' हानिकारक हेअरकलर्सना करा बाय! हे घरगुती उपाय करून केसांना द्या आकर्षक रंग! – InMarathi

हानिकारक हेअरकलर्सना करा बाय! हे घरगुती उपाय करून केसांना द्या आकर्षक रंग!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

जसं जसं वय वाढू लागतं, तसं तसं वय आपल्या खुणा अंगोपांगी दाखवू लागतं. केस, त्वचा, डोळे यांवर याचा परिणाम हळूहळू दिसू लागतो.

सगळ्यात आधी केस रंग बदलू लागतात. एखादा एखादा पांढरा केस दिसू लागतो. म्हणता म्हणता एका केसांची जागा एक बट घेते. आणि माणूस मग ती स्त्री असो की पुरुष खडबडून जागा होतो.

केसांमधली बट चंदेरी डोकावून हसते,

झाले आले म्हातारेपण सांगुनिया डिवचते!!!  – अशी गत होते.

 

gray-hair 1 InMarathi

 

मग केस डाय करावे वाटणं स्वाभाविक असतं. आणि त्या हेअर कलरच्या जाहिराती बघून त्यातल्या त्यात चांगला दर्जा असलेला आणि खिशालाही परवडेल असा हेअर कलर आपण घ्यायला जातो.

पार्लर मध्ये जाऊन लावूनही येतो. पण हा हेअर कलर सगळ्यांनाच सोसतो असं नाही. कुणाला अॅलर्जी होते. चेहऱ्यावर सूज येते, डोळे चुरचुरु लागतात.

कुणाच्या त्वचेलाही सहन होत नाही आणि हेअर कलर जिथे लागतो तेथील त्वचा जळजळणे किंवा चट्टे उठतात. मग नाईलाजाने हेअर कलर बंद करावा लागतो.

पण बाहेर जाणाऱ्या लोकांना, सदैव प्रेझेंटेबल रहावं लागणाऱ्या लोकांना हे असं राहणं म्हणजे गबाळा कारभार वाटतो. वाढलेल्या वयाचा क्लासी लुक सगळ्यांनाच जमतो असंही नाही.

यातही काही लोकांना कमी वयातच केस पांढरे होण्याचा संभव असतो. त्यांना हे हेअर कलर करणं क्रमप्राप्तच होतं. शिवाय फॅशन म्हणून केस रंगवणारे लोक पण आहेतच.

 

hair spa inmarathi

 

सोनेरी, निळा, बर्गंडी, लाल असे वेगवेगळे हेअर कलर बाजारात उपलब्ध आहेत आणि ते लावून फॅशनेबल राहणारे लोक पण आहेत.

मात्र कोणत्याही हेअर कलर मध्ये अमोनिया असतो ज्यामुळे केसांचा पोत बिघडतो. केस गळू लागतात, निस्तेज होतात. त्यांना फाटे फुटणं या समस्या निर्माण होतात.

या समस्यांवर उपाय आहे? हो आहे!!! घरगुती नैसर्गिक गोष्टी वापरून आपण केसांच्या रंगाबरोबर त्यांचा पोत सांभाळून होणारी हानी टाळू शकतो. त्यासाठी खालील पदार्थ वापरा बघा… नक्की फरक पडेल.

 

१. गाजराचा रस-

 

carrots-inmarathi

 

गाजराचा रस खोबरेल तेल किंवा आॅलिव्ह आॅईलमध्ये मिसळा. हे मिश्रण एकजीव करून केसांवर व्यवस्थित लावा. केसांना शाॅवर कॅपनं झाकून ठेवा आणि एक तासभर हे मिश्रण केसांवर राहू द्या.

एक तासाने apple cider vinegar ने केस धुवून टाका.

जर तुम्हाला अजून गडद लाल रंग हवा असेल, तर दुसऱ्या दिवशी परत एकदा हीच पद्धत वापरा.

२. बीटाचा रस-

 

beet juice inmarathi

 

जर तुम्हाला गडद लाल रंग हवा आहे केसांना, तर बीट हा उत्तम पर्याय आहे. जसा गाजराचा रस वापरला, तसाच बीटाचा रस वापरु शकता. त्याच पद्धतीने!!!

बीटाचा रस काढा आणि तो खोबरेल तेलात किंवा आॅलिव्ह आॅईलमध्ये मिसळा. हे मिश्रण एकजीव करून केसांवर व्यवस्थित लावा.

केसांना शाॅवर कॅपनं झाकून ठेवा आणि एक तासभर हे मिश्रण केसांवर राहू द्या.

