' प्रमोशनल स्टंट की सत्य? जाणून घ्या १४० / ४० क्रमांकावरून येणाऱ्या फोन कॉलमागचं रहस्य!

प्रमोशनल स्टंट की सत्य? जाणून घ्या १४० / ४० क्रमांकावरून येणाऱ्या फोन कॉलमागचं रहस्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

सध्या लॉकडाऊनच्या काळात लोकांना एकाच गोष्टीचा आधार आहे तो म्हणजे न्यूज चॅनल्स आयन सोशल मीडिया.घराबाहेर पडता येत नसल्याने बाहेर नेमकं काय घडत आहे ह्याचे लाईव्ह अपडेट्स आपल्याला चॅनल्स आणि सोशल मीडिया वर मिळत आहे!

पण या सोशल मिडियाच्या वाढत्या प्रभावामुळे आणखीन एक गोष्ट फोफावत आहे ती म्हणजे खोट्या बातम्या किंवा अफवा!

तुम्हाला आठवत असेल व्हॉट्सअप नवीन नवीन आलं तेंव्हा बऱ्याच मोठमोठ्या सेलिब्रिटीजच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या आणि मग नंतर न्यूज चॅनल किंवा पेपर च्या माध्यमातून समजायच की ही तर अफवा होती!

 

fake news inmarathi
indianexpress.com

 

ह्या अशा अफवांचा आता लॉकडाऊन काळात प्रचंड सुळसुळाट झालेला आपल्याला दिसेल, कोणती बातमी खरी कोणती खोटी ह्यावर विश्वास ठेवणं सुद्धा कठीण झाले आहे!

“आताच मुंबई पोलिस मेन कंट्रोलचा संदेश प्राप्त झाला आहे की १४० ने सुरुवात होणारे नंबरचे कॉल स्विकारु नयेत. सर्व ग्रुप वर ही माहिती पुढे पाठवा पब्लिक ग्रुप असेल तरी चालेल.”

“आपल्याला १४० या नंबर चा फोन आल्यास घेऊ नये. आत्ताच मेसेज झाला असून त्या प्रमाणे मुंबईत सर्व लोकांना PA सिस्टिम वर अनाऊंन्स करून सांगितले जात आहे. बहुदा तुमचे अकाउंट खाली होईल. काळजी घ्या. दुसऱ्याला पण सांगा.”

काल दिवसभर जवळपास प्रत्येक व्हाट्सअँप ग्रुप वर हे असले मेसेज सगळ्यांनाच आला असेल. सोबत अनाउसमेंट करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ.

आणि बघता बघता हे प्रकरण सोशल मीडिया वर एवढं तापलं की त्याचा शोध घ्यावा लागला.

140 fake news inmarathi
belgavkar.com

 

तर, या ताळेबंदच्या काळात सगळ्यात मोठा बिझनेस उभा राहिला आहे तो ओटीटी प्लॅटफॉर्म वाल्यांचा. तेच हो नेटफ्लिक्स,अमेझॉन प्राईम आणि इतर.

रोज या ना त्या प्लॅटफॉर्म वर कोणती ना कोणती वेब सिरीज रिलीज होत असते. आपण बेस्ट आहोत,आपला प्लॅटफॉर्म बेस्ट आहे हे सिद्ध करण्याची स्पर्धा तर अशी पण रोजच असते.

त्यात नवीन भर. आता रिलीज आहे म्हणजे प्रमोशन आलं. आणि प्रमोशन साठी पीआर एजन्सी काय डोकं लावेल सांगता येत नाही.

आणि असंच काही तरी हटके करण्याच्या नादात सोनी लिव्हच्या पीआर टीमला हा ‘कांड’ करायला सुचलं असेल.

हे ही वाचा –

तर, आपल्या नवीन ‘अनदेखी’ या शो च्या प्रमोशन साठी सोनी लिव्ह ने काही टेलीकॉ लर्स हायर केले आणि त्यांच्या थ्रू लोकांना फोन केले जाऊ लागले.

