' निरोगी राहण्यासाठी जर रोज व्हिटॅमिनच्या गोळ्या खात असाल तर थांबा, आधी 'हे' वाचा

निरोगी राहण्यासाठी जर रोज व्हिटॅमिनच्या गोळ्या खात असाल तर थांबा, आधी ‘हे’ वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्या कोरोनाची भीती प्रत्येकाच्याच मनात आहे. त्यापासून वाचण्यासाठी जमतील ते सगळे उपाय सध्या घरबसल्या लोकं करत आहेत.

आपल्या आरोग्याबद्दल अती काळजी बाळगून तुम्ही विविध जीवनसत्वे, खनिजे आणि मिनरल्स असलेली औषधे घेता का?

 

medicine-inmarathi
stylecraze.com

 

अमेरिका आणि युरोप सारख्या देशांत एकूण लोकसंखेच्या निम्मे नागरिक कोणती ना कोणती व्हिटॅमिनची गोळी घेत असतात. आणि याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाताना दिसतंय.

परंतु, अशा रितीने पूरक व्हिटॅमिनच्या गोळ्या रोजच्या रोज किंवा अनावश्यक असताना घेणे हे योग्य तर नाहीच, पण कधी कधी हानीकारक देखील ठरते.

 

पोषक आहार हा प्रथम महत्त्वाचा –

 

balanced diet inmarathi
firstcryparenting.com

 

जेवणाव्यतिरिक्त पूरक व्हिटॅमिनच्या गोळ्या किंवा औषधे यांची गरज फक्त गरोदर महिला, बाळाला पाजणाऱ्या महिला आणि विशिष्ट व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे आजारी पडलेले लोक यांनाच असते.

त्यापेक्षा पोषक आहार हा मात्र सर्वांनी घेणं अधिक चांगलं असतं.

पोषक आहार व्यवस्थित घेऊनही जर शरीरात जीवनसत्वांची कमतरता राहत असेल, तरच तेही डॉक्टरांचा सल्ला घेऊन गोळ्या घ्याव्यात.

 

medicines-inmarathi01
choice.com.au

 

तज्ज्ञ सांगतात, की आरोग्यदायी आहाराला व्हिटॅमिनच्या गोळ्या हा पर्याय नाही. अगदी व्हिटॅमिन सी किंवा कॅल्शियमची एक गोळी घेणं हे देखील नाही. त्याऐवजी ते मिळवून देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

पोषक आहार घेणं हे सप्लिमेंटरी व्हिटॅमिनच्या गोळ्या घेणं यापेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगले आहे.

पण आज या व्हिटॅमिनच्या, टॉनिकच्या गोळ्यांनी बाजारात मुसंडी मारलेली आहे. अनेक कंपन्या आपल्याला विविध प्रकारच्या जीवनसत्वांच्या गोळया विकत असतात.

आहाराचा विचार केला, तर जेवढे उत्तम आरोग्य आपल्याला चौरस आहारातून मिळते, तेवढे कोणत्याही जीवनसत्वाच्या गोळ्यांतून मिळत नाही हे सत्य आहे.

उदाहरणार्थ, आपण जेव्हा फळं आणि हिरव्या भाज्या खातो तेव्हा त्यातून नुसती जीवनसत्वेच नव्हे, तर त्यात असलेले फायटोकेमिकल्स आणि फायबर्स देखील आपल्या शरीराला मिळतात. जीवनसत्वाच्या गोळ्यांतून तुम्हाला या गोष्टी मिळत नाहीत.

 

medicines-inmarathi05
medicalnewstoday.com

 

तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिनच्या गोळ्या घेत राहणे ही शरीरापेक्षाही अनेकदा लोकांची मानसिक गरज बनलेली असते.

अशा लोकांना सतत असे वाटते, की आपण खात असलेल्या अन्नातून आपल्याला योग्य ती जीवनसत्वे मिळत नाहीत.

सतत असा नकारात्मक विचार केल्याने मग अशा गोळ्या घेणे ही मानसिक गरज होऊन बसते. प्रत्यक्षात तितकी गरज नसतेच.

सध्या तरी मोठे आजार होऊ नयेत म्हणून व्हिटॅमिन खात राहिल्याने तसा परीणाम मिळेल आणि आजार होणारच नाहीत असं काही सिद्ध झालेलं नाही.

व्हिटॅमिनच्या गोळ्या या शेवटी सप्लिमेंट्स आहेत. मुख्य आहार नव्हे. हे लक्षात ठेवायला हवं. आहार पोषक नसेल, आणि गोळ्या घेत राहाल तर त्याचा अपेक्षित परीणाम मिळणार नाहीच.

योग्य, पोषक चौरस आहाराचे आरोग्याला अनेक इतरही फायदे मिळतात. ते पूरक गोळ्यांनी मिळत नाहीत.

उदा. योग्य आहार विहारामुळे ताणतणावापासून मुक्ती मिळते. झोप चांगली लागते. अन्नातील फायबरमुळे पोट साफ होते. शरीरातील अंतर्गत अवयवांना हालचाल आणि व्यायाम मिळतो.

 

अती तेथे माती –

 

medicines
irishtimes.com

 

कुठल्याही गोष्टींचा अतिरेक वाईट असतो. त्याचे दुष्परिणाम असतात. त्याचप्रमाणे गरज नसताना काही विटॅमिन्स सतत घेतल्याने त्याचे देखील दुष्परीणामच होतात.

