' केंद्र सरकारने प्राण्यांच्या सुरक्षेसाठी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे – InMarathi

केंद्र सरकारने प्राण्यांच्या सुरक्षेसाठी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘सरकार आपल्यासाठी काय करतं?’ ह्या बद्दल आपल्याकडे नेहमी एक अज्ञान बघायला मिळतं. ह्याचं कारण म्हणजे बऱ्याच बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतंच नाहीत. आणि आपणही स्वतःहून त्या जाणून घेत नाही.

क्वचित प्रसंगीच आपण आपल्याला जय विषयाची माहिती आहे त्याबद्दल स्वतः गुगल करून माहिती मिळवतो.

आपण सगळे जाणतो की,  प्रत्येक सरकार infrastructure कडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न करत असते.

समृद्धी महामार्ग हा प्रकल्प सरकारने नागपूर ते मुंबई हा रस्ता कमी वेळात कापता येईल यासाठी हाती घेतला होता. या प्रकल्पाचा फायदा या रस्त्यावरील गावातील वाहतुक सुखकर होण्यासाठी सुद्धा झाला.

हा प्रकल्प तर आहे वाहतूक सुरळीत होण्यासाठी. पण, केंद्र सरकारने एक प्रकल्प हा प्राण्यांच्या सुरळीत वाहतुकीसाठी सुद्धा हाती घेतला आणि ऑगस्ट २०१९ मध्ये तो प्रकल्प पूर्ण सुद्धा केला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

NH7 या राष्ट्रीय महामार्गावर कान्हा – पेंच या मध्य प्रदेशातील गावाच्या ठिकाणी वन्य प्राण्यांनी त्याच्या खालून रोड क्रॉस व्यवस्थित करावा आणि त्यांना कोणतीही इजा पोहोचू नये आणि वाहतूक कोंडी सुद्धा होऊ नये या उद्देशाने फक्त अंडरपास (फ्लायओव्हर) बांधण्यात आला आहे.

 

wildlife underpass inmarathi
thebetterindia.com

 

या प्रकल्पाच्या हस्तांतरणा नंतर त्याचे ४५० फोटो हे Wildlife Institute of India(WII) ने जाहीर केले आहेत त्यापैकी जवळपास १५ प्राण्यांची वाहतूक ही या पुलाखालून होताना दिसत आहे.

२०१६ मध्ये केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने वन्य प्राण्यांच्या वाहतुकीला समोर ठेवून अशा २५ अंडरपास ला मान्यता दिली आहे. यापैकी १० प्रकल्प हे नॅशनल हायवे चे भाग आहेत.

हे सगळे अंडरपास हे जंगलातून किंवा प्राणी संग्रहालयाच्या मार्गातून बांधण्यात येणार आहेत.

प्राण्यांची सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून तयार केलेले हे अंडरपास हे कोणत्याही प्राण्याला रोड क्रॉस करत असताना होणारा जीवाचा धोका टाळणार आहेत.

या अंडरपास ची रचना ही एखाद्या गुहेसारखी करण्यात आली आहे. या अंडरपास च्या पिलर्स वर CCTV लावण्यात आले आहेत ज्यामुळे वन्य प्राण्यांची हालचाल ही या कॅमेरात कैद होत आहेत.

या CCTV मध्ये आतापर्यंत जवळपास १० वाघांना बघण्याचं सौभाग्य या कॅमेरा मुळे सहज शक्य झालं आहे.

 

wildlife underpass inmarathi1
thehindu.com

 

वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ने जाहीर केलेल्या परिपत्रकात असं म्हंटलं आहे की, “आम्ही जवळपास अशा १५० जागा शोधून काढल्या आहेत जिथून वाघांची हालचाल होण्याचा आम्ही अभ्यास केला आहे.

ह्या जागा सेन्ट्रल इंडिया आणि पूर्वेकडील भागातील घाटात जास्त शोधल्या आहेत. त्यापैकी २६ जागा ह्या प्रस्तावासाठी केंद्र सरकर ने मान्य केल्या आहेत.

