' पावसाळ्यात त्वचेची "वेगळी" निगा राखायला हवी - समजून घ्या महत्वपूर्ण टिप्स

पावसाळ्यात त्वचेची “वेगळी” निगा राखायला हवी – समजून घ्या महत्वपूर्ण टिप्स

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्यापैकी प्रत्येकालाच आपण कायम चिरतरुण दिसाव असं वाटत असत आणि आपण त्याकरता अनेक प्रकारे काळजी घेतो. म्हणजे उन्हाळ्यात घराबाहेर पडतांना सनस्क्रीन लाऊन जातो, पूर्ण हातपाय झाकले जातील असे कपडे घालतो.

किंवा हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते म्हणून आपण मोईस्चरायझर लावतो. अगदी काही जण घरगुती उपाय म्हणून तूप, तेल, मध असे अनेक प्रकार लावतात.

आणि इतर वेळी सुद्धा आपण आपल्या त्वचेची काळजी घेतोच कारण कोणालाच त्यावर साधा एक पिंपल किंवा ब्लॅकहेड आलेला चालत नाही.

हे झालं उन्हाळा आणि हिवाळा या ऋतूंच. पण पावसाळा आला की त्वचेत काही फरक पडतात. ते का हे जाणून घेऊया आणि त्याच्यावरचे उपाय सुद्धा.

पावसाळ्याने नुकतीच जोरदार हजेरी लावली आहे आणि त्यामुळे आधी असलेल्या उन्हाच्या तडाख्याला काहीसा आराम मिळाला आहे.

आणि त्यामुळे आता सगळे पाऊस पडल्यावर येणार्‍या मातीच्या सुंदर वासाला, हिरव्यागार झालेल्या आजूबाजूच्या झाडांना आणि थंडगार वार्‍याला सगळे एंजॉय करतायेत.

 

monsoon inmarathi

 

त्यात गरम चहा आणि कांदाभजी याची भर तर असतेच हे वेगळ सांगायला नकोच.

हे सगळं असलं तरी, इतरऋतूंप्रमाणेच पावसाळ्यात सुद्धा त्वचेच्या तक्रारी आपल्याला पाहायला मिळतात.

पावसाळ्यामध्ये मुळात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असत जे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले नसते. विशेषत: ज्यांची त्वचा ही तेलकट आणि पींप्लस युक्त असते त्यांनी अधिक काळजी घ्यावी.

त्यामुळे बदलत्या वातावरणानुसार तुम्ही त्वचेची काळजी ही घायला हवी. फक्त स्त्रियांनी नव्हे तर पुरुषांनी सुद्धा चेहरा स्वच्छ धुवावा आणि त्याला मोईस्चरायझर लावत राहावं.

पण इतकच करून होणार नाही. तर पुढील प्रकारे तुम्ही काळजी घेऊ शकता.

 

१. एक्सफोलिएशन करणे :

 

exfoliation inmarathi

 

एक्सफोलिएशन ही अशी प्रक्रिया आहे जी मृत त्वचा काढून टाकते. आणि त्वचेवरील छिद्रांना अनलॉक करायला मदत करते.

आपल्याला जर छान चमकणारी त्वचा हवी असेल तर नवीन त्वचा येण्यासाठी आवश्यक असलेल्या पेशींच्या वाढीस मदत करते.

कॉफी, चहाची पिशवी, साखर, बेकिंग सोडा, पपई, ओटस्चे जाडे भरडे पीठ आणि दही हे काही उत्कृष्ट एक्सफोलीएटर आहेत. ज्यामुळे तुमची त्वचा पावसाळ्यात स्वच्छ आणि सुंदर राहू शकते.

 

२. त्वचा स्वच्छ ठेवणे :

 

manisha koirala inmarathi

 

एकदा आपण त्वचेला एक्सफोलिएट केल्यावर चेहरा स्वच्छ धुवायची गरज असते. इतकच नाही तर ऐरवी पण उघडलेले छिद्र साफ करा ज्यामुळे आपली त्वचा हलकी होते आणि तिला वारा लागतो.

याकरता तुम्ही साध खोबरेल तेल, चहाच्या झाडाच तेल, अॅपल सायडर व्हिनेगर, कोरफड, मध, लिंबू आणि गुलाब पाणी असे पदार्थ वापरू शकता.

यामुळे तुमची त्वचा स्वच्छ राहण्यास मदत होते.

 

३. त्वचेला टोनिंग करा :

 

skin toning inmarathi

 

त्वचेवर असलेली घाण आणि मेकअप काढण्यासाठी आपल्या त्वचेला टोन करण गरजेचं आहे. स्टोअरमध्ये विकत घेतले जाणारे साहित्य उत्तम नसतील म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करायची गरज नाही.

त्वचेच टोनिंग करण्यासाठी काही घरी उपलब्ध असलेल्या गोष्टी आपण वापरू शकतो.

