“ग्लॅमरस” वाटणाऱ्या या प्रोफेशनचे आधी फायदे-तोटे जाणून घ्या, आणि मग ठरवा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

तुम्हाला एयर होस्टेस बनायचंय का? जर तुमचं उत्तर हो असेल, तर हा लेख तुम्हाला मदत करेल. कारण या लेखात एयर होस्टेस बनण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही दिलेले आहेत. ते वाचून तुम्हीच निर्णय घ्या.

अर्थातच प्रत्येक व्यवसायाचे किंवा नोकरीचे काही ना काही फायदे तोटे असतातच. तसेच ते एयर होस्टेसच्या नोकरीतही आहेत. या नोकरीचे अनेक फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत.

एयर होस्टेस बनणं हे काम सोपं नाही. जरी हा जॉब अट्रॅक्टीव्ह दिसत असला, तरी त्याचे काही तोटेही आहेत. त्यामुळे एयर होस्टेस बनण्याआधी याचा विचार करा आणि मगच निर्णय घ्या.

भारतातल्या अनेक तरुण-तरुणींना एअर होस्टेस बनावेसे वाटत असते. केबिन क्रू म्हणून जॉब मिळावा असं अनेकांचं स्वप्नं असतं.

या जॉबची इतकी क्रेझ का असेल तरुणांमध्ये? असा तुम्हाला प्रश्न पडलाय का? कारण या जॉबमध्ये पगार खूप चांगले मिळतात हे पहिलं कारण.

 

AirHostess profession InMarathi

 

याशिवाय या जॉबमधली लाईफस्टाईल ग्लॅमरस असते. तिचे आकर्षण अनेकांना वाटते. विमानांचा फुकट प्रवास, मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेल्समधून वास्तव्य, जगभर फिरण्याची संधी आणि इतर फायदे ही कारणे देखील त्यासोबत आहेतच.

थोडक्यात, ही नोकरी इतर ९ ते ५ च्या नोकऱ्यांपेक्षा नक्कीच वेगळी आहे!

विशेषतः मुलांपेक्षा मुलींना या नोकरीचं आकर्षण अधिक असतं. आणि या नोकरीत स्त्रियांचाच भरणा अधिक दिसतो.

अर्थात पुरुष देखील या नोकरीत येऊ शकतातच. ते देखील फ्लाईट स्टुअर्ड्स किंवा केबिन क्रू बनू शकतात.

 

फायदे –

ग्लॅमरस लाईफस्टाईल –

 

Glamour Airhostess InMarathi
Print

 

नेहमीच्या ९ ते ५ च्या इतर नोकरींपेक्षा वेगळी नोकरी. इथं तीच ती केबिन, तेच ते कलिग्स आणि तेच ते बोअर काम, फायली इत्यादी नाही.

इथं प्रवास करायला मिळतो. वेगवेगळे देश, वेगवेगळ्या जागा बघायला मिळतात.

अर्थात काही कालानंतर याचा देखील कंटाळा येऊ शकतो. पण तरीही सुरुवातीला तरी हे सगळं आकर्षक आणि चांगलं वाटतं.

 

भरपूर पगार –

 

Highly Paid jobs Inmarathi

 

पूर्वीपेक्षा फ्लाईट अटेन्डन्ट्सचे पगार आता कमी झाले आहेत. तरी देखील ते बऱ्यापैकी आकर्षक आहेत अजूनही.

शिवाय फुकट प्रवास, फुकट जेवण आणि पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहायला मिळतं.

 

जगभर फिरायला मिळतं –

फ्लाईट अटेन्डन्ट्सचा जॉबच प्रवासातला आहे. जगभरात विमाने जिथं जिथं जातात तिथं तिथं त्यांना जायला मिळतं.

देशविदेशातलं कल्चर, तिथले लोक, तिथली प्रमुख शहरे पाहायला मिळतात. वेगवेगळ्या देशांतील उत्तम हॉटेलात वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात.

 

देशविदेशातल्या लोकांशी ओळखी होतात –

 

first-class-passengers-InMarathi

 

इंटरनॅशनल विमान कंपनीत जर जॉब असेल, तर तुम्हाला देशविदेशात फिरायला मिळतं, त्याचबरोबर देशविदेशातल्या लोकांशी भेटी होतात. त्यांच्याशी बोलायला मिळतं. त्यांच्या ओळखी होतात.

शिवाय सोबत काम करणारे कलिग्स देखील वेगवेगळ्या देशांतले असतात त्यामुळे त्यांच्याशी चांगली मैत्री होऊ शकते.

त्यांच्याशी मैत्री केल्याने तुमच्या व्यक्तिमत्वात बराच फरक पडतो. जगभरातल्या लोकांचे राहणे, त्यांची संस्कृती कळते. त्यांच्या समजुती कळतात.

त्या सगळ्या विविध लोकांशी कसे वागायचे हे तुम्हाला कळते. तुम्ही समृद्ध होत जाता.

 

तुमच्यामध्ये चांगली कौशल्ये विकसित होतात – 

 

Polite Air-Hostess InMarathi

 

या जॉबमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते संभाषण कौशल्य. लोकांशी कसे बोलायचे, कसे वागायचे, आपलुकी, नम्रता, चेहऱ्यावर हास्य हे सगळं आणून कसं राहायचं हे सगळं इथं शिकावं लागतं.

