' भारतातील काही कुख्यात ‘गुन्हेगार’ आणि त्यांची भयावह कहाणी… – InMarathi

भारतातील काही कुख्यात ‘गुन्हेगार’ आणि त्यांची भयावह कहाणी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ८ पोलिसांना मारून फरार झालेला कुख्यात गुन्हेगार विकास दुबे, उज्जेनमध्ये पकडला गेला. युपीमध्ये परत आणताना चकमकीत तो एन्काऊंटर मध्ये मारला गेला.

योगी सरकारच्या एका मंत्र्याला याच दुबेने भर पोलीस ठाण्यात फटकवलेलं, पण याच्या विरोधात खुद्द पोलिसांनीच काही स्टेटमेंट दिल नाही.

यावरून विकास दुबेच्या दहशतीची कल्पना येऊ शकेल. मुंबईला गॅंग वॉर, चकमकी, अंडरवर्ल्ड, डॉन-भाई काय नवीन नाहीत.

दाऊद इब्राहिम, अबू सालेम, छोटा राजन, छोटा शकील, अरुण गवळी सारखे अनेक गुन्हेगार जे नंतर डॉन म्हणून पुढे आलेले मुंबईने पाहिलेले आहेत.

 

mumbai gangster inmarathi

 

तर पाहूया भारतातील असे काही गुन्हेगार ज्यांच्या नावाने एकेकाळी पुर्ण शहरात दहशत पसरली जायची.

१. नीरज बवाना – दिल्लीचा दाऊद –

 

neeraj bawana inmarathi

 

दिल्लीच्या गल्लीबोळामधील सगळ्यात बदनाम नाव… दाऊद इब्राहिमला आदर्श ठेऊन त्याच्या पावला वर पाऊल ठेऊन दिल्लीमध्ये सेट अप करायचा त्याचा प्लॅन होता.

वयाच्या १८व्या वर्षी त्याने पहिली चोरी केली. आणि नंतर याचा आलेख चढता गेला. नीरजचं नशीब फळफळलं ते २०१३ मध्ये.

दिल्लीला कंट्रोल करणाऱ्या नितु दाबोडिया याचा पोलीस एन्काऊंटर मध्ये खात्मा झाला. आणि नीरजचे डॉन बनण्याचे सगळे रस्ते मोकळे झाले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

गुन्हेगारांना पाठबळ असत ते राजकारण्यांचं. नीरजचा काका हा स्थानिक आमदार होता. आणि गुन्हेगारी जगात नाव बनवायच्या त्याच्या अपेक्षांनी आकाश गाठले.

काकाच्या पाठबळावर एक्स्टॉरशन, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, जमिनी बळकावने सारखे त्याचे काळे धंदे जोरात सुरू झाले.

पण नशिबाने काय त्याची जास्त साथ दिली नाही. २०१५ मध्ये पश्चिम दिल्लीच्या मुंडका भागात झालेल्या हातघाईमध्ये नीरज बवाना पकडला गेला.

२. शशिकला ‘बेबी’ पाटणकर –

 

shashikala patankar inmarathi

 

मुंबईला लेट नाईट पार्ट्या करणं तसं नवीन नव्हतं. पण ‘रेव्ह’ पार्ट्या हळूहळू पाय पसरवत होत्या. एकूणच ड्रग्जची किंमत आणि ते अफोर्ड करणारी पब्लिक कमी असल्याने रेव्ह पार्ट्या लिमिटेड होत्या.

अन साध्या लेट नाईट पार्ट्याना रेव्ह पार्टी मध्ये कन्व्हर्ट करायचं काम केलं ते शशिकला पाटणकर हिने. बेबी हे तीच टोपण नाव.

एम-कॅट नावाचं पार्टी ड्रग बाजारात आणलं ते हिनेच. एमडीएमए सारखाच परिणाम पण त्याहून स्वस्त अस हे ड्रग होत.

कित्येक वर्षे या ड्रगचा बिझनेस करून करोडाची संपत्ती तिने जमा केली. तिचा बॉयफ्रेंड कॉन्स्टेबल धर्मराज काळोखे १२६ किलो या ड्रग सोबत पकडला गेला.

आणि मुंबई पोलिसांनी शशिकलाला पकडण्यासाठी जाळं टाकायला सुरवात केली.

