'रिकाम्यापोटी हे पदार्थ खात असाल, तर स्वतःच आरोग्यचं खूप मोठं नुकसान करून घेत आहात

रिकाम्यापोटी हे पदार्थ खात असाल, तर स्वतःच आरोग्यचं खूप मोठं नुकसान करून घेत आहात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

क्षुधादुःखम् दिने दिने…अर्थात भूक रोजच लागते. रोजच खावं लागतं.

जुनी माणसं एक गोष्ट सांगायची, एकदा मनुष्य देवाकडं गेला. म्हणाला, देवा मला दोन डोळे, दोन कान, दोन हात दोन पाय दिलेस. पण पोट एकच का दिलंस? अजून एक पोट दे ना!!!

देव हसला आणि म्हणाला, आधी ते एक पोट भरुन दाखव, मग ये माझ्याकडं.. देतो तुला दुसरं पोट.

तेव्हापासून आजवर माणूस पोट भरायची धडपड करतो. पण पोट भरत नाही. मोकळं होतं.. कधी त्रास देतं. कधी काय तर कधी काय होतं.. पण कायमचं काही भरत मात्र नाही.

अनंत अडचणी, कष्ट सारं काही फक्त पोटासाठी तर चालू असतं.

 

cooked food inmarathi
pinterest.com

 

कधी आवडीनं कधी जबरदस्तीने तर कधी नाईलाजाने आपण कित्येक पदार्थ पोटात ढकलतो. केवळ उदरभरण करतो. एक घास बत्तीस वेळा चावून खावा हे पुस्तकातील वाक्य केवळ अभ्यासापुरतं मर्यादित ठेवतो.

सुखानं चार घास खावेत .. पण हे सुख आहे काय? खवैय्यांचं सुख उत्तमोत्तम पदार्थ खाण्यात आहे. जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा आपल्या आवडीचे चमचमीत पदार्थ ते हौसेने खातात.

पण खाण्याच्या सवयी जर योग्य असती,  तर तुमचं आरोग्य उत्तम राहू शकतं. अयोग्य खाणं अनारोग्याची भेट देतं.

 

acidity inmarathi
indiatoday.com

 

काही औषधं अनुशापोटी घ्यावीत असं सांगतात, म्हणजे सकाळी झोपून उठल्या उठल्या पोट रिकामं झालेलं असतं. अशावेळी त्या औषधाची मात्रा योग्य काम करत असते.

पण रिकाम्या पोटी जर काही पदार्थ खाल्ले तर काय होतं? नक्की त्रास होतो.

रात्री जेवण झाल्यावर अन्नपचन झाल्यानंतर आपली आतडीही विश्रांती घेतात. अशा विश्रांतीनंतर अचानक जर काही पदार्थ खाल्ले, तर आतड्यांवर ताण येतो आणि त्यामुळे त्रास होतो.

असे कोणते पदार्थ आहेत जे खाणं त्रासदायक ठरु शकतं?

 

१. मसालेदार पदार्थ-

 

eating fast food inmarathi
10minitous.com

 

तिखट, चमचमीत मसालेदार पदार्थ हे कधीही अनुशापोटी खाऊ नयेत. त्यातील तिखटपणा मुळं, मसाल्यांमुळं पोटाच्या आतील अस्तर जळजळायला लागतं. त्यामुळं शरीरातील आम्लपित्त वाढून पोट दुखायला लागतं.

तीव्र अपचन होते. अपचनामुळे उलट्या होणे, पोटदुखी हे त्रास उद्भवतात.

 

२. गोड पदार्थ किंवा फळांचे रस-

 

orange juice inmarathi
healthline.com

 

साधारणपणे सर्वसामान्य लोकांचा एक समज असतो की, सकाळी सकाळी गोड पदार्थ खाल्ले किंवा फळांचा रस घेतला तर आरोग्यदायी दिवसाची सुरुवात होते.

आहारतज्ज्ञ डॉ.रुपाली दत्ता सांगतात, हा अतिशय चुकीचा समज आहे. त्या म्हणतात सकाळी उठल्या उठल्या मोठा ग्लास भरुन ज्यूस घेतला, तर त्याचा परिणाम होतो तो पचनसंस्थेवर!!

आपण जशी झोपून विश्रांती घेतो तसंच अन्नपचन करुन झालं की आतडी, यकृत, स्वादुपिंड वगैरे एकंदरीत आपली पचनसंस्था पण विश्रांती घेत असते.

आपल्याला जर झोपेतून उठवून थेट कामाला जुंपलं तर काय होईल? तीच गोष्ट आपल्या अंतर्गत अवयवांची!!! उठल्या उठल्या मोठा ग्लास ज्यूस घेतला तर स्वादुपिंडावर ताण येतो.

