' २ महिने सूर्य उगवतच नाही असं नैसर्गिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या चमत्कार असलेलं शहर

२ महिने सूर्य उगवतच नाही असं नैसर्गिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या चमत्कार असलेलं शहर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

युनायटेड स्टेट्समधील अलास्का प्रांतात बॅरो हे ठिकाण पृथ्वीवरती अशा ठिकाणी स्थित आहे, की येथे सर्वात लहान आणि सर्वात मोठा दिवस असतो.

येथे १० मेला सूर्य उगवला, की तो जवळपास तीन महिने मावळतच नाही. आणि १८ नोव्हेंबरला मावळला. की तो जवळपास दोन महिने उगवतच नाही.

अलास्का हे नैसर्गिक आणि वैज्ञानिक असे दोन्ही दृष्ट्या एक चमत्कार आहे. येथील निसर्ग आश्चर्यकारक आहे. अलास्का हे जगातील सर्वात उंचावरचे, सर्वात मोठे, असे सुंदर ठिकाण आहे.

 

alaska inmarathi
taketours.com

 

युनायटेड स्टेट्समधील २० सर्वोच्च शिखरांपैकी १७ शिखरे एकट्या अलास्कात आहेत. यातील माउन्ट मॅककिनले हे शिखर नॉर्थ अमेरिकेतील सर्वात उंच म्हणजे २०३२० फूट उंचावर आहे. हे जगातील सर्वात उंच शिखर आहे.

अलास्कामध्ये ३ दशलक्ष तलाव आहेत, ३००० नद्या आहेत आणि ४७,३०० मैलांचा समुद्र किनारा आहे. जवळपास लाखभर ग्लेशर्स आहेत.

अमेरिकेतील एकूण ज्वालामुखींपैकी ८० टक्के जिवंत ज्वालामुखी केवळ अलास्कामध्ये आहेत. या देशातील सर्वात मोठी दोन जंगले अलास्कात आहेत.

टोंगाज हे जंगल १६.८ मिलिअन एकर्समध्ये पसरलेले आहे तर चुगाच हे ४.८ मिलिअन एकर्समध्ये पसरलेले आहे.

अलास्काच्या ३६५ मिलिअन एकर्स भुभागापैकी फक्त १ मिलिअन एकर भुभाग हा खाजगी भूभाग असून बाकीचा सगळा राष्ट्रीय ताब्यात आहे.

 

alaska inmarathi6
global.hurtigruten.com

 

अलास्कामध्ये १६ नॅशनल पार्क्स आहेत. ते ५४ मिलिअन एकर्समध्ये पसरलेले आहेत. ग्लेशर बे आणि डेनाली हे दोन प्रसिद्ध नॅशनल पार्क आहेत. येथील सर्वच नॅशनल पार्क्सची आपली अशी वैशिष्ट्ये आहेत.

इथं जंगली जीवन बघता अनुभवता येतं. कॅम्पिंग, फिशिंग, आऊटडोर फोटोग्राफी, राफ्टींग, कायाकिंग, माउन्टेन क्लायमिंग, स्किईंग, फाईटसिइंग, क्रुझेस, हिस्टोरीक टूर्स, कल्चरल मोन्युमेंट्स, हायकींग, नेचर वॉक्स अशी बरीच आकर्षणे इथे अनुभवता येतात.

इथं जवळपास १३० पार्क्स आहे. हे पार्क्स ३ मिलिअन एकर्समध्ये पसरलेले आहेत.

अलास्कामधील १ लाख ग्लेशर्स हे पर्यटकांचं आकर्षण आहे. यापैकी बरेच ग्लेशर्स कारने जाऊन बघता येण्यासारखे आहेत. बोटीने देखील एका दिवसात बरेचसे ग्लेशर्स बघता येतात. अशा टूर्स तिथले ग्लेशर्स बे नॅशनल सारखे पार्क आयोजित करत असतात.

 

alaska inmarathi1
seabourn.com

 

हजारो प्रकारचे मूस, कॅरीबू, मेंढ्या, अस्वले, लांडगे, जंगली बैल, जंगली शेळ्या आणि हरणं इथं सापडतात.

पक्ष्यांच्या जवळपास ४३० जाती सापडतात. लाखो सीबर्ड्स, स्वॅन्स, डक्स आढळतात. अमेरिकन राष्ट्रीय पक्षी ‘अमेरिकन बाल्ड ईगल’ येथेच पाहावयास मिळतो.

अलास्कामधील समुद्री जीवन देखील विविधतेने नटलेले आहे. इथे समुद्री सिंह, व्हेल मासे, आणि अनेक अद्भुत प्राणी बघावयास मिळतात. व्हेल माशाच्या १६ जाती येथे पाहावयास मिळतात.