मुंबई पोलिसांच्या मते शशिकला जवळपास ३० वर्ष हा ड्रगचा उद्योग चालवत होती.आणि फक्त एकदाच पकडली गेली होती. तेही २००१ साली.

अखेर २०१५ साली बस मधून प्रवास करताना ती पकडली गेली.

२ करोड किंमत असलेले १० फ्लॅट,गोराई बीच जवळ ५० लाख किमतीचा रो हाऊस, लोणावळ्यात बंगला, पुण्याच्या घोरपडी भागात फ्लॅट, तीन अकाउंट ज्यामध्ये प्रत्येकी ४० लाख रक्कम.

३. मुथप्पा राय -किंग ऑफ बंगळूर –

 

muthappa rai inmarathi

 

तुम्ही याच्या विकिपीडिया पेजवर विझिट द्याल तेव्हा तिथे त्याच्या प्रोफाइलवर बिझनेसमॅन, सोशल वर्करसारखे विशेषण बघायला मिळेल.

पण तुम्हाला हे कोणी नाही सांगणार की हा तोच माणूस आहे, जेव्हा बंगळूरचा पहिला डॉन जयराज याचा १९९४ साली बंगळूर कोर्टाबाहेर गोळ्या झाडून हत्या झाली होती तेव्हा ५ गोळ्या लागून सुद्धा हा माणूस जिवंत राहिला होता.

मुळात राय हा बँकर होता. नोकरी सोडून त्याने बंगळूरच्या पॉश अशा ब्रिगेड रोडवर बार सुरू केला विथ लाईव्ह ड्रम परफॉर्मन्स.

अल्पावधीतच बार मध्ये येणाऱ्या कुख्यात टोळ्यांशी परिचय झाल्यावर बंगळूर मधल्या अनेक रॅकेटला फुल्लस्टॉप राय देऊ लागला.

रियल इस्टेट, भेसळ केलेलं तेल, हत्यारे, ड्रग्ज, पब्ज अशा अनेक काळ्या धंद्यात उतरू लागला आणि कमी वेळेत त्याने त्यात जम बसवला.

दाऊद सोबत पण त्याने अशा अनेक डील केल्या होत्या. बंगळूरमध्ये आज त्याचा आलिशान बंगला आहे. त्यात त्याने पाळलेले विविध जातीचे घोडे.

कर्नाटकाच्या राजकारणात त्याचा बराच दबदबा होता. १५ मे २०२० रोजी त्याचा ब्रेन कॅन्सरने मृत्यु झाला.

४. नागेंद्रन – द चेन्नई बॉस –

 

nagendran inmarathi

 

इतर मेट्रो सिरीजच्या मानाने ऑर्गनाईझ क्राईम चेन्नईमध्ये उशिराने सुरू झाला. त्याचा परिचय चेन्नईशी करून दिला तो नागेंद्रन याने.

१९९८ पासून जेलमध्ये असलेला हा कुख्यात गुन्हेगार उत्तर चेन्नई मधला कुप्रसिद्ध व्यक्ती होता.

सगळ्या लहान-मोठ्या डॉनचा उदय हा ड्रग्ज व्यवसायातून होतो, तसाच नागेंद्रनचा उदय सुद्धा नार्कोटिक्स मधूनच.

जमिनी बळकावणे, मर्डर, इलिगल ट्रान्सपोर्ट सारखे अनेक काळे धंदे याचे चेन्नईमध्ये चालत असत. असं म्हणण्यापेक्षा अजून चालू आहेत म्हणून शकतो.

१९९८ मध्ये अण्णा द्रमुकच्या आमदाराच्या मर्डर केसमध्ये नागेंद्रन जेल मध्ये गेला. आणि आजही त्याचे सगळे धंदे तो जेलमधून चालवतो अस म्हटले जाते.

५. मनजीत महल –

 

manjit mahal inmarathi

 

दिल्ली एनसीआर आणि त्याच्या आजूबाजूच्या होणाऱ्या परिसराचा झपाट्याने होणारा विकास इलिगल जमीन हस्तांतरण आणि खंडणीच्या उद्योगाला चालना देऊ लागला.

आणि या काळ्या उद्योगात अनेकांनी आपला जम बसवला होता. मनजीत महल हा सुद्धा त्याच गँगस्टर पैकी एक. जो आता जेलमध्ये आहे.

