' शाळकरी मुली-मुले ऑनलाईन शिकत आहेत, या ७ गोष्टींची नक्की काळजी घ्या!

शाळकरी मुली-मुले ऑनलाईन शिकत आहेत, या ७ गोष्टींची नक्की काळजी घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्या कोव्हिड-१९ च्या लॉकडाऊनमुळे शाळा देखील ऑनलाईन घ्यायच्या आणि मुलांना घरीच ऑनलाईन शिकवायचं असं ठरलं आहे. त्याप्रमाणे आदेश देखील निघाले आहेत.

मात्र मुलांच्या हातात जेव्हा मोबाईल आणि टॅबसारखी साधने येतील तेव्हा त्याचे काही दुष्परीणाम आणि गैरफायदे देखील होण्याची शक्यता आहे.

त्यासाठी पुढील पाच गोष्टींची काळजी शाळा, विद्यार्थी आणि पालक या सगळ्यांना घ्यायला लागणार आहे आणि मुलांना त्या दुष्परीणामांपासून वाचवावं लागणार आहे. त्यासाठी सावध राहावं लागणार आहे.

शाळा, विद्यार्थी आणि पालक यांच्यात अधिकाधिक सुसंवाद राहणं गरजेचं असणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या किंवा साधनांच्या सुरक्षिततेची खात्री करून त्याचे मूल्यांकन करा-

 

app security inmarathi
fingent.com

 

ऑनलाईन लर्निंगसाठी वेगवेगळी मोबाईल अॅप्स वापरली जातात. ह्या अॅप्सची सुरक्षितता पडताळून घेणे गरजेचे आहे. मुलं, शिक्षक-शिक्षिका, पालक आणि शाळेचे चालक या सर्वांचा पर्सनल डेटा या अॅपवरून चोरीला जात नाही ना?

मुलं त्या अॅपवरचे प्रत्येक फंक्शन नीट चालू आणि वेळेवर नीट बंद करून ठेवतात ना? चॅट बॉक्सचा गैरवापर तर होत नाहीए ना? या सर्वांची खात्री करून घ्यायला हवी. त्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीची माहिती असणारा स्टाफ जवळ हवा.

कोणती अॅप्स सुरक्षित आहेत, कोणती नाही? यासंबंधी नीट माहिती काढता येणारा माणूस हवा.

जिथे अशा असुरक्षेची जाणीव होईल तिथे वेळीच ते अॅप बंद करून त्यासंबंधी कारवाई करता येईल आणि पर्यायी अॅप्स वापरता येतील याची काळजी घेता यायला हवी.

थोडक्यात, सायबर सुरक्षेची काळजी पूर्णपणे घेऊनच पुढील पावले उचलली जायला हवीत.

 

१ – ऑनलाईन वर्गाची धोरणे आणि प्रक्रिया स्पष्ट आणि सर्व स्टाफना नीट समजतील अशी असावीत – 

 

online learning inmarathi1
timesofindia.com

 

ऑनलाईन कार्यपद्धतीसंबंधी धोरणे सर्व स्टाफला नीट समजतील अशी सुनिश्चित आणि स्पष्ट असावीत.

यामध्ये सोशल मिडीया आणि आयसीटी स्त्रोतांचा वापर किती करायचा, गोपनीयतेची धोरणे, व्यावसायिक मानके, आचारसंहिता आणि अनिवार्य अहवाल मार्गदर्शनापर्यंत अनेक बाबींचा समावेश असेल.

एखाद्या विद्यार्थ्याचे ऑनलाईन शिक्षणामुळे काही नुकसान होत असेल, त्याला काही धोका असेल, तर ते वेळीच शाळेच्या स्टाफला, शिक्षकांना ओळखता यायला पाहिजे.

त्यासाठी बालसंरक्षण अहवालाच्या जबाबदाऱ्या आपल्या धोरणांत समाविष्ट करून घ्यायला हव्यात. यासंदर्भात कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना आणि कल्पना देण्यात याव्यात.

 

२ काही गैरप्रकार घडत असतील तर काय करावे-

 

online learning inmarathi4
livemint.com

ऑनलाईन शिकण्याची साधने आणि तंत्रे वापरताना विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्यास काय करावे हे सर्व शिक्षकांना माहित असणे आवश्यक आहे.

यामध्ये अंतर्गत आणि बाह्य घटनेची नोंद करण्यासाठी शाळेच्या प्रक्रियेची जाणीव असणे आणि पालकांना सूचित करणे तसेच अशा विद्यार्थ्यांचा पाठपुरावा करून त्यांना त्यापासून सावध करून पुन्हा योग्य मार्गावर आणणे या गोष्टी समाविष्ट आहेत.

ऑनलाईन शिकवत असताना किंवा इतर कोणत्याही वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षकांना काही शंका आल्यास त्यांनी त्यासंबंधी लिखित नोट्स आणि इतर पुरावे, जसे की स्क्रिनशॉट ठेवणे आवश्यक आहे.

असे डिजिटल पुरावे जपणे, वेळीच त्या गोष्टींचे रिपोर्टींग करणे यामुळे विद्यार्थ्यांचे पुढील नुकसान टळू शकेल.

