' माणसाच्या आठवणी “खोट्या” असू शकतात – वाचा यामागचं रहस्य! – InMarathi

माणसाच्या आठवणी “खोट्या” असू शकतात – वाचा यामागचं रहस्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अजय देवगण याच्या काही वर्षांपूर्वी आलेल्या Drushyam या सिनेमात एक डायलॉग होता की माणसाच्या Visual Memories खूप स्ट्रॉंग असतात, एकदा बघितलेली किंवा अनुभवलेली गोष्ट किंवा घटना माणूस सहसा विसरत नाही!

 

drushyam inmarathi

 

पण जर या आठवणी खोट्या ठरल्या तर काय होईल हा विचार तुम्ही कधी केला आहे का? माणसाच्या बऱ्याचशा आठवणी खोट्या असू शकतात, हे तर सिद्ध देखील झालं आहे!

पण सगळ्याच आठवणी काही खोट्या नसतात, काही आठवणी ह्या वास्तवाचा आधार घेऊन  मेंदू निर्माण करतो त्यामुळेच कधी कधी काही घटना आपल्याला घडून गेल्या आहेत असं वाटतं, पण त्या घडलेल्या नसतात तरी आपल्या डोक्यात ती घटना ती आठवण एकदम फिट्ट बसून राहते!

आठवणी म्हणजे काय?

मानसशास्त्राच्या भाषेत सांगायच झाल तर,

आठवणी म्हणजे तुमच्या भूतकाळात घडून गेलेल्या एखाद्या गोष्टीची किंवा घटनेची तुमच्या मेंदूत तयार झालेली एक डुप्लीकेट फाइल, आणि यामागच कारण एकच तुम्ही ती गोष्ट अनुभवली आहे! म्हणूनच ती गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे किंवा अंधूकशी का होईना पण आठवते!

यालाच आपल्या सामान्य भाषेमध्ये म्हणतात आठवणी!

 

memories inmarathi

 

उदाहरण द्यायचे झाले तर, तुम्ही जेंव्हा घरात येता तेंव्हा तुम्ही तुमची गाडीची चावी नेहमीच्या ठिकाणी ठेवली आहे असे समजून वावरता पण खरं तर चावी तुम्ही तुमच्या गाडीतच विसरला होतात, बाकीचा सगळा हा फक्त आठवणींचा खेळ होता!

ही गोष्ट बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडते!

 

carkeys inmarathi

 

एखाद्या घटनेची स्मृती मेंदूत साठवली गेली असली तरी माणूस त्यात वेळोवेळी काही ‘मनाच्या’ गोष्टींची भर घालत असतो असे एका संशोधनात समोर आले आहे. घटना जितकी जुनी तितकी त्यात खोट्या माहितीची भर असते हे आता सिध्द झाले आहे.

लंडन विद्यापीठाच्या संशोधकांनी माणसे खऱ्या -खोट्याची कशी सरमिसळ करतात हे शोधून काढण्यासाठी नुकतेच एक संशोधन केले त्यात ७०% जणांनी खऱ्या  घटनांत खोट्या गोष्टी घुसवल्याचे समोर आले.

 

fake-memories-marathipizza00

 

या संशोधनासाठी काही जणांचे वेगवेगळे गट तयार करण्यात आले होते. या गटांना एक एक डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. तीन दिवसांनंतर या सर्वांना एक एक करुन प्रयोगशाळेत बोलावण्यात आले.

त्यांच्या स्मरणशक्तींची चाचणी घेण्यात आली. या चाचणीत त्यांना त्या डॉक्युमेंटरीबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. ही उत्तरे ते किती आत्मविश्वासान देतात ते तपासले गेले.

त्यानंतर काही काळाने त्यांना पुन्हा प्रयोगशाळेत बोलावण्यात आले. तेथे या सर्वांच्या मेंदुतील घडामोडींचे स्कॅनिंग करण्यात आले. यावेळी त्यांना प्रश्न विचारताना सोबत उत्तरेही देण्यात आली.

या उत्तरांत इतरांची नावे घेत खोटी उत्तरेही होती. बहुतेकांनी ही खोटी उत्तरेही खरी मानून आपल्या उत्तरांत त्या माहितीचा समावेश केला.

अनेकांनी आधीच्या चाचणीत आत्मविश्वासाने दिलेल्या उत्तरातही ही खोटी पूरक माहिती सत्य म्हणून स्वीकारत बिनदिक्कत घुसडली. अशांचे प्रमाण ७०% निघाले.

 

fake-memories-marathipizza01

आपल्यापैकी इतरांनी म्हटले आहे म्हणजे ते खरेच असणार आणि आपल्या नजरेतून ते सुटले असणार असे समजत या लोकांनी आपल्या स्मृतीतील ख-या माहितीत ही खोटी माहिती जमा करुन टाकली.

या सर्वांना खरी उत्तरे कोणती आणि खोटी कोणती हे सांगितल्यावर काही जणांनी माघार घेतली आणि पुन्हा आपल्या मूळ उत्तरावर ते आले. पण काही जणांनी मात्र तसेही करण्यास नकार देत खोटी माहितीही खरीच असल्याचे ठासून सांगितले.

 

confused girl inmarathi

 

मेंदूत नेमके काय होते ?

हिप्पोकॅम्पस हा भाग दीर्घकाळ टिकणारी स्मृती तयार करण्याचे काम करतो तर अ‍ॅमीग्डाला हा भाग मेंदूचे भावनांचे केंद्र म्हणून काम करतो.

वैज्ञानिकांच्या मते अ‍ॅमीग्डाला हा भाग समूह संवादातून येणारी माहिती व माहितीवर प्रक्रिया करणारा आपल्या मेंदूतील भाग यात दुवा म्हणून काम करतो.

अ‍ॅमीग्डालाकडून शिक्कामोर्तब झाल्याशिवाय ती माहिती आपल्या मेंदूत साठवली जात नाही.

त्यामुळे बाहेरच्या काही गोष्टींचा दबाव असल्यास अ‍ॅमीग्डाला खोटी माहितीही खरी असल्याचे स्वीकारत तिच्यावर शिक्कामोर्तब करतो आणि हिप्पोकॅम्पसमध्ये ही माहिती साठवली जाते.

fake-memories-marathipizza03

 

म्हणजे आता आठवणींचा देखील भरोसा राहिला नाही !

बऱ्याच लोकांचा यावर विश्वास बसणार नाही,पण प्रत्येकाच्या डोक्यात या खोट्या आठवणी असतातच, प्रत्येकजण या आठवणींमध्येच जगतो! अगदी जरी कुणाची तल्लख स्मरणशक्ती असली तरी त्या व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट सहज घडू शकते!

म्हणजे हा कुठला मानसिक आजार नाही, ही आपल्या मेंदूची एक प्रकारची खासियत आहे, म्हणजे आपण सगळेच एका खोट्या विश्वात राहतो असं होत नाही! काही आठवणी खऱ्या असतातच तर काही ह्या आपल्या मेंदूने तयार केलेल्या असतात! इतक साधं सोपं विज्ञान आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?