'लहान-मोठ्या सर्व उद्योजकांनी रेड-लेबलच्या या ७ Ads पाहून नक्की फायदा करून घ्यावा

लहान-मोठ्या सर्व उद्योजकांनी रेड-लेबलच्या या ७ Ads पाहून नक्की फायदा करून घ्यावा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

चहा – भारतीय लोकांचं आवडतं पेय. कोणतंही काम करताना किंवा कोणत्या विषयावर चर्चा करताना चहा हा आपल्याला लागतोच.

घरातील वयस्कर मंडळी असो किंवा विद्यार्थी दशेतील मुलं असो किंवा नोकरी करणारी माणसं असो. “चला, जरा चहा घेऊ” असं म्हंटल्याशिवाय आपला दिवस सरतच नाही.

चहा हा भारतात ब्रिटिशांकडून आला आहे. ब्रिटिश लोक दुधाशिवाय चहा प्यायचे. आपण भारतीय लोकांनी त्यात दूध समाविष्ट केलं आणि त्याला आपली ओळख दिली.

या चहाला ‘कडक चाय’ या नावाने भारताच्या बाहेर ओळखलं जातं.

 

immunity tea inmarathi2
shutterstock.com

 

आज बहुतांश भारतीय लोकांना दिवसभरातून निदान दोन वेळेस चहा पिल्याशिवाय शांतच वाटत नाही. मागील काही वर्षात तर चहाला ‘अमृततुल्य’, ‘प्रेमाचा चहा’ अशी बिरुदं सुद्धा मिळाली आहेत.

आसाम मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चहाची शेती केली जाते आणि त्या चहाच्या पानांपासून भारतात चहापत्ती तयार केली जाते. या बिजनेस मध्ये सर्वात अग्रगण्य नाव घेता येईल ते म्हणजे Red Label या ब्रॅंडचं.

चहा म्हणजे रेड लेबल असं एक समीकरण आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या डोक्यात आहे असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.

जसं की, Xerox म्हणजेच फोटो कॉपी हे आपण खूप वर्षांपूवीच मान्य केलं आहे; तसंच, JCB म्हणजेच रोड excavation हे आपल्या डोक्यात फिट बसलं आहे.

ही इमेज तयार होण्यासाठी कंपनीच्या मार्केटिंग टीम आणि Advertising experts ने आपल्याशी कनेक्ट होण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत आणि अभ्यास असतो.

१९३३ मध्ये Lever Brothers नावाने एक कंपनी इंग्लंड मध्ये स्थापन झाली होती.

१९५६ मध्ये त्या कंपनी चं नाव हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड असं बदलण्यात आलं आणि २००७ पासून आपण त्या कंपनीला ‘हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (HUL)’ या नावाने ओळखतो.

२० वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये काम करणाऱ्या ह्या कंपनीचे ३५ प्रॉडक्टस् सध्या बाजारात आहेत. त्यापैकी आपल्या सर्वात जवळची वस्तू म्हणजे रेड लेबल चहा.

 

red label inmarathi3
mynationhindi.com

 

Brooke Bond Red Label चहा हे एक प्रसिद्ध ब्रँड Unilever ने त्यांच्या चहाला दिलं आहे. या ब्रँड ने लोकांचा चांगला विश्वास संपादन केला आहे.

चहा मध्ये आपण शोधतो ते म्हणजे चव आणि आरोग्य. चव चांगली असावी आणि चहा आरोग्यास हानिकारक असू नये अशी आपली एक इच्छा असते.

या ब्रँड ने नेमकं हेच हेरलं आहे आणि त्यांनी त्यांची टॅगलाईन ‘Tasty and Healthy’ हीच ठेवली आहे. चहा मध्ये असलेल्या Flavonoids मुळे या चहा चं मार्केट share हा वाढतच गेला.

त्या जोडीला कंपनीने तयार केलेल्या या काही जाहिरातींमुळे रेड लेबल हा आज एक फॅमिली मेंबर झाला आहे.

 

red label inmarathi2
brandyuva.in

 

रेड लेबल च्या ‘Taste of Togetherness’ या थीम वर तयार करण्यात आलेल्या जाहिरातींमुळे ती फक्त एक जाहिरात नसून लोकांना जवळ आणणारा मेसेज आहे हे कंपनी ने लोकांना अगदी सहज सांगितले.

प्रत्येक जाहिराती मध्ये घरातील सर्व सदस्यांनी एकत्र यावं आणि चहाचा आस्वाद घ्यावा हे सांगण्यात येतं. रेड लेबलच्या काही जाहिरातींचे उदाहरण बघूयात:

१. दोन गृहिणी घराच्या गच्चीवर गप्पा मारताना दाखवल्या आहेत. त्यांच्या कट्ट्यावर चहाचा ट्रे ठेवलेला दाखवला आहे.