याचा फायदा तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व लोकांशी वागताना होतो. पर्यायाने तुम्हाला लोकांशी चांगले संबंध टिकवण्याचे कौशल्य प्राप्त होते.

 

परंतु या जॉबचे काही तोटेही आहेत. ते बघू या – 

लवकर निवृत्ती –

 

Air-hostess- Early retirement Inmarathi

 

हा जॉब फार वर्षे करता येत नाही. तुम्हाला लवकर निवृत्त केले जाते. हा एक मोठा तोटाच आहे. म्हणजे या जॉबमध्ये मिळणारा पगार ही चार दिन की चांदनी ठरू शकते.

काही वर्ष हा जॉब केल्यानंतर दुसरा जॉब शोधणं, दुसऱ्या क्षेत्रात जाणं कठीण होऊन बसतं.

परंतु बऱ्याच एअर कंपन्या अशा स्टुअर्ड म्हणून निवृत्त झालेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या इतर ऑफिसमध्ये, इतर कामांसाठी सामावून घेतात.

 

जॉब व्हेकेन्सीज कमी –

भारतात एअर होस्टेसची ट्रेनिंग देणाऱ्या बऱ्याच संस्था भुछत्र्यांप्रमाणे उगवलेल्या आहेत. परंतु तेवढ्या व्हेकेन्सीज या जॉबमध्ये नसतात. आणि प्रत्येकाला इथं नोकरी मिळू शकत नाही.

त्यामुळे हा जॉब मिळवण्यात गळेकापू स्पर्धा असते. फार कमी व्हेकेन्सीज निघतात आणि उमेदवार खूप असतात. त्यामुळे हा कोर्स करून चांगली नोकरी मिळेलच याची खात्री नसते.

 

नोकरीची वेळ नक्की नाही –

 

Overworked Air Hostess InMarathi

 

फिक्स वेळेची नोकरी असेल, तर त्याचे फायदेही असतात. आपल्याला सुट्टी ठरवता येते. आपले कार्यक्रम वेळेनुसार ठरवता येतात. मात्र इथं फ्लाईट्सच्या टायमिंगप्रमाणे तुमची ड्युटी लागते.

तुम्हाला तुमचे वैयक्तिक कार्यक्रम तुमच्या मर्जीने ठरवता येत नाहीत. अनेकदा घरच्या कार्यक्रमांतही सहभागी होता येत नाही. हे शेड्यूलही बदलते राहते.

त्यामुळे आधी प्लॅनिंग करूनही कधी कधी तुम्हाला तुमच्या खाजगी कार्यक्रमांना हजर राहता येत नाही.

 

आरोग्याच्या समस्या –

 

acidity inmarathi
indiatoday.com

 

एअर होस्टेसना अशा रितीने विचित्र वेळांमध्ये काम करावे लागते. आणि फ्लाईट्सच्या नियमाप्रमाणे ठराविक वेळ आराम आणि झोपही घ्यावी लागते. त्यांच्या फ्रेश असण्यावर अनेकदा फ्लाईट्सची सुरक्षा अवलंबून असते.

पण त्यामुळे त्यांच्या शरीरातील नैसर्गिक झोपेचे, भुकेचे चक्र बिघडते.

इतर सर्वसामान्य लोकांप्रमाणे त्यांच्या खाण्यापिण्याच्या, झोपेच्या वेळा ठराविक राहत नाहीत. त्याचा दुष्परीणाम त्यांच्या आरोग्यावर होतो.

 

सुट्ट्यांमध्येही काम करावं लागणे –

 

air hostess inmarathi2
careers.turkishairlines.com

 

सणासुदीला सुट्टया या जॉबमध्ये मिळत नाहीत. आपल्या घरातील लोकांसोबत, सणसमारंभ साजरे करता येत नाहीत. कारण याच काळात फ्लाईट्सची संख्या अधिक असते.

लोक सुट्ट्यांमध्ये सणासाठी गावाला जात असताना एअर होस्टेसना त्यांच्या दिमतीला हजर राहावे लागते.

 

सर्व प्रकारच्या लोकांशी जुळवून घ्यावे लागते –

प्रवासात अनेकदा विचित्र लोक भेटतात. ते विचित्र वागतात. कधी कधी ते एअर होस्टेसना त्रासही देतात. अशा सगळ्या लोकांशी न चिडता जुळवून घ्यावे लागते. हे काम सोपे नसते.

 

सुरक्षितता –

 

Risk in the flight InMarathi

 

विमानांचे अपघात, चाचेगिरी, विमान हॅक करणं इत्यादी अनपेक्षित पण जीवावर बेतणाऱ्या गोष्टी या जॉबमध्ये घडू शकतात.

जरी नेहमीच अशा गोष्टी सगळ्याच फ्लाईटमध्ये घडत नसल्या तरी त्या कधी कुठे, कशा घडतील ते सांगता येत नाही. त्यामुळे इथं जीवाची सुरक्षितता पणाला लागत असते.

अशाप्रकारे हा जॉब आकर्षकही आहे आणि त्याचे काही तोटेही आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?