' सावधान : अनेकदा आपल्याला पडणारी “ही” स्वप्नं देत असतात आरोग्याविषयी गंभीर इशारा – InMarathi

सावधान : अनेकदा आपल्याला पडणारी “ही” स्वप्नं देत असतात आरोग्याविषयी गंभीर इशारा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा… हे गाणं ऐकताना काय वाटतं? खूप छान वाटतं. रेल्वेतून कुठंतरी अनोख्या ठिकाणी आपण निघालो आहोत. क्षितीजाकडंं आभाळ धरतीला भेटायला आलं आहे… असं बरंच काही!!!

गाढ झोप लागणं आणि त्यात स्वप्नं पडणं ही गोष्ट किती सुखद वाटती. लहान बाळं झोपेत कशी गोड हसत असतात. काय दिसत असेल त्यांना?

कधीकधी ती दचकून जागी होतात…रडू लागतात. मग आई आजी बाबा..जे कुणी जवळ असेल ते त्या बाळाला थोपटतात.. कुणीतरी आपल्या जवळ आहे हे जाणवलं, की बाळ परत झोपी जातं.

म्हणजे झोप आणि स्वप्न यांचा घनिष्ठ संबंध आहे. झोपेशिवाय स्वप्न पडत नाहीत. झोप आणि स्वप्नं हा आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. आपल्या मानसिक आरोग्याचा तो एक भाग आहे.

 

dreams-karma-part-1
ishafoundation.com

 

कधी कधी स्वप्नं पडतात..ती आपल्या अंतर्मनातील विचारांचं प्रतिबिंब असतं. कधी कधी अगदी निरर्थक स्वप्नंही पडतात. कधीकधी खूप जणांना पुढं घडणाऱ्या घटना स्वप्नात दिसतात.

स्वप्नांचे विविध अर्थ ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत. मानसशास्त्रीय चाचण्या केल्या, तर त्यांनी सांगितलेले स्वप्नाचे अर्थ फार वेगळे आहेत. कधी स्वप्नात आपण आकाशात उडतो, कधी समुद्र पार करतो.

जे जे प्रत्यक्षात होत नाही, ते खूपदा आपण स्वप्नात बघतो. पण तुम्हाला माहिती आहे काही काही स्वप्नं आपल्या आरोग्यासंबंधी धोक्याचा इशारा देत असतात.

कधी कधी आपणही स्वप्नातून दचकून जागे होतो. भयंकर स्वप्नं आपली झोप उडवतात. इतका ताण येतो मनावर, की तहानेनं जीव व्याकूळ होतो.

 

scary dreams inmarathi1
tvinkal.com

 

पण हे काही सारखं सारखं होतं नाही. क्वचित भयंकर स्वप्न पडणं, आपण दचकणं हे स्वाभाविक आहे. याही गोष्टींचा तज्ज्ञांनी अभ्यास केला आहे.

त्यांच्या मते, अशी स्वप्नं जर वारंवार पडत असतील, तर त्यांचा अर्थ आपलं आरोग्य बिघडणार असल्याचं ते द्योतक आहे. पुढं तब्येतीत काहीतरी बिघाड होणार आहे याचं हे चिन्ह आहे, किंवा हे सूचक आहे.

 

१. स्वप्नात प्राणी दिसणे-

 

Snake byte Inmarathi
WTVD.com

 

अभ्यासकांच्या मते, स्वप्नात जर सारखे प्राणी किंवा साप दिसत असतील, त्यांनी तुम्हाला वेढलं आहे असं दिसत असेल तर याचा अर्थ असा की, तुमच्या मनात एक असहाय्यतेची भावना आहे.

तुम्ही खूप मानसिक ताण तणावाखाली आहात. पण त्याचवेळी अशी काहीतरी गोष्ट आहे, जी तुम्हाला सकारात्मकतेने जगायला शिकवत आहे. किंवा काहीतरी सकारात्मक गोष्ट घडणार आहे.

 

२. स्वप्नात दात पडणे-

 

scary dreams inmarathi2
express.co.uk

 

आपण खूप चिडलो वैतागलो की काय करतो? दात ओठ खात बोलतो. आपला त्रागा व्यक्त करतो. रागारागाने दात करकर खाणारी माणसं तुम्ही पाहीली असतीलच.

