'सावधान : पाणी पिण्याच्या सवयींबद्दल "हे" जाणून नाही घेतलं, तर तीच संजीवनी जीवघेणी ठरू शकेल

सावधान : पाणी पिण्याच्या सवयींबद्दल “हे” जाणून नाही घेतलं, तर तीच संजीवनी जीवघेणी ठरू शकेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पाणी हा घटक आपल्या शरीराला आवश्यक आहे. आणि तो पुरेशा प्रमाणात शरीरात गेला पाहिजे. हे खरं असलं तरी पाणी पिताना आपण बऱ्याच चुकाही करत असतो.

त्यामुळे पाणी कधी प्यावं आणि कधी नाही हे या लेखातून पाहू :

आपण रोज जे पाणी पित असतो, त्यातील जवळपास वीस टक्के पाणी हे आपण खात असलेल्या पदार्थांमधून मिळत असतं. उदा. संत्री, डाळींब, कलिंगड, इत्यादी फळे आणि काकडी, हिरव्या पालेभाज्या इत्यादी.

शिवाय या फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये पाण्याव्यतिरिक्त मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सही असतात.

त्यामुळे नुसतं पाणीच पित राहू नका, तर हिरव्या भाज्या आणि फळंही भरपूर खा. त्यामुळे तुमच्या आरोग्याला अधिक फायदा होईल.

 

गरजेपेक्षा जास्त पाणी पिऊ नका –

 

water inmarathi
bbcgoodfood.com

 

हल्ली भरपूर पाणी प्या, भरपूर पाणी प्या असे सल्ले सगळीकडे दिले जाताना दिसतात. मात्र गरजेपेक्षा जास्त पाणी देखील तुमच्या शरीराला घातक ठरू शकते हे लक्षात ठेवा.

त्यामुळे जेवढी तहान लागेल तेवढंच पाणी प्या. विनाकारण सतत पाणी पित राहू नका. जेवल्यानंतर काही वेळाने भरपूर पाणी प्या.

दिवसभर सतत पाणीच पित राहू नका. अती पाणी प्यायल्याने तुमच्या रक्तातील सोडीयमचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते.

सोडीयम कमी झाले, की मेंदूत सूज येणे, बेशुद्ध पडणे असे प्रकार होऊ शकतात.

तुम्हाला घाम खूप येत असेल, किंवा खूप घाम येईल अशी श्रमाची कामं करत असाल, खेळ खेळत असाल, धावत असाल, तर अशावेळी मात्र शरीरात भरपूर पाण्याची गरज असते. तेव्हा जर पाणी भरपूर प्यायला नाहीत, तर तेही नुकसानकारक ठरेल.

आपल्या बिछान्याजवळ पाण्याचा ग्लास भरून ठेवू नका –

खूप लोकांना झोपताना बेडजवळ पाण्याचा ग्लास भरून ठेवायची सवय असते. आणि ते अधुनमधून झोप लागेपर्यंत ते पाणी पीत राहतात. मात्र गरज नसताना असे पाणी पिऊ नका.

त्यामुळे तुम्हाला रात्रीतून लघवीसाठी वारंवार उठावे लागेल आणि तुमच्या झोपेत व्यत्यय येईल.

 

 प्लास्टीकच्या बाटल्यांमधले पाणी पिऊ नका- 

 

plastic water bottles 4 InMarathi

 

आपले पिण्याचे पाणी प्लास्टीकच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवू नका. कारण या बाटल्या बिसफेनोल ए या रसायनापासून बनलेल्या असतात.

यात भरून ठेवलेले पाणी पिल्याने स्त्री-पुरुष दोन्हींची प्रजननक्षमता बाधित होऊ शकते. एवढेच नव्हे तर कॅन्सरसारखे आजारही होऊ शकतात. लठ्ठपणा वाढू शकतो.

तुम्हाला जर पाणी बाटल्यांमध्ये भरायचेच असेल, तर बीपीए फ्री असलेल्या पुन्हा पुन्हा पाणी भरून ठेवता येईल अशा बाटल्यांचा वापर करा.

 

तुम्ही लिंबू पाणी पिता की नाही?

 

lemon juice-inmarathi01
postsod.com

 

पाण्यात थोडे लिंबू पिळून पाणी प्यायल्याने पाण्याची चवच छान लागते असे नाही, तर हे पाणी तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत करते.

लिंबाच्या सालीत ऍन्टीऑक्सिडन्ट्स असतात. ते तुमच्या शरीरातील घातक द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करतात. त्यामुळे प्रत्येक वेळी पाण्यात लिंबाचा रसच न टाकता लिंबाच्या सालीसह चकत्या देखील टाका.

लिंबाच्या सालीमुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील कोर्टीसोल पातळीवर अंकुश ठेवण्यास मदत करेल.

झोपेतून उठल्या उठल्या सकाळी पाणी प्या 

आपल्या आयुर्वेदाप्रमाणे आणि आता आधुनिक विज्ञानही सांगतंय, की सकाळी झोपेतून उठल्या उठल्या लगेच ग्लासभर पाणी प्यायला हवे.

कारण झोपेत आपल्या शरीराची मेटाबॉलिक व्यवस्था मंदावलेली असते. आणि आपले शरीर झोपेत जवळपास सात आठ तास बिनापाण्याने राहिलेलं असतं. आणि शरीरातील चयापचय क्रियेसाठी ते आवश्यक असतं.

