' फॉग डिओ ब्रँड इतका कसा काय टिकून आहे, एक अनोखी कहाणी! – InMarathi

फॉग डिओ ब्रँड इतका कसा काय टिकून आहे, एक अनोखी कहाणी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जर आपण गेल्या दोन वर्षांपासून भारतात राहत असाल तर, आपल्या “क्या चल रहा है” असा प्रश्न विचारल्यावर किमान एक तरी व्यक्ती अशी सापडेल जी लगेच म्हणेल “फॉग चल रहा है”.

एका विशिष्ट डिओड्रन्ट ब्रँडने आपल्या विचार प्रक्रियेमध्ये किती फरक आणलाय हे तुम्हाला यावरून कळलं असेलच. तसच, बाजारात कॉस्मेटिक्सच वेड हे सारखं बदलत असतं.

 

fgg ad inmarathi
twitter.com

 

आणि त्यामुळे तुम्ही अनेक वर्ष पहिला नंबर टिकवून ठेवण सुद्धा तितकच कठीण आहे. तर या पार्श्वभूमीवर आपल्याला दिसून येईल, फॉगच मूल्य बाजारात २० टक्के आणि व्हॉल्यूम मार्केटचा वाटा २२ टक्के आहे.

भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध जाहिरातींपैकी एक फॉगची जाहिरात आहे. आणि भारतीय मार्केटिंग क्षेत्रात जर सगळ्यात वापरली जाणारी गोष्ट कुठली असेल तर ते म्हणजे पर्फ्यूम.

आणि या संधीचा फायदा घेऊन विनी कॉस्मेटिक्सचा पुनर्जन्म या क्षेत्रात झाला.

प्रत्येकाने कधीतरी फॉग डीओड्रन्ट वापरला आहे त्यामुळे आपल्याला माहित आहे की दररोज त्याचा वापर कमी केला तरी सुगंध हा अनेक काळ टिकतो.

 

Fogg Deo Inmarathi

 

आपण याबाबतीत कधीही विचार केला नाही, पण जर आपल्याला एखादी डिओड्रन्ट सारखी गोष्ट विकायची असेल तर आपण आपल्या मित्रांना याच मार्केटिंग करायला सांगू.

पण वातानुकूलित कार्यालयात बसून मार्केटींगच्या धोरणाबद्दल विचार करण्यापेक्षा त्यात बरच काही होत असतं अस विनी कॉस्मेटिक्सच्या महान यशामागील माणूस, श्री दर्शन पटेल, जे अधिक निरीक्षक आणि व्यावहारिक विचारवंत आहेत त्यांनी सांगितलं.

आपला विश्वास बसणार नाही पण मार्केटिंगची काहीच माहिती नसणारी ही व्यक्ती आहे ज्यांनी आज संपूर्ण मार्केट डोक्यावर घेतलय.

याच उत्तर म्हणजे नव्याने बनवलेल्या ब्रँडची क्षमता. ‘नो गॅस, ओनली परफ्युम’ सारख्या नवीन पिचिंग प्रॉडक्टच केलेलं मार्केटिंग.

तरुण तसच जुनी पिढी वापरत असलेल्या या ब्रॅंडचा ग्राहकांशी कायम संबंध राहण्यासाठी फॉगने हे नवीन पाऊल उचललं.

तज्ञांच्या मते, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, जेके हेलेन कर्टिस, मॅक्न्रो आणि निविया सारख्या स्पर्धकांना याची जाणीव होऊ लागल्याने फॉगला मागे टाकणं त्यांना कठीण झालय.

भारतात २०१३ ते २०१५ मधील डेटा पहिलला तर फॉग संपूर्ण काळ आघाडीवर होता.

पटेल यांनी एका मुलाखतीत सांगितलं की फॉग यांनी सुरुवातीला डिओड्रन्ट मध्ये पाण्याचे प्रमाण वाढवायचे हे धोरण ठेवलं होत.

 

darshan patel inmarathi
thehindubusinessline.com

 

मग या फॉगने देखील त्याच्या सुरुवातीच्या काळात या विचाराची जोरदार जाहिरात केली, त्यानुसार त्यांनी स्वत:च्या ठरवलेल्या संख्येपेक्षा जास्त प्रॉडक्ट विकले.

ग्राहकांना फॉग आवडतोय हे स्पष्टपणे दिसत होत. पटेल यांच जाहिरात कौशल्य इथे कामी आलं. आणि मग व्यवसाय करायला त्यांच्यात नवीन उत्साह निर्माण झाला.

विनी कॉस्मेटिक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पटेल यांनी चालू असलेल्या बाजाराचा अभ्यास करून नाही तर ग्राहकांची आवड पाहून फॉग डीओड्रन्ट याची बाजारपेठ तयार केली.

जेव्हा फॉग जाहिरातीत किंवा पोस्टरवर आला तेव्हा लगेच हा डिओड्रन्ट प्रत्येकाच्या खोलीत आला.

