' पैसे, संपत्ती अक्षरशः “गिळंकृत” करणाऱ्या “या” गोष्टींचा बंदोबस्त केल्याशिवाय श्रीमंत होणं अशक्य आहे – InMarathi

पैसे, संपत्ती अक्षरशः “गिळंकृत” करणाऱ्या “या” गोष्टींचा बंदोबस्त केल्याशिवाय श्रीमंत होणं अशक्य आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कवडी कवडी माया जोडी…

थेंबे थेंबे तळे साचे,

दाम करी काम,

हे आणि अशा आशयाचे बरेच वाक्प्रचार रूढ आहेत. कारण जगातील बहुसंख्य प्रश्न हे पैशाशीच निगडित असतात. टक्केवारी काढली, तर ९५% प्रश्न हे आर्थिक असतात आणि ५% भावनिक असतात.

दोहोंचा ताळमेळ लावताना भयंकर दमछाक होते. प्रत्येकाला असं वाटतं, की भरपूर पैसा मिळवावा. त्यासाठी सगळ्या तडजोडी करायची त्यांंची तयारी असते.

 

investment inmarathi
www.moneycontrol.com

 

आज भरपूर कष्ट करावेत, गाठीला पैसा जमवावा म्हणजे उद्याचं आयुष्य आरामात जाईल. म्हणून, वर्तमानातील कित्येक सुखांवर आपण पाणी सोडतो. आरामाला हराम समजून कष्ट करतो.

हे सारं कशासाठी? तर सुखाचे, श्रीमंतीचे दिवस यावेत…श्रीमंतीत, आरामात रहायला मिळावं.. महिनाअखेरीस पगाराची वाट बघत दिवस ढकलावे लागू नयेत यासाठी!!!

उत्तम आरोग्य आणि बक्कळ पैसा हे खूपजणांचं स्वप्न असतं. आणि त्यासाठी काहीही करायची तयारी असते त्यांची!!! पण तरीही काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकतात.

कोणत्या गोष्टींमुळे तुम्ही तुमच्या श्रीमंत होण्याच्या स्वप्नापासून लांब राहता?

 

१. भावना –

 

happy man inmarathi
thetypsyblog.com

 

ही सगळ्यात मोठी गोष्ट जी तुम्हाला कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी किंवा दुःखद प्रसंगात सोबत करते. आपण भावना रोखू शकत नाही. अत्यानंद झाला की आनंदानें आणि वाईट प्रसंगी त्या त्या प्रमाणे आनंदी किंवा दुःखी होतो.

खूप आनंद झाला तर तो क्षण, तो आनंद साजरा करतो किंवा खूप दुःख झालं तर ते ही मान्य करतो. त्यानुसार आपलं काम चालतं.

पण ज्या माणसाला श्रीमंत व्हायचं आहे त्यानं सुख दुःख समेकृत्वा..लाभा लाभ जया जयो हे तत्व अनुसरावं. कारण कोणत्याही क्षणी जो स्थितप्रज्ञ राहतो तोच यशस्वी होतो.

मार्केटमध्ये मंदी आली म्हणून‌ हात-पाय गाळून बसू नये आणि तेजी आली म्हणून‌ फार उडू नये. कारण दोन्हींचा अतिरेक घातकच. भावनांच्या आहारी जाऊन आपलं नुकसान करुन घेऊ नये. साधनांवर ताबा ठेवता आला पाहिजे.

 

२. मानसिकता –

 

happy_businessman-marathipizza
istockphoto.com

 

या प्रवासातील तुमची मानसिकता हा फार मोठा घटक आहे!! तुमची मानसिकता म्हणजे तुमचा कोणत्याही परिस्थितीकडे पहायचा दृष्टीकोन.

एकदा का तुम्ही एखादं ध्येय मनात ठेवलं तर त्यानुसारच तुम्ही तुमची वाटचाल करत राहणं महत्त्वाचं आहे. भावनांवर ताबा ठेवून आपला दृष्टिकोन विशाल करा.

प्रत्येक परिस्थितीत मग ती चांगली असो की वाईट, तुम्ही सकारात्मकतेने त्याकडं बघायला शिका.

हे जर नाही केलं, तर तुमची नकारात्मक मानसिकता आणि कोता दृष्टिकोन तुमच्या श्रीमंत होण्याच्या वाटेतील मोठा अडसर ठरु शकतो.

 

३. अनावश्यक उधळपट्टी –

 

savings-marathipizza01
innovativeretailtechnologies.com

 

आपल्यापैकी खूप जणांना दिखाऊपणा करायची फार सवय असते. एक म्हण आहे खूप पैसेवाल्या लोकांचा बराच पैसा आपण पैसेवाले आहोत हे दाखवण्यातच खर्च होतो.

म्हणजे विनाकारण केले जाणारे खर्च, चमकोगिरी किंवा लोकांना दाखवण्यासाठी पैसे खर्च करणं.

विनाकारण हाॅटेलिंग करणं, शक्य असलेली आपली कामं नोकरांकडून करवून घेणं, खरेदी करताना मुद्दाम महागडी खरेदी करणं हे सर्व दिखाऊपणाचे मामले. यामुळं पैसा कधीच साठून राहत नाही.

तुम्हाला जर खरोखरच श्रीमंत व्हायचं असेल तर श्रमप्रतिष्ठा बाळगा. अनावश्यक उधळपट्टी टाळा.

या दिखाव्याच्या पायी कर्जबाजारीपणा येऊ शकतो म्हणून अगदी साधे रहा असं नाही पण योग्य तिथंच पैसे खर्च करा. पैसा साठवा. उधळू नका.