जस की हिरवा चहा, लिंबाचा रस, गुलाबाचे पाणी, काकडीचे पाणी आणि कॅमोमाइल चहा यासारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून पावसाळ्यात त्वचेला जपू शकता.

 

४. मॉइश्चरायझिंगचा वापर करा :

 

moisturizer inmarathi

 

मॉइश्चरायझिंगचा समावेश तुमच्या रोजच्या त्वचेच्या रुटीन मध्ये आवश्य करा. कारण पावसाळ्यात आपली त्वचा हायड्रेटेड आणि मऊ ठेवणं महत्वाच आहे. काही नैसर्गिक मॉइश्चरायझर्समध्ये काकडी, नारळ तेल, भांग बियाण्याचे तेल आणि ऑलिव्ह तेल यांचा समावेश तुम्ही करू शकता.

हे मॉइश्चरायझर्स तुमची त्वचा तेलकट होऊ देत नाहीत. आणि असं काही नाही की तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही मॉइश्चरायझ नाही करू शकत.

उलट पावसाळ्यात करा म्हणजे जर त्वचा कोरडी होत असेल तर ती नरीश व्हायला उपयोगी पडेल.

 

५. सनस्क्रीन वापरा :

 

sunscreen inmarathi

हे ही वाचा – आपल्याला एखाद्या पदार्थाची ऍलर्जी का होते? ऍलर्जी म्हणजे नक्की काय? जाणून घ्या…

पावसाळी किंवा ढगाळ वातावरण असेल तर त्याचा अर्थ असा नाही की आपली त्वचा सूर्याच्या हानिकारक अल्ट्रा-व्हायोलेट किरणांपासून सुरक्षित राहते.

त्यामुळे जर तुम्ही बाहेर पडताय तर त्वचेची कोणतीही समस्या टाळण्यासाठी दररोज चांगला सनस्क्रीन वापरा.

 

६. केसांची काळजी घ्या :

 

hair care inmarathi

 

तुम्ही केस धुतल्यावर ड्रायरचा वापर करणं पावसाळ्यात शक्यतोवर टाळा याने तुमच्या टाळूची त्वचा कोरडी पडू शकते आणि मग कोंडा किंवा त्या सदृश त्वचेचे आजार होतात.

हे टाळा आणि केसांना तुमच्या कंडिशनर वापरा.

 

७. पायांची काळजी :

 

pedicure inmarathi

 

पावसाळ्यात आपण सतत बाहेर जातो. आणि त्यामुळे आपली त्वचा ओली राहते आणि पायाला घाण वास येतो. इतकच नाही तर काहींची त्वचा कोरडी होते.

यावर उपाय म्हणजे पाय स्वच्छ धूत रहा. पॅडीक्युर करत रहा. इतकच नाही तर वास घलवण्यासाठी तुम्ही मीठ, कॉर्नमील आणि कॉफी सम प्रमाणात घेऊन छान मिश्रण तयार करा आणि पायाला लावून ठेवा.

 

८. घरगुती फेसपॅक :

 

homemade facepack inmarathi

हे ही वाचा – पावसाळ्यात बळावणाऱ्या साथीच्या आजारांपासून स्वतःला वाचवायचं असेल तर या गोष्टी पाळाच

कापूरच्या तुकड्यांसह गुळगुळीत पेस्ट तयार करायची असेल तर मुलतानी माती एकत्र करा. ही पेस्ट फ्रिजमध्ये एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवा आणि दिवसात अनेक वेळा चेहर्‍यावर या मिश्रणाचा थोडासा भाग वापरा.

मुलतानी माती, लवंग तेल, चंदन पावडर आणि कडुलिंबाची जाड पेस्ट बनवा आणि चेहर्‍यावर आलेल्या मुरुमांवर लावा. हे पूर्णपणे कोरड झाल्यावर स्वच्छ धुवा.

अधिक फायदा हवा असेल तर हे मिश्रण तुम्ही दररोज वापरू शकता.

बेसन, हळद, लिंबू आणि गुलाब पाणी एकत्र करून पेस्ट बनवा. हा पॅक आपल्या चेहर्‍यावर लावा आणि लगेच धुवा.

अशाप्रकारे, तुम्ही पावसाळ्यात तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता आणि ताजेतवाने दिसू शकता आणि सदैव फ्रेश राहू शकता!

जनरली बहुतेक लोकं त्वचेची काळजी ही फक्त उन्हाळ्यात किंवा थंडीतच घेतात पण पावसाळ्यात सुद्धा त्वचेची निगा राखणं गरजेचं असतं. कारण साथीचे रोग तसेच त्वचेची अलर्जी ह्या गोष्टी पावसाळ्यात तोंड बाहेर काढतात, त्यामुळे पावसाळा आलाय ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?