 

तुम्ही अल्कोहोल घेत असताना मध्ये पाणी प्या 

man-drinking-inmarathi
indianexpress.com

 

जेव्हा तुम्ही दोन पेगच्या वर ड्रिंक घेता तेव्हा तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. ते तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवणाऱ्या घटकावर परिणाम करतं.

त्यामुळे दोन पेगच्या मध्ये एक ते दोन ग्लास पाणी जरूर प्या. शिवाय रिकाम्या पोटी अल्कोहोल घेऊ नका.

कधी कधी तुमच्या शरीराला पाण्याची गरज असते. अन्नाची नाही.

तुम्ही जर व्यवस्थित पाणी प्यायला नाहीत, तर तुम्हाला पोट रिकामं असल्यासारखं वाटेल आणि तुम्ही पाण्याऐवजी काहीतरी खात राहाल. अशाने गरजेपेक्षा तुमच्या शरीरात अधिक कॅलरीज जातात आणि आवश्यक असलेलं पाणी मात्र जात नाही.

त्याचे दुष्परिणाम दुहेरी होतात. त्यामुळे ह्यापुढे जेवल्यानंतरही काही खावंसं वाटू लागेल तेव्हा आधी पाणी पिऊन घ्या. नंतर मग भूक आहे का याचा विचार करून खाण्याचा विचार करा.

 

एखाद्या तहानेला फक्त पाण्याऐवजी ग्रीन टी घेणे –

 

green tea inmarathi
MedicalNewstoday.com

 

ग्रीनटी मध्ये अँन्टी ऑक्सिडन्ट्स असतात. ती तुमच्या शरीरातील घातक विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करतात.

एखाद्या तहानेला नुसतंच पाणी न पिता त्यात ग्रीन टी बॅग टाकून प्या. तुम्हाला ताजंतवानंही वाटेल आणि पाण्याची गरजही भागेल.

ग्रीन टी ऐवजी ब्लॅक टी सोबतही पाणी पिऊ शकता –

ग्रीन टी किंवा ब्लॅक टी – दोन्ही प्रमाणात असतील तर ते शरीराला फायदेकारक असतात. त्यामुळे दिवसातून एक किंवा दोनदा पाण्यातून टी बॅग्स टाकून प्यायल्याने फायदा होतो.

 

फ्रिजच्या थंडगार पाण्यापेक्षा कोमट पाणी चांगले – 

 

drinking warm water inmarathi

 

आपल्या आयुर्वेदानुसार ,थंडगार पाणी बाराही महिने न पिता ऋतुमानानुसार कोमट पाणी प्यावे. पावसाळा, हिवाळा या ऋतुंमध्ये आयुर्वेद फ्रिजचंच नव्हे, तर माठाचं पाणीही वर्ज्य करायला सांगतं.

आयुर्वेदानुसा,र फक्त तीन महिने म्हणजे मार्च ते मे माठातलं पाणी प्यावं. एरव्ही साधं, कोमट पाणीच मेटेबॉलिजम चांगलं ठेवतं.

 

तहानेला पाण्याऐवजी बाजारातील तयार फळांचे ज्युसेस पिऊ नका 

 

fruit juice-inmarathi03
naturalsociety.com

 

खूप लोकांना तहान लागली, की साध्या पाण्याऐवजी फळांचे बाजारू रस, कोल्ड्रिंक्स इत्यादी पिण्याची सवय असते. तसे करणे घातक आहे.

त्याने तहान जरी जात असली, तरी त्या रसात किंवा कोल्ड्रिंक्समध्ये प्रिझर्वेटीव्हज, रासायनिक कृत्रिम रंग, कृत्रिम इसेन्स इत्यादी असतात.

कोल्ड्रींक्समध्ये सोडा, साखर इत्यादी घातक पदार्थ असतात. त्यामुळे तहानेला साधंच पाणी प्या.

 

काम करताना कंटाळा, थकवा आल्यावर पाणी प्या

 

water health-inmarathi03

 

काम करत असताना थकवा, कंटाळा आला की लोकांना सारखं चहा कॉफी पिउन तरतरी आणायची सवय असते. परंतु प्रत्येक वेळी चहा कॉफी पिण्याचीच गरज नसते.

त्याऐवजी ग्लासभर पाणी प्या. पाण्याने देखील तुमचा कंटाळा दूर होईल. तुमच्या शरीरातील उत्साह, उर्जा वाढेल. चैतन्य आल्यासारखे वाटेल.

मेंदूची कार्यक्षमता ही शरीरातील पाण्याच्या प्रमाणावरच अवलंबून असते.

 

आवश्यक तेवढे पाणी पिता का?

 

water inmarathi
himdustantimes.com

व्यायाम केल्यावर, धावपळीची कामे केल्यावर, बाहेरून फिरून आल्यावर, चालून आल्यावर शरीराला पाण्याची गरज भासते. तेव्हा मात्र आवर्जून आठवणीने पाणी प्यायला हवे.

पाणी प्यायल्याने तरतरी येते. थकवा दूर होतो. हा आपला सर्वांचा अनुभव आहे.

शरीरात पाणी कमी झाल्यास लघवीला कमी होते. लघवीचा रंग दाट पिवळा होतो. तोंडाला कोरड पडते. त्यामुळे वेळच्या वेळी पाणी पित जा, मात्र ते पिताना वरील मुद्दे लक्षात घ्या.

 

===

 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?