 

४. अचानकपणे येणारी आपत्ती –

 

corona inmarathi 2
deccanherald.com

 

माणसाचं आयुष्य अत्यंत बेभरवशाचं आहे. कधी काय होईल काहीही सांगता येत नाही. आपल्याला जसं सरळसोट रस्त्यासारखं हवं असतं, पण तरीही परिस्थिती वेगवेगळी वळणं, चढ उतार घेऊन येत असते.

कधी अचानक येणारं मोठं आजारपण, किंवा आपल्या जीवलगाचं मरणं, एखादा अपघात, नोकरी जाणं, व्यवसायात नुकसान होणं, अचानकच एखादा मोठा खर्च उद्भवणं अशा अनेक समस्या आपत्ती बनूनच येतात.

या आपत्ती नुसत्याच येत नाहीत, तर जाताना खिशाला मोठं भगदाड पाडून जातात. यासाठी विमा उतरवणं, किंवा योग्य रितीने असलेला पैसा गुंतवणं हे‌ करणं गरजेचं आहे.

थोडक्यात, आपल्या उपलब्ध संपत्तीचं योग्य नियोजन केल्यास हे नुकसान कमी करता येते.

 

५. कर्जाचा विळखा-

 

loan Inmarathi
livemint.com

 

आयुष्यात कर्जबाजारीपणा हा फार घातकी. हा वाळवीसारखा तुमची संपत्ती हळूहळू कुरतडत राहतो. म्हणून उधळमाधळ करताना बेतानं करा.

पैसा कमी पडला, की उधारी उसनवारी करून तो उभा करायचा आणि नंतर हप्ते भरण्यात उरलेला पैसा घालवायचा हे फारच त्रासदायक ठरते.  म्हणून शक्य असेल तितकं कर्ज काढणं टाळा.

जर कर्ज काढायची वेळच आली तर यातही बँका, सरकारी बँका यांना प्राधान्य द्या. खाजगी सावकाराकडून चुकून सुद्धा कर्ज काढू नका.

हा सावकारी पाश भयंकर घातक असतो. तुमची आर्थिक घडी विस्कटणारा घटक. यापासून थोडं लांबच रहा. डेबिट- क्रेडिट कार्डचा वापर जपून करा.

 

६. चलनवाढीवर अवलंबून असणाऱ्या क्षेत्रात गुंतवणूक –

 

share market crash inmarathi
jagran.com

 

ही संपत्तीची दुसरी वाळवी!!! म्हणून शक्यतो गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा.

तुम्ही जर फिक्स्ड डिपाॅझिट, रिकरींग डिपाॅझिट, विमा किंवा पारंपरिक ठिकाणीच पैसा गुंतवत असाल, तर याचे व्याजदर हे चलनवाढीवर ठरत असतात. त्यामुळं कधी कधी यातून मिळणारा परतावा शून्य असू शकतो.

त्यामुळं विचारपूर्वक गुंतवणूक करा. योग्य सल्ला घ्यावा आणि त्यानुसारच गुंतवणूक करावी.

 

७. धोकादायक गुंतवणूक-

 

savings-inmarathi
indiatoday.intoday.in

 

खूपदा अति हव्यास हा घात करतो. जाहिराती देऊन गुंतवणूक करायला लावणारे लोक हे तसेच असतात.

जास्त व्याजाचं आमिष दाखवून, कमी वेळात पैशाची दुप्पट परत, असे वेगवेगळे भूलभुलैय्या मार्केटमध्ये खूप ठिकाणी सापळा बनून तुम्हाला पकडायला बसलेला असतो. अशा ठिकाणी सांभाळून रहा.

खूपदा आयुष्यभराची पुंजी अशा ठिकाणी जास्त व्याजदर आहे, कमी वेळात पैशाचा चांगला परतावा मिळेल अशा आशेने माणसांची धूळधाण उडविली आहे. म्हणून सांभाळून पैसे गुंतवा.

 

८. निष्क्रीयता-

 

indian guy saving inmarathi
timesofindia.com

 

कधीकधी कसलाच निर्णय न घेणं, किंवा गुंतवणुकीसाठी लक्षच न देणं हे पण महागात पडू शकतं. पैसा पडून आहे पण तो योग्य रितीने, योग्य ठिकाणी न गुंतवता तसाच ठेवला तर तो काही उपयोगाचा होतं नाही.

त्यामुळं योग्य ठिकाणी तो गुंतवला तर त्याचा काहीतरी उपयोग होतो. परतावा मिळून थोडासा तरी तो वाढतो. अन्यथा तो तेवढाच राहतो.

 

९. मालमत्तेचे योग्य रितीने विभाजन-

 

savings 1 inmarathi

 

मालमत्ता म्हणजे स्थावर जंगम मालमत्ता.. जागा घर यांचा यात समावेश आहे. त्यांची खरेदी करताना योग्य वेळी, योग्य वयात करा. म्हणजे आपण कार्यक्षम असे पर्यंत तर याचे कर्ज फिटून निवांतपणे राहता येते.

नाहीतर उतारवयात जागेचे हप्ते भरण्यासाठी परत नोकरी करावी लागतं यासारखं वाईट काय? म्हणून कोणत्याही गोष्टीचं योग्य रितीने नियोजन करुनच त्यानुसार जमा खर्च यांचा ताळमेळ बसवणं हेच कधीही उत्तम आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही पैसा जमा करत राहीलात तर तुम्ही खरोखर श्रीमंत नाही तर समाधानी श्रीमंत व्हाल.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?