 

३ एका विद्यार्थ्यास एक शिक्षक अशा रीतीने शिकवता येणार का?

 

online learning inmarathi

 

या ऑनलाईन शिक्षणात प्रत्येक विद्यार्थ्याकडे शिक्षक जातीने लक्ष देऊ शकणार का हा मोठा प्रश्न आहे.

काही गोष्टींत विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज असते. त्याचे काऊन्सेलिंग करणे, किंवा करीअर गायडन्ससारखे विषय असणे, किंवा म्युझिक, डान्स इत्यादी विषयासाठी वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज असते.

अशावेळी तुमच्या मुलासोबत एकट्याने त्याचे शिक्षक ऑनलाईन असलेले चालेल का? याची परवानगी तुम्हाला विचारूनच शाळेने असे प्रकार करायला हवेत. अशा क्लासवर लक्ष ठेवण्याच्या काही पद्धती असायला हव्यात.

घरी त्या पाल्याजवळ त्याचे पालक हजर असायला हवेत. तशा सूचना विद्यार्थ्यांच्या पालकाना द्यायला हव्यात. त्यांची संमती असायला हवी.

 

४  विद्यार्थ्यांशी सतत संवाद साधत राहा – त्यांना सर्व गोष्टींची वेळच्या वेळी माहिती देत राहा –

 

online learning inmarathi3
inm.com

 

विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी स्पष्ट मार्गदर्शन आणि वर्तनात्मक अपेक्षा यासंबंधी सूचना देण्यात याव्यात. त्यात पुढील गोष्टी समाविष्ट असाव्यात : 

शिकताना घरातली जागा योग्य प्रकारे कशी सेट करावी

शिक्षकांशी संपर्काची वेळ आणि वर्ग वेळापत्रक

शिक्षक व इतर विद्यार्थ्यांसमवेत ऑनलाईन संवाद साधण्याचे प्रोटोकॉल

त्यांना समस्या असल्यास आपल्या धोरणांचा आणि प्रक्रियांचा अवलंब करण

सांगितलेल्या सूचनांचे नीट पालन केले नाही तर होणाऱ्या परीणामांची कल्पना देणे

काही चुकत असल्यास त्यांना नीट मार्गदर्शन करणे

 

५  पालकांना वेळोवेळी सावध करा – त्यांना माहिती देत राहा

 

online learning inmarathi2

 

विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील शाळेच्या धोरणांची माहिती वेळोवेळी द्यायला हवी. शाळेत घडणाऱ्या घडामोडींविषयी त्यांनाही अपडेट ठेवावे.

मात्र त्याचवेळी त्याचे ओझे पालकांवर येणार नाही आणि पालकांना आपली कामे टाकून रोजच्या रोज पाल्यांसोबत येऊन बसावे लागणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल.

६ पालकांना घरात ऑनलाईन सुरक्षिततेचे समर्थन करण्याची आवश्यक माहिती द्या. त्यात पुढील गोष्टी असतील : 

विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा स्पष्ट करणे

गोपनीयता बाळगणे, ऑनलाईन अॅप्सची सेटींग बघून त्याप्रमाणे सेट करणे

विद्यार्थ्यांचा अभ्यास कशाप्रकारे घेतला जाईल आणि त्यांच्या परीक्षा कशा घेतल्या जातील यासंबंधी स्पष्टता करणे

ऑनलाईन सुरक्षिततेविषयी नियमितपणे पालकांशी संवाद साधणे

 

  ऑनलाईन सुरक्षेची कौशल्ये आत्मसात करून घ्या

 

wifi security inmarathi
Tipard.com

 

ऑनलाईन शिक्षणासंबंधी मार्गदर्शक सूचनांचे वेळोवेळी पालन करून त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची अधिकाधिक माहिती करून घेणे हे शाळांचे आणि शाळांच्या स्टाफचे काम असेल.

पुढे काय?
सध्या ऑनलाईन शाळा हा प्रकार आपल्या सर्वांसाठी नवीन आहे. हे दूरस्थ शिक्षण असून त्याचा अनुभव आजपर्यंत कुणालाही नाही.

हा आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदाही म्हणावा लागेल. मात्र त्याचवेळी त्याचे तोटे देखील गृहीत धरून ते कमीत कमी होतील यासाठी विद्यार्थी, शाळा, पालक या सर्वांनाच काळजी घ्यावी लागणार आहे आणि सावध राहावे लागणार आहे.

मात्र येणाऱ्या पिढीला हे तंत्रज्ञान लवकर अवगत होते आहे आणि ते मागील पिढीपेक्षा याच्याशी लवकर परिचीत होत आहेत. त्यामुळे गोष्टी सकारात्मक आहेत. नकारात्मक बाजू कमी आहेत.

मात्र त्या जरी कमी असल्या, तरी नुकसान करणाऱ्या आहेत. हे लक्षात घेऊन त्या टाळण्याचे शंभर टक्के प्रयत्न होणे गरजेचे आहेत.

ही आधुनिक काळाची मागणी समजून ती अधिकाधिक दोषरहित करण्यासाठी सगळ्यांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?