' भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात जागा न मिळालेलं “दुसरं” जालियनवाला हत्याकांड – InMarathi

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात जागा न मिळालेलं “दुसरं” जालियनवाला हत्याकांड

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जालियनवाला बाग हत्याकांड, भारताच्या इतिहासातील रक्तरंजित अस पर्व. भारतीयांच्या स्मृतीतून कधी न जाणारा काळा दिवस.

इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्यसंग्रामाला फुंकर देऊन ज्वलंत करणारी घटना.

परंतु अशा अनेक घटना आहेत ज्यांना इतिहासात आजही दुय्यम स्थान दिले गेले आहे.आणि पुस्तकात तर स्थान देखील नाही.

अशाच इतिहासात हरवून गेलेल्या घटनेबद्दल आज आपण पाहणार आहोत.

रक्ततीर्थ इरम- भारताच्या इतिहासातील जालियनवाला बाग २.०.

 

eram rakta tirtha inmarathi
bhadrak.nic.in

 

डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या इतिहासकारांच्या प्रभावामुळे आणखी एक गौरवशाली अध्याय भारतीय इतिहासात दिसून येत नाही.

७८ वर्षांपूर्वी,ओडिशाच्या इरममध्ये ब्रिटीश पोलिसांच्या गोळीबारात २९ स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा झाले.

इरम हे ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यात येणारे गाव रक्ततीर्थ इरम म्हणून प्रसिद्ध आहे. हे ठिकाण म्हणजे शौर्य, देशभक्ती आणि त्यागाची साक्ष आहे.

इरम हत्याकांड हे पंजाब मधील जालियनवाला बाग हत्याकांड यामध्ये बऱ्यापैकी साधर्म्य आहे.

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या दुसर्‍या क्रमांकाची हत्या इरममध्ये घडली.

अजून खोलात जाऊन सांगायचं म्हणजे भारत छोडो चळवळीच्या संपूर्ण काळात ब्रिटिश पोलिसांनी केलेले सर्वात मोठे हत्याकांड म्हणजे इरम हत्याकांड होय.

 

eram massacare inmarathi
scroll.in

 

भौगोलिक दृष्टीने इरम पूर्वेस बंगालचा उपसागर, उत्तरेस आणि पश्चिमेस कांसबांसा नदी, दक्षिणेस गमोई नदीने वेढलेले आहे.

भौगोलिक परिस्थिती मुळे इरम तेव्हा मागासलेले ठिकाण होते. म्हणून १९२० पासून हे ठिकाण स्वातंत्र्यसेनाणींचे पूर्वेकडील एक केंद्र बनले होते.

उत्कलमणि गोपबंधु दास आणि उत्कलकेशरी हरेकृष्ण महताब या प्रख्यात स्वातंत्र्य सेनानींनी इरमचा वापर स्वातंत्र्य चळवळीचं केंद्र म्हणून वापरण्यास सुरवात केली.

इरमने १९२० मध्ये असहकार चळवळ आणि १९३० मध्ये मिठाच्या सत्याग्रहात सक्रिय भूमिका बजावली होती.

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या मिठाच्या सत्याग्रहाला पाठिंबा म्हणून इरम मधील हजारो नागरिकांनी सत्याग्रहात आपला सहभाग नोंदवून समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून सरकारी आदेशाची अवहेलना केली.

ओडिशाच्या मीठ सत्याग्रहात क्रांतिकारक-राष्ट्रवादी कवी बंचनिधी मोहंती सर्वात पुढे होते.

 

mohanty inmarathi
mokatha.blogspot.com

 

स्थानिक नागरिकांमध्ये ब्रिटिशांविरोधात असंतोष उत्पन्न करण्यास मोहंती यांच्या राष्ट्रभक्तीयुक्त गीतांचा खूप मोठा हात होता.

मोहंती लिहितात, “स्वराज बिहूने नाघूनचिबा असा,सुरुजा बिहूने नाघूनचिबा दुख निसा”

अर्थात, स्वातंत्र्याशिवाय कोणतीही आशा नाही, स्वातंत्र्याशिवाय कोणत्याही दुःखाचा अंत नाही.

“कहा केऊन जाती पैची मुकाती,करी हरी,हुरी,गुहरी.” अर्थात, कोणत्याही राष्ट्राला दयेने आणि सहानुभूतीने स्वातंत्र्य मिळालेलं नाही.

१९३८ मध्ये कवी मोहंती यांचे निधन झाले. परंतु, स्वातंत्र्याची ज्वाला जनतेच्या मनात पेटवून ते लोकांच्या हृदयात कायम राहिले.

त्यांच्या निधनानंतर इरमच्या लोकांनी त्यांचे स्वतंत्र असे राज्य स्थापन केले आणि त्याचे नामकरण केले ‘स्वाधीन बंचनिधी चकला.!’