सी ऑटर्स हे इथलं आकर्षण आहे. हे समुद्री प्राणी चंचल असतात. आपल्याहून छोट्या सी ऑटर्सना ते आपल्या छातीवर घेऊन जाताना दिसतात.

 

alaska inmarathi2
mmc.gov

 

जेव्हा दोन दोन महिने सूर्य मावळत नाही, किंवा उगवत नाही, तर अशा परिस्थितीला अलास्काचे लोक कसे सामोरे जात असतील? ते कंटाळत नसतील का?

यावर तिथे दहा वर्षे राहिलेले क्लिमेटॉलॉजिस्ट डॉ. ब्रियान ब्रेशनायडर म्हणतात, की मी तरी या दहा वर्षाच्या कालावधीत अलास्काच्या लोकांना याबाबत काही तक्रार करताना ऐकलेले नाही.

इथे लोक आपल्या कामाचे वेळापत्रक आखून घेतात आणि जेव्हा जी कामं सोयीस्कर वाटतात तेव्हा ती कामं करतात. कारण इथं दिवस आणि रात्रीचं गणित वेगळंच आहे.

जेव्हा दोन महिन्याची रात्र संपून सूर्य दिसायला सुरूवात होतो तेव्हा लोक त्याचे स्वागत करतात, कारण आता हिवाळा संपून उबदार दिवसांची सुरूवात होणार असते.

 

alaska inmarathi3
youtube.com

 

दिवसरात्र सूर्यप्रकाश असल्याने त्याचा फायदाच वाटतो या लोकांना. कारण सूर्यप्रकाश कायम असल्याने कोणत्याही वेळी कोणतीही कामे करता येतात. आणि भरपूर कामे उरकता येतात.

बाहेर भटकंती करायची असली, तरी रात्रीचा अंधार नसल्याने तुम्ही रात्रीही डोंगरमाथे चढू शकता, भटकंती करू शकता, शिकार करू शकता.

पुढच्या दोन महिन्याच्या रात्रीची तयारी म्हणून तुमचा शिधा भरून ठेवण्याचे काम करू शकता किंवा नुसता आरामही करू शकता. असे तिथल्या लोकांचे म्हणणे आहे.

सततच्या सूर्यप्रकाशात लोक झोप कशी काढत असतील?

 

alaska inmarathi4
explorefairbanks.com

 

अंधार करण्यासाठी लोक घरात जाड पडदे लावतात. त्यांना अशा वातावरणाची तिथे सवय झालेली आहे. परंतु या दोन ते तीन महिने दिवस आणि दोन ते तीन महिने रात्र याच्या मधला काळ विचित्र असतो.

हा ट्रान्झिशन पिरिअड वैतागवाणा असतो. या मधल्या काळात सूर्यप्रकाश कमी जास्त होत राहतो.

बाहेरून आलेल्या लोकांना देखील सुरुवातीला हे वातावरण पचवायला कठीण जाते. मात्र काही दिवसांतच ते देखील या प्रकाराला रुळतात. सुरूवातीला अशा सूर्यप्रकाशात रात्र असून देखील त्यांना झोप लागत नाही. पण नंतर सवय होते.

वसंत ऋतुत होणाऱ्या ट्रान्झिशन पिरिअडपेक्षा पानगळीचा ऋतू अधिक चांगला असतो असे काहींचे म्हणणे. एकदा का ऑगस्ट सुरू झाला, की तिथले लोक नेहमीच्या वेळेला बरोबर झोपू शकतात. मग उठल्यावर अंधार असला तरी काही फरक पडत नाही.

लोकांच्या शरीरावर आणि आरोग्यावर याचे काही परीणाम होत नाहीत का?

 

alaska inmarathi5

 

जेव्हा रात्र मोठी असते, तेव्हा बाहेरची कामे आपण फार करू शकत नाही, ही जाणीव थोडी डिप्रेशन आणणारी असते. अशावेळी लोक उन्हाळा सुरू होऊन दिवस कधी मोठा होईल याची वाट पाहात असतात.

काही लोक इथं केवळ सूर्यप्रकाशाचा काळ असतो तेव्हाच इथे राहतात. त्यांना दोन दोन महिन्याची रात्र मात्र सहन होत नाही. ते तो काळ इथं काढू शकत नाहीत. तेव्हा ते दुसरीकडे निघून जातात.

तर काही लोक मात्र तेव्हाही इथेच राहण्यास शिकतात आणि अलास्काच्या लोकांशी मिसळून जातात. 

अशा या अलास्काला एकदा तरी आयुष्यात भेट द्यावी अशी इच्छा हे वाचून नक्कीच होईल. निसर्गाची किमयाच न्यारी हे मान्य करायला अलास्का भाग पाडतं

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?