ज्यांना अशी स्वप्नं पडतात, तज्ज्ञ लोकांच्या मते, तुमचं सुप्त मन तिथं हा राग वैताग साठून राहीलेला असतो. त्या वैतागाला ही वाट मिळणं असतं.

म्हणजेच तुमचे विचार तुमच्या स्वप्नातून वाट शोधत येतात. म्हणजेच तुमचे सूक्ष्म विचार असे बाहेर पडतात. म्हणजेच त्या नकारात्मक भावनांना निचरा करून वाट देणं गरजेचं असतं.

 

३. स्वप्नात शाही थाटात राहणे-

 

royal family of england-inmarathi06
cheatsheet.com

 

कधी कधी आपल्याला स्वप्न पडतं आपण एकदम भारी ठिकाणी गेलो आहोत. उंची द्रव्य म्हणजे अत्तर वगैरेंचा, शाही भोजनाचा आस्वाद घेत आहोत.

प्रत्यक्षात तिथं जाणं अशक्य आहे, अशा ठिकाणी आपण आहोत आणि फार मजा करत आहोत.

तर याचा अर्थ असा की, जे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवता येत नाही, ते तुमचं मन स्वप्नांचा आधार घेऊन अनुभवतं आहे. कारण वास्तव आणि कल्पना यांना जोडणारा पूलच स्वप्न आहे.

 

४. स्वप्नात आपल्यावर कुणीतरी हल्ला करणे-

 

scary dreasm inmarathi
ofm.co.za

 

या भयंकर स्वप्नातून आपण दरदरुन घाम येऊन जागे होतो. याचा अर्थ तुमच्या मेंदूवर अतिशय ताण आहे.

खूपदा कुणीतरी आपला पाठलाग करत येत आहे आणि आपण पळता पळता खाली पडतो आणि पाठलाग करणारी माणसं येऊन आपल्यावर जोरदार हल्ला चढवतात.

याचा अर्थ सरळ आहे तुमच्या मनावर पण खूप ताण आला आहे. अशी स्वप्नं स्मृतीभ्रंश झालेल्या रुग्णांना पडत असल्याचं निरीक्षक सांगतात.

तसेच कंपवात म्हणजे पार्किन्सन्स आजाराची पण ही लक्षणं आहेत. मज्जासंस्थेवर जरी काही ताण आला असेल, पुढं त्यात काही बिघाड होण्याची शक्यता असेल, तर अशी स्वप्नं पडतात.

 

५. स्वप्नामुळं आपण खडबडून जागे होणं-

 

sleep or tenstion at night InMarathi

 

असं कधी स्वप्न पडलंय का तुम्हाला, की तुम्ही अतिशय लवकर जागे झाला आहात आणि घामानं थबथबले आहात… हे स्वप्न सांगतं तुम्ही अतिशय जड जेवण केलं आहे आणि लगेच झोपून गेले होता.

त्याचा ताण पचनसंस्थेवर येतो. त्यामुळं श्वास घेणेही कठीण होतं. कधीकधी मसालेदार पदार्थ पण अडचण निर्माण करतात.आणि छातीत जळजळ सुरू होते. याचमुळे अॅसिडीटीचा त्रास होतो.

छातीवर दडपण आल्यासारखे होते आणि स्वप्नातून आपण दचकून जागे होतो. म्हणूनच रात्रीचं जेवण अतिशय हलकं फुलकं असावं.

थोडक्यात सांगायचं तर, मानवी शरीरात मन असतं आणि ते विविध भावनांचं भांडार असतं. राग लोभ प्रेम द्वेष, मोह हे सारे भाव असतातच, पण यातील कोणतीही भावना जास्त वरचढ झाली तर, तिचा निचरा होणंही आवश्यक असते.

खूपदा शरीर आजारी पडण्यापूर्वी आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी सूचना देत असतं. कितीतरी वेळा आपली मनाची दुखणी शरीरातून वाट काढतच बाहेर येतात.

त्याच्याकडे वेळच्या वेळी लक्ष दिलं, तर शरीराची होणारी हानी आपण टाळू शकतो.

वाढत्या वयाबरोबर काहीतरी व्याधी जडतात, पण अशा स्वप्नांद्वारे दिलेल्या सूचना जर मनावर घेऊन मनातील नकारात्मक भावनांना वाट मोकळी करून दिली तर आपण निरोगी आयुष्य आनंदाने जगू शकतो.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?