आता फोन तर करत आहेत, त्यात काय एवढं? एका फोन कॉल ने एवढं काय आभाळ फुटणार आहे.?

पण, हे वाटत तेवढं सोप्प नाही. या नंबर वरून येणाऱ्या फोन वरून समोरची व्यक्ती म्हणते की,”इथे कोणाचा तरी खून झाला आहे आणि खुनी माझा पण खून करायचा प्रयत्न करत आहे”

आणि शेवटी म्हणतात, “अनदेखी…स्ट्रीमिंग ऑन सोनी लिव्ह.” पहिले दोन वाक्य ऐकून तरी कोणालाही भीती नक्कीच वाटेल.

undekhi inmarathi
udayavani.com

 

काहींनी इग्नोर करून सोडून दिलं. पण,

आर्टस्ट्रिक डायरेक्टर स्मृती किरण यांनी हा फोन सिरीयस घेऊन त्यांनी मुंबई पोलिसांनी मेंशन करून ट्विट केलं.आणि बघता बघता त्या ट्विटला जोरदार प्रतिसाद यायला लागला.

एका ट्विटर युजरने तर भीतीने त्याला कापरी भरल्याचे सांगितले.

जर त्यांच्या ऐवजी कोणी वयस्कर व्यक्ती असली असती आणि त्यांचं काही बरं वाईट झालं असत तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती?

प्रमोशन करण्याची सोनी लिव्हची ही पद्धत अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे १४० पासून सुरू होणाऱ्या या फोन कॉल मुळे अनेक जण डिस्टर्ब झाले.

आणि त्यांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली. प्रकरण एवढं वाढलं की सोनी लिव्हला जाहीर स्टेटमेंट देऊन माफीनामा द्यावा लागलं.

आपल्या माफीनाम्यात सोनी लिव्ह म्हणते,आमच्या फोन कॉल करण्याचा उद्देश कोणाला त्रास द्यायचा नव्हता. हा एक प्रमोशन साठी केलेला स्टंट होता.

यामुळे जर कोणाला त्रास झाला असेल तर आम्ही दिलगीर आहोत. फोन कॉल च्या माध्यमातून कोणाला अस्वस्थ करण्याचा आमचा कोणताच हेतू नव्हता.

sony liv promotional stunt inmarathi
m.dailyhunt.in

हे ही वाचा –

 

१४० नंबर चा घोळ. एरव्ही कस्टमर केयर्स आणि ब्रँडिंगच्या प्रमोशन साठी १४० नंबर ने सुरवात केलेले कॉल यायचे.

मध्यंतरी डीएनडी सर्व्हिस मुळे या फोन कॉल चे येणे कमी झाले होते. TRAI च्या निर्देशानुसार टेलि मार्केटिंग साठी १४० पासून सुरवात असलेले नंबर वापरण्याचे आदेश आहेत.

म्हणून सोनी लिव्हचे कॉल्स १४० ने सुरवात असलेल्या नंबर वरून येऊ लागले. यापूर्वी ही असे स्टंट केले गेले आहेत.

विनोद कापरी दिग्दर्शीत पिहू च्या प्रमोशनच्या वेळेस ही अशीच ट्रिक वापरली गेलेली. कॉल वर एका लहान मुलाच्या ओरडण्याचा आवाज येतो आणि कॉल डिस्कनेक्ट होतो.

पुन्हा त्या नंबर वर कॉल केल्यावर ‘पिहू’ च्या प्रमोशन चा मेसेज ऐकायला येई.

pihu marketing strategy inmarathi
peepingmoon.com

 

विनोद कापरी या चुकीच्या प्रमोशन पद्धतीमुळे अडचणीत सुद्धा आले होते. आणि जाहीर माफी मागून त्यांनी हे प्रकरण मिटवल होत.

प्रमोशनच्या या चुकीच्या पद्धतीमुळे निर्माण झालेल्या तणावामधून इतर ओटीटी प्लॅटफॉर्म योग्य तो बोध घेतील आणि प्रेक्षकांच्या भावनेचा आदर करतील ही अपेक्षा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?