'सरावाच्या सुविधा नाही, साधे शूज नाहीत - तरी या भारतीय "हरिणीने" जग गाजवून दाखवलं

सरावाच्या सुविधा नाही, साधे शूज नाहीत – तरी या भारतीय “हरिणीने” जग गाजवून दाखवलं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कुठल्याही क्षेत्रात चमकदार कामगिरी करावी असं कुणालाही वाटतं. खेळाडू असो किंवा कलाकार.. दिमाखदार कामगिरी आपल्या हातून व्हावी, लोकांनी आपलं नांव नेहमी लक्षात ठेवावं असं नक्कीच वाटत असतं.

काही काही नावं काळाच्या ओघात सुध्दा मिटत नाहीत. लोक विसरत नाहीत.

भारताला आॅलिंपिक मध्ये धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणारी पी.टी. ऊषा आजही इतक्या वर्षांनंतरही लोकांना लक्षात आहे.

 

pt usha inmarathi
thebridge.com

 

अभिनव बिंद्रा, बबिता फोगट ही नावं लोक विसरले का? नाही.. कारण आॅलिंपिक मध्ये त्यांनी केलेली लखलखीत, दैदिप्यमान कामगिरी!!! पी टी उषाला तर आजही “गोल्डन गर्ल” म्हणतात.

थोडक्यात सांगायचं तर.. एक लखलखीत कारकीर्द सर्वात शेवटी लोकांना दिसते, पण त्यासाठी स्वतःला तयार करत असताना त्याची सुरुवात फार कठोर परिश्रम, बंधनं यांनी भरलेली असते. ती सुरु करताना प्रचंड मेहनत घ्यावी लागते.

खाण्यापासून लोकांना भेटण्यापर्यंतची बंधनं स्वतःवर घालून घ्यावी लागतात. कित्येक आवडते पदार्थ खाण्यातून वगळावे लागतात. प्रॅक्टिस.. सराव..व्यायाम, डाएट, झोपेची निश्चित वेळ यांनीच दिवस रात्र व्यापलेले असतात.

हे सगळं करुन चमकलेले खेळाडू आपल्याला माहीत आहेत. पी.व्हि. सिंधू, पी. टी. उषा, महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर वगैरे. आज आपण एका महिन्यात पाच सुवर्णपदकं पटकावणारी खेळाडू कोण आहे ते पाहू.

 

himadas inmarathi
theindianexpress.com

 

हीमा दास.. ही आसाममधील धावपटू. एका अतिशय गरीब घरातील मुलगी. जिनं वयाच्या १९ व्या वर्षी जागतिक अॅथलेट स्पर्धा, जी २० वर्षांखालील गटात घेतली जाते त्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं.

२००९ साली आसाममधील एका खेडेगावात ९ जानेवारीला हिमाचा जन्म झाला. धिंग पब्लिक स्कूल मधून तिनं आपलं शिक्षण पूर्ण केलं. शाळेत असताना तिला फुटबॉल खेळायला फार आवडायचं. मुलांसोबत पण ती खेळायची.

पण नंतर ही आवड धावण्यात बदलली. याचं कारण होते तिचे क्रीडा शिक्षक शम्सूल शेख. हे नवोदय विद्यालयात शिकवायचे.

त्यांनी हिमाची फुटबॉल खेळताना पळण्याची गती पाहून सांगितले, तू फुटबॉल ऐवजी धावण्याच्या स्पर्धेत जास्त चांगली कामगिरी करु शकशील. तिनंही हा गुरुमंत्र मानला.

धावण्यासाठी आवश्यक असलेले स्पाईक शूज हिमानं आत्ता आत्ताशी घेतले आहेत. पण त्यापूर्वी धावण्याचा सराव करण्यासाठी आवश्यक असलेला ट्रॅकही तिथं नव्हता.

फुटबॉलच्या चिखलाने भरलेल्या मैदानावरच ती धावण्याचा सराव करायची. सरावासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध नसतानाही हिमानं राज्यपातळीवर धावण्याच्या स्पर्धेत ब्राँझपदक मिळवलं.

 

hima das inmarathi1
indiawest.com

 

पुढच्या वर्षीच हिमा शंभर मीटर स्पर्धेसाठी राष्ट्रीय पातळीवर पोहोचली.

त्यानंतर लगेचच बँकाॅक येथे होणाऱ्या आशियाई युवक चँपियनशिपसाठी २०० मीटर स्पर्धेसाठी निवडली गेली. आणि ती सातव्या स्थानावर होती.