फळांच्या तयार रसात असलेलं फ्रुक्टोस शरीरात गेलं, की त्याचा पचनेंद्रियांवर अतिशय ताण येतो. यकृतावर त्याचा फार मोठा परिणाम होतो.

म्हणूनच सकाळी ज्यूस किंवा नाश्त्यामध्ये गोड पदार्थ शक्यतो टाळावेत. विकतचे ज्यूस तर फारच घातक असतात. म्हणून असे पदार्थ सहसा टाळावेतच.

 

३. कार्बोनेटेड साॅफ्ट ड्रिंक-

 

soft drinks inmarathi
indiamart.com

 

ही कृत्रिम पेयं. ही सर्वाधिक त्रासदायक असतात. दिवसातील कोणत्याही वेळी घरच्या त्याचे फक्त दुष्परिणामच होतात. ही कार्बोनेटेड ड्रिंक्स जर सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी घेतली यात असलेला गॅस शरीराला हानी पोहोचू शकतो.

मळमळायला होते. कारण आधीच पोट रिकामे असते. त्यात या पेयांमधील गॅस गेला तर आम्लता वाढते.

पचनासाठी पचनसंस्था आम्ल तयार करत असते. ते आम्ल आणि या पेयांतील गॅस यांच्या संयोगाने अधिकच आम्लता वाढते आणि पोटावर ताण येतो.

पोटदुखी, मळमळ, उलटी होणे हा त्रास होऊ शकतो. म्हणून ही पेयं सकाळी रिकाम्या पोटी टाळावीत.

 

४. शीतपेये-

 

dalgona coffee inmarathi
hauterfly.com

 

खूपजणांना तुम्ही सकाळी सकाळी कोमट पाणी आणि मध पिऊन दिवसाची सुरुवात करताना पाहीलं असेल. पण काही जण कोल्ड कॉफी किंवा आईस्ड् काॅफी घेतात.

सकाळी उठल्याबरोबर उन्हाळा वगळता इतर ऋतूत हवेत किंचित गारठा असतो. त्याचवेळी जर अशी थंडगार पेयं घेतली तर श्लेष्मल त्वचेची हानी होतेच शिवाय पचनक्रिया मंद होते आणि त्याचा परिणाम आपलंही काम आळसावल्यासारखं होतं.

थोडक्यात सांगायचं तर शीतपेये ही उपाशीपोटी पिणं हानीकारक असतात.

 

५. आंबट फळं-

 

citrus-fruits1-inmarathi
food.ndtv.com

 

वास्तविक फळं खाणं हे आरोग्यदायी आहे, पण ती योग्य वेळी खाल्ली तरच!! जर सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुम्ही आंबटगोड फळं सेवन करत असाल तर थांबा!!!! त्यातील आंबट रसामुळं शरीरातील पित्त वाढतं.

अॅसिडीटी होऊन त्रास होतोच. शिवाय त्यात असलेल्या तंतूमय पदार्थांचा आणि फ्रुक्टोसचा दुष्परिणाम होऊन पचनक्रिया मंदावते.

म्हणून सकाळी रिकाम्या पोटी पेरु, संत्री मोसंबी अशी फळं चुकुनही खाऊ नका.

 

६. कच्च्या पालेभाज्या-

 

acidity-inmarathi

 

जे लोक डाएटबाबत जागरूक असतात ते असं समजतात की सॅलड हा कोणत्याही वेळी खाणं हा सर्वात उत्तम पर्याय आहे. पण रिकाम्या पोटी कच्च्या भाज्या खाणं हा फारसा चांगला पर्याय नाही.

अशा भाज्या खाल्ल्याने त्यातील तंतूमय पदार्थ पोटातील वात वाढवू शकतात. आणि पोटदुखी उद्भवते.

 

७. काॅफी-

 

coffee inmarathi
dreamwallpage.blogspot.com

 

काही लोक सकाळी उठल्याबरोबर काॅफीचा वाफाळता कप घेतल्याशिवाय आपला दिवसच सुरु करु शकत नाहीत. पण रिकाम्या पोटी काॅफी घेणं हे अॅसिडीटीचं कारण ठरु शकतं.

पचनसंस्थेत हायड्रोक्लोरीक अॅसिड निर्माण करुन गॅसेस होऊन त्रासदायक ठरु शकते.

१. ठराविक पदार्थ रिकाम्या पोटी अजिबात खायचे नाहीत.

२. पचनसंस्थेवर ताण येऊ नये म्हणून आपणच तिला विशिष्ट वेळ द्यायचा.

३. उठवल्यानंतर किमान दोन तासांनी नाश्ता करा.

४. उठल्यानंतर एक कप दूध हा सर्वोत्तम पर्याय आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?