' तब्बल ४५१ वर्षे पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेल्या "गोव्यात" झालेला हा नरसंहार थरकाप उडवतो!

तब्बल ४५१ वर्षे पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेल्या “गोव्यात” झालेला हा नरसंहार थरकाप उडवतो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोणताही धर्म माणुसकी सोडून वागा असं सांगत नाही. कोणताही देव माणसांना त्रास द्या असं सांगत नसतो. पण एकमेकांवर स्वामित्व गाजवण्याची इच्छा, दुसऱ्या धर्माला हीन लेखण्याची वृत्ती ही केवळ आणि केवळ माणसातच आहे.

सक्तीनं धर्मांतर करुन घेणं, धर्मांतर न केल्यास अमानवी शिक्षा करणं, पाशवी वृत्तीचं दर्शन घडवत इतरांना दहशत बसवून धर्मांतर करायला भाग पाडतो अशा रक्तरंजित इतिहासाने मानवी जीवनाची कितीतरी पानं भरलेली आहेत.

वसाहतवाद, इतर धर्मांवर आक्रमण, त्यावरुन झालेल्या लढाया या गोष्टी इतिहासात सर्रासपणे घडल्या आहेत.

आज गोवा आपल्यासाठी पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं. मनमुक्तपणे हवं तसं, हवे ते पोशाख करुन आपण गोवा पालथा घालू शकतो.

 

goa inmarathi
tripoto.com

 

पण तुम्हाला हे माहित आहे का की गोवा भारतापेक्षाही जास्त वर्षं पारतंत्र्यात होता. गोव्यातील लोकांनाही अनन्वित छळ आणि अत्याचारांना तोंड द्यावं लागलं आहे. ही भयंकर नरसंहाराची कहाणी…

पोर्तुगीजांनी बरीच वर्षे गोवा, दमण आणि दीव या भागांवर राज्य केले. अगदी इंग्रजांपेक्षाही जास्त वर्षे. जवळपास ४५१ वर्षं पोर्तुगीजांनी गोव्यावर आपला अंमल ठेवला होता.

१९६१ साली भारताने आक्रमण करुन हे तिन्ही प्रदेश आपल्या ताब्यात घेऊन पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा मुक्त केला.

त्यापूर्वी कितीतरी शतकं गोवा हे पौर्वात्य देशांचं रोम समजलं जायचं. पूर्वेकडील देशातील कॅथलिक चर्चचं मुख्यालय अशीच गोव्याची ओळख होती. जुन्या गोव्यात आजही फ्रान्सिस झेवियरची कबर चर्चमध्ये ठेवलेली आहे.

तेथेच वास्को दी गामा ख्रिसमसच्या रात्री मेला. वास्को दी गामा हा अतिशय ख्रिश्चन धार्जिणा होता. त्यामुळे त्याने हिंदूंच्या विरोधात चौकशी करण्याचे जे सत्र आरंभले ते हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणारे ठरले.

नव्हे ते केलेच होते! अत्यंत धर्मवेडेपणाने आणि क्रूरपणाने सर्व पोर्तुगीज राज्याच्या सर्व भागात हे चौकशी सत्र सुरू केले, आणि गोवा त्याचे मुख्य केंद्र होते.

 

goa inquisition inmarathi
navrangindia.blogspot.com

 

अल्फ्रेडो डी’मेलो हा ब्रिटीश अधिकारी, तो नुसताच अधिकारी नव्हता, तर इतिहास संशोधक पण होता. त्यानं कोलंबस, पोर्तुगीज आणि गोव्यातील आठवणींवर एकूण तीन पुस्तके लिहीली.

पैकी दोन इंग्लिश मध्ये होती आणि एक स्पॅनिश मध्ये होते. त्यात एक प्रकरण गोव्यातील आठवणींवर लिहीले आहे. त्यात त्यानं लिहीलं आहे…

पोर्तुगाल हा अतिशय छोटा देश.. परंतु त्यांना त्यांच्या देशाचा इतिहास आणि केलेली प्रगती यांचा जाज्ज्वल्य अभिमान आहे. ते केवळ दर्यावर्दी तांडेलच नव्हते तर नविन भूभाग शोधून तिथं आपल्या वसाहती स्थापन करण्यात ते वाकबगार होते.

पौर्वात्य देशांत, आशिया, आफ्रिका खंडात विविध ठिकाणी त्यांनी आपला वसाहतवाद रुजवला. तेथील मूर, मुस्लिम या स्थानिक लोकांनी केलेल्या विरोधाचा बिमोड करत तिथं आपली पकड मजबूत केली.

गोवा तर त्यांचं सिंहासनच होतं. प्रसिद्ध इतिहासकार टोफीलो ब्रॅगा लिहीतात, पोर्तुगीज राजवटीत दोन तारखा अतिशय वाईट मानल्या जातात.

एक होती, चार्ल्स राजाने ख्रिश्चनांच्या सांगण्यावरून जी लोकांच्या चौकशी सत्राची सुरुवात केली तो, आणि कवि असलेला गिल व्हिन्सेंट याला गप्प केले तो दिवस!

 

portuges literature inmarathi
portugaltravelguide.com

 

पोर्तुगीज राजा डी’जो तिसरा याने कॅटरीना जौना’ जा लोका हिच्याशी लग्न केलं. ही धर्मगुरुंनी वेढलेली होती. ज्यांनी तिला हिंसक कारवाया करत ही धार्मिक चौकशी करायची चिथावणी दिली होती.