 

 

eram smarak inmarathi
banchhanidhimohanty.org

 

इरमच्या या राज्यात सत्तावीस खेडे व सहा पंचायत हद्दी समाविष्ट झाल्या होत्या. राज्यात एक राष्ट्रपती आणि पंतप्रधान होते. स्वतःचे सैन्य होते.

न्यायव्यवस्था,गुप्तहेर खातं,दारूगोळा डेपो आणि तुरूंग सुद्धा होते. इरमच्या या राज्यात ब्रिटिश बहिष्कृत होते. आणि ब्रिटिशांसोबतची मैत्री म्हणजे राजद्रोह होता.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात या वेगाने प्रगती फारच कमी होती. अन ब्रिटिशांना तोंडात बोट घालायला भाग पाडणारी देखील घटना होती.

वर्ष १९४२.  भारत छोडो आंदोलन सुरू झाले आणि इरम मध्ये जोरदार हालचाली व्हायला सुरुवात झाली.

इरम सरकारने ब्रिटिश सरकारला टॅक्स न देणे, ब्रिटिश अधिकृत माध्यमातून धान्य विक्री न करणे, ब्रिटिश पोलिसांचा प्रतिकार करणे अशाप्रकारचे जहाल पावले उचलायला सुरवात केली.

दिनांक २८ सप्टेंबर १९४२. दुपारी इरम मेलाना मैदान येथे इरमच्या ग्रामस्थांची बैठक भरली.

 

rakta tirtha inmarathi
bhadrak.nic.in

 

२४ वर्षीय तरुण तडफदार कमला प्रसाद कर यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांच्या विरुद्ध कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी ही एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली.

जवळपास १०,००० ग्रामस्थांनी या सभेला हजेरी लावली होती.

आणि सभेत आंदोलनाचं हत्यार उगारण्याचे एकमताने ठरले.

इरम मधले हे आंदोलन रोखण्यासाठी तत्कालीन भद्रक उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) कुंजबिहारी मोहंती यांच्या नेतृत्वात ब्रिटीश पोलिसांच्या पथकाने इरमच्या दिशेने कूच केली.

पोलिस दल जसे तिथे पोहोचले तसे वंदे मातरम्, इंकलाब झिंदाबाद, ब्रिटीश राज मुर्दाबाद, महात्मा गांधी की जय सारख्या घोषणांनी इरम चे आकाश दुमदुमून गेले.

पोलीस अधिकारी कुंजबिहारी मोहंती यांनी येथे जनरल डायर यांचा रोल निभावला आणि शांततापूर्ण चाललेल्या निदर्शकांवर त्यांनी पोलिस दलाला गोळीबार करण्याचा आदेश दिला.

३०४ गोळ्यांच्या फैरी झाडल्या गेल्या. २८ स्वातंत्र्यसैनिकानी या गोळीबारात आपले प्राण गमावले. नंतर जखमी झालेले एक सेनानी वीरगतीला प्राप्त झाले.

 

eram kand inmarathi
zeenews.india.com

 

ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्यात परी बेवा नावाच्या एक महिला सुद्धा होत्या. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महिला हुतात्म्यांपैकी त्या एक आहेत.

आणि सर्वात लहान हुतात्म्यांपैकी १३ वर्षीय बिरुली दास यांचा समावेश आहे.

नरसंहार दरम्यान त्या शुरांचे घोषणा देणे बंद नव्हते. ते म्हणत होते. “आम्ही प्राण त्यागू,पण घाबरून अजिबात राहणार नाही.!”

दिवस मावळतीकडे निघाला. तसे गोळ्या संपल्यामुळे पोलिसांनी माघार घेतली.

इरम मधील या हत्याकांडानंतर ब्रिटीश पोलिसांनी इरमच्या ग्रामस्थांवर अत्याचार बरेच महिने चालू ठेवला होता.

इरमच्या या आंदोलनाचे मुख्य सूत्रधार कमला प्रसाद कर यांना ब्रिटीश पोलिसांनी अटक केली. त्यांना दोषी ठरवून कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

पुढे स्वातंत्र्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. कमला प्रसाद कर यांनी सप्टेंबर २००२ मध्ये शेवटचा श्वास घेतला.

 

eram hutatma inmarathi
indspice.com

 

ब्रिटिश सरकारने महसूल विभागीय आयुक्त इ.सी.अन्सोंग आणि पोलिस महानिरीक्षक बी.ओ.पर्कीन यांच्या नेतृत्वाखाली इरम हत्याकांडाच्या चौकशी साठी आयोगाची स्थापना केली.

आश्चर्य म्हणजे इरमला भेट न देता या दोन्ही वरिष्ठ ब्रिटीश अधिकाऱ्यांनी भद्रक शहरातून बनावट चौकशीचा अहवाल तयार करून तो सरकार दफ्तरी जमा केला.

निःसंशयपणे अशा क्रांतीला भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात विशेष स्थान असले पाहिजे होते. परंतु दुर्दैवाने या ऐतिहासिक घटनेस स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात जागा नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?