नैरोबी येथे होणाऱ्या जागतिक युवक चँपियनशिपसाठी ती निवडली गेली. तिथंही हे अंतर तिनं केवळ २४.३१ सेकंदात पार केलं आणि ती त्या स्पर्धेसाठी पात्र ठरली.

त्यानंतर लगेचच आॅस्ट्रेलिया येथील एप्रिल २०१८ मध्ये होणाऱ्या काॅमनवेल्थ गेममध्ये ४०० मीटर आणि ४*४०० मीटर रिलेमध्ये ती सहाव्या स्थानावर होती.

हे अंतर तिनं ५१.३२ सेकंदात पार केलं, जे बोस्टवानाची सुवर्ण पदक मिळविणारी अमांटल माँटशो पेक्षा फक्त १.१७ सेकंद जास्त होतं.

४*४०० मीटर रिलेमध्ये भारतीय चमूची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती. भारतीय खेळाडू सातव्या स्थानावर होते. ती वेळही ३.३३.६१ सेकंद होती.

पण १२ जुलै २०१८ रोजी हिमा दासने आपलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं. वीस वर्षांखालील गटात तिने ५१.४६ सेकंदात ४०० मीटर अंतिम फेरीत पार करून पहिल्या स्थानावर आपला पहिला विजय नोंदवला.

त्यानंतर १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पण तिनं परत सुवर्णपदक मिळवलं.

 

hima das inmarathi2
jagaranjosh.com

 

आॅगस्ट २०१८ मध्ये आशियाई गेम्स मध्ये ४०० मीटर अंतर केवळ ५१ सेकंदात पूर्ण केलं होतं. तर २६ आॅगस्ट २०१८ रोजी ४०० मीटर अंतर तिने केवळ ५०.७९ सेकंदात पार करुन एक नवा रेकॉर्ड केला.

त्यानंतर चारच दिवसानंतर तिनं सरीता गायकवाड, एम.आर. पूर्वाम्मा, आणि व्ही के. विस्मया यांच्या सोबतीने ४*४०० मीटर अंतर ३:२८:७२ सेकंदात पार केलं. आणि रजतपदक जिंकलं.

हे यश म्हणजे हिमासाठी फार महत्त्वपूर्ण ठरलं, कारण २०० मीटरसाठी पात्रता फेरीत ती बाद झाली होती. हिमानं आॅलिंपिक पूर्व आशियाई स्पर्धेतही ४*४००मीटर मिश्र रिलेमध्येही रजत पदक मिळवलं.

सप्टेंबरमध्ये ती घरी परत आली, तर आदिदास इंडिया या कंपनीनं तिला जकार्ता येथील स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी खेळासाठी एका अॅथलीटला अत्यावश्यक असलेली सर्व प्रकारची साधने, शूज वगैरे पुरवले होते. हा एक प्रकारे तिचा सन्मानच होता.

 

hima das inmarathi3
ETretail.com

 

वास्तविक, २०१९ हे वर्ष काही हिमासाठी फारशी चांगली सुरुवात करणारं नव्हतं. पहिले सहा महिने असेच वाया गेले.

पण जुलै महिन्यात २ जुलैला पोलंडमध्ये झालेल्या पोझनान अॅथलेट ग्रँड पिक्स या स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक जिंकलं आणि खातंच उघडलं!!!पाचच दिवसांनी तिनं दुसरं सुवर्णपदक मिळवलं ते कुतनो अॅथलीट मीटमध्ये.

पुढील वीस दिवसांत तिनं तीन सुवर्णपदके पटकावली. तिला पाठदुखीचा इतका त्रास होत होता. पण तरीही तिनं जिद्दीनं धावण्याची स्पर्धा भाग घेऊन जिंकली.

 

hima das inmarathi4
outlookindia.com

 

एका अतिशय साधारण कुटुंबातील एक साधीशी मुलगी, धावायचं ठरवते… तिचे आई वडील तिला पाठिंबा देतात.

परिस्थिती नसतानाही केवळ जिद्दीच्या जोरावरच ही मुलगी परदेशी खेळायला जाते.  तिच्याकडं सरावासाठी मैदान नव्हतं…धावण्याच्या सरावासाठी खास रनिंग ट्रॅक नव्हता.. की वापरायचे शूज नव्हते.

आपली जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर एका महिन्यात पाच सुवर्णपदके जिंकून आपलं आणि आपल्या देशाचं नाव चमकवणाऱ्या हिमा दास या असाधारण मुलीची असाधारण कहाणी नुसतीच लखलखणारी नाही, तर प्रेरणादायी पण आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?