' या माशाची सुगंधी "उलटी"आहे करोडो रुपयांची, कारण जाणून घ्या!

या माशाची सुगंधी “उलटी”आहे करोडो रुपयांची, कारण जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जगात अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या खूप दुर्मिळ असतात आणि ह्या दुर्मिळ वस्तूंची किंमत सुद्धा गगनाला भिडणारी असते, आणि ह्या दुर्मिळ वस्तु सहजासहजी मिळत नाहीतच!

अशाच एका दुर्मिळ आणि विचित्र अशा गोष्टीबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, आणि त्या विचित्र गोष्टीची किंमत ऐकून तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल!

ही गोष्ट म्हणजे व्हेल मास्याची उलटी.. होय होय अगदी बरोबर वाचलत! व्हेल माशाची एक किलोची उल्टी आहे १० मिलिअन डॉलर्सची..!

 

whale fish puke inmarathi
dailynews360.patrika.com

 

आश्चर्यचकीत झालात ना? परंतु जगात अशा अनेक आश्चर्यजनक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नसतात आणि आपण कधी त्याची कल्पनाही केलेली नसते.

व्हेल माशाची उल्टी किंवा अंबरग्रीस –

ही उलटी जमवणे आणि विकणे हे बेकायदेशीर आहे. तो गुन्हा आहे, आणि त्यासाठी तुम्हाला शिक्षा सुद्धा होऊ शकते. या माशाची ही उल्टी अंबरग्रीस या नावानेही ओळखली जाते.

ती मुल्यवान वस्तू म्हणून ओळखली जाते आणि तिचा वापर परफ्युम्स बनवण्यासाठी होतो. ‘चॅनेल’, ‘गिव्हन्ची’, गुस्सी’ या सारखे मोठे नामांकित ब्रॅन्ड्स या अंबरग्रीसचा वापर आपल्या उत्पादनांत करतात.

व्हेल माशाची ही उल्टी ‘फ्लोटिंग गोल्ड’ समजली जाते. म्हणजे तरंगते सोने.

तुम्हाला माहिती आहे का याबद्दल? युरोपच्या समुद्रकिनाऱ्यांवर ते सापडते.

पण ते आपल्या सोन्यासारखे चकाकत नसते. तर ते एखाद्या खडकासारखे दिसते आणि त्याला सुगंध असतो.

 

ambergris inmarathi
businesstoday.in

 

हा व्हेल माशाने उल्टी केलेला एक सुगंधी पदार्थ असतो आणि तो नैसर्गिक परफ्युम्स बनवण्यात वापरला जातो. हा फार दुर्मिळ पदार्थ आहे. याची किंमत करोडो रुपयांत असते.

पर्यावरण खात्याला भीती वाटते, की जर लोक या पदार्थाच्या मागे लागले, तर ते व्हेल माशांना त्रास देऊन पकडतील आणि पर्यायाने त्यांची संख्या रोडावेल.

व्हेल माशांच्या अस्तित्वालाच अशाने धोका पोचेल, म्हणून व्हेल माशाच्या या उल्टीची विक्री करण्यास प्रतिबंध घातलेले आहेत. त्याचा व्यापार करणं हे बेकायदेशीर मानलं गेलेलं आहे.

ती प्रत्यक्षात आहे – व्हेल माशाची विष्ठा!

जरी याला व्हेल माशाची उल्टी समजलं जात असलं, तरी प्रत्यक्षात ती त्या माशाची उल्टी नसून त्याची विष्ठा असते. या माशाची ही विष्ठा समुद्रावर तरंगताना आढळते किंवा किनाऱ्यावर देखील पडलेली सापडते.

ती व्हेल माशाच्या आतड्यातून बाहेर आलेली असते. त्याला न पचलेल्या गोष्टी आणि पदार्थाचे अवशेष यात असतात. त्यामुळे ती कडक दगडासारखी झालेली असते.

परंतु ती मेणासारखी मऊ असते. तिचा रंग दगडासारखा करडा असतो.

 

ambergris 2 inmarathi
news.softpedia.com

 

ख्रिस्तोफर केम्प या लेखकाने ‘फ्लोटींग गोल्ड- ए नॅचरल हिस्ट्री ऑफ अबरग्रीस’ या नावाचे एक पुस्तक लिहिले असून त्यात या व्हेल माशाच्या पोटातून निघणाऱ्या दुर्मिळ आणि मुल्यवान पदार्थाबद्दल साद्यंत माहिती दिली आहे.