 

red label inmarathi1
pieceofcakeproductions.in

 

त्या दोघीही वेगवेगळ्या कम्युनिटी च्या दाखवल्या आहेत. पण, केवळ चहा मुळे फक्त त्या एकत्र येऊ शकल्या हा सुंदर मेसेज त्यांनी जाहिरातीतून दिला आणि लोकांची पसंती मिळवली.

२. Natural Care:

ज्या भागांमध्ये सतत हवामान बदलत असतं खास त्या भागांसाठी रेड लेबल ने हे प्रॉडक्ट लोकांची immunity वाढवण्यासाठी उपयुक या कन्सेप्ट ने लोकांसमोर आणला आणि तो लोकांना प्रचंड आवडला.

३. रेड लेबलने २०१६ मध्ये एका गाण्याच्या स्वरूपात जाहिरात केली ज्यामध्ये त्यांनी तृतीय पंथीय लोकांना गाण्याची संधी दिली. त्यांनी जे गाणं म्हंटलं त्याचे बोल ‘हम है हॅपी’ असे होते.

‘The 6 pack Band’ हे या म्युजिक बँड चं नाव होतं. तुतीय पंथीय लोक सुद्धा आपल्या समाजाचाच एक भाग आहेत आणि त्यांनाही समान संधी मिळाव्यात या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या गाण्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

YouTube वर या गाण्याला ५ लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितलं.

४. रेड लेबलच्या जाहिराती मधले काही स्लोगन जसं की, ‘पियो तो जानो’, ‘जियो मेरे लाल’ आणि ‘प्यार का प्याला तो स्वाद अपनो का’ हे लोकांशी खूप जोडले गेले.

 

red label inmarathi
socialsamosa.com

 

त्यापैकी एका जाहिरातीत त्यांनी काही सेकंदातच एक लव्हस्टोरी लोकांना दाखवली. या लोकप्रिय जाहिरातीत रेड लेबल ने बॅकग्राऊंड ला सुरेश वाडकर यांचा आवाज सुद्धा वापरला होता.

५. कोणत्याही एका ब्रँड ambassador न ठेवता जाहिरातीच्या थीम नुसार कलाकार जाहिरातीत घेण्याचं ठरवलं.

अनुपम खेर हे एका जाहिरातीत दादाजी च्या रोल मध्ये दिसले तर अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा हे एका जाहिरातीत चहाचे फायदे एकमेकांना सांगताना दिसले. त्यामुळे हा ब्रँड सगळ्या वयाच्या लोकांसोबत सहज कनेक्ट झाला.

६. दोन वेगवेगळ्या धर्मातील लोकांना एकत्र आणणारी एक जाहिरात सुद्धा लोकांना खूप आवडली. टाटा टी च्या ‘जागो रे’ या यशस्वी जाहिरात कॅम्पेनचं महत्व कमी करण्यासाठी ही जाहिरात रेड लेबल ने सादर केली होती.

आपल्या घराची किल्ली नसल्यावर शेजारच्या घरी वाट बघत चहा घेणे इतकी साधी ही थीम होती. पण, चेहऱ्यावरचे भाव आणि सादरीकरण यामुळे जाहिरात लोकांना खूप लोकांना खूप आवडली.

 

red label inmarathi4
exchange4media.com

 

७. एका मुलाचे आई वडील अचानक मुलाला भेटायला जातात आणि तिथे ते मुलासोबत एक मुलगी लिव्ह-इन मध्ये राहत आहे ते बघतात.

ती मुलगी त्यांच्यासाठी रेड लेबल चहा बनवते आणि पुढचा होणारा सीन टाळल्या जातो आणि आई मुलीला पसंती देते.  अशी सुद्धा एक जाहिरात तयार करून कंपनीने तरुणांना सुद्धा इम्प्रेस केलं.

३० सेकंद ते एक मिनिटाच्या वेळात आपल्या प्रॉडक्ट बद्दल सांगणं आणि त्यासोबत एक सामाजिक संदेश सुद्धा द्यायचा हे खरंच सोपं काम नाहीये.

रेड लेबल ने त्यांच्या गुणवत्तेसोबत त्यांच्या जाहिरातींमध्ये सुद्धा सतत नाविन्य आणलं आणि लोकांच्या मनात आपलं स्थान अढळ ठेवलं हे मान्य करावंच लागेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?