'अति जास्त "उंची" आरोग्यासाठी चांगली की वाईट, नक्की वाचा!

अति जास्त “उंची” आरोग्यासाठी चांगली की वाईट, नक्की वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लहानपणी आपण ऊंची वाढावी म्हणून सायकल चालवतो, दोरीच्या उड्या मारतो, व्यायाम करतो इतकच नाही तर कोंप्लेन, बोर्नविटा, होर्लिक्ष हे आणि आणखीन १० प्रकार दुधात मिसळून पितो.

कारण आपल्याला माहीत असतं साधारण १७ वर्षांनातर आपली ऊंची वाढण थांबेल. आणि मग तोपर्यंत आपण अनेक गोष्टी करतो.

 

Tall girls Inmarathi

 

पण ऊंची वगैरे वाढण आपल्या फॅमिली जीन्स वर अवलंबून असतं. तरीसुद्धा अति ऊंची असण हे कधी कधी घातक ठरू शकतं.

तुम्ही उंच असल्याने बहुतेक तुम्हाला बास्केटबॉल संघात सहज स्थान मिळू शकेल. तसच ऊंची अधिक असणं हे आत्मसन्मान आपल्या पे-चेकसाठी चांगल असेल.

पण नुकत्याच झालेल्या संशोधनात असही आढळल आहे की ठराविक फूटाच्या वर ऊंची गेल्यास तुमच्या शारीरिक आरोग्याच्या विविध बाबींवरही परिणाम होऊ शकतो आणि कुठलीही गोष्ट अति असणं हे चांगल नाही.

 

height obssessed inmarathi
vice.com

 

यामुळे काही आरोग्यासंबंधी तक्रारी निर्माण होऊ शकतात जस विशेषत: लहान किंवा मोठ्या व्यक्तीच्या शरीराच्या अवयवांवर किंवा एकंदरीत शरीरावर काय परिणाम होऊ शकतो ते आहे.

एकंदरीत पुरुषांची सरासरी उंची सुमारे ५ फूट ९ इंच असते. तर महिलांची सुमारे ५ फूट ४ इंच असते. जर आपण या सरासरीपेक्षा उंच किंवा लहान असाल तर आपल्याला याचे काही परिणाम साधक आणि बाधक दिसतील.

तुमची उंची तुमच्या आरोग्याशीही संबंधित असल्याने हे खरं आहे की याचा तुमच्या आरोग्याला धोका होऊ शकतो.

 

Too tall 2 Inmarathi

 

तर अशा या उंची अधिक असल्यामुळे काय परिणाम आपल्यावर होऊ शकतात याचा घेतलेला हा एक आढावा.

 

१. ब्लड क्लोट :

 

blood clot inmarathi
studypages.com

 

शरीराची ही एक गंभीर स्थिती आहे. विशेषत: जर एखाद्या व्यक्तीला ब्लड क्लोट असेल आणि ती मुख्य नस आपल्या फुफ्फुसांकडे गेली असेल तर हे अधिक चिंतेच कारण आहे.

संशोधक हे समजावून सांगू शकत नाहीत, पण अभ्यास असे दर्शवतो की तूमची ऊंची जेवढी कमी असेल तितकं आपल्या रक्तवाहिनीत रक्त गोठण्याची शक्यता कमी असते.

उंचीने पाच फूट किंवा त्यापेक्षा लहान लोकांना ब्लड क्लोट होण्याची शक्यता कमी आहे.

 

२. कॅन्सर :

 

cancer inmarathi
newscientist.com

 

पूर्वी केलेले काही संशोधन पाहिले तर त्यात दिलेले आहे की सरासरीपेक्षा माणसाची उंची कमी असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा कर्करोग होण्याची शक्यता कमी आहे.

उदाहरणार्थ, युरोप आणि उत्तर अमेरिकेतील १०,००,००० हून अधिक महिलांचा अभ्यास केला तेव्हा अस दिसून आलं की उंचीने लहान स्त्रियांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी आहे.

तसच ५० ते ६० या वयोगटातील उंच नसलेल्या पुरुषांना प्रोस्टेट कर्करोग सहसा होत नाही.

 

३. मधुमेह :

 

diabetes-inmarathi02
jadipani.com

 

टाईप २ हा मधुमेह होण्याच्या कारणांमध्ये आपल्या पायांची लांबी जोडली जाऊ शकते. मागील ५ वर्षांचा डेटा अभ्यासला असता लक्षात येईल की ६००० पेक्षा जास्त प्रोढांचा विचार वैज्ञानिकांनी केला तेव्हा लक्षात आलं उंच लोकांना ते मिळण्याची शक्यता कमी आहे.