मार्च २०१६ मध्ये केवळ या एकट्या उत्पादनाने प्रचंड कमाई केली आणि ती मोजली तर रक्कम ६१० कोटी आली.

केवळ दोन वर्षांच्या कालावधीत बरेच गुंतवणूकदार यांच्याकडे आकर्षित झाले आणि दोन मोठे गुंतवणूकदार आता त्यांच्याबरोबर काम करतात, त्यापैकी एक सिकोईया इन्व्हेस्टर्स आहे.

विनी कॉस्मेटिक्समध्ये त्यांची १२% इक्विटीची मालकी आहे.

फॉग ही कंपनी २०१०-११ मध्ये सुरू करण्यात आली होती आणि ती ग्राहकांना लगेच आवडली.

 

 

ब्रँडने लाँचच्या पहिल्या चार महिन्यांत दहा लाखांहून अधिक डिओड्रन्ट कॅन विकले आणि पहिल्या वर्षाच्या आतच १०० कोटी डॉलर्सचा आकडा सहजपणे ओलांडला.

लॉन्च झाल्यानंतर सुमारे दोन वर्षात, या नवीन डिओड्रन्ट ब्रँडने बाजारातील प्रसिद्ध आणि अत्यंत लोकप्रिय डिओड्रन्ट ब्रँड असा शिक्का स्वतःवर मारून घेतला.

डिओड्रन्ट ब्रँडच्या गर्दीत फॉगला वेगळं मानलं गेल आणि मग उत्कृष्ट सूद्धा.

दर्शन पटेल यांनी एरोसोलची गरज नसलेला पंप आणला, ज्यामुळे ब्रँडने त्यांच्या उत्पादनांच्या ओळीत नो-गॅस किंवा नॉन-एरोसोल पंप असून लिहून नवीन उद्योगात प्रगती केली.

त्यांच्या टीमने हे फिक्स केल की सुगंध जास्त काळ टिकेल. तर यामुळे काय झाल जेव्हा तो माणसांनी अप्लाय केला तेव्हा कमी डिओड्रंट वाया गेला आणि एकाच कॅनच्या वापरायच्या कालावधीत भर पडली.

या कंपनीच अस म्हणणं आहे ते डिओड्रन्ट बाजारात आणतांना अगदी गावातील लोकांचा पण विचार करत होते. त्यामुळे त्यांना कमीतकमी पैशात जास्तीत जास्त ग्राहकांना खुश ठेवायच होत. जे त्यांना जमल सुद्धा.

 

fogg perfumes inmarathi
nextbigbrand.in

 

आणि याचा फायदा असा झाला की भारतात जिथे गोष्टींच्या किंमती बर्‍यापैकी जास्त असतात तिथे या प्रॉडक्टनी स्वतःची जागा तयार केली.

या ब्रँडने चांगली सुरुवात तर केली, पण या स्पर्धात्मक बाजारपेठेत कायम पुढे राहण देखील तितकच महत्वाच होत. पुढील पाऊल होत मोठ्या प्रेक्षकांना आकर्षित करायच.

क्रिएटिव्ह जाहिरात मोहिम या ब्रँडसाठी डिझाइन केल्या गेल्या ज्यामध्ये सर्व वयोगटातील लोकांना घेऊन मोठा कंटेन्ट दाखवण्यात आला.

पटेल यांचे म्हणणं आहे की, या ब्रँडला फॅमिली डिओड्रन्ट म्हणून प्रतिसाद मिळण हे कंपनीच्या सुरुवातीच्या काळात प्रसिद्ध होण्याच्या प्रमुख घटकांपैकी एक आहे.

आजच्या परिस्थितीत, फॉगकडे भारतातील इतर डिओड्रन्ट ब्रॅंडपेक्षा २०% वाटा जास्त आहे, सध्या विनी कॉस्मेटिक्स कंपनीच मूल्य ₹४००० कोटींच्या वर आहे.

बार्गेन ऑफर, क्रिएटिव्ह पोजिशनिंग, व्हॅल्यू प्रोपोजिशन्स आणि काही लैंगिक सूचक जाहिरात मोहिमेचा भडिमार यामुळे ग्राहकांना ब्रँडकडे त्यांनी आकर्षित केलं. म्हणून हा ब्रँड वेगाने वाढणार्‍या डिओड्रन्ट शर्यतीत आघाडीवर आहे.

 

fogg deos inmarathi
businessstandard.com

 

फॉगच्या यशाच्या परिणाम म्हणजे, विनीने स्वत: च्या २०० कर्मचार्‍यांसह एक राष्ट्रीय वितरण नेटवर्क तयार करण्यास सुरुवात केलीये.

आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर हे एक उत्तम उदाहरण आहे फक्त त्यासाठी माहिती शोधावी लागेल, प्रेरणा घ्यावी लागेल आणि तस प्रॉडक्ट तयार कराव लागेल.

तर असा होता हा फॉग चल रहा है अस म्हणणार्‍या ब्रॅंडचा आजवरचा प्रवास.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?