उदा. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, निएसिन, फॉलिक ऍसिड, कॅलशिअम, आणि आयर्न हे जर शरीरात गरजेपेक्षा जास्त झाले तर त्याचे दुष्परिणाम होतात.

गरज नसतानाही जर तुम्ही आयर्न सप्लिमेंट्स घेत राहिलात तर अतिरिक्त आयर्न शरीरात साठून तुम्हाला आतड्याचे आणि लिव्हरचे त्रास उद्भवू शकतात.

योग्य आहारतज्ज्ञ, डॉक्टर इत्यादींच्या सल्ल्याशिवाय आणि गरजेशिवाय सप्लिमेंट्स घेऊच नयेत.

अतिरिक्त झिंकही शरीरातील आयर्न आणि कॅल्शिअम शोषून घेते आणि मग पर्यायाने या दोन व्हिटॅमिन्सची शरीरात कमतरता जाणवू शकते.

अतिरिक्त कॅल्शिअमच्या सेवनाने किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते.

अतिरिक्त व्हिटॅमिन डी मुळे पचनसंस्थेभोवतालच्या आणि श्वसनसंस्थेभोवतालच्या स्नायूंमध्ये कॅल्शिअम साठून राहण्याची शक्यता वाढते.

 

vitamin d inmarathi 2
bbc.com

 

कुठल्याही गोष्टींच्या काही मर्यादा असतात.

जेव्हा तुम्ही आहार देखील पौष्टीक, चौरस घेता आणि वरून व्हिटॅमिनच्या गोळ्या देखील अनावश्यकपणे घेत राहाल, तर तुमच्या शरीरात अतिरिक्त व्हिटॅमिन्सची भरमार होऊन त्याचे वरील सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे दुष्परिणाम होऊ शकतात.

म्हणजे आहार योग्य असेल, तरी व्हिटॅमिन्स घेण्याची गरज नसते. आणि आहार योग्य नसेल आणि फक्त व्हिटॅमिनच्या गोळ्या खात राहणे हे देखील चांगले नसते.

कधी कधी नॅचरल विटॅमिनच्या नावाखाली अतिरिक्त विटॅमिन्स घेतली जातात. परंतु नॅचरल असली तरी ती आवश्यकतेपेक्षा अधिक शरीरात गेली तर त्याचे दुष्परीणामच होणार.

शिवाय दोन विरोधी व्हिटॅमिन्स एकाच वेळी घेतली तर ती परस्परांवर परीणाम करतात.

 

vitamin inmarathi
holistic-medicine.com

 

शिवाय प्रत्येक व्यक्तीची शारीरिक गरज वेगळी असल्याने, प्रत्येक व्यक्तीला लागणारी व्हिटॅमिन्स किंवा त्या व्यक्तीच्या शरीरातील व्हिटॅमिन्सची कमतरता ही भिन्न भिन्न असू शकते.

अशा वेळी प्रत्येकानेच सगळी व्हिटॅमिन्स घेत राहणे हे योग्य नव्हे.

म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय अशी व्हिटॅमिन्स घेत राहू नये. तज्ज्ञ तुमचा आहार बघून देखील तुम्हाला विशेषतः कोणत्या सप्लिमेंटची आवश्यकता आहे ते सांगू शकतात.

 

व्हेगन्स –

 

vitamin b12 inmarathi
bodyandsoul.com.au

 

व्हेगन्स लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता निर्माण होऊ शकते. कारण शाकाहारी जेवणातून बी१२ हे जीवनसत्त्व उपलब्ध होत नाही.

त्यामुळे तुम्ही जर शाकाहारी असाल, तर तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने बी१२ च्या सप्लिमेंटरी गोळ्या घेऊ शकता.

 

गरोदर स्त्री –

 

medicines taking inmarathi 2
naturally savvy.com

 

गरोदरपणात स्त्रियांच्या शरीरात फॉलिक ऍसिड, आयर्न, कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी यांची कमतरता निर्माण होते.

ओमेगा-३ फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन बी, सी इत्यादीही अशा गरोदर स्त्रीला आवश्यक भासते. तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याने अशा गोळ्या जरूर घ्याव्यात.

 

मेनोपॉझनंतर स्त्रिया –

 

menopause inmarathi 3

 

मेनोपॉजनंतर स्त्रियांच्या हाडांतील कॅलशिअम कमी होऊ लागते, त्यासाठी कॅलशिअम आणि व्हिटॅमिन डी घेण्याची आवश्यकता असते.

तेव्हा हाडांच्या आरोग्यासाठी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स जरूर घ्या.

 

म्हातारी माणसे –

 

medicines-inmarathi04
livemint.com

 

म्हाताऱ्या माणसांच्या शरीरात व्हिटॅमिन डी तयार होणे बंद होते. त्यामुळे त्यांना सप्लिमेंटरी गोळ्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने द्याव्यात.

थोडक्यात, अशा रितीने जिथे आवश्यक असतील तिथेच व्हिटॅमिन सप्लिमेंट्सच्या स्वरुपात गोळ्या औषधे घ्यावीत. आपल्याच मनाने कुठल्याही गोळ्या घेऊ नयेत. आणि सतत तर अजिबात घेऊ नयेत.

पोषक आहार हा कधीही या सप्लिमेंटपेक्षा खूप महत्त्वाचा असतो. चौरस आहार योग्य वेळी घेत असल्यास सहसा अशा सप्लिमेंट्सची गरज राहत नाही. डॉक्टरांच्या किंवा डाएटीशियन्सच्या सल्ल्याशिवाय कोणतीच औषधे घेऊ नयेत.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?