' अंतराळात वास येत असतील का? ते कसे असतील? या प्रश्नांचं उत्तर म्हणजे नासाचा अद्भुत परफ्यूम – InMarathi

अंतराळात वास येत असतील का? ते कसे असतील? या प्रश्नांचं उत्तर म्हणजे नासाचा अद्भुत परफ्यूम

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सुगंध – आपल्या आयुष्यातील एक महत्वाची गोष्ट.

आपण किती तरी जागा, वस्तूंबद्दल तिथल्या वासावरून मत बनवत असतो. स्वयंपाक करणाऱ्या व्यक्ती या केवळ वासावरून तो अन्न पदार्थ कसा झाला असेल हे सांगू शकतात.

इतकंच नाही तर, तुम्ही एखाद्या रूम मध्ये असाल किंवा लिफ्ट मध्ये असाल आणि समोरून एखादी व्यक्ती जर का सुंदर वासाचा परफ्युम लावून त्या जागेत आली की आपोआप एक “अहाहा” आपल्या तोंडावर येतं.

देवासाठी वापरणाऱ्या उदबत्ती मध्ये सुद्धा फुलांच्या वासांप्रमाणे किती तरी फ्लेवर उपलब्ध आहेत आणि लोकप्रिय सुद्धा आहेत. कित्येक जणांना तर पेट्रोलचा वास सुद्धा खूप आवडतो.

नवीन आणलेल्या कपड्यांचा असेल किंवा नवीन पुस्तकाचा, वर्तमानपत्राचा असेल किंवा पावसाळ्यात पहिल्यांदा पाऊस पडलेल्या जमिनीचा वास असेल. सुगंध असल्याशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण आहे.

 

human nose smelling inmarathi
beliefnet.com

 

त्यामुळेच की काय, पण थोडा जरी पाऊस पडला की, “अत्तराचे भाव कोसळले” अशी हेडलाईन सोशल मीडिया वर सध्या फिरत असते.

आता जमीनवरचे सुगंध तर आहेतच; पण बऱ्याचदा असा विचार मनात येतो की पृथ्वीबाहेर कोणता वास असेल का? असेल तर तो कसा असेल? 

अवकाशात अंतराळवीर जातात. त्यांना कोणते वास येत असतील का? 

वास ही अशी गोष्ट आहे की जी समजावून सांगण्यास कठीण आहे, म्हणूनच अवकाशातील सुगंध सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्याची जय्यत तयारी नासा या संस्थेने सुरू केलीआहेत.

 

astronauts inmarathi1
space.com

 

एक असं अत्तर आपल्या भेटीला लवकरच येणार आहे, ज्याचा सुगंध हा अवकाशातील घटकांप्रमाणे असेल. ज्याला सोप्या शब्दात सांगायचं तर, पिस्तूलातून एखादी गोळी निघून गेल्यानंतर जो धुर येतो तसा हा या अत्तराचा वास असेल.

‘eau de space’ हे त्या परफ्युमचं नाव असेल. अमेरिकेच्या ओमेगा इन्ग्रेडीएन्ट्स नावाच्या कंपनीने हा परफ्युम तयार केला आहे. Steve Pearce हे त्या कंपनीच्या केमिस्ट आणि मालकांचं नाव आहे.

हे परफ्युम बनवण्यामागे कल्पना अशी होती की, हे परफ्युम अंतराळवीर अवकाशात जाण्याच्या आधी वापरतील. त्यांच्या ट्रेनिंगच्या वेळी हे परफ्युम वापरलं जाईल.

‘eau de space’ हे परफ्युम बनवण्यामागे उद्देश हा होता की, अंतराळवीर जेव्हा अवकाशातल्या वातावरणात जातील तेव्हा त्यांना बाहेरच्या वासाचा त्रास होऊ नये आणि तो वास त्यांना आधीच ओळखीचा असावा.

 

eau de space perfume inmarathi
dailymail.co.uk

 

हे साध्य करण्यासाठी नासाने अत्तर बनवणाऱ्या कंपन्यांसोबत चर्चा करून त्यांना हा फॉर्म्युला तयार करायला सांगितला. हा फॉर्म्युला तयार व्हायला खूप वर्ष लागली आणि त्यानंतर सुद्धा हा फॉर्म्युला सिक्रेट ठेवण्यात आला होता.

जेव्हा ‘eau de space’ टीम ला नासा च्या रिसर्च टीम ने संमती दिली तेव्हाच तो परफ्युम बाजारात आणला गेला.

२००२ मध्ये CNN या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना एका अंतराळवीराने असं सांगितलं होतं की,

“अवकाशा चा वास म्हणजे तळलेल्या पदार्थासारखा किंवा रासबेरी रम सारखा असतो. त्या वासाची बरोबरी पिस्तूलातून गोळी मारल्यानंतर येणाऱ्या धूराशी करू शकतो.”

‘eau de space’ च्या टीम ला फॅशन, टेक्नॉलॉजी, design आणि लॉजीस्टिक्स या सर्व क्षेत्रांचा दांडगा अनुभव आहे. या स्पेशल परफ्युमसाठी त्यांनी अजून एका कंपनी सोबत जॉईंट व्हेंचर केलं आहे.

 

eau de space perfume inmarathi1
timesnie.com

 

ही जोडी अजून एक परफ्युम बनवत आहे , तो बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची उत्सुकता निर्माण होण्यासाठी असेल.

हा परफ्युम विद्यार्थ्यांना STEM (Science, Technology, Engineer & Mathematics) मध्ये इंटरेस्ट वाढावा या उद्देशाने या तयार करण्यात आला आहे.

कंपनी सध्या फॉर्म्युला घेऊन तयार आहे. ते सध्या कमीतकमी किती युनिट्स (Minimum Order Quantity) किती असावी यावर काम करत आहे.

तांत्रिक बाबींची आणि आवश्यक त्या मान्यतेची पूर्तता केल्यानंतर ‘eau de space’ ची टीम हे परफ्युम कोणालाही पाठवू शकते.

कंपनी चे संचालक रिचमंड यांनी सांगितलं आहे की,

“आम्ही असे नवनवीन प्रयोग करण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. या पुढील आमचं संशोधन हे चंद्रावरच्या वास याबद्दल असेल. तो परफ्युम वापरला की, तुम्हाला चंद्रावर गेल्याची भावना येईल.”

 

moon-inmarathi
deccanchronicle.com

 

‘eau de space’ हे अत्तर लवकरच आपल्यापर्यंत पोहोचेल अशी आशा करूया आणि अवकाशात जाणं शक्य नसलं तरी निदान तिथल्या सुगंधाचा तरी अनुभव घेऊया आणि या संशोधन करणाऱ्या टीम चे आभार मानूयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?