'राजकारणी + गुन्हेगार + पोलीस = कुणाचं तरी "एन्काऊंटर"!

राजकारणी + गुन्हेगार + पोलीस = कुणाचं तरी “एन्काऊंटर”!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : शैलेश चपळगावकर

===

पूर्वी मुंबईत पेपरमध्ये एक टिपिकल बातमी महिन्यातून एकदोनदा येत असे “खबर्यामार्फत विश्वसनीय माहीत मिळाली की कुख्यात गुंड zyx हा अमुक अमुक इथं येणार आहे.

पोलीस तिथं ठरल्या वेळेला दबा धरून बसले, ठरल्या वेळेवर तो आला पोलिसांनी त्याला हाक मारली, तो, zyxच असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी त्याला शरण येण्यास सांगितले.

पण त्याने त्याच्या जवळील बंदुकीने उलट पोलिसांवर गोळीबार सुरू केला आणि स्वसंरक्षणासाठी केलेल्या उलट गोळीबारात zyx ठार झाला. ज्याच्यावर एवढे गुन्हे होते……” वगैरे वगैरे.

 

ab tak chappan inmarathi
indiatimes.com

 

मुंबईतल्या मोठ्या टोळ्या जुलिओ रिबेरो आणि वाय सी पवार यांच्या काळात अशाच संपावल्या गेल्या. यावर झैदिनी बरंच लिहिलंय.

बाकी भारतात उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा झारखंड हे भाग पूर्वीपासून “दबंग” लोकांच्या हातात.

दबंग म्हणजे ह्याच्या सोबत सर्व क्रुशल एलिमेंट्स जसं गुंड, राजकारणी आणि पोलीस आहेत आणि ते यांच्या पूर्ण ऐकण्यातले आहेत तो, मग तो दबंग या तिघांमधलाच एक कुणीतरी जो त्यावेळेस सर्वात क्रूर असू शकतो तोच होतो.

बाहेरून काही राजकारणी आपल्याला अत्यंत साधे साधु किंवा लालू बेरकी वाटु शकतात पण तिथलं राजकारण हे असंच चालतं.

तिथल्या राजकारणात टिकून मोठं व्हायचं असेल कुणीतरी “दुबे” सारखा सोबत ठेवावा लागतो त्याशिवाय तिथं राजकारणात टिकून राहणे शक्य नाही.

आणि एक दुबे काही कारणाने “दबंग” साठी गद्दार निघाला तर त्याची जागा घ्यायला दुसरे अनेक दुबे तयार असतात.

गुन्हेगार हा भारतातल्या राजकारणाचा अविभाज्य घटक आहे वेगवेगळ्या स्वरूपात असेल पण आहे.

 

politics and criminals inmarathi
governancenow.com

 

उत्तरेपेक्षा दक्षिणेत त्याचं स्वरूप वेगळं आहे. गोव्यातले नैजेरिअन आणि रशियन अमलीपदार्थ तस्कर, परदेशी मुलींनी भरलेला वेश्याव्यवसाय किंवा अवैध खाणी असोत कुणीही गोव्यात मुख्यमंत्री झाले तरी ते पूर्णपणे आटोक्यात आणणे शक्य झालेले नाही.

आंध्रप्रदेश कर्नाटक तामिळनाडू इथला अवैध खनिज उत्खननात प्रसिद्ध रेड्डी बंधू सर्वांना माहीत आहेत.

यामागची कारणे म्हणजे संघटनेला आणि त्या वेळेच्या मुख्य नेत्याला आवश्यक असलेला पतपुरवठा फार मोठ्या प्रमाणावर ह्या माणसांकडून होत असतो.

कुणी A ला देईल कुणी B ला पण काही असेही हुशार असतात की ते सर्वांना खुश ठेवतात ते मात्र गुन्हेगारीतून राजकारणात येतात मोठे होतात आणि मग आपली समांतर सत्ता चालवतात.

राजाभैय्या, आजम खान, नाईक बंधू अशी उदाहरणे देता येतील.

 

raja bhaiya aazam khan inmarathi
hindi.oneindia.com

 

पकडलेल्या गुन्हेगाराला रस्त्यातच मारून टाकणे यात अनेकांचा फायदा असतो, त्या तिन्ही एलिमेंट्स चा “अळी मिळी गुप चिळी”.

यात खरा तो मारला का दुसराच कुणी त्याच्या जागी मारून विल्हेवाट लावून पोलीस मोकळे झाले हे सुद्धा सांगू शकत नाही.

भारतातले असे अनेक गुन्हेगार नेपाळमार्गे बाहेरच्या देशात पळून गेलेले आहेत आणि पोलीस दप्तरी त्यांनी नोंद “सादर व्यक्ती मयत त्यामुळे सर्व फाईल्स बंद” अशी असते.

सामान्य माणूस मात्र बरं झालं एक नालायक मेला. तो असाच मारायला पाहिजे *#$ वगैरे म्हणून मोकळा होतो.

 

encounters inmarathi
timesofindia.indiatimes.com

 

यातला त्या क्षणी जो सर्वात बलवान असतो तो दुसऱ्याला मारतो अनेक राजकारणी अनेक पोलीस याआधी असे मारले गेले आहेत अनेक गुन्हेगारही असे मारले आहेत.

अनेक मोठ्या नेत्यांवर गुन्हेगारांशी संबंध असल्याचे आरोप आहेत, काय होतं त्याच?

नावावर गुन्हे असलेल्याना आम्ही तिकीट देणार नाही असं सगळेच पक्ष सांगतात पण कुणीही ते पळत नाही हे वास्तव आहे. ते जगचं वेगळं, तुमच्या आमच्यापासून फार लांब आणि अनाकलनीय असतं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?