

ओटीपी सारखे औथेंटीकेशन साठी येणाऱ्या एसएमएस माहिती चोरण्यासाठी प्राप्त केले जाते. एकदा का ओटीपीचा मेसेज डिव्हाईस मध्ये रिसिव्ह झाला की आपोआप ट्रानजेक्शन होऊन जाते.

जेव्हा अकाउंट मधून पैसे डेबिट झाल्याचा मेसेज किंवा मेल येतो तेव्हा पैसे चोरी झाल्याचे मोबाईल युजरला कळते.

अर्थात मागच्या मागे मोबाईल मध्ये काय व्यवहार चालले आहेत याचा युजरला काहीच थांगपत्ता नसतो.

एका छोट्याशा जावा कोडने एवढं मोठं घबाड रचता येत हे विशेष. यासारख्या मालवेयरच्या तपासणीसाठी गुगल कडे तशी स्वतःची सिक्युरिटी ट्रॅकिंग आणि सर्व्हिस आहे.

परंतु जोकर व्हायरसने त्यांचे कोड क्रॅश करून डमी अँपचे कव्हर घेऊन डिव्हाईस मध्ये एन्ट्री करतो.

त्यामुळे गुगल सुद्धा इन्स्टॉलेशन च्या वेळेस या व्हायरस ला ट्रॅक करण्यास अपयशी ठरतो.

त्यामुळे आपल्या प्लेस्टोर सर्व्हिस ऍप मध्ये एक पॅरलल सिक्युरिटी ऍक्टिव्ह करून जोकरला कव्हर दिलेले अँप गुगल ने शोधून काढले.

 

google playstore inmarathi
indianexpress.com

 

आधी २४ ऍप रिमूव्ह करताना अप्लाय केलेली स्ट्रॅटेजी यावेळेस परत अप्लाय करून गुगल ने अजून ११ ऍप आपल्या प्लेस्टोअर वरून काढून टाकले.

ते ११ ऍप पुढील प्रमाणे,

com.imagecompress.android,  com.relax.relaxation.androidsms,  com.cheery.message.sendsms (two different instances), com.peason.lovinglovemessage,  com.contact.withme.texts,  com.hmvoice.friendsms,  com.file.recovefiles,  com.LPlocker.lockapps,  com.remindme.alram and com.training.memorygame.

एकूणच,

आपल्या दुर्लक्षितपणामुळे नको असलेले इंटरटेन्मेंटवाले ऍप किती मोठे प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात हे इथे दिसून येते.

एखाद ऍप इन्स्टॉल करताना त्याची विश्वासार्हता पाहूनच इन्स्टॉल करावा. केवळ मनोरंजन म्हणून इन्स्टॉल करणं हे घातक ठरू शकत.

अशा समस्येवर स्वतः जागरूक असणे हाच उपाय आहे. जेव्हा प्रॉब्लेम मोठा वाटू लागला तेव्हा गुगलने यात लक्ष घातले. तोपर्यंत बरेच जण या व्हायरसला बळी पडले होते.

त्यामुळे सावधान रहा आणि सतर्क रहा आणि मोबाइल वापरताना प्रचंड काळजी घ्या!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?