एक तासाने केस धुवून टाका. छान गडद शेड मिळेल तुमच्या केसांना!!!

 

३. मेहंदी-

 

hair dye inmarathi

 

ही केस रंगवण्यासाठी सर्रास वापरली जाते. असं तर सणावाराला, लग्न कार्यात हातावर मेहंदीची डिझाईन काढतातच, पण केस रंगवण्यासाठी मेहंदी वापरली जाते.

मेहंदीच्या निम्मे पाणी घ्या आणि गुठळ्या होऊ न देता एकसारखी मेहंदी भिजवून घ्या. १२ तास हे मिश्रण भिजू द्या.

नंतर केसांचे थोडे थोडे भाग करुन मेहंदी केसांवर लावा. शाॅवर कॅपनं किमान दोन तास मेहंदी लावलेले केस नीट झाकून ठेवा.

दोन तासांनी मेहंदी केसांवर रंगेल.आणि मग केस धुवून टाका.

 

४. लिंबाचा रस-

 

lemon juice-inmarathi01

 

लिंबाच्या रसामुळे केसांना फार छान चमक येते. वर सांगितलेल्या उपायांपेक्षा हा उपाय कायमस्वरूपी आहे.

लिंबाचा रस काढा. एका बाउलमध्ये घाला. केसांना थोडे थोडे भाग करुन तो रस लावा. रस सगळीकडे नीट लागावा म्हणून कंगव्याने केस विंचरुन घ्या.

सूर्यप्रकाशात थोडा वेळ बसा. एक तासाने केस स्वच्छ धुवून घ्या.

यामुळे तुमच्या केसात कोंडा असेल तर तो कमी होण्यासाठी देखील मदत होईल.

 

५. काॅफी-

 

coffee inmarathi

 

काॅफी हा अजून एक नैसर्गिकरित्या केस रंगवण्याचा उपाय. काॅफीच्या बिया फारच उपयुक्त आहेत.

अर्धा कप पाण्यात दोन चमचे काॅफीची पावडर टाका. एक कप लिव्ह इन कंडीशनरमध्ये उकळलेलं काॅफीचं पाणी आणि एक चमचा काॅफीच्या बिया मिसळा.

तयार झालेलं मिश्रण केसांना लावा. एका तासाने केस स्वच्छ धुवून टाका.

काॅफी फार काळ रंग टिकवू शकत नाही, पण केस लगेचच रंगवायचे असतील तर ऐनवेळी हा उपाय करा.

 

६. साजीची पाने-

 

sage leaves inmarathi

 

हा अजून एक उपाय. तुमचे केस गडद तपकिरी रंगाचे करण्यासाठी हा उपाय अतिशय उपयुक्त आहे.

दिड कप साजीची पाने पाव भांडे उकळत्या पाण्यात टाकावीत. आणि ते अर्धा तास उकळू द्यावे. तुम्ही जितकं जास्त उकळाल तितकं जास्त त्याचा अर्क उतरुन गडद रंग बनतो.

नंतर हे पाणी गार झाल्यावर त्यातील साजीची पाने बाहेर काढून टाका.

केस धुवून झाले की हे पाणी केसांवर ओता. जितकं शक्य तितकं जास्त वेळ ओता.

किमान पंधरा मिनिटे हा अर्क केसांवर राहीला पाहिजे.

 

७. कॅमोमाईल चहा-

 

chamomile flower inmarathi

 

कॅमोमाईल ही डेझीच्या फुलासारखी फुलं आहेत. ती उकळून पाणी थंड करावे. फुलं काढून टाकावीत.

केस धुवून झाले, की हे पाणी केसांवर ओता. जितकं शक्य तितकं जास्त वेळ ओता. किमान पंधरा मिनिटे हा अर्क केसांवर राहीला पाहिजे.

या नैसर्गिक उपायांनी तुम्हाला नुसते केस रंगवूनच मिळणार नाहीत, तर केसांचं आरोग्य चांगलं राहील. केसांवर नैसर्गिक चमक येतेच, शिवाय इतर तक्रारी कमी होतात.

हा रंग जास्तीत जास्त दिवस टिकावा यासाठी खालील प्रमाणे काळजी घ्या-

 

hair color inmarathi'

 

१. हेअर ड्रायर, स्ट्रेटनिंग आयर्न, कर्लिंग आयर्न यांचा वापर मर्यादित प्रमाणात करा.

२. गरम पाण्यानं केस वारंवार धुवू नका.

३. केस धुण्यासाठी वापरता ते पाणी जड असू नये. फिल्टर करुन हलके केलेले पाणीच शक्यतो वापरा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?