याची इतकी किंमत का आहे?

कारण हा पदार्थ फार दुर्मिळ आहे. तो सहज सापडत नाही. क्वचित सापडतो. म्हणून तो किंमती आहे. यापासून उत्तम दर्जाची, टिकाऊ वासाची अत्तरे बनतात. ही अत्तरे खूप महागडी असतात.

शिवाय हे फ्लोटिंग सोने माणसाच्या हातात पडण्यापूर्वी अनेक दशके महासागरात खूप आत आणि खूप खोलवर पडून राहिलेले असते. त्यानंतर ते क्वचित कधीतरी किनाऱ्याला लागते.

हे जर अस्सल अंबरग्रीस असेल, तर त्याची किंमत करोडोत असते. ते काहीसे मेणासारखे असते. हे असे अंबरग्रीस फार कमी आणि सुदैवी लोकांच्याच हाताला लागते.

एक प्रकारे लॉटरीच म्हणा ना!

सन २०१३ मध्ये केन विल्यम्स नावाच्या माणसाला अचानक आणि अनपेक्षितपणे व्हेल माशाची ही विष्ठा किंवा उल्टी म्हणा सापडली होती आणि त्याला ताबडतोब त्याचे १८०००० डॉलर्स मिळाले होते.

 

floating gold inmarathi
mirror.co.uk

 

विकण्यावर बंदी – पर्यावरणाला धोक्याची भीती

खरं म्हणजे अशा रितीने बाहेर आलेली व्हेल माशाची ही उल्टी किंवा फ्लोटींग गोल्ड विकल्याने व्हेल माशाला काही नुकसान होणार नसते. तरीह देखील अंबरग्रीसच्या व्यापारावर अमेरिकेत बंदी आहे.

कारण अशाने लोक व्हेल माशाला पकडून त्याच्या पोटातून त्याची विष्ठा काढण्याचा प्रयत्न करतील अशी सरकारला भीती वाटते आणि त्यामुळे त्या माशाची जात नष्ट होण्याची भीती वाटते.

अर्थात अशी व्हेल माशाची विष्ठा असते, ती ओळखता येणे, आणि त्याचे इतके असे पैसे मिळू शकतात इत्यादींबद्दल फार कमी लोकांना माहिती असते.

आणि ती माहिती असली, तरी ती किनाऱ्यावर किंवा समुद्रातही कुणाला सापडणे हा केवळ योगायोग किंवा नशीबच म्हणायला हवे.

पण तरीही, लोकांना जर याची माहिती होत गेली, तर लोक समुद्राचे आणि त्या माशांचे पर्यावरण धोक्यात आणतील ही भीती आहेच.

आपल्या भारतात मागच्या वर्षी जून महिन्यात व्हेल माशाची अशी विष्ठा बेकायदेशीरपणे विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन माणसांना घाटकोपर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी पकडले होते. ते जवळपास किलोभरचे होते.

 

whale vomit ghatkopar inmarathi
dnaindia.com

 

मुख्य म्हणजे हा पदार्थ कुठल्याही व्हेल माशापासून सापडत नाही. तो फक्त स्पर्म व्हेल या प्रजातीपासूनच निर्माण होतो. आणि या प्रजातीला धोका पोचू नये यासाठी या पदार्थावर बंदी घालण्यात आली आहे. आणि त्याचा व्यापार बेकायदेशीर ठरवण्यात आला आहे.

१९७० मध्ये मध्ये स्पर्म व्हेलची ही प्रजाती दुर्मिळ जातींमध्ये निश्चित करण्यात आलेली जाती आहे. अशाच प्रकारे दोन वर्षांपूर्वी ठाणे येथील कळवा पोलिस स्टेशनला देखील तीन माणसांना अटक करण्यात आली होती.

त्यांच्याजवळ जवळपास २ कोटी रुपये किंमतीचे फ्लोटींग गोल्ड होते. ही माशाची विष्ठा त्याला रत्नागिरीच्या समुद्राजवळ सापडली होती असे त्याचे म्हणणे होते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?