हे दोघे का संबंधित आहेत हे समजू शकत नाही, पण तरीही काळजी ही घ्यायला हवी.

 

४. हृदयरोग :

 

heart patient inmarathi
lifeline24.co.uk

 

पण एक सरासरी पहिली ते लक्षात येईल की ५ फूट ३ इंचापेक्षा लहान आणि ५ फूट ८ इंच किंवा त्यापेक्षा उंच अशा व्यक्तींना हृदयरोग होण्याची शक्यता जास्त आहे.

जन्मापूर्वी किंवा बालपणात खराब पोषण हे सुद्धा कारण आहे.

 

५. अल्झायमर :

 

alzeihmers inmarathi
imdb.com

 

यातही उंचीचा परिणाम होऊ शकतो. विशेषत: ६०० हून अधिक लोकांवर केलेल्या अभ्यासावरुन असं दिसून आलं आहे की सुमारे ५ फूट ११ इंच किंवा त्यापेक्षा उंच असणार्‍या पुरूषांना अल्झायमरचा आजार होण्याची शक्यता जास्त आहे.

उंच स्त्रियांनाही याची शक्यता असू शकते पण उंचीच कारण त्यांच्याकरता तितक योग्य असेल अस दिसत नाही.

 

६. स्ट्रोक :

 

amitabh bacchan inmarathi
cinemachaat.com

 

जेव्हा आपल्या मेंदूच्या क्षेत्रामध्ये रक्त प्रवाह कमी होतो तेव्हा आपल्याला स्ट्रोक सारखे आजार उद्भवतात. उंच लोकांना स्ट्रोक होण्याची शक्यता कमी असते जेव्हा त्यांचं वजन हे प्रमाणाच्या बाहेर नसतं.

तसचं त्यांच्या बालपणातील पौष्टिक आहार आणि आरोग्याशी संबंधित इतर गोष्टी याला कारण असू शकतात.

 

७. गरोदरपणा :

 

pregnancy-inmarathi
bostonglobe.com

 

उंचीने लहान स्त्रियांपेक्षा जास्त उंच असलेल्या स्त्रियांमध्ये जास्त वेळा गर्भधारणा होण्याची शक्यता असते. एका अभ्यासानुसार, ५ फूट ८ इंच किंवा त्यापेक्षा उंच असलेल्या स्त्रिया पूर्ण वय गाठण्यापूर्वीचं सहजतेने मुलांना जन्म देण्याची शक्यता जास्त असते.

असे का असते याबद्दल शास्त्रज्ञांना पुरेसं माहिती नाही परंतु ते हिप्स किंवा गर्भाशयसारख्या शरीरातील काही भागांच्या आकाराशी संबंधित असू शकत असं त्यांचं म्हणणं आहे.

 

८. दीर्घकाळ जगणे :

 

long life inmarathi
economist.com

 

वर्षानुवर्षे केलेल्या अभ्यासवरून अस दिसून आलय की उंच लोकांपेक्षा उंचीने लहान असलेली लोक थोड जास्त काळ जगतात आणि त्यांना आजारही कमी असतात.

शास्त्रज्ञ अजूनही याच्या मागे काय कारण असू शकतात याचा अभ्यास करतायेत.

तर काही भागात संशोधनानंतर हे सिद्ध झालय ह्याला पेशींच नुकसान, काही हार्मोन्सची पातळी वर खाली होण, आणि मेंदू, यकृत आणि मूत्रपिंडांसारख्या काही अवयवांचे आकार कमी जास्त असण अशी कारण असू शकतात.

 

९. उष्णता वाढणे :

 

heat inmarathi
food.ndtv.com

 

उंचीने लहान असलेल्या लोकांना शरीरात जास्त उष्णता तयार होऊन आजार होण्याची शक्यता नसते किंवा हीटस्ट्रोक नावाची अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होत नाही.

हे आजार मुख्यत: उंच आणि जाड शरीर असलेल्या लोकांमध्ये जास्त उष्णता निर्माण करतात. जर त्यांनी व्यायाम वेगवान केला तर ते उष्माघातास कारणीभूत ठरू शकतात.

उंच लोक जिथे थंड हवामान आहे अशा ठिकाणी जास्त व्यवस्थित राहू शकतात.

तर तुम्हाला हे वाचून थोड वेगळं वाटू शकतं. पण वरील आजार हे ऊंची जास्त असेल तर सहज होऊ शकतात. त्यामुळे उगाच ऊंची वाढवायचा हट्ट करू नका.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?