आतापर्यंत जवळपास ३९९ वाघांना रोड क्रॉस करताना इजा झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकल्पांमुळे वाघांना होणाऱ्या इजा कमी होतील अशी आशा आहे.”

 

wildlife underpass inmarathi3
animalpeopleforum.org

 

इंडियन फॉरेस्ट सर्विस ऑफिसर श्री. प्रवीण कासवान यांनी या प्रकल्पावर अशी प्रतिक्रिया दिली आहे, ”

या योजना राबवताना जंगलातील इतर प्राण्यांची गैरसोय होऊ नये हे बघावं. जंगलात जेव्हा प्राणी विहार करू शकतात, ते या जागांमध्ये सुरक्षित राहू शकतात. अशा प्रकल्पांमुळे कनेक्टिव्हिटी वाढली तर वन्य प्राणी वाढण्यास मदत होईल.”

प्राणी संवर्धनासाठी राबवण्यात आलेल्या या प्रकल्पाबाबत बोलताना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्याचं कौतुक केलं,

“वाघांचं संवर्धन किंवा निसर्गाचं संवर्धन हे कधीच विकासाच्या आड येत नाही. गरज आहे ती वन्यप्राणी संघटना आणि या प्रोजेक्ट कंपनी ने एकत्र येऊन काम करण्याची. इन्फ्रास्ट्रक्चर टीम आणि वन्यजीव संवर्धन संघटना ही या बाबतीत एकत्र येऊन खूप छान करत आहेत.”

वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूटच्या एक्स्पर्ट ने या गोष्टीवर खूप समाधान व्यक्त केलं आहे की, वन्य प्राणी हे कोणत्याही सुचनेशिवाय किंवा ट्रेनिंग शिवाय या अंडरपास चा व्यवस्थित वापर करत आहेत हे पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे.

हा प्रश्न तेव्हा सर्वांसमोर आला होता, जेव्हा NH-44 या राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण करण्यात आलं होतं. त्यावेळी एक चित्ता आणि वाघ यांना गाड्यांच्या ट्रॅफिक मुळे त्यांचा जीव गमवावा लागला होता.

 

wildlife underpass inmarathi2
conservationindia.org

 

त्यानंतर मुंबई हायकोर्टने नॅशनल हायवे अथोरिटीला काही निर्देश दिले. या निर्देशांमध्ये वन्य प्राण्यांच्या रोड क्रॉस करण्याच्या गोष्टीकडे लक्ष देण्यात यावं हे सांगण्यात आलं होतं.

सामान्य माणसाच्या नजरेतून बघितलं, तर हे अंडरपास या समस्येवर प्रभावी सोल्युशन आहे हे मान्य करायला काहीच हरकत नसावी. पण, काही समीक्षकांच्या मते, या प्रकल्पात सुद्धा काही चुका झाल्या आहेत.

या चुका मुख्यत्वे पूर्ण सुरक्षा आणि पाण्याची व्यवस्थित विल्हेवाट न होणे या संदर्भात आढळून आल्या आहेत. या सूचनांवर लवकरच काम करण्यात येईल असं आश्वासन संबंधित एजन्सी कडून देण्यात आलं आहे.

माणसांसोबत प्राण्यांचा सुद्धा आपल्या निसर्गावर, जागेवर तितकाच अधिकार आहे हे मान्य करायला पाहिजे. मग, आपण असे अजूनही प्रकल्प राबवू शकतो आणि प्राणी संवर्धनाच्या कामासाठी हातभार लावू शकतो.

या गोष्टींकडे आताच लक्ष दिलं गेलं नाही, तर काही वर्षांनी पुढच्या पिढीला हे वन्य प्राणी फक्त टीव्ही वर किंवा कार्टून मध्येच फक्त बघायला मिळतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?