आणि काही ना काही कारणामुळे दिल्लीच्या न्यूज मध्ये झळकत असतो.

२०१७ मध्ये त्याच्या रायवल गॅंगने त्याच्या वडिलांची हत्या केली. त्यामुळे राजधानीत पुन्हा नव्याने गॅंगवॉर सुरू होतंय की काय याचं टेन्शन दिल्ली पोलिसांना होतं. 

मर्डर आणि खंडणीच्या आरोपाखाली मनजीत २०१६ साली पकडला गेला.

६. रुबिना सिराज सय्यद उर्फ पठाण –

 

rubina saiyyad inmarathi

 

नागपाड्यातली ही महिला छोटा शकील गॅंगसाठी पॅरलली एक सपोर्ट सिस्टीम चालवायची.

ती मेहेंदीचा बिझनेस करायची. या बिझनेसचा फ्रंट वापरून ती मागच्या मागे अनेक इलिगल कामाला अभय द्यायची.

जेलमध्ये असलेल्या गॅंग मेंबर्सना जेवण, पैसा पासून हत्यारं हीच पोहोचवायची.

सगळं सुरळीत चालू असताना ही रंगेहाथ पकडली गेली. भायखळ्याच्या जेलमध्ये आता शिक्षा भोगत आहे.

७. शोभा अय्यर –

 

shobha iyer inmarathi

 

पोलिसांच्या मोस्ट वांटेड लिस्ट मधली महिला अपराधी.

विशेष म्हणजे हिचा साधा फोटो किंवा स्केच सुद्धा पोलिसांकडे नाही. म्हणून ती आजपर्यंत पकडली नाही गेली.

नुकतीच पोलिसांनी हिच्या नावाने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.

८. समायरा जुमानी –

 

samaira jumani inmarathi

 

अबू सालेमची एक्स-पत्नी. पुरुषांना लाजवेल असे एक सो एक पराक्रम हिने गुन्हेगारी दुनियेत केले आहेत. खंडणी, रियल इस्टेट स्कॅम, खोटे डॉक्युमेंट वापरून पैसे वटवणे आणि बरेच.

१९९३ च्या बॉम्ब स्फोट मध्ये पण हिचा सहभाग होता.

टॉप वॉन्टेड क्रिमिनल लिस्टमधली अजून एक महिला अपराधी आज कित्येक वर्षे अमेरिकेत लपून बसली आहे.

९. रेश्मा आणि शबाना मेमन –

 

reshma shabana memon inmarathi

 

१९९३ बॉम्बस्फोट खटल्याचा मुख्य आरोपी टायगर मेमनची पत्नी आणि मेव्हणी.  या दोघी सुद्धा या बॉम्ब हल्ल्यात सहभागी होत्या.

एकूणच सगळ्या फरार मेमन परिवारामध्ये या सुद्धा होत्या.

१०. रवी पुजारी –

 

ravi pujari inmarathi

 

बिल्डर लॉबीला टार्गेट करणारा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन. छोटा राजन चा हस्तक असलेला पुजारी नंतर स्वतंत्र काम करू लागला.

खंडणी,मर्डर आणि बरेच काळे उद्योग. ९०च्या दशकात मध्ये कुजरेजा बिल्डरच्या हत्येनंतर पुजारी पुन्हा चर्चेत आला.

नव्या मुंबईतले प्रसिद्ध बिल्डर वाधवा यांच्या अयशस्वी हल्ल्यानंतर रवी पुजारी गॅंग सक्रिय असल्याचे पुन्हा निष्पन्न झाल.

जानेवारी २०१९ मध्ये सेनेगलमध्ये तो पकडला गेला.

११. हसीना पारकर –

 

haseena parkar inmarathi

 

दाऊद इब्राहिमची बहीण आणि नागपाड्याची आपा. १९९३ मध्ये फरार झाल्यावर दाऊद चा सगळा काळा कारभार हिने आपल्या हातात घेतला.

खंडणी, हवाला सारखे धंदे ती मुंबईमध्ये जोरात चालवू लागली होती.

हवालाच्या आरोपाखाली २००८ मध्ये तिला अटक सुद्धा झाली होती. जुलै २०१४ मध्ये हार्ट अटॅकने तिचा मृत्यू झाला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?