' यशस्वी होण्यापासून बहुतेकांना आळस थांबवतो – उपाय काय? ह्या घ्या, सर्वाधिक यशस्वी लोकांच्या टिप्स! – InMarathi

यशस्वी होण्यापासून बहुतेकांना आळस थांबवतो – उपाय काय? ह्या घ्या, सर्वाधिक यशस्वी लोकांच्या टिप्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्याला कायम लवकर उठायचं म्हटलं, की कंटाळा आलेला असतो नाही का? म्हणजे उद्या एखादी मीटिंग आहे, किंवा कुठे बाहेर गावाला जायचंय, घरात काही कार्य आहे तरच आपण लवकर उठतो.

या अशा वेळेस आपण अगदी आदल्या दिवशी मनात ठरवतो, “काहीही करून उद्या लवकर उठायच” तरी ते अलार्मच स्नूझ बटण दाबायचं काही आपण थांबत नाही.

आपल्याला माहित आहे का, की लवकर उठणं हे दिवसभर सकारात्मक राहून काम करण्याचा उत्तम मार्ग आहे.

 

morning yoga inmarathi
life360.tips

 

तुम्हाला माहित असेल, की जगातील बरेच यशस्वी उद्योजक लवकर उठणारे आहेत.

खरंतर, संशोधनातूनच असं सिद्ध झालं आहे, की जगातील काही सर्वात यशस्वी लोकांना एक रहस्य सापडलं, ज्यामुळे त्यांना आयुष्यात मोठे ध्येय प्राप्त करण्यास मदत झाली.

हे रहस्य काय आहे? सकाळची एक उत्तम दिनचर्या.

तुम्ही कधीही बघा, जर तुमची सकाळ उत्तम झाली तर तुमचा पुढचा दिवस छानच जातो. आपण सकाळी जी एखादी चांगली गोष्ट करतो, ती दिवसभर आपल्यासाठी टोन सेट करू शकते.

म्हणून लोक सकाळी मॉर्निंग वॉकला जातात, प्राणायाम आणि योग करतात, जिमला जातात या सकारात्मक गोष्टींमुळे तुमची मानसिक आणि शारीरिक स्थिती उत्तम राहते.

तुमची सकाळची दिनचर्या प्रभावी तयार करण्यासाठी या पुढील गोष्टी नक्की करा.

 

१. एक रात्र आधी तयारी करा.

 

writing inmarathi
HaresfieldSchool.com

 

जेव्हा तुम्हाला दुसर्‍या दिवशी लवकर उठायचं असतं तेव्हा तुम्ही एक सोपा मार्ग निवडू शकता.

आपण झोपायला जाऊन गाढ झोप लागण्यापूर्वी, त्या दिवसाचा आढावा घेण्यासाठी वेळ काढा आणि पुढील सकाळची योजना करा.

चालू असलेल्या कामांचे किंवा त्याबाबत असलेल्या समस्यांचे तपशील लिहून काढा.

हे  कदाचित तुम्हाला त्रासदायक वाटेल, पण तरी दुसर्‍या दिवशी आपल्याला कराव्या लागणार्‍या गोष्टींची यादी लिहून काढलीत तर तुमची सकाळ छान जाईल.

आपल्याबरोबर शाळेत किंवा कामावर जाण्यासाठी ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तुमच्या बॅगेत भरून ठेवा. घालायचे कपडे काढून ठेवा. या

सर्व गोष्टींमुळे रात्री आपलं मन पहाटे उठण्यासाठी आपोआप तयार होतं.

 

२. रात्रीची झोप शांत घ्या

 

sleeping girl inmarathi
depositphotos.com

 

आपली सकाळ ताजतवानी होण्यासाठी आणि दिनक्रम प्रभावी होण्यासाठी आवश्यक तेवढी झोप होणं गरजेचं आहे.

संशोधनातून अस दिसून आलंय, की जे सलग १२ तास काम करतात, त्यांनी ७ ते ८ तासांची झोप घेण गरजेचं आहे.

झोप येत नसेल तर, मोबाईल सारख्या मन विचलित करणार्‍या गोष्टी बाजूला ठेवा. दिवे बंद करा आणि शांतपणे पडून रहा. 