चार्ल्स राजाचे अत्यंत जवळचे सहकारी असलेले डाॅक्टर दिएगो डि’गोवेय यांनी राजाला पटवलं की, आपण पौर्वात्य देशांत येशू ख्रिस्ताच्या धर्मप्रसारासाठी मिशनरी लोकांना पाठवूया.

तत्काळ फ्रान्सिस झेवियर यांना पोर्तुगालला पाठवलं गेलं. तिथून त्याना गोव्याला पाठवलं. गोव्यामधून पत्र पाठवून फ्रान्सिस झेवियर यांनी रोमला पत्र लिहून या चौकशीसाठी परवानगी मागितली.

त्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टींचा समावेश असलेल्या नीतीचा म्हणजे साम, दाम दंड भेद वगैरेंचा वापर करायची परवानगी मागितली होती.

आधीच पोर्तुगीज सम्राटाने ही परवानगी दिली होती. अगदी एखादा कायदा जर बदलावा लागला तरी बेधडक बदलू शकाल अशी मुभाही दिली.

सर्व तऱ्हेच्या बळाचा मनसोक्तपणे वापर करुन आपला धर्म जगात पोचलाच पाहीजे हा तर त्यांचा उद्देश होता.

फ्रान्सिस झेवियर असताना काही हा चौकशीचा फार्स अंमलात आणता आला नाही. मात्र १५६० मध्ये अॅलेक्सीओ डायस, फ्रान्सिस्को मार्कीस यांनी ही चौकशी गोव्यात सुरु केली.

ही चौकशी ज्या ठिकाणी केली जात होती ते ठिकाण म्हणजे व्हाॅईसरायचा वाडा होता. नंतर त्यात तुरुंगाचे सेल बनवले गेले.

 

goa brutality inmarathi
medium.com

 

अलेक्झांडर हर्क्युलोनो या लेखकाने या भयंकर चौकशीचं वर्णन करताना लिहीलं आहे हे चौकशीचं सत्र म्हणजे छळवादाची सीमा होती. सगळे क्रूरशहा या छळापुढं फिके पडतील असा त्रास भारतीयांना दिला गेला.

पण भारतीय लोक सोशिक आणि सहिष्णू म्हणूनच त्यांनी हा त्रास सोसला. ही चौकशी म्हणजे हिंदुस्थानच्या तोंडावर क्रौर्याने उमटवलेले वळ आहेत. ज्यासाठी इतिहास पोर्तुगीजांना कधीच माफ करणार नाही.

तो लिहीतो, स्त्रीयांना फार अत्याचारांना सामोरे जावे लागले. जेवणानंतर हे अत्याचार करणाऱ्या लोकांची झुंबड उडे. तो दुर्दैवी जीव या लोकांच्या तडाख्यात सापडायचा त्याचे हालहाल केले जात.

त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर, डोळ्यांवर, हातांना, स्तनांना हे घोळक्याने जमलेले लोक वासनेने‌ बरबटलेले स्पर्श करत. त्यांना इतका त्रास दिला जायचा की त्यांचा गर्भपात व्हावा.

पुरुषांच्या त्रासाची तर कथाच वेगळी. त्यांना सरळ सरळ जिवंत जाळलं जायचं. १ एप्रिल १६५० ला चार माणसांना जिवंत जाळून टाकलं. त्यानंतर १८ लोकांना जाळून मारलं कारण त्यांनी धरल्यावर आक्षेप घेतला होता.

 

goa inmarathi 2
thefactreasearch.com

 

पाखंडी मतं सांगितली होती. १६६६ ते १६७९ या १३ वर्षाच्या कालखंडात एकूण बळी घेतलेल्या भारतीय लोकांची संख्या होती १२०८.

१७३६ साली एक अखंड कुटुंब घरात कोंडून पेटवून दिलं गेलं. तसंच लोकांना तुरुंगात डांबून ठेवलं जाई. तिथंही चिंचोळ्या जागेत कसंबसं रहावं लागे. एका छोट्या खिडकीतून अन्न पाणी दिलं जाई. तेही पुरेसं नसे.

बारीक सारीक गोष्टींची एकच शिक्षा असे जिवंत जाळणे. तुरुंगात कुणी मेलं तर त्याची हाडंच बाहेर दिली जात. कितीतरी वेळा आपली चूकही या लोकांना माहिती नसायची.

जे बाणेदारपणे अमान्य करत त्यांना जाळून टाकले जाई. काही जण ख्रिश्चन धर्म स्वीकारत त्यांना सोडून दिलं जाई. पण तोही अपमानच होता. यांच्या शिक्षा भयंकर होत्या.

दोषी माणसाला हात मागे बांधून कप्पीला अडकवत. आणि अर्धा तास वर खाली वर खाली करत. हात बांधलेले असत त्यामुळे सांधे अवघडून जात. वेदनांनी तो किंचाळायला लागे. किंवा त्याला लोखंडी कांबेला बांधून सतत पाण्याचा मारा केला जाई.

तिसऱ्या प्रकारात दोषी माणूस अधांतरी टांगत, त्याच्या पायांना ज्वलनशील पदार्थ बांधत आणि खाली आग पेटवत. तो माणूस गुन्हा कबूल करे पर्यंत आग वाढवत नेत.

अशा अनेक जीवघेण्या त्रासांना कंटाळून माणसं न केलेला गुन्हा कबूल करत, धर्म बदलत, पण हे सर्व करताना एकच प्रश्न येतो.. खरा धर्म कोणता? जगाला प्रेम अर्पावे हा? की जगाची मान मुरगळून सत्ताधारी व्हावे हा???

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?