तुमची रात्रीची झोप शांत व्हायला हवी आणि पूर्ण व्हायला हवी. तरच तुमची सकाळ योग्य आणि ताजीतवानी होईल.

 

३. अलार्म स्नूझ करण थांबवा

 

alarm-clock-inmarathi01
veja.abril.com.br

 

आपल्यापैकी बरेचजण शक्य असेपर्यंत स्नूझ बटण दाबून ठेवतात आणि मग उशिरा उठल्यामुळे नंतर घाईघाईत तयार होतात.

हे असं न करता जेव्हा अलार्म पहिल्यांदा वाजतो, तेव्हाच उठण्याची चांगली सवय आपल्या शरीराला लावायला पाहिजे.

तर हा स्नूझ प्रकार टाळा आणि वेळेत उठून छान आवरून तुमच्या कामाला लागा.

 

४. सकाळचा दिनक्रम ठरवा

 

daydream inmarathi

 

सकाळी आपल्याला काय काम करायचं आहे याची योजना आधीच करा आणि त्यानुसार उठा.

शेड्यूल बघून त्याप्रमाणे तुम्ही काही काम राहीलं असेल तर ते पूर्ण करा, नंतर काहीतरी विरंगुळा शोधा.

आपले शरीर आणि मन प्रसन्न करण्याचा एक चांगला मार्ग आहे प्राणायाम किंवा योग. बुद्धीला चालना देण्यासाठी शब्दकोडं सोडवा.

छान निरोगी आणि प्रोटिनयुक्त ब्रेकफास्ट करा. अशा अनेक प्रकारे तुम्ही तुमची सकाळ शुभ आणि निरोगी बनवू शकता. जेणेकरून तुमचा पुढील दिवस हा छान जाईल.

 

५. शरीर हायड्रेट करा

 

warm water inmarathi
apollopharmacy.in

 

रात्रीच्या जेवणानंतर साधारण  १२ तास आपण काही खाल्लेलं किंवा प्यायलेलं नसतं. त्यामुळे उठल्यावर पहिले किमान एक ग्लास तरी पाणी प्या.

अनेक डायटीशीयन आपल्याला सकाळी उठल्यावर “कोमट लिंबू पाणी प्या” असं सांगतात. ज्यामुळे शरीराला आधार मिळतो.

यामुळे तुमचं पोट कमी होतं. आणि तुमचं पोट रिकाम व्हायला देखील मदत होते.

 

६. ध्यान करा

 

yoga inmarathi
knot9.com

आपण जर आपलं सध्याचं आयुष्य पहिलं, तर लक्षात येईल की त्यात अनेक प्रकारचे नैराश्य आहे.

घर असो किंवा ऑफिस आपल्याला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं.  यामुळे आपली चिडचिड होते, राग येतो.

हे सगळं कमी करण्यासाठी बरेच लोक रोज १५ ते २० मिनिटं ध्यान धारणा करतात. याने संपूर्ण दिवस आपल मन शांत राहतं. आपल्या जीवनात सकारात्मकता वाढते.

थोडक्यात काय, दैनंदिन स्वास्थ्य टिकवण्यासाठी आणि दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळवण्यासाठी ध्यान करण कधीही चांगलं आहे.

 

७. जवळच्या लोकांना फोन करा

 

phone call inmarathi
rebtel.com

 

जर तुम्ही तुमच्या कुटुंबापासून लांब राहत असाल, तर त्यांना सकाळी फोन करा.

आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीला, मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला संपर्क साधून आपली दिवसाची सुरुवात छान होऊ शकते.

स्वत:ला उत्साही करण्याचा आणि संपूर्ण दिवसाचा सकारात्मक करण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे.

 

८. मी सकाळी उठणार

 

sleepingbrain inmarathi

 

शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा विचार बदला. “मी सकाळी उठू शकत नाही. माझी झोप पूर्ण होणार नाही.” हे असे विचार मनातून काढून टाका.

मी सकाळी उठणार आहे. मला जाग येणार आहे. असा सकारात्मक विचार करा आणि झोपा. तुम्ही नक्की सकाळी उठाल आणि दिवस देखील चांगला जाईल.

तर या आठ गोष्टी नक्की करा, जेणेकरून तुमचा दिवस चांगला जाईल. आणि तुम्हाला सकारात्मक सुद्धा वाटेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?